
पुस्तकाचे विविध प्रकार असतात जसे कथासंग्रह कांदबरी नाटक वगैरे हे आपणाला माहिती असेलच. या प्रत्येक प्रकारचे काही फायदे तोटे आहेत. त्यातील चरित्र या प्रकारचा विचार केला असता आपणास मोठ्या प्रमाणात सकारात्मकता मिळू शकते अरे या व्यक्तीने इतक्या अडचणीतून प्रवास केला आहे आपल्या अडचणी तर यापुढे अतिशय शुल्लक आहेत आपण परिस्थिती बदलण्यास प्रयत्न केलाच पाहिजे हा विचार आपणास चरित्र आणि आत्मचरित्र वाचनातून मिळू शकतो. तसेच चरित्रे वाचल्यास आपणास दुसऱ्याच्या संघर्षाचे ज्ञान होत असल्याने जर एखादा व्यक्ती संघर्ष करत असल्यास संघर्ष करत असलेल्या व्यक्तीविषयी काहीसे ममत्व देखील निर्माण होते असे अनेक मानस शास्त्रज्ञ सांगत असतात याशिवाय ज्या व्यक्तीने चरित्र किंवा आत्मचरित्र लिहले आहे त्या व्यक्तीने ते लिहताना त्या व्यक्तीला समाजातील विविध समाजघटकांचा त्यास काय अनुभव आलाया विषयी देखील लिहले असते त्या अर्थाने चरित्रे आत्मचरित्रे समाजाचा आरसा देखील ठरतात. चरित्र वाचनातून होणारे हे फायदे लक्षात घेत या २०२६ अर्शी माझ्या वाचनाला काहीसे वळण लागावे म्हणून य वर्षी जास्तीत जास्त चरित्रे आत्म चरित्रे वाचण्याचे ठरवले आहे

तर वाचक मित्रानो, मी या माझ्या संकल्पाचे पालन करण्याच्या हेतूने मी नुकतेच सुप्रसिद्ध विद्रोही लेखक लक्ष्मण माने यांनी लिहलेले त्यांचे छोटेखानी चरित्र ' उपरा' नुकतेच वाचले. समाजाच्या एका भीषण वास्तवाचेवास्तविक स्वरूप दखवणारे पुस्तक असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. १५४पानाच्या या छोटेखानी पुस्तकात आपणास जातीव्यवस्थेचं एक विदारक स्वरूप ठसठशीत रूपात समोर येते. पुस्तक प्रसिद्ध होऊन आता सुमारे ५० वर्ष पूर्ण झाली आहेत आता परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलीये असे समजले तरी या बदलाची सुरुवात किती भयानक स्वरूपात झाली हे या पुस्तकातून समजते समाजातील एका मोठ्या वर्गाला शिक्षण घेण्यसाठी काय हालअपेष्ठा भोगाव्या लागल्या/हे समजते. सुमारे दोन तृतीयांश भागात भटक्या विमुक्त जातीच्या लोकभाषेत लिहले आहे जी मराठीशी मल्टि जुळती आहे त्यामुळे आपल्या मराठीतील भाषेचे सौदर्य देखील यामुळे उलगडते
या पुस्तकाला सहित अकादमीचा पुरस्कार मिळाला आहेत्यामुळे हे छोटेखानी आत्मचरित्र संहिताच विचार करता ऊत्तम आहे हे सांगायला नकोच भटक्या जातीत अन्य समाज घटकात शिक्षणाचा प्रचार प्रसार कसा झाला त्यांचे प्रश्न मुळात काय आहेत ?गरिबीबरोबर क्षिक्षण घेताना समाजातील समजुतीमुळे त्या समाजातील मुलं मुलींना घेताना कोणत्या अडचनांसमोर जावे लागते याचे कारण अर्थात आरक्षणाची गरज का आहे याचे
आकलन या पुस्तकातून समजते अर्थात आता पुस्तक प्रसिद्ध होऊन अर्ध्या शतकाचा यातील दाहकता झालेली असावी
एकंदरीत समारोपाचे बोलायचे झाल्यास आपल्या समाजातील गुंतागुंत त्यातील विविध प्रश्न समजून घेण्याचे सहजसोपे माध्यम म्हणजे उपरा हे आत्मचरित्रपार पुस्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा