लेखाचे विषय

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

शोध एका प्रग्लभ आणि विक्षीप्त व्यक्तीमत्वाचा 'प्यासा'

काही व्यक्तिमत्त्वे मोठी विलक्षण असतात. त्यांच्या विषयी कितीतरी वेळा, कितीतरी वेळ बोलत राहिलो. लिहीत राहिलो तरी दरवेळी त्यांच्याविषयी काय लिहायचे ,काय बोलायचे याचा विचार केला तर दरवेळी कोणतातरी वेगळा मुद्दा , व्यक्तिमत्त्वातील आतापर्यंत फारशा चर्चित ना गेलेला पैलू आपणस गवसतो . आणि आपल्याला या  व्यक्तिमत्त्वाची पूर्ण माहिती झाली आहे.असे वाटत असताना आपणाला या व्यक्तीची पुरेशी माहिती नाही याची जाणीव होते. आज ३० नोव्हेंबर २०२५ रोजी  रात्री साडेदहाच्या सुमारास हा मजकूर लिहीत असताताना  ज्यांचे निधन होऊनच ६० वर्ष झाली आहेत, तरी   ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय बॉलिवूवंडचा इतिहासच लिहिता येणार नाही.  किंबहुना त्यांना  वगळून इतर सर्व व्यक्तींची माहिती लिहिली तरी त्या इतिहासाची किंमत सकाळी शौचास बसण्यासाठीचा कागद अशीच करावी लागेल असे बॉलिवूवडमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, सिने निर्माते, सिने अभिनेते, सिने दिग्दर्शक असा सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांचा समावेश  अश्याच काही विलक्षण व्यक्तिमत्वांमध्ये करावा लागेल. 

तर या विलक्षण प्रतिभेच्या मात्र त्यावेळी चक्रम, सटकलेले व्यक्तिमत्त्व  म्हणून  ज्यांना आपण सहज ओळखू शकतो  अश्या वंसतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांच्या चित्रपट निर्मितीतील आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रवास सांगणारे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले सुधीर नांदगावकर लिखित ' प्यासा'हे पुस्तक मी नुकतेच वाचले. गुरुदत्त यांचा आकस्मित मृत्य झाल्यावर त्याचा घरी सर्वात पहिले जे पत्रकार पोहोचले होतेत्यापैकी एक म्हणजे म्हणजे पुस्तकाचे लेखक सुधीर  नांदगावकर होते अर्थात ती त्यांच्या करियरची सुरवात होती.करियरच्या उमेदवारीचा  काळात त्यांना त्यावेळच्या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाला अर्थात गुरुदत्तला भेटण्याची इच्छा होती जी त्यांना त्या गुरुदत्तच्या निधनाच्या वेळी त्या ठिकाणी सर्वात  पहिले पोहोचून मिळाली असो 

  ३०८ पानाच्या या पुस्तकातून २५ प्रकरणातून लेखकाने गुरुदत्त यांचे विवाहपूर्व कौटुंबिक जीवन विवाहापश्चात त्यात झालेले विनाशकारी बदल  सुरवातीची आर्थिक स्थिती , त्यांचे नृत्य विषयक शिक्षण त्यांच्या चित्रपट श्रुष्टीतील प्रवेश ,चित्रपट श्रुष्टीत होणारे बदल त्यांनी कोणत्या प्रकारे बघितले ? इतरांना कोणत्या प्रकारे बघायला लावले ? पहिल्यांदा भागीदारीत आणि नंतर स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था कोणत्या प्रकारे काढली ? चित्रपट निर्मितीसाठी ते कोणत्या प्रकारे अभ्यास करत ? सहकलांकारांविषयी त्यांची मते,भूमिका काय होती ? त्यांची

चित्रपट निर्मिती कोणत्या प्रकारे घेत ? गीता दत्त  यांच्याशी त्याचे संबंध का दुरावले ? संबंध दुरावू नयेत यासाठी गुरुदत्त यांनी काय प्रयत्न केले ?  गीता दत्त यांच्याशी संबंध दुरवण्यामागे गुरुदत्त यांनी त्यांना गाण्यास केलेला विरोध, गीता दत्त यांच्या मनात वहिदा रेहमान यांच्याविषयी असलेली  अधी गुरुदत्त त्यांणी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात झोकून दिल्यामुळे त्यांचे संसाराकडे झालेले दुर्लक्ष आणि सरतेशेवटी दक्षिण मुंबई  उच्चभू परिसरातील पेडर रोडमधील घरात झालेला  मृत्यू याविषयी सांगते. पुस्तकाच्या अखेरच्या २५ व्या प्रकरणाच्या शेवटच्या काही पानांत लेखकाने गुरुदत्त यांचे अचानक झालेले निधन ही आत्महत्या नव्हती तर तो हार्ट अटॅकच होता हे गुरुदत्त यांचे फॅमिली डॉक्टर रिबिनो यांचा हवाला सांगितले आहे . 


गुरुदत्त यांच्या विषयीची दोन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत गुरुदत्त यांच्या चित्रपट निर्मितीविषयी सांगणारे ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि अरुण खोपकर लिखित 'गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका' हे पहिले पुस्तक  आणि सत्या सरन यांनी लिहलेले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारे 'त्या १० वर्षातील गुरुदत्त' .हि पुस्तके त्यांत माहितीपूर्ण असली तरी गुरुदत्त यांच्या एकाच पैलूवर प्रकाश टाकतात . मात्र रोहन प्रकर्षानतर्फ़े प्रकशित या पुस्तकात आपणास वंसतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांच्या वैयक्तिक आणि चित्रपट निरिटी अश्या दोन्ही पैलूंची ओळख होते. त्यामुळे हे पुस्तक या दोन्ही प्रसिद्ध पुस्तकांपेक्षा काहीसे वेगळे ठरते मग वाचणार ना हे पुस्तक ! 

गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका' या पुस्तकाविषयी मी लिहलेले वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4?updated-max=2018-11-20T23:48:00-08:00&max-results=20&start=4&by-date=false


त्या १० वर्षातील गुरुदत्त' .' या पुस्तकाविषयी मी लिहलेले वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा


https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/11/blog-post.html


अजिंक्य तरटे 

९५५२५९९४९५ 

९४२३५१५४०० 





 



 
 


मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

मानसशास्त्राची सर्व बाजूने सविस्तर आणि रंजक पद्धतीने माहिती देणारे पुस्तक 'मनात'

मानसशास्त्र , आपल्या शरीरातील सर्वात विस्मयकारी अवयवव असलेल्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. काही अपवाद वगळता प्रामुख्याने कला शाखेच्या विद्यर्थ्यांनी शिकण्याचा विषय म्हणजे मानसशास्त्र . आता काही परिस्थिती वेगाने बदलतीये, अनेक हुशार विद्यार्थी ठरवून कला शाखेत प्रवेश घेत आहेत. मात्र पूर्वी ज्याला इतर कुठे प्रवेश मिळाला नाही, अश्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळवण्यासासाठी कुठे प्रवेश घ्यावा तर कला शाखेत. आणि अश्या कला शाखेतील एक विषय म्हणजे मानसशात्र . मुळात  हा विषय ज्या शाखेत प्रामुख्याने शिकवला जातो ती शाखाच दुर्लक्षित त्यामुळे विषयाकडे सुद्धा दुर्लक्ष होणे आलेच. मात्र आपल्या सर्व हालचालीवर , वर्तनावर, अन्य लोकांशी असलेल्या नातेसंबंधावर भावनांवर, पर्यायाने आपल्या संपूर्ण आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे मानसशास्त्र  हि जाणीव सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याने सध्या विविध आस्थापनात नोकरी भरती करणाऱ्या व्यक्ती आपण ज्यांना भरती करून घेत आहोत र्त्यांची मानसिक स्थिती काय आहे ? हे विविध चाचण्यांतून समजून घेत आहेत. 

त्यामुळे आपल्या सर्वाना मानसशास्त्राची किमान तोंडओळख असणे सध्याच्या काळात आवश्यक आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्या मराठीत सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल, समजेल अश्या पद्धतीने आणि प्रकारची मानसशात्राची  माहिती देणाऱ्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. आपल्या मराठीतील मानसशास्त्राची माहिती देणारी बहुसंख्य पुस्तके अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने लिहण्यात आलेली आहेत ज्यामुळे ज्याला मानसशास्त्राची  फक्त तोंड ओळख करून घेयचीआहे त्यात पारंगत होण्याची इच्छा नाही त्याला देखील  कारण नसताना रटाळ पुस्तके वाचावी लागतात.तसेच या पुस्तकाची भाषा देखील परिभाषेत अडकलेली असल्याने समजायला अडचण येते. याला ऊत्तर काय तर  जे मानसशास्त्राचे अभ्यासक नाही अश्या सर्वसामान्य व्यक्तींना उपयुक्त ठरेल अश्या पद्धतींची माहिती ती देखील रंजक पद्धतीने देण्यात आलेली पुस्तके वाचणे आणि या कामात आपल्याला मदत करते . अर्थशास्त्र, संगीत, अकाउंटिंग, गणित नॅनो टेक्नॉलॉजी, ए  आय, साहित्य, नैसर्गिक शात्राच्या विविध शाखा, व्यवस्थापनशास्त्र, मानसशास्त्र  अश्या विविध क्षेत्रातील  विविध बाबींवर मराठीत सहजसोप्या  मराठीत माहितीपूर्ण पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहलेले 'मनात हे पुस्तक. जे मी नुकतेच वाचले 

अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात वापरलेल्या भाषसेबाबत त्यांना पूर्ण मार्क देणे आवश्यकच आहे.  याही पुस्तकांची भाषा सहजसोपी ज्याला मानशास्त्राची काहीही पार्श्वभूमी नाही, अश्या त्यांना देखील या शास्त्राची मोठ्या प्रमाणात माहिती करून देणारे पुस्तक म्हणून पण या पुस्तकाकडे बघू शकतो. क्रमिकपुस्तकात असलेला बोजडपणा या पुस्तकात आढळत नाही. पुस्तक सोप्या भाषेत लिहायचे आहे मग करा माहितीत काटछाट, हाही मुद्दा या पुस्तकात आढळत नाही. यात संगीतलेल्या घटकांविषयी मोठ्या प्रमाणात सविस्तर माहिती या पुस्तकातून आपणास मिळते. पुस्तक विविध विभागात विभागले आहे. त्यामुळे जर आपणास एखद्या ठराविक घटकाचीची माहिती हवी असेल तर आपण तो शोधू शकतो, प्रत्येक  विभाग प्रकरणात विभागाला आहे त्यामुळे विषय समजण्यात काहीही अडचण येत नाही. या पुस्तकात एकूण १७ विभाग आहेत. प्रत्येक विभाग हा स्वतंत्र्य पुस्तक म्हणून बघितला तरी हरकत नसावीअशी या पुस्तकांची रचना आहे ढोबळमानाने मानसशास्त्रावरच्या  १७ वेगवेगळ्या पुस्तकांचे एकत्रयीपणे छापलेले ७०० पानाचे पुस्तक म्हणजे सदर पुस्तक होय . मन कितीही अथांग आह. आपण त्यापैकी किती लहान भाग जाणतो ,हे सांगणारे पुस्तकाचे निळसर हिरव्या रंगातील हिमनगाच्या पार्श्वभूमीवरील मेंदूचे छायाचित्र आपणास पुस्तकाकडे सहजतेने खेचून घेते. 

अच्युत गोडबोले यांचे  मानसशास्त्रावरील मी वाचलेले हे सहावे पुस्तक. मी आधी अच्युत गोडबोले यांची मानसशास्त्रावरील मनकल्लोळ  भाग १ आणि २ ,सायकोथेरपीज . ऑटिझम, संवाद ही पुस्तके वाचली आहेत . मात्र मनात या पुस्तकातील माहिती उचलून पुन्हा दिली आहे. असे आढळत नाही. अपवादात्मक स्थितीत माहिती पुन्हा दिल्याचे आढळते मात्र याचे प्रमाण २ ते अडीच टक्क्याच्या पुढे नाही त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे असो .या पुस्तकात आपणास  भारतीय संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक दृष्टिकोन , युरोपीय आणि अमेरिकन मानशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास, त्यांनी मांडलेल्या विविध संकल्पना, मानसिक आरोग्याचा आणि विकारबाबत झालेले वेगवेगळे संशोधन , या संशोधनाचे विविध टप्पे, विविध मानसिक विकारांचे ,आजारांची,व्याधींची माहिती , मानसिक आजार बरे व्हावे किंबहुना होऊच नये  यासाठी कोणते मानसशास्त्रीय उपाय  योजले जातात  मानसशास्त्रांच्या विविध उपशाखांची माहिती, तसेच मानसशास्त्राशी जवळचा संबंध असलेले भावनांक, बुध्यांक  आदी विषयांची माहिती देण्यात  आली आहे.

भारतीय संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक दृष्टिकोन सांगताना लेखकाने हिंदू धर्म ,बौद्ध धर्म, जैन धर्म अन्य पारंपरिक बाबींची माहिती दिली आहे .तसेच भारतीय सारखीच प्राचीन संस्कृती असलेल्या ग्रीक संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक तसेच मनोरुग्णालायची स्थिती कशी सुधारत गेली मनोविकाराविषयी माहिती पहिल्या भागात सांगितली आहे दुसऱ्या भागात मेंदू आणि मज्जसंस्र्थानची माहिती देण्यात आली आहे तिसऱ्या आणि चवथ्या भागात अनुक्रमे सिग्मनफ्राईड पर्यतची मानसशास्त्राची वाटचाल आणि सिग्मनफ्राईड आणि युंग यांनी घातलेली भर सांगण्यात आली आहे. भाग क्रमांक ५ ,७, ,८,९ आणि १० मध्ये एक्सपिरिमेंटल सायकोलॉजी गेस्टेलास्ट सायकोलॉजी, डेव्हल्पमेंटल सायकोलॉजी, सोशल सायकोलॉजी ह्युमिनिस्टिक सायकोलॉजी यांची याचा क्रमाने माहिती देण्यात आली आहे सहाव्या भागात बिव्हेरिझम ची माहिती लेखकाने दिली आहे तर ११ व भाग आणि १२ तसेच भाग १३ वा अनुक्रमे बुध्यांक , व्यक्तिमत्व आणि भावना या घटकावर भाष्य करतो. १४ आणि १५ व भाग पुन्हा एकदा आपणांला अनुक्रमे कोंगीटीव्ह आणि परस्पेशन या मानसशास्त्राच्या उपशाखांबाबत माहिती देतो. शेवटून दुसरा भाग ऑटिझम,ओसीडी फोबिया, स्किझोफेनिया, डिप्रेशन, चिंता या आजाराविषयी माहिती देते .तर शेवटचे १७ वे प्रकरण विविध उपचार पद्धतीच्या थेअरीविषयी  आपणास माहिती देते 

लेखाच्या सुरवातीला सांगितले  त्या परिमाणे मानसशास्त्र  सध्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याने आपणास या विषयाची तोंड ओळख होण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

मानवी भूगोलाच्या दुर्लक्षित उपशाखेला अर्थात वाहतूक भूगोल ला समर्पित दिवाळी अंक 'भवताल'

आपल्याकडे शहाणपण ज्या कारणाने येते, त्यामध्ये केल्याने देशांतरण या  घटकाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.  आपल्या मराठीत मीना प्रभू, पु. ल . देशपांडे या सारख्या काही लेखकांनी त्याच्या प्रवासाची वर्णने लिहून त्यांना भेट देताना काय काय अनुभव आले आहेत. हे सांगितले आहेच.  मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात समावेश होणाऱ्या कल्याण, पनवेल आदी क्षेत्रातून रोज हजारो नागरिक मुख्य मुंबई शहरात येतच असतात, आपल्याकडे धार्मिक हेतू मनात ठेवून ज्या यात्रा आयोजित करण्यात येत असतात . त्यामध्ये आपणास मोठ्या प्रमाणात प्रवास देखील करावा लागतो. असे असून देखील भूगोलाच्या दोन मुख्य शाखांपैकी एक असलेल्या मानवी भूगोलाची एक उपशाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वाहतूक भूगोल या विषयात त्याचा समावेश करून आपण या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्याप्रमाणे  जेव्हा मोठ्या प्रमाणात अंधार असतो तेव्हा मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड करत असते.  त्या प्रमाणे  वाहतूक भूगोल या विषयवार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात असताना गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यावरण  या विषयातील विविध संकल्पनेवर आधारित दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या 'भवताल ' या संस्थेकडून या वर्षीचा दिवाळी अंक 'वाहतूक या संकल्पनेवर आधारित प्रकाशित करण्यात आला आहे 

सुमारे २५० पानाच्या या दिवाळी अंकात वाहतूक या संकल्पनेच्या मोठ्या प्रमाणात आढावा घेण्यात आला आहे. ज्यामध्ये माणसांनी प्रवास करायला कधी आणि का सुरवात केली ? माणसांनी कोणत्या मार्गानी प्रवास केला ? या दरम्यान त्यांना विश्रांती घेयची असल्यास काय सोयी सुविधा होत्या ? त्या कोणी निर्माण केल्या होत्या ? त्या सुविधांविषयी त्या वेळच्या नागरिकांनी काय लिहले आहेत ?  नागरिकांनी या साठी कोणती साधने वापरली ? वाहतूक भूगोल या भूगोलाच्या उपशाखेतील शास्त्रज्ञांनी वरील प्रश्नाची उत्तरे कोणत्या प्रकारे शोधली ? जगभरात प्रवाश्याची साधने कोणती होती ? या काळात जगभरातील कोणी कोणी आपल्या भारताला भेट दिली ? त्यांनी त्यासाठी येताना आणि जाताना कोणती साधने वापरली ?त्यावेळी त्यांना कोणते अनुभव आले  वरील प्रश्नाच्या उत्तरातून त्यावेळच्या समाजजीवनाविषयी काय काय माहिती मिळते ? या सारख्या असंख्य प्रश्नाची उत्तरे आपणास या दिवाळी अंकांच्या वाचनाने मिळतात 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यातमहत्वाचे योगदान असलेल्या सुरतेची स्वारी तसेच दक्षिणेची स्वारी कोणत्या प्रकारे राबवण्यात आली ?  पर्यटनाच्या निमित्ताने अनेक लेण्यांना भेट देतो ? पूर्वीच्या काळी प्रवासाच्या दरम्यान या लेण्यांना काय महत्त्व  होते ?  महाराष्ट्रातच लेण्या मोठ्या संख्येनं का आढळतात ? पूर्वीच्या काळी डोंगर दऱ्यातून लोक कोणत्या प्रकारे प्रवास करत असे ?  त्यावेळच्या प्रशासनकडून कोणत्या प्रकारे याची निगा राखण्यात येत असे ? त्यासाठी काही करप्रणाली होती का ?  व्यक्तीच्या प्रवाश्यामुळे काही गावांना महत्व आले होते का ? त्याच्या सुबत्तेचे कारण कोणते होते ?  लोकांनी जल प्रवाशाची सुरवात कोणत्या प्रकारे केली ? पूर्वी नागरिक कोणत्या मार्गावर जल प्रवास करत होते ? तेर प्रवास कोणत्या कालावधीत करत असे ? जगातील सर्वच

लोक सारख्याच पद्धतीने प्रवास करत होते का ? जल प्रवाश्यामुळे जगाच्या भूगोलात काही बदल झाला का ?  झाला असल्यास कोणता बदल झाला ? तो कोणी आणि कोणत्या पद्धतीने केला ?  आपल्या भारतातील व्यक्ती प्रवाश्यासाठी जगात कुठे कुठे जात असत ? त्या ठिकाणी जाऊन ते काय करत असत ? शास्त्रज्ञांनी या विषयीची माहिती कोणत्या प्रकारे मिळवली त्याविषयीची रंजक माहिती देखील दिवाळी अंकाच्या वाचनाने आपणास समजते .

 प्रवासववर्णन या वाहतुकीच्या मुळाशी असलेल्या घटकाला, तसेच आपल्या मराठीत खूपच कमी बोलल्या जाणणाऱ्या हवाई वाहतूक आणि अंतराळ प्रवास या घटकांना देखील या अंकात स्थान देण्यात आले आहे. हवाई वाहतुकीचे नियमन कोणत्या प्रकारे केले जाते?  विमान वाहतूक आणि  हेलीकॅप्टर वाहतूक यामध्ये काय फरक आहे ? याविषयीची माहिती या अंकात देण्यात आली आहे.  

दिवाळी अंकावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्ती अनेकदा आपल्या मराठीत सध्या फक्त जाहिराती छापून पैसे मिळावे या हेतून दिवाळी अंक छापले जातात.  दिवाळी अंकात साहित्यविषयक मजकूर कमी आणि जाहिरातीच जास्त असल्याचा आक्षेप घेतात .मात्र या अंकात त्याचा लवलेश देखील जाणवत नाही. सुमारे अडीचशे पानाच्या अंकात फक्त एकच जाहिरात देण्यात आलेली आढळते ती देखील मधल्या पानावर आहे . कव्हर पेजेसवर नाही हे आपण लक्षात घेयला हवे . जाहिरात ना घेता दिवाळी अंक काढता येतो तो लोकप्रिय देखील करता येतो हे 'भवताल 'आपणास दाखवून देतो . ज्यांना खरोखरीच काही उत्तम वाचायचे आहे त्यांना भवताल हा एक उत्तम पर्याय आहे . मग वाचणार ना ' भवताल ' 

मागील वर्षांचा अर्थात २०२४ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 



२०२३ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 




२०२२ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 






बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

विनोदवीराचा पडद्यामागील संघर्ष दाखवणारे पुस्तक, 'हसरे दु:ख'


आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली पायद्वारे सतत पोहणे सुरू असते‌.बदकांच्या पायांची हालचाल होत असल्याने वरवर शांत वाटणारे पाणी सतत वेगाने धुसमळत असते. मात्र वरून बघताना आपणास ते पाणी शांत भासते,आत चालणाऱ्या वादळाची आपल्याला कल्पना देखील येत नाही.
कोणत्याही सुप्रसिद्ध माणसाचे व्यक्तीमत्व देखील काहीसे असेच असते‌. ज्या कारणासाठी तो प्रसिद्ध झाला, त्या पातळीपर्यत पोहोचण्यासाठी त्याने घेतलेले सर्वच्या सर्व कष्ट बाहेर येतीलच असे नाही. लोकांनी गरज नसता केलेले मात्र तरी देखील हसत हसत सहन केलेले अपमान, मेहनत लोकांपर्यत पोहचलेलेच असे नाही. एखाद्या यशस्वी व्यक्तीमत्वाचा आपण सत्कार करत असू तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भलेही हास्य दिसत असले तरी त्या हसऱ्या चेहऱ्यामागची भावना या स्थितीपर्यत पोहचण्यासाठी केलेले कष्ठ आठवून मनातल्या मनात रडत सुद्धा असू शकते‌.
याच  हसऱ्या दु:खामगाची वेदनेची कारुण्यातेची आपल्याशी भेट होते, राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि भा.द.खेर लिखित 'हसरे दु:ख या पुस्तकात.नाशिकमधील सर्वात जून वाचनालय असलेल्या सावाना, अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या सौजन्याने मी हे पुस्तक नुकतेच वाचले. या पुस्तकात थोर विनोदवीर चार्ली चाप्लिन यांचे कांदबरी स्वरुपात चरीत्र सांगण्यात आले आहे. स्वामी या कांदबरीतून जसे माधवराव पेशव्यांचे, नेताजी मधून  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कथास्वरुपातील चरीत्र आपणासमोर उभे करण्यात येते.अगदी त्याचप्रमाणे भा.द.खेर  यांनी आपल्यासमोर चार्लि चाप्लिन याचे चरीत्र उभे केले आहे.
  या पुस्तकाच्या ५१४ पानातून  ३२ प्रकरणाद्वारे,लेखकाने सविस्तरपणे रंजकभाषेत चार्ली चाप्लिन यांचे चरीत्र रेखाटले आहे.पुस्तकाचे पहिले प्रकरण चार्लि चाप्लिनचे रंगभुमीवर पाऊल कसे पडते‌? याविषयी सांगते. या प्रकरणात चार्लि चाप्लिनची आई,जी व्यावसायिक गायिका आहे, जी गाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा कमवते अस्या लिली हार्ले हीच्या गाण्याचा कारकिर्दीचा शेवट कसा वेदनादायी होतो. गाण्याचा कारकिर्दीचा दुर्देवी शेवट झाल्याने ती चरीतार्थ भागवण्यासाठी अन्य छोटो मोठे व्यवसाय कसे करते,त्याचा बाल चार्ली चाप्लिनवर कसा परीणाम होतो, हे पहिल्या प्रकरणात सांगण्यात आले आहे‌. ‌पहिल्या प्रकरणात सांगितलेल्या बाबीच आधिक सविस्तरपणे साधरणत: एक  तृतीयांश पुस्तकात सांगितल्या आहेत.या बाबी सांगताना चार्लिची आईच्या पुर्वायुष्यातील व्यक्तींचा उल्लेख करत गाडी हळूचपणे भुतकाळात नेली आहे.
पुस्तकाचा साधरणत: पहिला एक तृतीयांश भाग वाचून झाल्यावर लेखकाने संपुर्ण फोकस चार्लि चाप्लिनवर केला आहे‌. यामध्ये त्याचा व्यवासायिक नट, दिग्दर्शक म्हणून प्रवेश, त्याला मिळणारे यश, आपल्या भावडांशी असणारे त्याचे प्रेमळ संबंध, त्याला यशाकडे वाटचाल करताना अचानक आलेले अपयश आपल्या आयुष्यातील पुर्वानुभव आठवत त्याने त्यावर केलेली मात याबी पुस्तकाच्या सुमारे ३३ टक्के ते ६६टक्के या भागात सांगितल्या आहेत.
, शेवटचा एक  तृतीयांश भाग अपयशातून बाहेर पडत चार्लि चाप्लिन याने यशची चव पुन्हा एकदा कशी चाखली? त्याचा मृत्यू कोणत्या स्थितीत झाला? मृत्यूच्या वेळी त्याची कोणती इच्छा होती,याविषयी सांगण्यात आले आहे चार्ली चॅप्लिनचा मृत्यूची घोषणा डॉक्टर करतात आणि पुस्तक संपते.
आपल्याला यशस्वी माणसाचे यशस्वीपण दिसते‌.मात्र त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट केलेली मेहनत दिसत नाही‌ ते दाखवण्याचे काम हे पुस्तक करते यशस्वी  होणाऱ्या माणसांनी अनेक गोष्टीचा विरह सहन केलेला असतो. तो आपल्याला या पुस्तकातून दिसतो. समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्याप्रमाणे 'जगी सर्व सुखी असा कोण आहे रे, विचारी मना तूच शोधूनी पाहे, हे वचन आपणास पुस्तक वाचल्यानंतर किती खरे आहे, हे समजते.

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

ग्रामीण भागातील कष्टकरी व्यक्तींचे भाव विश्व उघडणारा कथासंग्रह 'हस्ताचा पाउस

आपल्या मराठीत विविध प्रकारचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच या साहित्यात समाजातील सर्व जातीच्या व्यवसायाच्या ,आर्थिकदृष्ट्या श्रीमंत,गरीब ,मध्यमवर्गीय असा सर्व स्तरातील व्यक्तींच्या जीवनाचे खुबीने चित्रण केलेले आढळते‌. साहित्याचा वैवध्येतेची परंपरा मराठी साहित्यात खुप वर्षापासून आढळते‌. या वैभवशाली  साहित्यातील  एक घटक म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांनी लिसलेला हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह .नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या पुस्तक संग्राहलायतून मी  हे पुस्तक. मी नुकतेच वाचले.
   सुमारे ८ते १० पानी असलेल्या १२कथा या कथा संग्राहात समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक कथेचे सुत्र ग्रामीण जीवनात अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीभोवती गुंफण्यात आले आहे‌. कथेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषेचा वापर देखील खुबीने केल्याचा दिसून येते.प्रत्येक कथा उलगडताना पार्श्वभुमीवर जास्त चर्चा लेखकाने केलेली नाही‌.अत्यंत हळुवारपणे मात्र न रेंगाळता सुरवातीच्या अर्ध्या ते एक पानात लेखकाने पात्र परिचय आणि पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे‌.
पहिल्या कथेचे शिर्षक 'देवा सटवा महार' हे आहे.या कथेत अज्ञानामुळे आणि गरिबीमुळे  एक महार समाजबांधव कसा नागवला जातो,त्याने बघितलेल्या स्वप्नाचा कसा चकाचूर होतो,हे १०पानांत लेखकाने मांडलयं वडार समाजबांधवांचे दैन्य दु:ख आपणास ९पानाच्या 'वडारवाडीच्या वस्तीत',या दुसऱ्या कथेतून समोर येतेय. पडकं खोपट या  कथेतून काही कारणाने गुन्हेगारीच्या चक्रात अडकलेल्या दोन कुटुंबप्रधान व्यक्तीमुळे कुटुंबाची कसी वाताहात हे समजते.ही या पुस्तकातील तिसरी कथा आहे. काळ्या तोंडाची आणि एकटा या अनुक्रम चौथ्या पाचव्या कथेतून प्राण्याचा भावना कथेतून डोकावतात.या दोन्ही कथांचे नायक आणि नायीका हे कुत्रे आहेत‌.पोकळी असे शिर्षक असलेल्या सहाव्या कथेतून काही कारणाने नोकरी न मिळाल्याने आणि व्यवसाय देखील करु न शकलेल्या प्रेमभंग झालेल्या माधव कुलकर्णी याचे व्यक्तीचित्र लेखक आपणासमोर उभे करतो‌.

 सातव्या कथेत श्याम नावाच्या आईवडील नसलेल्या आणि मोठ्या विवाहीत बहीणीच्या आधाराने लहान कुटुंबियांना सांभाळणाऱ्या श्याम नावाच्या प्रेमप्रकरणात अयशस्वी ठरलेल्या, आणि आपले दुःख कोणाला तरी सांगण्यासाठी आसुसलेल्या व्यक्तिरेखेसी लेखक आपली भेट करवून देतो.या कथेचे शिर्षक वसाण आहे.विपरीत घडले नाही या आठव्या कथेत एका जोगीण आणि तीला मदत करणाऱ्या विठ्ठलाचे भावविश्व आपणास दिसते. हस्ताचा पाऊस या कथेत आपणास गाढव आणि मालक यातील सबंध लेखक उलगडून सांगतो .हस्ताचा पाऊस ही या कथासंग्रहातील नववी कथा आहे.याच कथेवरून कथासंग्रहाचे नाव हस्ताचा पाऊस हे घेतले आहे.मायलेकाचा मळा या दहाव्या कथेत गावात एकेकाळी कुलकर्णीपद भुसवणाऱ्या मात्र घरातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर ते सोडून शांतपणे जीवन व्यतीत करणाऱ्या मात्र त्यावेळीच गावातील सावकरांकडून त्रास सहन करणाऱ्या मायलेकाची गोष्ट लेखक आपल्यापुढे सादर करतो. शेवटून दुसऱ्या असलेल्या ११व्या कथेत सुद्धा सांदीपान आणि त्याची आई येशा या मायलेकांची गोष्ट आहे.हे दोघे महार बांधव आहेत परिस्थितीने पिचलेले आहे.तर कथा संग्रहातील शेवटची बारावी कथा पती असताना प्रचंड श्रीमंती बघितलेल्या मात्र पती निधनानंतर गरीबीत जिवन जगणाऱ्या विधवा पत्नींची आणि तिच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे‌
पुस्तकाच्या कथा सहजसोप्या चटकन समजणाऱ्या, आणि छोट्या आहेत.तसेच त्यामुळे मनोरंजन देखील उत्तम होते .तरी किमान एकदा तरी त्या वाचल्याच पाहिजे असे माझे मत आहे.

मंगळवार, २९ जुलै, २०२५

इस्राइलच्या गुप्तचर संस्थेची रंजक कहाणी सांगणारे पुस्तक 'मोसाद'

सध्या आपल्या मराठीत अनेक नवनविन विषयांवरील अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.  महाराष्ट्राच्या शहरी भागातीलच नव्हे  ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या सर्वच प्रकाशकांकडून ही पुस्तके प्रसिद्ध करण्यात येत आहेत. पुर्वीपासून मराठीत असणारी इतर भाषेतील पुस्तके मराठी भाषेत अनुवादीत करण्याची परंपरा सध्या वेगाने विस्तारत आहे‌. याच मराठीच्या उत्तमोत्तम पुस्तकांचा परंपरेतील पुस्तके प्रसिद्ध करणारे एक महत्तवाचे प्रकाशन म्हणून आपण मधूश्री प्रकाशनाकडे   बघू शकतो‌.मुळचे नाशिक जिल्ह्यातील तालूक्याचे गाव देखील  नसणाऱ्या घोटीतून सुरवात केलेले आणि आता पुण्यात स्थिरावलेल्या  या प्रकाशनाकडून अच्युत गोडबोले यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत‌ हे आपणास माहिती असेलच‌.या पुस्तकांशिवाय मधूश्री प्रकाशनांकडून विविध देशांच्या गुप्तचर संस्थांची माहिती देणारी पुस्तके प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यापैकी रॉ, एफबीआय, सीआयए, केजीबी या संस्थांवरील प्रत्येकी एक तर मोसादवरची दोन पुस्तके प्रमुख म्हणता येतील. मोसादवरील दोन पुस्तके  १६० आणि ३७६पानांची आहेत.त्यातील १६०पानांचे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील प्रमुख वाचानालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेंचा मदतीने वाचले‌.
१६० पानांच्या या पुस्तकात ३० प्रकरणाद्वारे इस्राइलला मोसादची स्थापना करण्याची गरज का भासली,इस्राइल स्थापनेपुर्वीच मोसादच्या स्थापनेची सुरवात कसी झाली? मोसादची स्थापना झाल्यावर सुरवातीच्या काळात तीचे नियमन करताना इस्राइली पंतप्रधांनांकडून झालेल्या चूका, या चूकांवर त्यांनी कसे नियंत्रण मिळवले. मोसादबरोबरच स्थापन झालेल्या इस्राइलच्या अन्य गुप्तचर संस्था मोसादमध्ये कोणत्या पद्धतीने विलीन करण्यात आल्या.मोसादच नाही तर कोणत्याही देशातील गुप्तहेर संस्थांचे काम कसे चालते? मोसादने आतापर्यत यशस्वी केलेल्या मोहिमा, मोसादवर झालेले आरोप,त्यामागची कारणे,मोसादचा आपल्या गुप्तहेरांविषयी असलेला दृष्टिकोन, मोसादच्या सुरवातीच्या काळात तीला मिळालेली अमेरीकेची मदत या विषयी माहिती मिळते.
मूळ पुस्तक इंग्रजी आणि तामिळ भाषेत अनेक विषयांवर संशोधनपर मात्र रंजक आणि माहितीची वस्तुनिष्ठता जपत लिखाण करणाऱ्या नागसुब्रमणियन चोक्कनाथन यांनी इंग्रजी भाषेत लिहले आहे. एन चोक्कन या नावाने ते प्रसिद्ध आहे.मुळचा इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा अभय नरहर जोशी यांनी अनुवाद केला आहे‌.मी मराठी अनुवाद वाचला आहे.अनुवादाची भाषा प्रवाही,सहज समजणारी आहे.मोसादचे बोधचिन्ह असलेले निळ्या रंगातील मध्ये पिवळा पट्टा असलेले आणि पुस्तकाचे नाव पांढऱ्या रंगात छापलेले मुखपृष्ठ आपले लक्ष चटकन वेधून घेते.
सध्या आपल्या भारतात गुप्तहेर संस्था गुप्तहेर यांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.त्या पार्श्वभुमीवर जगप्रसिद्ध अस्या मोसादची माहिती देणारे फाफटपसारा टाळणारे हे पुस्तक आपण वाचायलाच हवे‌

शनिवार, १९ जुलै, २०२५

संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणीचे सद्य काळातील महत्त्व सांगणारे पुस्तक, तूका राम दास

आपल्याकडे संतपरंपरेची मोठी परंपरा आहे. या संतांनी जीवनाविषयीच्या अनेक समस्यांवर मोठा उपदेश केला आहे. मात्र आपल्या दुर्देवाने या संताच्या शिकवणीच्याऐवजी त्यांनी केलेल्या चमत्काराचीच चर्चा जास्त होताना दिसते. जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचा मुखातून गीता म्हणवली, भिंत चालवली.किंवा संत तूकाराम यांची कागदावर लिहलेली गाथा तीन दिवस पाण्यात राहुनसुद्धा तीन दिवसांनी जशीच्या तसी बाहेर आली‌.वगैरै. सध्याचा अत्यंत ताणतणावाच्या काळात या संताच्या उपदेशाचे महत्त्व अजूनच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.संताच्या या  सध्याचा काळातील  शिकवणीचे महत्त्व आपणास समजते ,दैनिक लोकसत्ताच्या प्रकाशनविभागाकडून करण्यात आलेल्या 'तूका राम दास' या पुस्तकातून. संत तूकाराम यांच्या नावातील राम आणि संत रामदास यांच्या नावातील राम एकत्रच घेतलेल्या या पुस्तकातून आपणास या संताच्या शिकवणीचे सध्याचा काळातील महत्त्व समजून येते‌. सन २०१६साली दैनिक लोकसत्तात संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या विषयी साप्ताहिक लेखमाला प्रसिद्ध झाली होती.याच लेखमालिकेचे हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सुप्रसिद्ध वाचनालय सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या मदतीने वाचले.
यात संत तूकाराम यांच्या विषयी २६ प्रकरणातून तर संत रामदास यांच्याविषयी २२प्रकरणातून सांगण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रकरणे आधी सदर स्वरूपात वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली असल्याने  छोटी आहेत. जी चटकन वाचून समजतात. या पुस्तकात दोन्ही संताचे चरीत्र सांगण्यात आलेले नाही तर तर सर्वच्या सर्व प्रकरणे संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणूतील वर्तमान संदर्भ आपणास उलगडून सांगतात.नाही म्हणायला पुस्तकाच्या संत तूकाराम महाराज यांच्या विषयीच्या भागातील पहिले दोन प्रकरणे संत तूकाराम महाराजांच्या वेळची परिस्थिती स्पष्ट करतात.तर शेवटचे प्रकरण संत तूकाराम यांच्या सदेह वैंकुठगमनाविषयी सांगतात. ते वगळता  पुस्तकातील अन्य ४५ प्रकरणे पुर्णत: या १७ व्या शतकातील संताचे सद्यस्थितीतील महत्त्व अधोरेखीत करतात. 
संत तूकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी या काहीस्या समकालीन संतांमुळे समाजात चैतन्य कोणत्या प्रकारे आले‌. त्यांनी केलेल्या रचनांमध्ये त्यांनी केलेल्या न केलेल्या रचना देखील कोणत्या बेमालूम पद्धतीने कालांतराने घुसवण्यात आल्या . याउलट स्थिती संत तूकाराम यांच्याबाबत कशी उद्भवली.त्यांच्या ह्यातीत त्यांनी केलेल्या रचना इतरांनी स्वत:चा म्हणून कश्या वापरल्या.याबाबत संत तूकाराम यांची प्रतिक्रिया काय होती.समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक वगळता अन्य कोणत्या रचना केल्या.कोणकोणत्या भाषेत केल्या.‌समर्थ रामदास स्वामी कोणकोणत्या विषयांत पारंगत होते.याविषयीची माहिती देखील या पुस्तकातून मिळते.
     पुस्तक मुळात वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह असले तरी  दोन तीन लेखांचा अपवाद वगळता लेख लोकसत्तात प्रसिद्ध झाले त्यावेळचा राजकीय स्थितीचा उल्लेख आढळत नाही‌. हे याचे वैशिष्ठच म्हणता येईल.मी या आधी वाचलेल्या या सारख्या पुस्तकात तत्कालीन राजकीय स्थितीचा उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतो .
पुस्तक वाचल्याने आपणास संत तूकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची सद्यस्थितीत देखील किती गरज आहे‌, हे समजते‌.पुस्तक फार मोठे नही जेमतेम २०६ पानांचे आहे‌.जे सहजतेने वाचून होते‌.पुस्तक छोटे असले तरी त्यातील आशय खुप मोठा आहे.मग वाचताय ना पुस्तक

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...