पुस्तकाच्या विश्वाचा विचार करता प्रमुख घटक असलेल्या वाचक आणि प्रकाशक या मुख्य मुद्यांच्या अवतीभोवती फिरणारे अनेक घटक आहेत मात्र त्यांची चर्चा होईलच असे नाही किंबहुना त्यावर चर्चा करायची गरजच ती काय असा सूर सहजतेने उमटू शकतो. मात्र पुस्तकाच्या विश्वच सविस्तर आढावा घेयचा असल्यास ते आवश्यक ठरतात. त्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या भागाविषयी आणि टीव्हीवर आणि युट्युब वरील अस्तित्वाविषयी आपण लेखाच्या पहिल्या भागात बघितले होते या दुसऱ्या लेखात आपण पुस्तकाविषयीची ऍप्लिकेशन आणि सोशल मीडियावरील अस्तित्व या विषयी बोलूया .
तर वाचक मित्रानो पुस्तकाबविषयीचे हे विश्व अगदी मराठी भाषेचा विचार करता देखील अत्यंत समृद्ध आहे सोशल मीडियात त्यातही प्रामुख्याने टेलिग्राम मध्ये पुस्तकविषयीचे अनेक ग्रुप आहेत. ज्यावर पुस्तकाच्या पीडीएफ मोठ्या संख्येने शेअर केलेल्या असतात त्यामुळे आपण सहजतेने विविध पुस्तके वाचू शकतो अर्थातप्रत्यक्ष प्रिंटेड पुस्तक वाचण्याची मजा यामध्ये येत नसली तरी दुधाची तहान ताकावर या वाक्यप्रचारानुसार हे ही नसे थोडके. व्हाट्सअप या सोशल मीडियावर देखील अनेकी ग्रुप आहेत तसेच सर्व सोशल मीडियाचे वडील असे ज्या सोशल मीडिया साईटला म्हणता येऊ शकते त्या फेसबूकवर (सोशल मीडियाचा आजोबा म्हणून ऑर्कुट, याहू मेल यांना आपण ओळखू शकतो ) आणि मी ज्या माध्यमाचा वापरक करत तुमच्याशी बोलतोय त्या ब्लॊगवर देखील अनेक पुस्तकांविषयीचं ब्लॉग आहेत आणि वर सांगितले त्या प्रमाणे मराठी भाषा त्या ठिकाणी समृद्ध आहे. मला यनाची अनेक उदाहरणे माहिती आहेत मात्र माझी इछा तुम्ही ती स्वतः शोधावी अशी असल्याने त्याविषयी मुद्दामून सांगत नाहीये मी सांगितले तर फक्त तुम्ही तेच शोधाल मात्र .तुम्ही स्वतःहून शोधल्यास तुम्हला थेट खजिनाच गवसेल माझी इच्छा तुम्ही खजिना शोधावा अशी आहे त्यामुळे याविषयी माझी आता चुपी
या खेरीज थेट पुस्तक वाचायचे असल्यास सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे स्टोरी टेल, बुकगंगा, कुकू एफ एम उडान वगैरे याही बाबत आता माताही मोठ्या प्रमाणात समुद होत आहे .अनेक मराठी प्रकाशनाचीची आता वेबसाईट सोडा ऍप्लिकेशन देखील आलेली आहेत आपण त्यावर देखील प्रिंटेड पुस्तकाची मागणी नोंदवू शकतो अर्थात लेखाच्या पहिल्या भागात सांगितले तसे याठिकाणी इ बुक चा पर्याय देखील आहेच मी वरील सांगितली उदाहरणे पप्रातिनिधीक आहेत आपण इंटरनेटवर शोधल्यास अनेक उदाहरणे मिळतील. समर्थ रामदास स्वामी यांच्या काळात आपल्या महाराष्ट्रात पुस्तके छापण्याची सोया उपलब्ध नव्हती त्यावेळी पुस्तके हाताने लिहली जायची तरी त्यांनी प्रसंगी काहीतरी ते वाचावे असे सांगितले होते त्यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व ओळखले होते. आताच्या काळातील पुस्तकाची सहज होणारी उपलब्धता बघून त्यांना आनंददच झाला असता हे नक्क्की .तोच आंनद तुम्हाला मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करत या दुसऱ्या भागात आपली रजा घेतो ते तिसऱ्या भागात भेटण्यासाठी या लेखाच्या तिसऱ्या भागात पुस्तक प्रकाशनच्या वेगवेगळ्या बाबी जसे पुस्तक ऑन डिमांड आदी विषयी बोलेल. ते भेटूया तिसऱ्या भागात
या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक लारा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा