अर्थात युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट ऑफ रिपब्लिक या देशाची इस्राइलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनासारखीच प्रसिद्ध असलेली गुप्तहेर संघटना यु.एस.एस.आर ची शकले होवून स्वतंत्र्य१४ देश निर्माण झाल्यावर पुर्वी केलेल्या कृष्णकृत्यांमुळे प्रसिद्ध झालेली संघटना, केजीबी .या केजीबीची सविस्तर आणि खऱ्या माहितीच्या पुस्तकांचा आपल्या मराठीत काहीसा अभावच .मात्र ही पोकळी भरुन निघते आपल्या मराठीत अनेक उत्तोमोत्तम पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या मधूश्री प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले केजीबी या पुस्तकामुळे .नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या घोटी या छोटयासा गावात मुख्यालय असलेल्या मधूश्री प्रकाशनाकडून मराठी भाषेत अच्युत गोडबोले यांची अनेक पुस्तके तसेच विविध तांत्रीक विषयावरची अन्य लेखकाची पुस्तके, आणि सीआयए, मोसाद एफबीआय, रॉ या सारख्या गुप्तहेर संघटनांवर माहितीपुर्ण पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत.त्यातील केजीबी वरचे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील सर्वात मोठे वाचनालय असलेल्या, सावाना अर्थात सार्वजनिक वाचानलय नाशिक यांचा संग्राहलयातून वाचले.
मुळ इंग्रजी भाषेत एन चोक्कन यांनी लिहलेल्या या पुस्तकाचे सुदर्शन आठवले यांनी मराठीत केलेले भाषांतर म्हणजे सदर 132पानाचे हे पुस्तक होय.या 132 पानाच्या छोटेखानी पुस्तकात 17प्रकरण आणि 2 परिशिष्टाद्वारे केबीजी या गुप्तहेर संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभुमी, स्थापनेनंतर झालेला विकास, या संघटनेने केलेल्या स्वत:च्याच देशातील नागरिकांच्या हत्या, संघटनेने केलेल्या कृष्णकृत्ये जगासमोर आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न ,या संघटनेला वेळोवेळी दिलेले आणि काही प्रसंगी काढून घेतलेले अधिकार,या संघटनेची प्रशासकीय रचना आणि त्यात वेळोवेळी झालेले बदल ,यु.एस.एस.आर मधील नागरिकांच्या संघटनेविषयच्या मतांमध्ये वेळोवेळी झालेला बदल,या संघटनेत कार्यरत असणाऱ्या नागरिकांचा स्वत:च्या संघटनेविषयीची मते,केजीबी या संघटनेने दुसऱ्या देशात पसरवलेले गुप्तहेरांचे जाळे,केबीजीच्या विरोधात अन्य देशाकडून झालेल्या कारवाया,यु.एस.एस.आर च्या पतनानंतर संघटनेचे विद्यमान स्वरूप याविषयी आपणास माहिती मिळते.अनुवादीत पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे.जी वाचून लगेच समजते.ओघवत्या भाषेत लिहलेल्या, या पुस्तकाचे वाचन केल्यास आपणास, केजीबीच्या पुर्वसुरी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, चेका, ओजीपीयू, एनकेव्हीडी, जीयूजीबी,एनकेजीबी, एनजीबी, केआय,एमव्हीडी, या संघटनांची माहिती मिळते.
मराठीत गुप्तहेरांच्या कथा काही प्रमाणात असली तरी मराठीत गुप्तचर संघटनांची माहिती देणारी पुस्तके खुपच कमी आहेत. या अत्यंत मोजक्या पुस्तकांमध्ये समावेश होणारे हे पुस्तक आपण आंतराष्ट्रीय राजकराणात दिसते तसे मुळीच नसते, मित्र म्हणवणारी राष्ट्रे देखील एकमेकांच्या प्रदेशातच हेरगिरी करते.यासारख्या अनेक गोष्टीची माहिती मिळते. तरी या गोष्टीची माहिती करुन घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा