मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

समाजाच्या एका भीषण वास्तवाचे वास्तविक स्वरूप दखवणारे पुस्तक. 'उपरा'

पुस्तकाचे विविध प्रकार असतात जसे कथासंग्रह कांदबरी नाटक वगैरे हे आपणाला माहिती असेलच.  या प्रत्येक प्रकारचे काही फायदे तोटे आहेत. त्यातील चरित्र या प्रकारचा विचार  केला असता आपणास मोठ्या प्रमाणात सकारात्मकता मिळू शकते अरे या व्यक्तीने इतक्या अडचणीतून प्रवास केला आहे आपल्या अडचणी तर यापुढे अतिशय शुल्लक आहेत आपण परिस्थिती बदलण्यास प्रयत्न केलाच पाहिजे  हा विचार आपणास चरित्र आणि आत्मचरित्र वाचनातून मिळू शकतो. तसेच चरित्रे वाचल्यास आपणास दुसऱ्याच्या संघर्षाचे ज्ञान होत असल्याने जर एखादा व्यक्ती संघर्ष करत असल्यास संघर्ष करत असलेल्या व्यक्तीविषयी काहीसे ममत्व देखील निर्माण होते असे अनेक मानस शास्त्रज्ञ सांगत असतात  याशिवाय ज्या व्यक्तीने चरित्र किंवा आत्मचरित्र लिहले आहे त्या व्यक्तीने ते लिहताना त्या व्यक्तीला  समाजातील विविध समाजघटकांचा त्यास काय अनुभव आलाया विषयी देखील लिहले असते  त्या अर्थाने चरित्रे आत्मचरित्रे समाजाचा आरसा देखील ठरतात. चरित्र वाचनातून होणारे हे फायदे लक्षात घेत या २०२६ अर्शी माझ्या वाचनाला काहीसे वळण लागावे म्हणून य वर्षी जास्तीत जास्त  चरित्रे आत्म चरित्रे वाचण्याचे ठरवले आहे 

तर वाचक मित्रानो, मी  या माझ्या संकल्पाचे पालन करण्याच्या हेतूने मी  नुकतेच सुप्रसिद्ध विद्रोही लेखक लक्ष्मण माने यांनी लिहलेले त्यांचे छोटेखानी चरित्र ' उपरा' नुकतेच वाचले.  समाजाच्या एका भीषण वास्तवाचेवास्तविक स्वरूप दखवणारे पुस्तक  असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल.  १५४पानाच्या या छोटेखानी पुस्तकात आपणास जातीव्यवस्थेचं एक विदारक  स्वरूप ठसठशीत रूपात समोर येते. पुस्तक प्रसिद्ध होऊन आता सुमारे ५० वर्ष पूर्ण झाली आहेत आता परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलीये  असे समजले तरी या बदलाची सुरुवात किती भयानक स्वरूपात झाली हे या पुस्तकातून समजते समाजातील एका मोठ्या वर्गाला शिक्षण घेण्यसाठी काय  हालअपेष्ठा भोगाव्या लागल्या/हे समजते.  सुमारे दोन तृतीयांश भागात भटक्या विमुक्त जातीच्या लोकभाषेत लिहले आहे जी मराठीशी मल्टि जुळती आहे त्यामुळे आपल्या मराठीतील भाषेचे सौदर्य देखील यामुळे उलगडते 

या पुस्तकाला सहित अकादमीचा पुरस्कार मिळाला आहेत्यामुळे हे छोटेखानी आत्मचरित्र संहिताच विचार करता ऊत्तम आहे हे सांगायला नकोच भटक्या  जातीत अन्य समाज घटकात शिक्षणाचा प्रचार प्रसार कसा झाला  त्यांचे प्रश्न मुळात काय आहेत ?गरिबीबरोबर क्षिक्षण घेताना समाजातील समजुतीमुळे त्या समाजातील मुलं मुलींना  घेताना कोणत्या  अडचनांसमोर जावे  लागते याचे कारण अर्थात आरक्षणाची गरज का आहे याचे

आकलन या पुस्तकातून समजते अर्थात आता   पुस्तक प्रसिद्ध होऊन अर्ध्या शतकाचा  यातील दाहकता  झालेली असावी 

एकंदरीत समारोपाचे बोलायचे झाल्यास आपल्या समाजातील गुंतागुंत त्यातील विविध प्रश्न समजून घेण्याचे  सहजसोपे  माध्यम म्हणजे उपरा हे आत्मचरित्रपार पुस्तक 

जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 2)

       
  पुस्तकाच्या विश्वाचा विचार करता प्रमुख घटक असलेल्या वाचक आणि प्रकाशक या मुख्य मुद्यांच्या अवतीभोवती फिरणारे अनेक घटक आहेत मात्र त्यांची चर्चा होईलच असे नाही किंबहुना  त्यावर चर्चा करायची गरजच ती काय असा सूर सहजतेने उमटू शकतो. मात्र पुस्तकाच्या विश्वच सविस्तर आढावा घेयचा असल्यास ते आवश्यक ठरतात. त्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या भागाविषयी आणि टीव्हीवर आणि युट्युब वरील अस्तित्वाविषयी आपण लेखाच्या पहिल्या भागात बघितले होते या दुसऱ्या लेखात आपण पुस्तकाविषयीची ऍप्लिकेशन आणि सोशल मीडियावरील अस्तित्व या विषयी बोलूया . 
          तर वाचक मित्रानो पुस्तकाबविषयीचे हे विश्व अगदी मराठी भाषेचा विचार करता देखील अत्यंत  समृद्ध आहे सोशल मीडियात त्यातही प्रामुख्याने टेलिग्राम मध्ये पुस्तकविषयीचे अनेक ग्रुप आहेत.  ज्यावर पुस्तकाच्या पीडीएफ मोठ्या संख्येने शेअर केलेल्या असतात त्यामुळे आपण सहजतेने विविध पुस्तके वाचू शकतो अर्थात
प्रत्यक्ष प्रिंटेड पुस्तक वाचण्याची मजा यामध्ये येत नसली तरी दुधाची तहान ताकावर या वाक्यप्रचारानुसार हे ही नसे थोडके. व्हाट्सअप या सोशल मीडियावर देखील अनेकी ग्रुप आहेत तसेच सर्व सोशल मीडियाचे वडील असे ज्या सोशल मीडिया साईटला म्हणता येऊ शकते त्या फेसबूकवर (सोशल मीडियाचा आजोबा म्हणून ऑर्कुट, याहू मेल यांना आपण ओळखू शकतो ) आणि मी ज्या माध्यमाचा वापरक करत तुमच्याशी बोलतोय त्या ब्लॊगवर देखील अनेक पुस्तकांविषयीचं ब्लॉग आहेत आणि वर सांगितले त्या प्रमाणे मराठी भाषा त्या ठिकाणी समृद्ध आहे. मला यनाची अनेक उदाहरणे माहिती आहेत मात्र माझी इछा तुम्ही ती स्वतः शोधावी अशी असल्याने त्याविषयी मुद्दामून सांगत नाहीये  मी सांगितले तर फक्त तुम्ही तेच शोधाल मात्र .तुम्ही स्वतःहून शोधल्यास तुम्हला थेट खजिनाच गवसेल माझी इच्छा तुम्ही खजिना शोधावा अशी आहे त्यामुळे याविषयी माझी आता चुपी
               या खेरीज थेट पुस्तक वाचायचे असल्यास सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे स्टोरी टेल,  बुकगंगा, कुकू एफ एम उडान वगैरे याही बाबत आता माताही मोठ्या प्रमाणात समुद होत आहे .अनेक मराठी प्रकाशनाचीची आता वेबसाईट सोडा ऍप्लिकेशन देखील आलेली आहेत आपण त्यावर देखील प्रिंटेड
पुस्तकाची मागणी नोंदवू शकतो अर्थात लेखाच्या पहिल्या भागात सांगितले तसे याठिकाणी इ  बुक चा पर्याय देखील आहेच मी वरील सांगितली उदाहरणे पप्रातिनिधीक आहेत आपण इंटरनेटवर शोधल्यास अनेक उदाहरणे मिळतील. समर्थ रामदास स्वामी यांच्या काळात आपल्या महाराष्ट्रात पुस्तके छापण्याची सोया उपलब्ध नव्हती त्यावेळी पुस्तके हाताने लिहली जायची तरी त्यांनी  प्रसंगी काहीतरी ते वाचावे असे सांगितले होते त्यांनी  पुस्तक वाचनाचे महत्त्व ओळखले होते. आताच्या काळातील पुस्तकाची सहज होणारी उपलब्धता बघून त्यांना आनंददच झाला असता हे नक्क्की  .तोच आंनद  तुम्हाला मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करत  या दुसऱ्या भागात आपली रजा घेतो ते तिसऱ्या भागात भेटण्यासाठी  या लेखाच्या तिसऱ्या भागात पुस्तक प्रकाशनच्या वेगवेगळ्या बाबी  जसे पुस्तक ऑन डिमांड आदी विषयी बोलेल. ते भेटूया तिसऱ्या भागात 
 

या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक लारा 


रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 1)

शीर्षक वाचून गोंधळलात का? हा कोणत्या घटकाविषयी बोलणार आहे,असा प्रश्न तूम्हाला पडलेला असेल तर पहिलेच सांगतो मी बोलणार आहे, विविध वर्तमानपत्रात येणाऱ्या 'नव्या पुस्तकाची ओळख' आणि 'मी वाचलेले पुस्तक' या सारख्या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणाऱ्या लेखाविषयी तसेच पुस्तकाविषयी सांगणाऱ्या  टीव्हीवरील वेगवेगळ्या
 चॅनेलवरील कार्यक्रम अणि युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओ विषयी‌.सर्वसाधरणपणे पुस्तक म्हटले की प्रकाशक, वाचक याविषयी बोलले जाते, असा माझा अनुभव आहे.म्हणून म्हटले पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी
तर वाचक मित्रांनो, टिव्हीवर पुस्तकावरील कार्यक्रमाचा विचार करता समोर येणारे चित्र काहीसे निराशाजनक आहे.डी.डी. सह्याद्री आणि डि.डी.इंडीया या सारख्या सरकारी चॅनलचा अपवाद वगळता इतर ठिकाणी पुस्तकाविषयी फारसे कार्यक्रम मला तरी आढळत नाही.नाही म्हणायला न्युज 18 मराठी जेव्हा आय.बी.एम लोकमत होते, त्यावेळी त्यावेळी ' वाचाल तर वाचाल' हा साप्ताहिक कार्यक्रम होत असे.केतकी जोशी या वृत्तनिवेदिका तो सादर करत असे. त्याचा अपवाद वगळता इतर खासगी वाहिनीवरील पुस्तकाविषयीचे मराठी भाषेतील कार्यक्रम मला आढळलेले नाहीत. इंग्रजी भाषेत डीस्कव्हरी सारख्या चॅनेलवर होत असतील तर त्याचा विचार मला करायचा नाही .माझा रोख मराठी भाषेतील कार्यक्रमाविषयीच आहे.
मात्र युट्युबचॅनेलवर मात्र या विषयी खूप रेलचेल आहे.पुणे येथे झालेल्या पुस्तक महोत्सवानंतर तर त्यात भरच पडलेली दिसतेय.बोलभिडू सारख्या काही मुख्य धारेतील काही युट्यूब चॅनेलने  बुक कट्टा सारखी प्ले लिस्ट सुद्वा सुरु केली आहे.अर्थात हे उदाहरण मी प्रातनिधीक स्वरूपात घेतले आहे विषय समजावा म्हणून या सारखी अनेक युट्युब चॅनेल आहेत.हे आधीच लक्षात घ्या.
शेवटी वृत्तपत्राच्या बाबत बोलायचे झाल्यास ,आजकाल प्रिंटेड  पुस्तके वाचली जात नाहीत असे सहजतेने बोलले जात असले तरी पुस्तके मात्र पूर्वीपेक्षा जास्त प्रसिद्ध होत आहेत.असे सहजतेने म्हणता येऊ शकते.आत्ता मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमाच्या आणि आर्थिक गणिताचा विचार करता अजून देखील प्रिंटेड पुस्तकाला मोठी मागणी असल्याचे म्हणता येउ शकते.तोच न्याय मी वाचलेले पुस्तक या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाविषयी बोलता येऊ शकते. अर्थात पूर्वी प्रसिद्ध झालेले किंवा पत्रकारांनी टेबलवर तयार केलेली स्टोरी म्हणून सुद्धा या लेखाकडे बघता येऊ शकते असो आपण यातील नकारात्मक दुर सारूया. 
थोडक्यात पुस्तकाच्या बाबत बोलायचे झाल्यास पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी अजून सकारात्मकच चित्र आहे, असे म्हणता येऊ शकते, हेच खरे.


सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या शहराची सैर घडणारे पुस्तक ' न्यूयॉर्क'

           
आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीमूळे शहाणपण येते असे संगितले जाते त्यामध्ये पर्यटन , फिरण्याच देखील समावेश होतो. अर्थात प्रयेकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते .तसेच जग एव्हढे मोठे आहे की,पण राहतो तो आंणि त्याला लागून असलेले ४ ते ५ जिल्हे जरी फिरायचे म्हंटले तरी एक ते दोन वर्ष सहज लागू शकतात. (आता अति परिचयात अवज्ञा किंवा  आपण लांबचे एरिया आधी बघू . हा भाग काय जवळचा आहे कधीही बघता येईल,असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर भाग वेगळा ) तर दुसरे  देश किमान राज्य बघयाला घेतले तर सर्व आयुष्य देखील पुरणार नाही . मग याला ऊत्तर ते काय ? तर दुसऱ्याच्या अनुभवातून फिरायचे . म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीने लिहलेल्या प्रवास वर्णनातून एखादा प्रदेश समजून  घेयचा
  'माझे प्रवासाचे हकीगत' हे आपल्या मराठीतील पहिले प्रवासवर्णन. या पहिल्या प्रवासवर्णनानंतर अनेकांनी विशेषत:
पु. ल देशपांडे, मीना प्रभू या लेखकांनी आपल्या प्रवास्यांची वर्णन लिहून आपल्या मराठीत हा  प्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रुजवला. किंबहुना कै. मीना प्रभू या याच गोष्टीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या न्यूयॉर्कच्या प्रवाश्याचे वर्णन 'न्यूयॉर्क' या पुस्तकात केले आहे हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
            मीना प्रभू यांनी २४ जुलै २०११ ते २७ ऑगस्ट २०११ या दरम्यान न्यूयॉर्क शहारला भेट दिली.त्यावेळी त्यांना आलेले अनुभव या सुमारे सव्वा चारशे पानांचा पुस्तकात त्यांनी उलगडले आहेत. या सुमारे १ महिन्याचा  कालावधीत त्यांना आलेले अनुभव त्यांनी तारखे नुसार लिहून ठेवले आहेत. हे अनुभव म्हणजे हे पुस्तक असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. मात्र हे पुस्तक म्हणजे मी आज येथे भेट दिली तिथे हे बघितले अशी त्यांच्या आयुष्याची माहिती देणारे पुस्तक नाहीये. पुरंदरे प्रकाशनतर्फे प्रकाशित या पुस्तकात लेखिकेने तिने ज्या ठिकाणी भेटी दिल्या तेथील इतिहास समाजजीवन, आणि तेथील सोयीसुविधा भविष्यात तिथे काय बदल होणार आहेत,काय  बदल होणे अपेक्षित आहे  यांची देखील रंजकतेने माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तक लेखिकेचा स्वतःच्या  टेम्भा मिरवणरे पुस्तक म्हणजे 'न्यूयॉर्क' असे न राहता आपणास  न्यूयॉर्क शहराची माहिती देणारे  पुस्तक म्हणून आपण याकडे बघू शकतो पुस्तकाच्या सुरवातीलाच न्यूयॉर्क शहराचा इसवीसनपूर्व १०,००० पासून चा इतिहास बुलेट पॉईंट स्वरूपात उलगडला आहे. त्यामळे पुस्तक रंजक  झाले आहे 
           पुस्तकात न्यूयॉर्क मधील पर्यटन स्थळाची चित्रे स्वतंत्ररित्या काहिस्या गुळगुळीत कागदावर छापलेली आहेत. ती जर लेखासोबतच सर्वसाधारण कागदावर  छापली असती तर लेख वाचताना अजून आनंद आला असता असे मला वाटतेय.  मात्र त्याच वेळी वेगळ्या गुळगुळीत कागदावर चित्रे  छापल्याने ती जास्त रंगीत आणि
आकर्षक झाली आहेत हे देखील नाकारता येत नाही.  नाही म्हणायला लेखासोबत काही नकाशे आहेत ज्यात न्यूयॉर्कच्या कोणत्या भागात हेपर्यटनस्थळ आहे हे सांगितले आहे,  उदाहरणार्थी पुणे शहरात फिरायला आलेल्या व्यक्तीने शनवार वाड्याचे वर्णन करताना शनवार पेठेचा नकाशा छापून त्यात शनवार वाड्याचे स्थान दाखवणे.  पु   ल देशपांडे  उद्यानाविषयी लिहताना सिह्गड रोडचा नकाशा छापणे मात्र प्रत्यक्ष शनवार वाड्याचा किंवा पु ल देशपांडे उद्यानाचा फोटो लेखासोबत न छापता पुस्तकात वेगळ्या ठिकाणी दोन्ही ठिकाणचे फोटो एकत्रित छापणे असो हा एका दोष जर सोडला तर  पुस्तक आपणस वाचताना खिळवून ठेवते. स्वतःचेछोटेसे असले तरी  अनुभव किती ऊत्तमप्रकारे खुलवून सांगता येतात हे आपणास या पुस्तकातून समजते/ तरी वाचणार हे पुस्तक 

मी कै.  मीना प्रभूंचे वाचलेले हे दुसरे प्रवासवर्णन आहे  मी मी य आधी वाचलेल्या मीना प्रभूंच्या प्रवासवर्णनांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....

यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल.  मी आतापर्...