जे दुःखी, कष्टी आणि पीडित आहेत, त्यांना जो माणूस आपलं मानतो, तोच खरा साधू (संत) आहे आणि त्याच्या ठिकाणीच देव वास करतो हे सांगणारा संत तुकाराम यांचा 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा अभंग सुरसिद्ध आहे.अभंग सुप्रसीद असला तरी प्रत्यक्षात त्या प्रमाणे वागणारे हाताचा बोटावर मोजता येतील इतकेच लोक आचरण करत असल्याचे आपणास सहज दिसते. या मोजक्या लोकांमध्येच मोजता येतील असे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे होय. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी, दिव्यांग, वनवासी व्यक्ती आणि यासारख्या समाजातील मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या नागरिकांना समजाजच्या मूळ प्रवाहात आणण्यसासाठी लोक बिरादरी, हेमलकसा, आनंदवन सोमनाथ आदी प्रकल्प उभारले आहेत . या प्रकल्पाची माहिती देणारी पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध आहेत अश्याच प्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकांपैकी एक म्हणजे बाबा आमटे यांचे सुपुत्र असलेल्या डॉ विकास आमटे यांनी लिहलेले "आनंदवन लोकवन हे पुस्तक .या पुस्तकात डॉ विकास आमटे "आनंदवन चा इतिहास उलगडला आहे .हे पुस्तक मी नुकतेच वाचले
या पुस्तकात १९० पानाच्याद्वारे ७ प्रकरणातूनरंजक पद्धतीने आनंदवनची गोष्ट उलगड जाते.पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे. जी वाचल्यावर चटकन समजते .सलग वाचल्यास कंटाळा येतो हे लक्षातघेऊन जाणीपूवक पुस्तकात विविध चित्रे देखील देण्यात आलेली आहेत ज्यामुळे पुस्तक वाचताना आपण त्यात रंगून जातो आणि पुस्तक कधी वाचून संपले हे लक्षात सुद्धा येत नाही. पहिल्या प्रकारांत डॉ विकास आमटे यांनी गोष्ट सांगण्यापूर्वी या शीर्षकाखाली हे पुस्तक का लिहले? हा हेतू सांगितला आहे ज्यात त्यानी अधिकृत माहिती व्हावी यासाठी हे पुस्तक लिहले असल्याचे सांगितले आहे. या पुस्तकाचे लेख कसे झाले ? कोणी त्यास मदत केली हे या प्रकरणातून सांगण्यात आले आहे. एका प्रकारे हि पुस्तकाची प्रस्तावनाचं ते असे पण म्हणू शकतो दुसऱ्या प्रकरणात बाबा आमटेयांना आनंदवनाची संकल्पना कशी सुचली ?त्यांनी आनंदवन उभारण्याच्या आधी कोणते प्रकल्प उभारले ? त्यावेळी त्यांना काय अनुभवलं आले ? आनंदवन उभारण्याचं आधी बाबा आमटे उदर्निर्वाहासासाठी काय करत होते हे सांगितले आहे.आनंदवनची निर्मिती करताना बाबा आमटे यांनी आलेल्या अडचणींवर कोणत्या प्रकारे मात केली ? आनंदवनची सुरुवात कोणत्या प्रकारे झाले डॉ विकास आमटे यांचे आनंदवनातील बालपणीचे अनुभव सांगितले आहे.झडलेली बोटे ,निर्मितीक्षम हात असे शीर्षक असलेल्या या प्रकरणातून आनंदवन काय आहे हे समजण्याची आपली पूर्वपीठिका तयार होते तिसऱ्या प्रकरणात ?रोगमुक्तीचा वाढता परीघ या शीर्षकाखाली आपण आनंदवनचे करी कसे विस्तारित गेले कुष्ठरोग्यांच्या सेवेतून सुरु झालेले आनंदवनच्या कर्यणारे अपंग कल्याण आणि अन्य आरोग्यविषयक सेवा देण्यास कोणत्या प्रकारे सुरुवात केली .किंबहुना असे करणे सुरु करावे असे बाबा आमटे आणि आनंदवन व्यवस्थापनास का वाटले हे संगितले आहे चौथ्या प्रकरणात आनंदवनात शेती करणे कोणत्या पद्धतीने सुरु कऱण्यात आले , मुळात त्यांची गरज का भासली आजमितीस आनंदवनातील शेतीचे स्वरूप काय आहे ? आज आनंदवनास भेट दिली असता आपणास दाट जंगलात आल्यासारखे वाटते ? या जंगलाची निर्मिती कशी झाली ?याची माहिती देण्यात आली आहे २९ पानाच्या या प्रकरणाचे नाव हिरव्या निर्मितीचा ध्यास असे आहे / उद्योगातून आत्मसन्मान असे शीर्षक सलेल्या पाचव्या प्रकरणात ३० पानांद्वारे डॉ विकास आमटे यांनी आनंदवनातविविध प्रकारचे व्यवसाय करणे कसे सुरु झाले? आनन्दानात कोणते उद्योग सध्या सुरु आहेत ? आनंदवनात सुरु झालेले कोणते उद्योग काही कारंणारे बॅड झाले आहेत का ? याची माहिती मिळते या प्रकरणात आनंदवनाखेरीज बाबत आमटे त्यांच्याकडून अन्य कोणते उपक्रम राबवण्यात येतात याची तोंडओळख करून देण्यात अली आहे तर पुढच्या म्हणजेच सहाव्या प्रकरणात ज्याचे नाव कुष्ठमुक्तांचे हात वंचितांच्या मदतीला असे आहे त्यात या विषयी सविस्तर सांगण्यात आले आहे अखेरच्या सातव्या प्रकरणात आनंदवनाच्या व्यस्थापनविषयी आणि आमटे परिवाराच्या सध्याच्या शिलेदारणमाची ओळख करून देण्यात आले आहे
आनंदवन म्हणजे फक्त कुष्ठरोगाशी संबंधित संस्था नव्हे तर त्याही पलीकडे आनंदवनाचे कार्य आहे हे कार्य समजून घेण्यासाठी किमान एकदा तरी हे पुस्तक वाचाच
मी थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्याविषयी वाचलेले हे दुसरे पुस्तक मी वाचलेल्या पहिल्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा