लेखाचे विषय

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

"युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " आजच्या काळात वाचायलाच हवे असे पुस्तक

सध्या आपल्या भारतात सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय कोणता असेल ? याचा धांडोळा घेतला असता आपणास चीनमार्फत जगात पसरलेला कोरेंना व्हायरस याचा विचार करावाच लागतोव्हॉटसपव्दारे या विषयी विविध प्रकारची माहिती सांगितली जात आहे . त्यात काही प्रमाणात खोटी माहिती देखील सांगण्यात येत आहेया पार्श्वभूमीवर या विषयाची  मराठीत शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचे "युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " या पुस्तकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते . जैविक युद्ध आणि रासायनिक हल्ल्यासारख्या किचकट आणि काहीसा कंटाळवाणा  विषय या पुस्तकामध्ये अत्यंत सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला आहे . पुस्तकाची भाषा काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी असल्याने पुस्तक खूपच रंजक झाले आहे .

             पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पध्द्तीने करता पारंपरिक पद्धतीने केली आहे . पुस्तकाची रचना दोन भागात केलेली असून पहिल्या भागात  सध्या सर्वांच्या कळीच्या मुद्दा  झालेल्या  जैविक हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे . ज्याचा  सुरवातीला  याचा इतिहास सांगितलं आहे ज्यामध्ये प्राचीन काळाच्या युरोपात पसरल्या एका अनामिक रोगाच्या साथीपासून सध्याच्या काळातील अँथ्रेक्स , सार्स आदी रोगांच्या आढावा घेण्यात आला आहे . जैविक हल्ल्याची संकल्पना ही आधुनिक संकल्पना नसून प्राचीन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात असल्याचे आपणास या पुस्तकांद्वारे कळते . फक्त ही संकल्पना प्राचीन काली काहीशी विस्कळीत होती . तीला  व्यवस्थित स्वरूप आधुनिक काळात देण्यात आले इतकाच तो काय फरक  . प्राचीन काळी सुद्धा विविध जैविक हत्यारे वापरण्याचे प्रयोग झाले होते , या बाबत अनेक उदाहरणे या पुस्तकात देण्यात आलेली आहेत . जसे रोमन साम्राजाची विविध युद्धे . गिरीश कुबेर यांच्या या पुस्तकातीलबहुसंख्य उदाहरणे हि युरोप खंडातील किंवा प्राचीन चीनमधील आहेत . त्याच्यातही युरोपातील उद्धरणे संख्यने अधिक आहेत .भारत आणि जपान वगैरे भागात यावेळी काय घडत होते , याविषयी सादर पुस्तकाच्या या भागात काहीच सांगितले नाहीये . प्राचीन काळी संपूर्ण अमेरिका खंड आणि आफ्रिका खंडाचा उत्तर भाग वगळता इतर भाग जगाला माहिती नसल्याने त्या भागाचा प्रश्नच येत नाही . मात्र हान्याय भारत जपान आदी भागाला लावता येत नसल्याने या भागातील युद्धांचा समावेश करण्यात येईल पाहिजे होता असे मला वाटते .

   पुस्तकाच्या दुसऱ्या भागात विविध रासायनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली आहे .ज्यामध्ये जमिनीचा क्रूरकर्मा हिटलर यांनी या रासायनिक शस्त्रांचा कसा,  वापर केला ?  याची माहिती देण्याबरोबर सध्या पोलीस दलांच्यामार्फत सहजतेने वापरात असलेला अश्रूधूर या सारख्या शास्त्रांची माहिती तर देण्यात आली आहेच त्या प्रमाणे अनेक प्राणघातक शस्त्रांची माहिती देण्यात आली आहे . या भागात महाभारताचा उल्लेख करण्यात आला आहे . लेखकाच्या मते प्राचीन इतिहासात याचे फारसे दाखले मिळत नाहीत  सुरवात झाल्यावर हा प्राणघातक शस्त्रांचा वापर सुरु झाला . लेखकाने या प्रकारचानरसंहारककशग्स्त्रांच्या निर्मितीचे श्रेय पुन्हा एकदा पाश्चात्य देशांना दिले आहे , त्यातही याच्या निर्मितीचे पातक प्रामुख्याने जर्मनीच्या माथी मारलें आहे मात्र पुस्तक खूपच माहितीपूर्ण झाले आहे .

               मराठीत अर्थशास्त्र , विज्ञानाच्या संदर्भात शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके सध्या पूर्वीपेक्षा अधिक संख्येने निघत आहे . त्या पुस्तकांच्या मालिकेतील हे पुस्तक त्याच्या भाषाशैलीमुळे  खूपच रंजक झाले आहे . प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे . गिरीश कुबेर  त्यांच्या संपादकीयेतून बहुसंख्य लोकांना रुचणारी मते मांडत असले  तरी त्यांची राजकीय मते बाजूला ठेवून खऱ्या ज्ञानावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने वाचावेच असे हे पुस्तक आहे . मग कधी घेताय पुस्तक वाचायला .

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

विश्व पुस्तक मेळा आणि मराठी पुस्तक विश्व


 आज 5 जानेवारीला  हा लेख लिहीत असताना नवी दिल्लीला प्रगती मैदान येथे पुस्तकप्रेमींचा कुंभमेळा म्हणून ज्यास सहजतेने संबोधता येईलअसा  विश्व पुस्तक मेळा  मोठ्या दिमाखात सुरु आहे . 4 जानेवारीला सूरु  झालेला हा वाचकांचा कुंभमेळा 12जानेवारी पर्यंत चालू असेलमात्र जगातील 17व्या क्रमांकाची मातृभाषा असणाऱ्या मराठीचे या विश्व पुस्तक मेळ्यात स्थान काय आहे ? याचा आढावा घेतला असता समोर येणारे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही . कोणत्याही मराठी वृत्तवाहिन्यांवर याची एक मिनिटाची देखील बातमी मी बघितली नाही . मराठी साहित्यविश्वात साहित्य संमेलनाचे जे अनन्य साधारण महत्व आहे , तेच किंबहुना त्याहून कणभर अधिक असे महत्व जागतिक आणि भारतीय साहित्याचा विचार करता या विश्व साहित्य मेळाचे आहे . मात्र त्या ठिकाणी मराठीचे तुरळक अस्तिव आहे . मराठीतील साहित्याचा अवीट गोडवा जगासमोर येण्याची एक उत्तम संधी यामुळे मराठी भाषिकांकडून निसटून गेली आहे . भारताचा विचार करता मराठी भाषिक आज तिसऱ्या क्रमांकावर आहेत . जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणाऱ्या  देशात जिथे 21 अधिकृत भाषा आहेत . अश्या देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या तिसऱ्या क्रमांकावयावरच्या भाषेच्या बाबतीत अशी स्थिती असणे नक्कीच भूषणावह नाही .

                      आज जगभरात वाचक कोणत्या विषयावरची पुस्तके वाचतात ?  त्या विषयावरची पुस्तके मराठीत आहेत का ? नसल्यासत्या विषयावर मराठीत सहजतेने लिहू शकतील अश्या व्यक्ती आहेत का ? हा सर्व शोध मराठीच्या तुरळक अस्तित्वामुळे थांबला आहे . आज मराठीत अनेक नवीन विषयावर पुस्तके निघत आहेत .

त्याची गती यामुळे वाढली असती . मी मूळची अन्य भाषेतील मात्र मराठीत अनुवाद झालेली अनेक पुस्तके बघतो , मात्र त्या तुलनेत मूळची मराठीतील मात्र अन्य भाषेत भाषांतरित झालेली पुस्तके बघावयाला

मिळत नाहीत . जर खूप मोठ्या संख्येने मराठी प्रकाशक या ठिकाणी आले असते , तर या चित्रात नक्कीच बदल झाला असता हे नक्की . मूळचा  शेस्कपियरने इंग्रजी भाषेत आणलेला सॉनेट हा काव्य रचनेचा प्रकार मराठीत केशवसुतांनी आणला तो भाषा भेटीतूनच . या भाषा भेटीची एक अत्यंत छान संधी  विश्व पुस्तक मेळ्यात पुरेश्या प्रमाणत  सहभागी झाल्याने मराठी भाषिकांकडून निसटून गेली आहे . महाराष्ट्र सरकारतर्फे पुस्तकांचं गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलवड  हे गाव विकसित करण्यात आले खरे . मात्र हे प्रयत्न पुरेशे नाहीत वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करणे

अत्यावश्यक असल्याचे सध्या सुरु असणाऱ्या नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील विश्व पुस्तक मेळ्यातील मराठीचा स्थितीवरून दिसून येते आहे अर्थात या चित्रात सकारात्मक बदल करण्याचे प्रयत्न सर्व पातळीवर सुरु आहेत . त्याला चांगले फळ लवकरच लागेल अशी अशा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो . नमस्कार .

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

तेलाचे राजकारण आणि मराठी पुस्तके -

आपल्या सर्वांच्या आयुष्याशी या ना त्या कारणाने जोडला गेलेला घटक म्हणजे जैवइंधने . या इंधनाविषयी आपल्या मराठीत लिहली गेलेली पुस्तके मी नुकतीच वाचली . ती म्हणजे "हा तेल नावाचा इतिहास आहे" आणि "एका तेलियाने " दोन्ही पुस्तके एकाच लेखकांनी लिहलेली आहे. लेखकाचे नाव आहे गिरीश कुबेर . जेव्हा  मला या पुस्तकांविषयी समजले तेव्हा अधाशीपणाने मी ती पुस्तके वाचून काढली.

आपल्या मराठीत इतक्या  सोप्या भाषेत या विषयातील गुंतागुंत समजून सांगणारी पुस्तके मला तरी आढळली नाहीत कोणाला माहीती  असल्यास सांगावे मला आवडेल.

एका तेलियाने या पुस्तकात आखाती देशातील सत्ताधिकाऱ्याविषयी माहिती मिळते . अमेरिकेची या सत्ताधिकाऱ्याना कश्या प्रकारे फूस होती , या विषयी माहिती मिळते.  तेल आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे . त्याच्या किमती "ओपेक" या संघटनेमार्फत कश्या प्रकारे नियंत्रित करून जगाच्या आर्थिक मुठ्या आवळल्या जातात ? लोकशाहीविरोधी असूनही व्हिएतनाम सारखी भूमिका घेता सौदी अरेबिया या देशातील राजघराण्याविषयी अमेरिकेची सहानभूती का ? अमेरिकेवर कुप्रसिद्ध असणारा /११ चा दहशतवादी हल्ला करणारा ओसामा बिन लादेन मुळात कशी अमेरिकेचीच निर्मिती आहे ?तसेच  नंतर ज्या सत्ताधिकाऱ्यांची त्याच्याकडे प्राणघातक शस्त्रे आहेत या आरोपातून हत्या करण्यात आली तो सत्ताधिकारी म्हणजे सद्दाम हुसेन कश्या प्रकारे  अमेरिकेचीच निर्मिती आहे अशीही रंजक माहिती या पुस्तकातून मिळते .

     तर हा तेल नावाचा  इतिहास" या मध्ये आपणास तेलाच्या शोध कश्याप्रकारे लागला; युरोपातील लोकांनी कश्या प्रकारे कंपन्या स्थापून  आखाती देशातील लोकांचे शोषण केले याची माहिती मिळते,  त्याच प्रमाणे आशियातील पहिली विहिर पश्चिम आशियात नव्हे तर भारतातील आसाम मध्ये खणण्यात आली . .या तेलाची

किमंत युरोपीय लोकांनी  आणि अमेरिकी लोकांनी ओळखून सुरवातीला आखाती  देशातील लोकांना कश्या प्रकारे मूर्ख  बनवले ; त्यांच्यातील दुहीचा  स्वतःच्या फायद्यासाठी कश्या प्रकारे फायदा करून घेतला;  आज  पेट्रोल आणि डिझेलच्या आपण ज्या मोठ मोठया कंपन्या बघतो त्यांची सुरवात कश्या प्रकारे झाली  , या विषयीची माहिती मिळते

दोन्ही पुस्तके राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत .तेलाच्या राजकारणाविषयी माहिती पाहिजे असल्ल्यास हि पुस्तके वाचायलाच हवीत .गिरीश कुबेर यांनी तेलावर एकूण तीन पुस्तके लिहली आहेत ती म्हणजे हि दोन आणि "अधर्म युद्ध" हे पुस्तक

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

त्या दहा वर्षातील गुरुदत्त -

गेल्या काही दिवसांपासून मी हिंदीतील एक असामन्य निर्माते दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांचा जीवनावर आधारीत मुळचे इंग्रजी भाषेतील माञ मराठीत अनुवाद झालेले "त्या दहा वर्षातील गुरुदत्त " हे पुस्तक वाचत होतो. आताच ते वाचून संपले .

 मुळचे इंग्रजी पुस्तक सत्या सरन यांनी लिहलेले आहे . तर मिलींद चंपानेरकर यांनी त्याचा अनुवाद केला आहे . पुस्तकात गुरुदत्त याच्या बरोबर काम केलेल्या अबरार अल्वी त्यांचा आठवणी लेखीकेबरोबर शेअर (सामाईक ) केल्या आहेत . अर्थात हे पुस्तक एकाने सांगीतले दुसर्याने लिहून घेतले अश्या प्रकारचे नाही . अबरार अल्वी यांनी सांगितलेल्या कथनावर लेखिकेने (अनुवादक जरी पुरुष असला तरी मुळ लिखाण करणारी स्ञी आहे त्यामुळे लेखीका ) भाष्य केले आहे. आणी कथन आणी भाष्य हे लिखाण वेगवेगळ्या फॉन्ट (टंक) मध्ये केल्याने (निदान अनुवादित पुस्तकात तरी मुळ पुस्तकाबाबत माहीती नाही ) सहज समजते , भाष्य कोणते अणी कथन कोणते ते .         

   पुस्तक प्रकरणांंमध्ये विभागले आहे . प्रत्येक प्रकरणाला गुरुदत्त यांचा चिञपटातील गाण्याचे बोल वापरले आहेत . (त्यामुळे मला पण अरे हे प्रसिध्द गाणे गुरुदत्तांचा चिञपटातील आहे असे आश्चर्याचे धक्के पण बसले असो.)गुरूदत्त यांचा आयुष्यातील सर्वाधीक रहस्यमय भाग म्हणजे गीता दत्त गुरु दत्त आणी वहीदा रेहमान यांचे परस्परामध्ये असणारे भावविश्व याला माझा मते पुस्तकात अजून जागा द्यायला पाहीजे होती ,जी देण्यात आलेली नाही . पहीले प्रकरण आणी शेवटुन दुसरे प्रकरण किंवा पानाचा भाषेत बोलायचे झाल्यास एकुण 250 पानांपैकी फक्त 20 पाने या संदर्भात आहेत , जी कमी आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे . तुमचे मत या पेक्षा भिन्न असू शकते ,आणी मला तुमच्या मताचा पुर्ण आदर आहे . त्या घटनेमुळेच एका अत्यंत मनश्वी प्रतीभावंत कोमल हद्य्री चिञपट निर्माता दिग्दर्शक अभिनेता आपल्यातून निघून गेला असल्याने यावर अधीक प्रकाश टाकणे गरजेचे होते . बाकी पुस्तक उत्तमच आहे

. एखादा चिञपट तयार करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो , एखादा चिञपट तयार करण्यासाठी पडद्यामागे किती व्यक्ती खपत असतात याची सूध्दा माहिती हे पुस्तक वाचताना समजते मागे एकदा NDTV वर सुध्दा वहिदा रेहमान यांची मुलाखत बघताना या विषयाला बगल दिली होती असो . राजेश खन्ना अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी असणारा आनंद या चिञपटातील वाक्य आहे .आनंद मररा नही आनद मरते नही

ते वाक्य मला गुयरुदत्त यांचा बाबतीत अत्यंत चपखल बसते असे वाटते ते म्हणजे गुरुदत्त जैसै दिग्दर्शक मरते नही! गुरुदत्त मरे नही ! ते आजही आपल्यात आहेत त्यांचा चिञपटाचा रुपाने त्याचा दुर्दैवी निधनानंतरही इतक्या वर्षांनी ते परत चर्चेत आहेत यातच त्यांचे मोठेपण दिसुन येते . त्यांचा विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पून्हा भेटण्यासाठी तो पर्यत आपण म्हणूया जाने वो कैसै लोग थे जिन्होने इतने अच्छे चिञपट बनाये , हमने चाहा बनाने को चिञपट तो सिर्फ पैसांकी बरबादी हूवी

साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम

आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत  थांबलेला ...