मंगळवार, १३ मे, २०२५

भारताच्या कुटनितीची माहिती देणारे पुस्तक, 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा'

           सध्याचा भारत पाकिस्तान तणावाच्या काळात, युद्धाच्या बातम्या बघताना आपणास अरे अपल्या लष्कराला पाकिस्तानमधील दहशतवादी तळाची अचूक ठिकाणे कशी काय समजतात? असा प्रश्न पडू शकतो.तर याचे उत्तर आहे आपली गुप्तहेर संघटना, रिसर्च अँड अँनलिसीसस अर्थात रॉ या संघटनेचे जाळे.आपण अनेकदा इस्राइलची गुप्तहेर संघटनेच्या कारवाया ऐकतो‌ याच पद्धतीचे कामकाज करणारी मात्र अनेकदा पडद्याआड राहणारी संघटना म्हणजे रॉ.मराठीत न च्या बरोबर आणि इंग्रजीतसुद्धा मोजकेच लेखन झालेल्या रॉचे कार्य  नक्की कसे  चालते‌? देशहितासाठी त्यांनी आतापर्यत कोणते कार्य केले आहे? हे अचूकपणे समजून घेयचे असेल तर आपणास मनोविकास प्रकाशनाच्या 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा' हे पुस्तक खुप उपयोगी पडते. सध्या मुंबई सकाळ चे संपादक असलेले  ज्येष्ठ पत्रकार रवी आमले या पुस्तकाचे लेखक आहेत. रवी आमले यांनी 300 पानांच्या या पुस्तकातून 24 प्रकरणाद्वारे
रॉ ने केलेल्या कार्याची ओळख करून दिली आहे. मी नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या सहकार्याने नुकतेच हे पुस्तक वाचले.
         अत्यंत सहजसोप्या भाषेत  लिहलेल्या या पुस्तकात, प्राचीन भारतातील गुप्तहेरांचे कार्य कसे चालायचे? आर्य चाणक्य यांनी गुप्तहेरांबाबत काय लिहलेले आहे‌.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गुप्तहेरांचे कार्य, ब्रिटीश राजवटीत गुप्तहेर संघटनांची सुरवात कोणत्या पद्धतीने झाली. स्वातंत्र्योत्तर भारतात गुप्तहेर संघटनांचा प्रवास कोणत्या पद्धतीने झाला .इंटेलिजियन्स ब्युरो कार्यरत असताना रिसर्च अँड अँनलिसीसस अर्थात रॉ च्या स्थापनेची गरज का निर्माण झाली.रॉचे कार्य कसे विस्तारत गेले.रॉने श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान तसेच बांगलादेशात कोणकोणत्या मोहिमा राबवल्या.सिक्किमच्या विलीनीकरणात रॉ ची काय भुमिका होती,याविषयी माहिती मिळतेच त्याच बरोबर इशान्य भारतातील बंडखोरी मोडण्याबाबत रॉने आखलेल्या मोहिमा, रॉ चे इंदिरा गांधीची हस्तक या दृष्टिकोनातून कसे खच्चीकरण करण्यात आले.काश्मीर मधील दहशतवाद्यांचा विरोधात रॉ ने कोणत्या मोहिमा राबवल्या.
पाकिस्तानात भारतविरोधी शक्तींना कोणत्या प्रकारे नेस्तनाबुत केले. पाकिस्तानमधील फुटीरतावादी गटांना कोणत्या प्रकारे छूपी मदत केली याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
   पुस्तकाच्या शेवटी जोडण्यात आलेली संदर्भ ग्रंथसुची तब्बल 11पानांची आहे.एव्हढ्या मोठ्य संदर्भ सुचीमुळे लेखकाने पुस्तक लिहण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत,हे सोदाहरण स्पष्ट करते. पुस्तक रॉ सारख्या देशाच्या दृष्टीने  महत्त्वच्या गोष्टीबाबत असल्याने गोपिनयतेमुळे अनेक गोष्टी उघड करता येत नाही तसेच काही गोष्टींची खात्रीशीर   माहितीच मिळत नसल्याने काही गोष्टींचा समावेश पुस्तकात करता येत नसल्याची कबुली लेखकाने आपल्या मनोगतातच दिली आहे.मात्र लेखकाच्या लेखनशैलीमुळे आपणापासून काही माहिती लपवली आहे,असे वाचकांना वाटतचं नाही.वाचकांना खिळवून ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.वाचकांना ज्ञानाची गुहाच उलगडत असल्याचा अनुभव पुस्तक वाचताना येतो (किमान मला येतो)
  पाकिस्तानने भारताच्या काश्मीर भागातच नव्हे तर इशान्य भारतातील अनेक फुटीरतावाद्यांना संघटनांना दहशतवादी संघटनांना 1 956 पासूनच कोणत्या मा़ध्यमातून तसेच कोणत्या प्रकाराची मदत केली आहे? तसेच आंतरराष्ट्रीय राजकरणात दिसते ते सर्व खरे नसते.किंबहुना दिसते त्याचा पुर्णपणे 180 अंशात उलटी असणारी परिस्थिती ही सत्यस्थिती कसी असते‌ ज्याप्रमाणे  समुद्रातील हिमनगाचा फक्त 10 टक्के भागच वरती दिसतो त्या प्रमाणे कोणत्याही देशातील गुप्तहेर संघटनांचे कार्य कसे चालते‌.कोणत्याही देशात कोणत्या प्रकारच्या व्यक्ती हेरागिरीसाठी उपयुक्त असतात. गुप्तहेर फितूर का होतात? आपल्या 
 रॉ ला या प्रकारचा अनुभव आलेला आहे का? आलेला असल्यास त्याचा सामना रॉने कसा केला यासरख्या प्रश्नाची उत्तरे माहिती करुन घेयची असल्यास हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे‌

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...