रोजच्या जगण्यात आपणास अनेक अनुभ पदोपदी येत असतात. काही अनुभव सुखद असतात .काही अनुभव दुःखद असतात.हेर अनुभव आपण काही ठरवून केले किंवा नाही केले तरी आपली पाठ सोडत नाहीत ते येतातच आपला सुखद अनुभव आपण दुसऱ्याला विविध प्रकारे सांगायचं प्रयत्न करतो माझे आजचे लेखन त्याच पठडीतील
तर त्याचे असे झाले की काहीसा मोकळा वेळ मिळाल्याने पूर्वी फारसा न उघडलेला एक टेलिग्राम ग्रुपवरील मेसेज वाचत होतोकधीतरी जॉईन केलेला तो टेलिग्राम ग्रुप होता तो त्या ग्रुपवर अनेक पुस्तकाच्या पी डी एफ होत्या मला वाचनाची मुळातच वाडा असल्याने मी भस्म्या झाल्यासारख्या त्या डाउनलोड करत होतो ग्रुपवरील पीडीएफ डाउनलोड करताना एक नुकताच ग्रुपवर आलेल्या पीडीएफ ने माझे लक्ष वेधून घेतले ती पीडीएफ होती ब्रिटिश चेस मॅगझीन मे २०२६ च्या अंकाची मला वाचनवाबरोबर बुद्धिबळाच्या देखील आवडीचे असल्याने मी पीडीएफ डाउनलोड करणे थांबवून ती वाचायला सुरुवात केली
ब्रिटिश चेस मॅगझीन मे २०६ विषयी सांगायचे झाल्यास मासिकाचे आपण
* भाषेची काठीण्य पातळी
* आशय मांडण्याची शैली पुस्तक प्रकार पारंपरिक छापील
* विषयाची निवड
* मुद्दा समजावा म्हणून वापरण्यात आलेले फोटो
या मुद्द्यावरून परीक्षण करू शकतो. आता एक एक मुद्दा स्वतंत्रपणे सविस्तरपणे बघुया
मासिकाची भाषा सहजसोपी आहे. ज्याचे शिक्षण दहावीपर्यत झाले आहे. अशी व्यक्तीसुद्धा सहजतेने समजू शकेल,इतक्या सोप्या भाषेत लिहिलेले आहे. मात्र भाषा सोपी आहे ना मग त्यात माहितीचा अभाव असला तरी कुठे वाईट आहे.सोप्या भाषेत आधी विषय समजून घ्या.आणि सविस्तरपणे सखोल अभ्यासासाठी कठिणभाषेतील पुस्तके अभ्यासा असा दृष्टिकोन या ठिकाणी आढळत नाही.सोप्या भाषेत लिहिलेले असून देखील विषयाला पूर्ण न्याय दिल्याचे पुस्तक वाचताना समजते.
आशय मांडण्याची शैली बाबत बोलायचे झाल्यास विषय मांडतांना अनावश्यक फाफटपसारा टाळलेला स्पष्टपणे दिसतो.विषयाची पार्श्वभुमी मांडायला जास्त शद्ब न घेता थेट मुद्द्याला हात घातल्याने बुद्धिबळाचा अभ्यास करण्यासाठी मासिकाचे वाचन करणाऱ्या व्यक्तीच्या अनावश्यक वेळ वाचतो.
विषयाची निवड : मासिकाचा विषय मुळातच बुद्धिबळ असल्याने हा मुद्दा गैरलागू असल्याचे प्रथमदर्शनी वाटेल,किंवा बुद्धिबळविषयक असल्यान बुद्विबळ विश्वातील क्रमांक दोनच्या स्पर्धेविषयी माहिती येणार असे वाटत असले तरी ते पुरेसे नाही.असे मला वाटते. मासिकाचा पुर्ण रोख बुद्धिबळपटुंच्या खेळावरच केंद्रीत आहे.त्यांच्याविषयी इतर माहिती देणारे लेख किंवा स्पर्धेविषयी माहिती देणारे लेख,किंवा या सारख्या मुळ खेळाशी संबंधित नसणाऱ्या बाबी सांगत उगीच पानांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. खेळाडूंच्या खेळाचे विश्लेषण करताना महिला खेळाडुंना कमी जागा दिल्याचे जाणवते.जे माझ्यामते काहीसे अयोग्य आहे.असो कदाचित पुढील अंकात जास्त महत्व देतील.
मुद्दा समजावा म्हणून वापरण्यात आलेले फोटो
कोणत्याही क्रीडा विषयक मासिकात फोटो खुप महत्त्वाची भुमिका बजावतात. खेळातील उत्तम क्षणाचा फोटो खेळातील उत्सुकता वाढवतो.बुद्धिबळासारख्या खेळात जिथे दर मुव्ह नंतर बोर्डवरची स्थिती बदलत असते.त्याठिकाणी सातत्याने फक्त मुव्हचे लेखी वर्णन केल्यास गेम समजायला काहीसे अवघड होते.त्यामुळे बुद्धिबळ सारख्या खेळात काही मुव्हनंतर बोर्डचा फोटो मस्ट ठरतो. मात्र सातत्याने जर फोटोच टाकले तर आपण नक्की कोणता फोटो बघत आहोत,आणि कोणत्या फोटोचे डिटेल्स वाचत आहोत,याबाबत कंफ्युज होण्याची शक्यता असते. खेळाविषयी माहिती वाचून तो शिकणाऱ्या खेळाडूंच्या या समस्येच्या या मासिकात खूपच गांभीर्याने विचार केलेला दिसतो.
अचानक गवसलेल्या या खजिन्यामुळे माझा त्यानंतरचा वेळ आनंदातच गेला हे वेगळे सांगायला नकोच



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा