आपल्या मराठीला उत्तमोत्तम संदर्भग्रंथांची मोठी दिर्घ परंपरा आहे.महाराष्ट्राच्या, भारताच्या जगाच्या इतिहास,सामाजिक जीवन,राजकीय जीवन यावर सविस्तर सखोलपणे माहिती देणारी कितीतरी ग्रंथ आपणास मराठीत आढळतात. त्याच प्रमाणे सुरवातीला एखाद्या दैनिकात,साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्त लेख मालिकेचे कालांतराने पुस्तक प्रसिद्ध केल्याचा समृद्ध इतिहास देखील मराठी पुस्तक विश्वाला आहे.आपल्या मराठीत असी अनेक पुस्तके आहेत जी ही दोन्ही निकषे, संदर्भ ग्रंथ म्हणून उत्तम मुल्य आणि प्रथमत: मालिका स्वरूपात प्रसिद्धी नंतर पुस्तक रुपाने प्रसिद्धी हे पुर्ण करतात.पुस्तकाची गुणवत्ता उत्तम आहे हे दाखवणाऱ्या या दोन्ही निकषांची पूर्तता करणाऱ्या पुस्तकांच्या मांदियाळीतील मुकुटमणी होईल असे पुस्तक म्हणजे राजहंस प्रकाशनातर्फे आणि ज्येष्ट विचारवंत ,लेखक प्राध्यापक डॉ सदानंद मोरे यांनी लिहलेले लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक. मोठ्या आकाराच्या सव्वा साडे सहाशे पानाच्या या पुस्तकाच्या दोन भागापैकी पहिला भाग मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक अर्थात सावाना च्या ग्रंथ संग्राहालयाच्या मदतीने वाचला.
या ग्रंथाविषयी याच्या आधीच अनेकदा अनेक माध्यमात कित्येकांनी लिहलयं त्यामुळे या ग्रंथात काय आहे,हे आपणापैकी अनेकांना माहिती असणारचं. हे लेखन वाचणाऱ्यांपैकी बऱ्याच लोकांनी हा ग्रंथ सुद्धा वाचला असेल.याचा विचार करता मी हा ग्रंथ खुपच उशिरा वाचला असे कोणी म्हटत असल्यासह त्यात वावगे ठरणार नाही.मात्र देरसे आयें मगर दुरुस आये या हिंदी वाक्यप्रचारानुसार अखेर का होईना ,मी हा ग्रंथ वाचला हे उत्तम असे म्हणूया. आधीच सांगितल्यानूसार हा खुप प्रसिद्ध आणि बराच जूना संदर्भ ग्रथ असल्याने याच्याविषयी आधीच माहिती आहे असे समजून यात काय आहे, हे सांगण्यात मी वेळ घालवू इच्छित नाही.मी मला हा ग्रंथ वाचून काय वाटले हे सांगतो तरी जेन झी जनरेशनसाठी सांगायचे झाल्यास इसवीसन 1908ते इसवीसन 1945/48 पर्यत महाराष्ट्राचे भारतातील महत्त्व कसे बदलत गेले तसेच महाराष्ट्रातील जातीय राजकारण ,समाजकारण कसे बदलत गेले याविषयी सांगण्यात आले आहे असो
तर मित्रानों या ग्रंथाच्या वाचनातून मला ब्राह्मण ब्राह्मणेत्तर संघर्ष त्याच्या विविध पैलुंसह समजला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज निर्मितीच्या कार्याचे विविध राजकीय पैलू, तेथून महाराष्ट्राने देशाला दिलेली दिशा, महाराष्ट्रातील विकासात ब्राह्मणांचे त्यातही अधिक ठळकपणे बोलायचे झाल्यास कोकणस्थ ब्राह्मणांचे योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीची पार्श्वभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू महासभा यांच्यातील अन्योन्य संबंध,लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या अनुयनांचा उडालेला गोंधळ ,लाल बाल पाल या देश पातळीवर महत्त्वाच्या तीन नेत्यांपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळकाच्या निधनानंतर महाराष्ट्र पुन्हा देशपातळीवर सर्वमान्य होईल असे नेर्तत्व का उभा करु शकला नाही. लोकमान्य टिळकांच्या नंतर महाराष्ट्रात उदयास आलेले नेर्तत्व कसे विशिष्ठ जनसमुदायापर्यतच सिमित मर्यादीत का राहिले ?महात्मा गांधीचा खुन एका महाराष्ट्रीय व्यक्तीने केल्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशपातळीवर कशी डागळली या कलंकित प्रतिमेमुळे महाराष्ट्राला काय सोसावे भोगावे लागले या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.नाही म्हणायला सदर ग्रंथातील लेख जेव्हा मालिकेच्या स्वरुपात साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्व होत होते.त्यावेळी काही लेख वाचले होते.मात्र तेव्हाची माझी राजकीय समज यथातथाच असल्याने आणि तेव्हा लेख सलगपणे न वाचल्यामुळे मला फारसे समजले नव्हते.तेव्हापासून आतापर्यतचा विचार करता तूकड्यात न वाचता सलगपणे वाचणे आणि यू.पी.एस.सी च्या परीक्षेमुळे आलेली समज,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून घेतलेल्या शिक्षणामुळे वाढलेले आकलन यामुळे तेव्हापेक्षा मला यावेळी हा ग्रंथ अधिअ उत्तमतेनेह समजला असे म्हटल्यास ते चूकीचे होणार नाही .
पूर्वी वाचले तेव्हा जेव्हढा ग्रंथ समजला त्यापेक्षा अधिक व्यापकतेने समजण्यासाठी या ग्रंथाचे पुनर्वाचन करण्यासाठी आणि महाराष्ट सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचावाच असे मी जाताजाता सांगू इच्छितो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा