आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीमूळे शहाणपण येते असे संगितले जाते त्यामध्ये पर्यटन , फिरण्याच देखील समावेश होतो. अर्थात प्रयेकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते .तसेच जग एव्हढे मोठे आहे की,पण राहतो तो आंणि त्याला लागून असलेले ४ ते ५ जिल्हे जरी फिरायचे म्हंटले तरी एक ते दोन वर्ष सहज लागू शकतात. (आता अति परिचयात अवज्ञा किंवा आपण लांबचे एरिया आधी बघू . हा भाग काय जवळचा आहे कधीही बघता येईल,असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर भाग वेगळा ) तर दुसरे देश किमान राज्य बघयाला घेतले तर सर्व आयुष्य देखील पुरणार नाही . मग याला ऊत्तर ते काय ? तर दुसऱ्याच्या अनुभवातून फिरायचे . म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीने लिहलेल्या प्रवास वर्णनातून एखादा प्रदेश समजून घेयचा
'माझे प्रवासाचे हकीगत' हे आपल्या मराठीतील पहिले प्रवासवर्णन. या पहिल्या प्रवासवर्णनानंतर अनेकांनी विशेषत:
पु. ल देशपांडे, मीना प्रभू या लेखकांनी आपल्या प्रवास्यांची वर्णन लिहून आपल्या मराठीत हा प्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रुजवला. किंबहुना कै. मीना प्रभू या याच गोष्टीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या न्यूयॉर्कच्या प्रवाश्याचे वर्णन 'न्यूयॉर्क' या पुस्तकात केले आहे हे पुस्तक मी नुकतेच वाचले
मीना प्रभू यांनी २४ जुलै २०११ ते २७ ऑगस्ट २०११ या दरम्यान न्यूयॉर्क शहारला भेट दिली.त्यावेळी त्यांना आलेले अनुभव या सुमारे सव्वा चारशे पानांचा पुस्तकात त्यांनी उलगडले आहेत. या सुमारे १ महिन्याचा कालावधीत त्यांना आलेले अनुभव त्यांनी तारखे नुसार लिहून ठेवले आहेत. हे अनुभव म्हणजे हे पुस्तक असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. मात्र हे पुस्तक म्हणजे मी आज येथे भेट दिली तिथे हे बघितले अशी त्यांच्या आयुष्याची माहिती देणारे पुस्तक नाहीये. पुरंदरे प्रकाशनतर्फे प्रकाशित या पुस्तकात लेखिकेने तिने ज्या ठिकाणी भेटी दिल्या तेथील इतिहास समाजजीवन, आणि तेथील सोयीसुविधा भविष्यात तिथे काय बदल होणार आहेत,काय बदल होणे अपेक्षित आहे यांची देखील रंजकतेने माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तक लेखिकेचा स्वतःच्या टेम्भा मिरवणरे पुस्तक म्हणजे 'न्यूयॉर्क' असे न राहता आपणास न्यूयॉर्क शहराची माहिती देणारे पुस्तक म्हणून आपण याकडे बघू शकतो पुस्तकाच्या सुरवातीलाच न्यूयॉर्क शहराचा इसवीसनपूर्व १०,००० पासून चा इतिहास बुलेट पॉईंट स्वरूपात उलगडला आहे. त्यामळे पुस्तक रंजक झाले आहे
पुस्तकात न्यूयॉर्क मधील पर्यटन स्थळाची चित्रे स्वतंत्ररित्या काहिस्या गुळगुळीत कागदावर छापलेली आहेत. ती जर लेखासोबतच सर्वसाधारण कागदावर छापली असती तर लेख वाचताना अजून आनंद आला असता असे मला वाटतेय. मात्र त्याच वेळी वेगळ्या गुळगुळीत कागदावर चित्रे छापल्याने ती जास्त रंगीत आणि आकर्षक झाली आहेत हे देखील नाकारता येत नाही. नाही म्हणायला लेखासोबत काही नकाशे आहेत ज्यात न्यूयॉर्कच्या कोणत्या भागात हेपर्यटनस्थळ आहे हे सांगितले आहे, उदाहरणार्थी पुणे शहरात फिरायला आलेल्या व्यक्तीने शनवार वाड्याचे वर्णन करताना शनवार पेठेचा नकाशा छापून त्यात शनवार वाड्याचे स्थान दाखवणे. पु ल देशपांडे उद्यानाविषयी लिहताना सिह्गड रोडचा नकाशा छापणे मात्र प्रत्यक्ष शनवार वाड्याचा किंवा पु ल देशपांडे उद्यानाचा फोटो लेखासोबत न छापता पुस्तकात वेगळ्या ठिकाणी दोन्ही ठिकाणचे फोटो एकत्रित छापणे असो हा एका दोष जर सोडला तर पुस्तक आपणस वाचताना खिळवून ठेवते. स्वतःचेछोटेसे असले तरी अनुभव किती ऊत्तमप्रकारे खुलवून सांगता येतात हे आपणास या पुस्तकातून समजते/ तरी वाचणार हे पुस्तक
मी कै. मीना प्रभूंचे वाचलेले हे दुसरे प्रवासवर्णन आहे मी मी य आधी वाचलेल्या मीना प्रभूंच्या प्रवासवर्णनांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा