लेखाचे विषय

बुधवार, २४ जून, २०२६

ब्रिटिश चेस मॅगझीन मे 2026 चे वाचन एक सुखद धक्का

रोजच्या जगण्यात आपणास अनेक अनुभ पदोपदी येत  असतात.  काही अनुभव सुखद असतात .काही अनुभव दुःखद असतात.हेर अनुभव आपण काही ठरवून केले किंवा नाही केले तरी आपली पाठ सोडत नाहीत ते येतातच आपला सुखद अनुभव आपण दुसऱ्याला विविध प्रकारे सांगायचं प्रयत्न करतो माझे आजचे लेखन त्याच पठडीतील 
तर त्याचे असे झाले की काहीसा मोकळा वेळ मिळाल्याने  पूर्वी फारसा न उघडलेला एक टेलिग्राम ग्रुपवरील मेसेज वाचत होतोकधीतरी जॉईन केलेला तो टेलिग्राम ग्रुप होता तो त्या ग्रुपवर अनेक पुस्तकाच्या पी डी  एफ  होत्या मला वाचनाची मुळातच वाडा असल्याने मी भस्म्या झाल्यासारख्या त्या डाउनलोड करत होतो ग्रुपवरील पीडीएफ डाउनलोड करताना एक नुकताच ग्रुपवर आलेल्या पीडीएफ ने माझे लक्ष वेधून घेतले ती पीडीएफ होती ब्रिटिश चेस मॅगझीन मे २०२६ च्या अंकाची मला वाचनवाबरोबर बुद्धिबळाच्या देखील आवडीचे  असल्याने मी पीडीएफ डाउनलोड  करणे थांबवून ती वाचायला सुरुवात केली 

 ब्रिटिश चेस मॅगझीन मे २०६ विषयी सांगायचे झाल्यास  मासिकाचे आपण 

* भाषेची काठीण्य पातळी 

* आशय मांडण्याची शैली  पुस्तक प्रकार पारंपरिक छापील 
 
* विषयाची निवड

* मुद्दा समजावा म्हणून वापरण्यात आलेले फोटो 

या मुद्द्यावरून परीक्षण करू शकतो. आता एक एक मुद्दा स्वतंत्रपणे सविस्तरपणे बघुया 

 मासिकाची भाषा सहजसोपी आहे. ज्याचे शिक्षण दहावीपर्यत झाले आहे. अशी व्यक्तीसुद्धा सहजतेने समजू शकेल,इतक्या सोप्या भाषेत लिहिलेले आहे. मात्र भाषा सोपी आहे ना मग त्यात माहितीचा अभाव असला तरी कुठे वाईट आहे.सोप्या भाषेत आधी विषय समजून घ्या.आणि सविस्तरपणे सखोल‌ अभ्यासासाठी कठिण
भाषेतील पुस्तके अभ्यासा असा दृष्टिकोन या ठिकाणी आढळत नाही.सोप्या भाषेत लिहिलेले असून देखील विषयाला पूर्ण न्याय दिल्याचे पुस्तक वाचताना समजते.

आशय मांडण्याची शैली बाबत बोलायचे झाल्यास विषय मांडतांना अनावश्यक फाफटपसारा टाळलेला स्पष्टपणे दिसतो.विषयाची पार्श्वभुमी मांडायला जास्त शद्ब न घेता थेट मुद्द्याला हात घातल्याने बुद्धिबळाचा अभ्यास करण्यासाठी मासिकाचे वाचन करणाऱ्या व्यक्तीच्या अनावश्यक वेळ वाचतो.

विषयाची निवड :  मासिकाचा विषय मुळातच बुद्धिबळ असल्याने हा मुद्दा गैरलागू असल्याचे प्रथमदर्शनी वाटेल,किंवा बुद्धिबळविषयक असल्यान बुद्विबळ विश्वातील क्रमांक दोनच्या स्पर्धेविषयी माहिती येणार असे वाटत असले तरी ते पुरेसे नाही.असे मला वाटते‌. मासिकाचा पुर्ण रोख बुद्धिबळपटुंच्या खेळावरच केंद्रीत आहे.त्यांच्याविषयी इतर माहिती देणारे लेख किंवा स्पर्धेविषयी माहिती देणारे लेख,किंवा या सारख्या मुळ
खेळाशी संबंधित नसणाऱ्या बाबी सांगत उगीच पानांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. खेळाडूंच्या खेळाचे विश्लेषण करताना महिला खेळाडुंना कमी जागा दिल्याचे जाणवते.जे माझ्यामते काहीसे अयोग्य आहे‌.असो कदाचित पुढील अंकात जास्त महत्व देतील.

मुद्दा समजावा म्हणून वापरण्यात आलेले फोटो 

कोणत्याही क्रीडा विषयक मासिकात फोटो खुप महत्त्वाची भुमिका बजावतात‌. खेळातील उत्तम क्षणाचा फोटो खेळातील उत्सुकता वाढवतो.बुद्धिबळासारख्या खेळात जिथे दर मुव्ह नंतर बोर्डवरची स्थिती बदलत असते‌.त्याठिकाणी सातत्याने फक्त मुव्हचे लेखी वर्णन केल्यास गेम समजायला काहीसे अवघड होते‌.त्यामुळे बुद्धिबळ सारख्या खेळात काही मुव्हनंतर बोर्डचा फोटो मस्ट ठरतो‌. मात्र सातत्याने जर फोटोच टाकले तर आपण नक्की कोणता फोटो बघत आहोत,आणि कोणत्या फोटोचे डिटेल्स वाचत आहोत,याबाबत कंफ्युज होण्याची शक्यता असते. खेळाविषयी माहिती वाचून तो शिकणाऱ्या खेळाडूंच्या या समस्येच्या या मासिकात खूपच गांभीर्याने विचार केलेला दिसतो.
अचानक गवसलेल्या या खजिन्यामुळे माझा त्यानंतरचा वेळ आनंदातच गेला हे वेगळे सांगायला नकोच 

आऊट लुक मे २५


 सध्या वाचनासाठी खूपच मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध हे . जर तुमच्याकडे जागा कमी असेल तुम्ही प्रवास्यात असाल तर ईबुक या अत्याधुनिक साधनांच्या आधार तुम्ही आपली वाचनाची भूक भागवू शकता अर्थात पारंपरिक वाचनाच्या तुलनेत ईबुकमध्ये वाचनाचा आनंद काहीसा कमी प्रमाणात मिळत असला तरी अगदीच मिळत नाही असे नाही काही प्रमाणात मिळतो दुधाची तहान ताकावर भागावणे या प्रकारचा आनंद आपणास मिळतो .तर वाचक मित्र- मैत्रिणींनो असाच मर्यादित स्वरूपाचा का होईना मात्र प्रवासात असताना एक वाचनाचा उत्तम अनुभव मला काही दिवसापूर्वी घेता आला.  निमित्त होते माझ्या एका मित्राने मला पाठवलेला आऊट लुक या साप्ताहिकाचा हिंदी भाषेतील २५ मे च्या अंकाची पीडीएफ 
या साप्ताहिकाला  आपण दोन भागात विभाजन करु शकतो. साप्ताहिकाच्या एकुण ५२ पृष्ठांपैकी पहिल्या ३९ पानांचा पहिला भाग आणि उर्वरीत १३ पृष्ठांचा दुसरा भाग असे सरळसरळ विभाजन होईल. पहिल्या भागात राजकीय विषयांवरील लेखन आहे.तर दुसऱ्या भागात चित्रपटसृष्टीविषयक लेखन आहे. माझ्यामते या दोघांचा स्वतंत्र्यपणे विचार करणे संयुक्तिक होईल.

पहिल्या भागाचा विचार  पुढील मुद्द्यांचा आधारे केल्यास, योग्य होईल असे माझे मत आहे.

* साहित्यिक लेखनशैली 
 
* माहिती मांडण्याची लेखनशैली 

* माहितीतील काठीण्य पातळी 

* मांडण्यात आलेल्या विचारांचा कल 

साहित्यिक लेखनशैलीचा विचार करता, पहिल्या भागात छापण्यात आलेल्या वाचकांचा पत्रव्यवहातील भाषेतील शाब्दिक वैविधता खुप उत्तुंग  पातळी गाठणारी आहे‌. तर लेखातील शाब्दिक वैविधता खुपच सामान्य दर्जाची आहे. हिंदी भाषेतील शब्द संग्रह वाढवायचा असल्यास पत्रव्यवहार वाचणे फायद्याचे ठरू शकते.

माहिती मांडण्याची शैलीचा विचार करता पहिल्या भागात छापण्यात आलेल्या लेखांपैकी, 'पश्चिम बंगाल विषयक लेखांचा अपवाद वगळता अन्य सर्व लेख हे वृत्तलेख स्वरूपातील आहेत.जिथं फक्त माहिती देण्यात आलेली आहे.  लेखातील माहितीचे 
पृथ्थकरण, विश्लेषण करुन कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. तथापी पश्चिम बंगालविषयक लेख मोठ्या प्रमाणात निष्कर्षापत पोहोचणारे आहेत.
माहितीतील काठीण्य पातळी या संदर्भात पहिल्या भागातील लेखांचा विचार करता पश्चिम बंगालचा अपवाद वगळता अन्य सर्व लेखात सांख्यिकी माहितीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. या लेखात कुठेही आकडेवारी देण्यात आलेली नाही. पश्चिम बंगाल विषयक लेखात मात्र खुपच मोठ्या प्रमाणात सांख्यिकी आकडेवारी मांडण्यात आलेली आहे.मात्र या सांख्यिकी आकडेवारीचा स्त्रोत लेखात नमुद करण्यात आलेला नाही.मांडण्यात आलेल्या विचारांचा कल हा पुर्णपणे भाजपाला समर्थन देणारा आहे. भाजपाच्या विरोधी पक्षावर अनाठायी टिका केल्याचे लेख वाचताना जाणवणते.
भाग दोन विषयी सांगायचे झाल्यास यामध्ये कृष्णधवल काळातील तसेच पिस्टमन कलर काळातील  चित्रपटांविषयी सांगण्यात आले आहे.लेखनशैली काहीसी कंटाळवाणी, संस्कृतच्या प्रभाव असलेल्या हिंदीशी
साधर्म्य साधणारी आहे.माहितीची सखोलता या विषयी बोलायचे झाल्यास मध्यम श्रेणीत मोडेल इतक्या काठीण्य पातळीची  आहे.या भागातील विषय व्यक्तीकेंद्रीत असल्याने पहिल्या भागात असणारे अन्य मुद्दे येथे गैर लागू ठरतात असे मला साप्ताहिक वाचून वाटले
ईबुकमुळे माझा प्रवास कंटाळवाणा न होता, उत्तम झाला आपण देखील आपणस मिळणारा वेळ नक्कीच वाचनात गुंतवावा असे माझे आपणास अनुभवातून सांगणे आहे कारण जग कितीही ए आय बाबत प्रगती करो वाचनाला पर्याय नाही वाचाल तर वाचाल हे त्रिकालाबाधित सत्य आहे 



शुक्रवार, १२ जून, २०२६

शिक्षणामुळे होणारा बदल दाखवून देणारे आत्मचरीत्र, 'माज्या जल्माची चित्तरकथा'

साधरणत:१९८० ते१९९० या कालखंडात समाजातील शोषित,पिडीत समजला जाणारा तळागाळातील समाज आपल्या लेखनाद्वारे व्यक्त होऊ लागला.पॅथरच्या माध्यमातून आपल्या समाजातील वेदनेला वाचा फोडु लागला. मात्र यात प्रामुख्याने पुरुषवर्गाचे प्रमाण अधिक होते.माता-भगिनी महिलावर्ग तूलनेत यामध्ये काहीसा मागे होता.आता ज्याला आपण समांतर साहित्य/विद्रोही साहित्य म्हणून ओळखतो त्याचा सोन्याचा या दिवसात जी आत्मचरीत्रे प्रसिद्ध झाली,ती प्रामुख्याने पुरुषांनी लिहलेलीच जास्त संख्येने दिसतात.तूरळक स्वरुपात दिसणाऱ्या या महिलांच्या साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मचरीत्र म्हणजे, , 'माज्या जल्माची चित्तरकथा' जे मी नुकतेच वाचले.
शिक्षणामुळे होणारा बदल दाखवून देणारे आत्मचरीत्र म्हणजे 'माज्या जल्माची चित्तरकथा' असे या आत्मचरीत्राबाबत आपण म्हणू शकतो. पहिले दलित महिला आत्मचरीत्र असी ओळख असलेले हे आत्मचरीत्र अन्य  विद्रोही साहित्यातील आत्मचरीत्राप्रमाणेच गावकुस्यात झालेला अन्याय, त्यावर मात करण्यासाठी केलेला
संघर्षाचे दर्शन घडवते.या प्रकारच्या अन्य आत्मचरीत्रात असते, त्याचप्रमाणे सुरुवातीला बोली भाषा आणि पुस्तकाचा साधरणत: अर्ध्यापसून प्रमाण मराठी भाषेतील लेखन आढळते‌.
लेखिकेने  जुनी सातवीपस होऊन शिक्षिका  नोकरीस सुरुवात केली आणि शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाली. या दरम्यान दलित म्हणून अपमानाचे प्रसंग तीला सामोरे जावे लागले . घरची गरिबी आणि सभोवताली शिक्षणास अनुकूल वातवरण नसणे यामुळे तिच्या क्षिक्षणाला अनेकदा विरोध झाला मात्र या अडचणींवर  मत करत सांगली जिल्ह्यातील पहिली दलित शिक्षणाधिकारी म्हणून लेखिकेने आपली कोणत्या प्रकारे छाप सोडली तिची स्थिती सुधारल्यावर लेखिकेचे आप्तेष्ट तिच्याशी कसे वागले,किंबहुना ती तिच्याशी कोणत्या प्रकारे वागली हे सर्व समजून घेयचे असल्यास हे पुस्तक वाचायलाच हवे 

सोमवार, ८ जून, २०२६

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ......

माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत .ते आम्हा तरुणांच्या मोबाईलप्रेमावर सातत्याने  बोलत असतात ते म्हणतात, 'अरे तुमच्या हातात जेव्हा बघावा तेव्हा मोबाईल मोबाईल आणि फक्त मोबाईल अरे जरा वाचत जा'' वाचनाचे महत्व सांगताना या आजोंबाच्या हक्काचे पेटंट म्हणता येईल वाक्य असतेच असते किंबहुना जर त्यांनी वाचनाचे महत्व सांगताना त्यांनी ते वाक्य बोलले नाही तर त्यांना आठवण करून द्यावी का ? की तुम्ही तुमचे नेहमीचे वाक्य बोलला नाहीत विसरले की काय ? असे म्हणावे इतक्या मोठ्या प्रमाणात ते वाक्य म्हणतात. तर आजोबांचे ते हुकुमी वाक्य मुळातील समर्थ रामदास स्वामींचे आहे.  ते म्हणजे ................  प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ...... ते नेहमी सांगतात अरे  मी नाही पण समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे म्हणून तरी वाचा 

मात्र हे आजोबा हे सांगताना एक गोष्ट विसरतात किंबहुना त्यांच्या मुद्दा जोरकसपाने पुढे यावा म्हणून त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात असे म्हणा हवेतर तो म्हणजे मुळात समर्थ रामदास स्वामींना हा उपदेश करण्याची गरज का वाटावी ? माझ्यामते  लोकांची मुळातच वाचनाची प्रवृत्ती नसावी.आज मोबाइलमुले वाचन कमी झालंय असेम्हणतात त्यावेळी दुसरे काही करणे असतील . त्याहीवेळी वाचणारी जनता कमीच असल्याने समर्थाना प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ......हा उपदेश करावा लागला असेल.

समर्थ रामदास स्वामींच्या  काळातही लोकांना वाचनाची सवय लावावी लागत होती. म्हणजेच वाचनाचा अभाव हा नव्या युगाचा दोष नसून, मानवी स्वभावाशी निगडित एक सातत्यपूर्ण प्रवृत्ती आहे, असे आपण म्हणू शकतो ना ?  लोकांच्या वाचनाचा मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आपण असे म्हणू शकतो की, मानवाला सहजसोपे, त्वरित आनंद देणारे आणि कमी कष्टात मिळणारे पर्याय अधिक आकर्षित करतात. वाचन मात्र
एकाग्रता, संयम आणि सातत्याची मागणी करते. त्यामुळे अनेकजण वाचनाकडे दुर्लक्ष करतात. पूर्वीच्या काळातही लोकांच्या आयुष्यात शेती, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांना प्राधान्य होते; त्यामुळे अभ्यासपूर्ण वाचनासाठी वेळ आणि प्रेरणा कमी पडत असे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामीं सारख्या संतांनी  आणि विचारवंतांनी वाचनाचे महत्त्व समजला पटवण्याचा प्रयत्न केला. 

 पूर्वीच्या काळातील कीर्तन, प्रवचन किंवा भागवत सप्ताह. या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असे. लोक कथा आणि अभंग मन लावून ऐकत; परंतु त्या मागील ग्रंथजसे की दासबोध, भागवत, रामायण स्वतः हुन  वाचणाऱ्यांची संख्या तुलनेने कमीच  असे .  “ऐकणे” लोकांना अधिक सोपे वाटत होते वाचन विचारांना परिपक्व करते, निर्णयक्षमता वाढवते आणि व्यक्तिमत्त्व घडवते.हा मुद्दा लोकांनी समजून घ्यायला हवा  पुर्वी कीर्तन, यामुळे
लोक वाचन करायला नाखूष असत आज कीर्तन प्रवचन यांची जागा मोबाईलने घेतली आहे इतकाच तो कायफरक  माणसाची मूलभूत प्रवृत्ती मुळातून बदलली नाहीये पूर्वी सुद्धा वाचनबाबत अनास्था होती आज देखील आहेमात्र त्यामुळे पूर्वी होती त्या प्रमाणे आजदेखील . सखोल, चिंतनशील वाचनाची गरज आजही महत्त्वाची ठरतेय 


सोमवार, १ जून, २०२६

'पोरकी पोरं' मन हेलावून टाकणारे साप्ताहिक सदर

मुल ही देवा घरची फुले, रम्य ते बालपण, या सारख्या वाक्यप्रचारातून कोणत्याही व्यक्तीचा लहानपणाचा काळ हा सुखाचा असतो असे सांगितले जाते. मात्र प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच,असतो. तसा या नियमाला देखील आहे,हो काही लहान मुलांचे आयुष्य करपलेले, दु:खाने ग्रस्त, प्रेमाचा अभावातच सरते. लहानपणी जे मिळणे कोणत्याही व्यक्तीचा मुलभुत म्हणा किंवा नैसर्गिक अधिकार असतो,तो त्यांचापासून दुरावला जातो. आई- वडील किंवा जवळचे सांभाळणारे नातेवाईक नसणारी अनथालयातील मुला-मुलींचाच नव्हे,तर आई -वडील जिवंत असलेल्या काही अभागी मुला-मुलींचा आयुष्याचे देखील रखरखीत वाळवंट झालेले असते. हे सर्व आपणास उलगडते, ते दैनिक तरुण भारतच्या पुणे आवृत्तीत दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या आसमंत या साप्ताहिक पुरवणीतील लेखमालिकेद्वारे. नाशिकचे रहिवासी असलेल्या डॉ.तूषार सावरकर यांनी लिहलेल्या पोरकं पोरं या लेखमालिकेद्वारे आपणास या अभागी मुला-मुलींचा आयुष्यातील दाहक वास्तव समजते‌.

आपल्यापेक्षा कितीतरी मोठे दु:ख ही मुले-मुली भोगत आहेत.यांचा तूलनेत आपले दू:ख काहीच नाही,या जाणिवेतून आपल्या दु:खाला विनाकारण कुरवाळीत बसण्याची कृती किती निरर्थक आहे, याचे आकलन होते.आसमंत ता पुरवणीत शेवटच्या ६ क्रमांकाच्या पानावरील घडीच्या खालच्या अर्ध्या भागातील डाव्या कोपऱ्यातील ही लेखमाला प्रत्येकाने पेफर हातात आल्यावर पहिल्यांदा वाचावीच,असी आहे. थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आडनाव असलेले या लेखमालिकेचे लेखक स्वत:च्या लेखाद्वारे आपणास अरे यांचे दु:ख बघ आणि स्वत:चा दुखातून 'सावर रे' असा जणू उपदेश देतायं,असे लेख वाचताना सातत्याने वाटते.साधरण:  तात्कालीक, त्या त्या वेळी चर्चेत असणारे विषयांवर लेख प्रसिद्व करण्यावर वृत्तपत्रांचा भर असतो,मात्र या सारखे सार्वकालिक जनतेचे खरे दु:ख समाजासमोर आणल्याबद्दल तरुण भारत नागपूर च्या संपादकीय विभागाचे देखील कौतूक करायला हवे.
या लेखमालिकेत आतापर्यत प्रसिद्ध लेखांचा विचार करता, गुन्हेगारांच्या अपत्यांबाबतचा समाजाचा दृष्टिकोन, बांधकाम मजूरांची मुले, रस्त्यावर, सिग्नलवर फिरणारी, रेल्वे स्टेशन रेल्वेत राहणारी मुले, लहान भावंडाची जवाबदारी जवाबदारी पार पाडणारी मुले, रिमांड होम, बालसुधारगृहातील, अनाथालयातील मुले - मुली, तसेच पालकांच्या सवयीमुळे, आई-वडीलांच्या सतततच्या होणाऱ्या भांडणामुळे,झालेल्या घटस्फोटामुळे पालकांचा प्रेमाला मुकलेल्या मुला-मुलींविषयी माहिती मिळते.
समाजासाठी काही करु इच्छिणाऱ्या, महाविद्यालयात एम.एस डब्ल्यु या सारखे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी ही लेखमाला अत्यंत महत्त्वाची आहेच.मात्र लेखाच्या सुरुवातीला सांगितले, त्या प्रमाणे विनाकारण स्वत:,चे दू:ख मोठे आहे,असे समजून त्याला कुरवाळीत बसणाऱ्या,व्यक्तींना त्यांच्या वागण्यातील फोलपणा लक्षात यावा यासाठी देखील त्यांनी ही लेखमाला वाचायलाच हवी.

जगाच्या छप्पराची सफर घडवणारे प्रवासवर्णन :वाट तिबेटची

प्रवासवर्णन हा लेखन प्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रुळला आहे . सन १८५७ साली गोडसे गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या विष्णू ...