लेखाचे विषय

सोमवार, १८ मे, २०२६

अकाउंटिंगची मुळाक्षरे गिरवण्यापासून निभाव लागू शकेल असे अकाउंटींग ची माहिती देणारे पुस्तक"अकाउंट फॉर डमीज'


 
सध्याच्या ए. आय च्या काळात आपणास जॅक ऑफ ऑल ट्रेडस असणे अत्यावश्यकच आहे. त्याशिवाय आपला निभाव लागणे निव्वळ अशक्य.मात्र आपल्या रोजच्या आयुष्यात फार मोठ्या प्रमाणात आवश्यक असणाऱ्या 'अकाउंटंसी' या विषयाबाबत माझे ज्ञान खूपच तुकडे होते सध्याचा काळात आपल्यला ज्या विषयाची काहीही माहिती नाही. त्या विषयावरची मुळाक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे अश्या विषयाबाबत आपणास मदत करायचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्या विषयावर अच्युत गोडबोले यांचे एखादे पुस्तक आहे का ?हे बघणे मी देखील तेच  केले आणि मला त्यांची दोन पुस्तके सापडली त्यातील एक म्हणजे "अकाउंट फॉर डमीज' आणि दुसरे म्हणजे 'कॉस्ट अँड मॅनेजमेन्ट ' माझ्या घरी कॉमर्सची मोठी परंपरा असली तरी शाळेत नववी आणि दहावीला शिकलेल्या अर्थशात्राच्या पुस्तकांखेरीज मला कॉमर्सचा  गंध नव्हता त्यामुळे मी चटकन ती पुस्तके विकत घेतली

काही जण मी विनाकारण पुस्तके विकत घेतली असे म्हणतील त्यांच्यामते चॅट जीपीटीमुळे थेट माहिती मिळत असताना पुस्तके का विकत घेयची ? तर अश्या मित्र - मैत्रीणींना मी सांगू इच्छितो की चॅट जीपीटीमुळे माहिती मिळते ज्ञान नाही जर तुम्हला एखाद्या विषयात  ज्ञानी होयचे असल्यास अजूनही पुस्तकांशिवाय तरणोपाय नाही.  मात्र तुम्हला फक्त माहितीगार होयचे असल्यास 'जय हो चॅट' जीपीटी असे तुम्ही म्हणू शकता. थोडक्यात तुम्हाला भूक लागली असता तुमच्या जिभेवर थेट  मॅगी ठेवणे म्हणजे चॅट जीपीटी तर मॅगी कशी तयार करायची याची प्रात्यक्षिकासह उजळणी करत मॅगी खायची  म्हणजे पुस्तकाचे वाचन .आता थेट जिभेवर मॅगी ठेवल्याने पोट भरत असले तरी स्वतः तयार करून मॅगी खाण्यातीळ मजा काही औरच ना ?  आणि आपली हि गरज पुस्तकेच पूर्ण करू शकतात .म्हणून आज देखील पुस्तके महत्वाची आहेतच असो 

तर या दोन पुस्तकांपैकी  "अकाउंट फॉर डमीज या पुस्तकाचे दुसरे वाचन मी नुकतेच केले (कोणत्याही अभ्यासविषयक पुस्तकाचे तीन वाचन केल्यास फायदा होतो. पहिल्या वाचनात पुस्तक चाळणे होते .दुसऱ्या वाचनात पुस्तक
सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचणे होते या दुसऱ्या वाचनात पुस्तक आपणास बऱ्यापैकी समजते तर टिपऱ्या वाचनांत आपणास पुट खूपच मोठ्या प्रमाणात समजते ज्यामुळे पण त्यावर परीक्षेत प्रश्न सोडवू शकतो ) दुसऱ्या वाचनात मालपुस्तक किती समजले हे सांगण्यासाठी आजचे लेखन 

.तर अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकासारखीच यही पुस्तकांची भाषा सहजसोपी आहे .मराठीत पुस्तक आहे ना ! मग भलेही व्यवहार वापरता नसेना वापर संस्कृतचा प्रभाव असलेले शब्द ज्यामुळे संकल्पना समजत असली  तरी संकल्पनेत वापरलेले शब्द मुळात वापरत नसल्याने वाचकाचा व्यवहारत शब्दाचा गोंधळ झाला तरी कुठे बिघडले असा इतर मराठी पुस्तकात दिसणारा प्रकार अच्युत गोडबोले याचा पुस्तकात कधीही नसतो तो याही पुस्तकात नाहीये याही पुस्तकात त्यांनी आपल्यकडे रूळलेले इंग्रजी शब्दच वापरलेले आहेत . साधारणपणे अकाउंटिंग हा विषय अनेकांना कठीण, कंटाळवाणा वाटतो . मात्र गोडबोले यांनी आपल्या खास सोप्या आणि संवादात्मक शैलीत हा गैरसमज दूर केला आहे.

या पुस्तकात अकाउंटिंगची  मूलभूत संकल्पना अगदी ग्राउंड लेव्हलपासून स्पष्ट केली आहे. “अकाउंटिंग म्हणजे काय?”, “ते का आवश्यक आहे?” यापासून सुरुवात करून व्यवहारांची नोंद, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांसारख्या संकल्पना टप्प्याटप्प्याने समजावून सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक संकल्पना दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट केल्यामुळे वाचकाला ती सहज कळते 

याशिवाय, पुस्तकात केवळ सैद्धांतिक माहिती न देता व्यवहारात अकाउंटिंग कसे उपयोगी पडते, आर्थिक निर्णय कसे घ्यावेत, याबाबतही मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे वाचकाला फक्त ज्ञानच मिळत नाही, तर ते प्रत्यक्षात वापरण्याची दिशा देखील मिळते.पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे पुस्तकाच्या  शेवटी २७ पानांमध्ये अकॉंटिंगच्या वेगवेगळ्या संकल्पांची सुमारे २० ते २५ शब्दात एक संकल्पना या प्रकारे करून दिलेली ओळख ज्यामुळे पुस्तकात शिकलेल्या गोष्टीची सहजतेने उजळणी होते. तसेच याच्या आधी वाचकला पुस्तक किती कळालेले आहे हे समजावे यासाठी काही प्रश्न देखील दिलेली आहेत 

एकूणच, "अकाउंट फॉर डमीज' हे पुस्तक अकाउंटिंग विषयाची भीती दूर करून त्याला सोप्या, उपयुक्त आणि समजण्यासारख्या स्वरूपात मांडणारे उत्कृष्ट मार्गदर्शक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अकाउंटिंगची मुळाक्षरे गिरवण्यापासून निभाव लागू शकेल असे अकाउंटींग ची माहिती देणारे पुस्तक"अकाउंट फॉर डमीज'

  सध्याच्या ए. आय च्या काळात आपणास जॅक ऑफ ऑल ट्रेडस असणे अत्यावश्यकच आहे. त्याशिवाय आपला निभाव लागणे निव्वळ अशक्य. मात्र आपल्या रोजच्या आयुष...