लेखाचे विषय

लेखक- अच्युत गोडबोले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेखक- अच्युत गोडबोले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ जुलै, २०२६

नादवेध संगीताची अदभूत सफर घडवणारे पुस्तक

संगीत , आपल्या मानवी जीवनातील अविभाज्य घटक .मानवी जीवनातील ताण तणाव अडचणीनं क्षणभर का होईना विसरायला लावून मनुष्याला आनंदाचेक्षण समाधानाची अनुभूती करायला लावणारी अदभूत अशी नैसर्गिक शक्ती म्हणजे संगीत.  .याच संगीताच्या या विलक्षण शक्तीमुळे वैद्यकीय उपचार पद्धतीत संगीताचा उपयोग मानसशास्त्रीय तसेच शारीरिक आजारांच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरतो. ‘म्युझिक थेरपी’द्वारे ताण, चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक आजारांमध्ये आराम मिळतो. शांत संगीत मन स्थिर करते, भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि सकारात्मक विचार वाढवते. शारीरिक आजारांमध्येही संगीत वेदना कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि झोप सुधारण्यास सहाय्यक ठरते. तसेच मेंदूच्या कार्यक्षमतेवरही चांगला परिणाम होतो. त्यामुळे औषधोपचारांसोबत संगीताचा वापर केल्यास रुग्णाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळते.आपल्या प्राचीन ऋषीमुनींना संगीताच्या या सामर्थ्याचीजाणिवावं होती त्यामुळेच  त्र्यांनी संगीताचे मानवी जीवनातील  महत्त्व सांगताना सांगितले की 

“साहित्यसंगीतकलाविहीन
साक्षात् पशुः पुच्छविषाणहीनः।”

आताच्या मराठीत सांगायचे झाल्यास ज्या मनुष्याला साहित्य, संगीत आणि कला यांची आवड नसते, तो प्रत्यक्षात शेपूट आणि शिंगे नसलेला पशूच आहे 

तर या संगीताचा विचार करता अत्यंत महत्वाचा धडक म्हणजे राग . सामान्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने बहुसंख्य जनता याच्या पुरेपूर आंनद घेण्यास मुकते हे टाळले जावे या साठी मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील असणारे अच्युत गोडबोले पुन्हा एकदा आपल्याला मदत करायला पुढे येतात त्यांनी सुलभ पिशवीकर त्यांच्या मदतीने लिहलेले 'नादवेध' हे पुस्तक आपली संगीतातील विविध रागाची नसलेली माहितीची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी करते . 

 ‘नादवेध’ या पुस्तकाकडे ताच्या विश्वाचा सखोल आणि रसपूर्ण वेध घेणारे एक महत्त्वपूर्ण साहित्य म्हणून  आपण सहज बघू शकतो. या पुस्र्कात या पुस्तकात भारतीय आणि पाश्चात्य संगीताच्या विविध पैलूंवर अत्यंत सोप्या, चटकन समजणाऱ्या मात्र वाचताना वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या भाषेत माहिती देण्यात आलेली आहे संगीताची सुरुवात त्याची प्रगती तसेच स्वर, ताल आणि लय यांसारख्या मूलभूत घटकांची  सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.

‘नादवेध’चे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही लेखकांनी संगीत या विषयाकडे केवळ तांत्रिक दृष्टीकोनातून न पाहता त्यामागील मानवाला धावणाऱ्या गोष्टी जसे  संगीत ऐकताना येऊ शकणाऱ्या भावना त्यांचे सांस्कृतिक संदर्भ गायकाच्या गायनांतील भावना यांच्या देखील विचार केल्याचे पुस्तक वाचताना जाणवते. 
पुस्तकात भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच पाश्चात्य संगीताचीही माहिती दिली आहे. या दोन्ही संगीतप्रकारांतील साम्य-भेद स्पष्ट करताना लेखकांनी वाचकाला जागतिक संगीताची  व्यापक दृष्टीकोनातून ओळख करून देण्यात आली आहे.त्यासाठी  अनेक नामवंत संगीतकार, गायक आणि त्यांच्या कार्याचा संदर्भ देत संगीताचा प्रवास अधिक जिवंत आणि प्रभावी केला आहे 

पुस्तक आधी लोकसत्तामध्ये स्तंभ स्वरूपात प्रसिद्ध झालेले असल्याने लेख लहान आहेत ज्यामुळे पुस्तक वाचनता दडपण येत नाही पुस्तक वाचताना  आपण सहजतेने एक एक प्रकरण वाचत पुस्तकांच्या शेवटाकडे येतो लेखनशैली अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकांसारखीच  संवादात्मक आणि सहज असल्यामुळे अवघड वाटणाऱ्या संकल्पनाही सोप्या पद्धतीने समजतात. उदाहरणे, किस्से आणि संदर्भ यांच्या मदतीने पुस्तक अधिक रोचक बनते. एकूणच, ‘नादवेध’ हे पुस्तक संगीताच्या गूढ आणि सुंदर विश्वात प्रवेश करण्यासाठी एक उत्कृष्ट दार आहे. नवशिक्या असो वा जाणकार, प्रत्येक संगीतप्रेमीसाठी हे पुस्तक प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि मार्गदर्शक ठरते.



बुधवार, २७ मे, २०२६

आपल्या शरीरातील बहुमोल ईश्वरी देणगीची माहिती देणारे पुस्तक 'रक्त'

अरे,तो माझा रक्ताचा नातेवाईक आहे,तरी असा कसा काय वागला ? लोक सध्या रक्ताची नाती देखील विसरत चालली आहेत. रक्ताच्या नात्यातील माणसे एकवेळ दगा देतील मात्र आमची माणसे नाहीत.रक्तातील माणसांसारखीच काळजी आमच्या येथे घेतली जाते .या प्रकारची अनेक वाक्ये आपण अनेकदा ऐकतो, बोलतो .हिंदी चित्रपटाचा विचार करता, मै तुम्हारा खून पी जाऊंगा हा एकेकाळचा सुप्रसिद्ध डायलॉग . त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचा विचार करता त्या राक्षसांच्या प्रत्येक थेंबापासून नवीन दैत्य जन्मला येत असल्याचा कथा आहेत .इतिहासात रक्त सांडून लढाई जिंकल्याचे अनेक दाखले देण्यात येतात . रक्ताचे पाणी होणे. या सारख्या अनेक म्हणी वाक्यप्रचार आपल्या मराठीत आहेत  जास्त रक्तस्त्राव होऊन रुग्णाचा मृत्यू या बातम्या देखील आपल्या परिचयाचा आहेत .तर असा आपल्या शरीरातील महत्वाचा घटक जो आपल्या संस्कृतीशी देखील जोडला गेला आहे तो घटक म्हणजे रक्त. इतके असून देखील या घटकांविषयी आपल्या मराठीत शास्त्रीय दृष्ट्या अचूक माहिती देणाऱ्या पुस्तकाचा मात्र अभाव होता . 

मात्र मराठीत ज्या विषयावर   माहितीचा अभाव तिथे अच्युत गोडबोले हजर  या सुप्रसिद्ध फॉर्मुल्याप्रमाणे अच्युत गोडबोले यांनी डॉ वैदेही लिमये यांना  बरोबर घेऊन  रक्त  या विषयावर पुस्तक लिहले आहे. जे मी नुकतेच वाचले.  अच्युत गोडबोले यांनी एकट्याने लिहलेली आणि सहलेखक/सहलेखिका घेऊन लिहलेल्या ७५ पुस्तकांचा

एकत्रित विचार करता अच्युत गोडबोले यांनी लिहलेले आणि  मी वाचलेले हे १८ वे पुस्तक (त्यातील ९ पुस्तके माझ्या वैयक्तिक संग्रहात आहेत. तर उर्वरित पुस्तके मी वाचनालयातून आणून वाचली आहेत )   

अच्युत  गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये लिखित ‘रक्त’ हे पुस्तक विज्ञान, इतिहास आणि मानवी जीवन यांची एकत्रितपणे माहिती देणारे  विविध गोष्टीना साजेने स्पर्श करणारे लेखन आहे. सुमारे ३५०  पानांच्या या पुस्तकात  ‘रक्त’ या जीवनावश्यक घटकाचा सर्वांगाने विचार केल्याचे जाणवते. . केवळ शरीरशास्त्रापुरते मर्यादित न राहता, हे पुस्तक वाचकाला विज्ञान, संस्कृती, समाज आणि मानवी अनुभव यांची सविस्तर माहिती पुस्तकातून मिळते 

पुस्तकात रक्ताचे स्वरूप, त्याचे घटक आणि घटकांची कार्ये  जसे लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स, यांची कार्ये अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत. रक्त शरीरात ऑक्सिजन वाहून नेते, रोगांशी लढते आणि संतुलन राखते, हे स्पष्ट करताना  उदाहरणांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. त्यामुळे गुंतागुंतीचा विषयही सहज कळतो. 

या पुस्तकाचीएक चांगली बाजू म्हणजे रक्ताच्या शोधाचा आणि प्रयोगांचा इतिहास. प्राचीन काळातील अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती आणि सुरुवातीचे धाडसी प्रयोग यांचे वर्णन वाचताना खिळवून ठेवले जाईल अश्या  पद्धतीने

केले आहे. पुढे रक्ताभिसरणाचा शोध, रक्तगटांची ओळख आणि रक्तसंचार तंत्रज्ञानाचा विकास यामुळे वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती  छान पद्धतीने  सांगितली  आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रक्तपेढ्यांची गरज आणि त्यांचा विकास कसा झाला, हेही सांगितले आहे. 

याशिवाय, रक्ताशी संबंधित आजार, फॉरेन्सिक सायन्समधील उपयोग आणि गुन्हे उलगडण्यात रक्ताची भूमिका यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. रक्तदानाची संकल्पना आणि त्यामागील मानवतावादी दृष्टिकोन हा देखील पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. रक्तदान हे केवळ वैद्यकीय गरज नसून सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणिव  हे पुस्तक वाचनातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते 

पुस्तकात रक्ताचा सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थही मांडला आहे. साहित्य, कला आणि परंपरेत रक्त कधी शौर्याचे, तर कधी नातेसंबंधांचे प्रतीक म्हणून दिसते. या विविध दृष्टिकोनामुळे विषय अधिक समृद्ध होतो.एकूणच, ‘रक्त’ हे पुस्तक ज्ञान, इतिहास आणि भावना यांचा सुंदर मेळ साधणारे आहे. सोपी भाषा, सखोल मांडणी आणि व्यापक दृष्टीकोन यामुळे हे पुस्तक वाचकाची जिज्ञासा वाढवते आणि विज्ञानाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवते.

शनिवार, २३ मे, २०२६

कॉस्टिंग आणि मॅनेजमेन्ट या विषयाची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट'

नाशिक येथे मुख्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठाच्या विद्यापीठ गीतात एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे  'ज्ञानाची साधना निरंतर ' साधारणतः १९८० ते १९९० या दरम्यान कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहीहेले गे विद्यापीठ आजच्या काळात देखील त्यांत महत्वाचे आहे .किंबहुन सध्याच्या चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजिनसिनच्या काळात तर त्याचे महत्व अजूनच वाढले आहे.जर मनुष्याने सतत काहीतरी नवीन शिकले नाही तर तो या स्पर्धेत पार दूरवर फेकला जाईल,हे कटू असले तरी सत्य आहे ,माझ्याकडून हि चूक होऊ नये यासाठी मी कॉमर्सच्या अभ्यास सुरु केला आहे .या अभ्यासाला मदत होण्यासाठी मी अच्युत गोडबोलेंहि लिखित 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट' हे पुस्तक नुकतेच वाचले,असो .
 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट'  हे पुस्तक मॅनेजमेंट  आणि अकाउंटिंग या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून ओळखता येऊ शकते . गुंतागुंतीच्या  आर्थिक व व्यवस्थापकीय संकल्पना या पुस्तकात खूपच सोप्या,  शाळेत असताना ९ आणि १० त शिकलेले अर्थशास्त्र  सोडून  कॉमर्सच्या काहीही गंध नसलेल्या माझ्यासारख्या देखील समजू शकतात या भाषेत लिहिलेल्या आहेत.मी वाचली ती पुस्तकाची पहिली आवृत्ती असेल म्हणून असेल कदाचित,  पुस्तकात हे पुस्तक क्रमिक पुस्तक म्हणून देखील

वापरता येऊ शकते असा थेट उल्लेख नसला तरी पुस्तकाची एकूण रचना त्याच प्रकारची आहे. पुस्तक दोन भागात विभागले आहे.पहिल्या भागात संकल्पना एक्सप्लेन करण्यावर भर देण्यात आला आहे तर दुसऱ्या पार्ट मध्ये याची डिटेल्स इन्फो देऊन काही एक्ससाईज सोडवायला दिल्या हेत या चाचण्यांमुळे विषय आपण नक्की किती समजला आहे हे समजते या पुस्तकात ‘कॉस्टिंग’ आणि ‘मॅनेजमेंट अकाउंटिंग’या दोन प्रमुख संकल्पना रोजच्या जगण्यात नेहमी अनुभवायास येणाऱ्या गोष्टीच्या आधारे सामावून सांगितल्या आहेत . उत्पादन खर्च कसा ठरवला जातो, खर्चाचे विविध प्रकार (Fixed, Variable, Semi-variable), तसेच खर्च नियंत्रणाची तत्त्वे  या सारख्या अनेक गोष्टीची सविस्तर माहिती आपणस या पुस्तकातून मिळते. त्यामुळे हे पुस्तक केवळ कॉमर्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच उपयोगी आहे असे नाही, तर ज्याला या विषयाबाबत जाणून घेण्याची इच्छुकता आहे असा कोणीही सायन्स ग्रॅज्युएट, इंजिनियर आर्ट्सवाला कोणीही म्हणजे कोणोही वाचून याविषयी समजवून घेऊ शकतो. या प्रकारे हे पुस्तक गोडबोले सरानी लिहलेलं 

पुस्तकातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे एखाद्या कंपनीत डिसिजन मेकिंगमध्ये  कॉस्टिंगची भूमिका. एखाद्या कंपनीने उत्पादन वाढवावे की कमी करावे, नवीन प्रकल्प हाती घ्यावा की नाही, किंमत धोरण कसे

असावे अशा अनेक कमर्शियल  निर्णयांमध्ये ‘कॉस्ट अॅनालिसिस’ कसा उपयोगी पडतो, हे अच्युत गोडबोले यांनी  उदाहरणांसह स्पष्ट केले आहे. यामुळे वाचकाला केवळ थेरॉटिकल  नॉलेज मिळत नाही, तर प्रत्यक्ष जीवनातील उपयोगही समजतो.

याशिवाय ‘बजेटिंग’, ‘स्टँडर्ड कॉस्टिंग’, ‘ब्रेक-ईव्हन अॅनालिसिस’ यांसारख्या संकल्पनाही अरे ! या संकल्पना इतक्या सोप्या आहेत तर ! मी उगीच  काहीतरी अवघड गोष्टी आहेत असे समजत होतो असे विचार वाचल्यावर यावेत अश्या पद्धतीने मांडल्यात. 

एकंदरीत, ‘कॉस्ट अँड मॅनेजमेंट’ हे पुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार करण्याची सवय लावते. आर्थिक निर्णयांच्या मागील तर्क समजून घेण्यासाठी आणि व्यावसायिक दृष्टी विकसित करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरते.

सोमवार, १८ मे, २०२६

अकाउंटिंगची मुळाक्षरे गिरवण्यापासून निभाव लागू शकेल असे अकाउंटींग ची माहिती देणारे पुस्तक"अकाउंट फॉर डमीज'


 
सध्याच्या ए. आय च्या काळात आपणास जॅक ऑफ ऑल ट्रेडस असणे अत्यावश्यकच आहे. त्याशिवाय आपला निभाव लागणे निव्वळ अशक्य.मात्र आपल्या रोजच्या आयुष्यात फार मोठ्या प्रमाणात आवश्यक असणाऱ्या 'अकाउंटंसी' या विषयाबाबत माझे ज्ञान खूपच तुकडे होते सध्याचा काळात आपल्यला ज्या विषयाची काहीही माहिती नाही. त्या विषयावरची मुळाक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे अश्या विषयाबाबत आपणास मदत करायचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्या विषयावर अच्युत गोडबोले यांचे एखादे पुस्तक आहे का ?हे बघणे मी देखील तेच  केले आणि मला त्यांची दोन पुस्तके सापडली त्यातील एक म्हणजे "अकाउंट फॉर डमीज' आणि दुसरे म्हणजे 'कॉस्ट अँड मॅनेजमेन्ट ' माझ्या घरी कॉमर्सची मोठी परंपरा असली तरी शाळेत नववी आणि दहावीला शिकलेल्या अर्थशात्राच्या पुस्तकांखेरीज मला कॉमर्सचा  गंध नव्हता त्यामुळे मी चटकन ती पुस्तके विकत घेतली

काही जण मी विनाकारण पुस्तके विकत घेतली असे म्हणतील त्यांच्यामते चॅट जीपीटीमुळे थेट माहिती मिळत असताना पुस्तके का विकत घेयची ? तर अश्या मित्र - मैत्रीणींना मी सांगू इच्छितो की चॅट जीपीटीमुळे माहिती मिळते ज्ञान नाही जर तुम्हला एखाद्या विषयात  ज्ञानी होयचे असल्यास अजूनही पुस्तकांशिवाय तरणोपाय नाही.  मात्र तुम्हला फक्त माहितीगार होयचे असल्यास 'जय हो चॅट' जीपीटी असे तुम्ही म्हणू शकता. थोडक्यात तुम्हाला भूक लागली असता तुमच्या जिभेवर थेट  मॅगी ठेवणे म्हणजे चॅट जीपीटी तर मॅगी कशी तयार करायची याची प्रात्यक्षिकासह उजळणी करत मॅगी खायची  म्हणजे पुस्तकाचे वाचन .आता थेट जिभेवर मॅगी ठेवल्याने पोट भरत असले तरी स्वतः तयार करून मॅगी खाण्यातीळ मजा काही औरच ना ?  आणि आपली हि गरज पुस्तकेच पूर्ण करू शकतात .म्हणून आज देखील पुस्तके महत्वाची आहेतच असो 

तर या दोन पुस्तकांपैकी  "अकाउंट फॉर डमीज या पुस्तकाचे दुसरे वाचन मी नुकतेच केले (कोणत्याही अभ्यासविषयक पुस्तकाचे तीन वाचन केल्यास फायदा होतो. पहिल्या वाचनात पुस्तक चाळणे होते .दुसऱ्या वाचनात पुस्तक
सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचणे होते या दुसऱ्या वाचनात पुस्तक आपणास बऱ्यापैकी समजते तर टिपऱ्या वाचनांत आपणास पुट खूपच मोठ्या प्रमाणात समजते ज्यामुळे पण त्यावर परीक्षेत प्रश्न सोडवू शकतो ) दुसऱ्या वाचनात मालपुस्तक किती समजले हे सांगण्यासाठी आजचे लेखन 

.तर अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकासारखीच यही पुस्तकांची भाषा सहजसोपी आहे .मराठीत पुस्तक आहे ना ! मग भलेही व्यवहार वापरता नसेना वापर संस्कृतचा प्रभाव असलेले शब्द ज्यामुळे संकल्पना समजत असली  तरी संकल्पनेत वापरलेले शब्द मुळात वापरत नसल्याने वाचकाचा व्यवहारत शब्दाचा गोंधळ झाला तरी कुठे बिघडले असा इतर मराठी पुस्तकात दिसणारा प्रकार अच्युत गोडबोले याचा पुस्तकात कधीही नसतो तो याही पुस्तकात नाहीये याही पुस्तकात त्यांनी आपल्यकडे रूळलेले इंग्रजी शब्दच वापरलेले आहेत . साधारणपणे अकाउंटिंग हा विषय अनेकांना कठीण, कंटाळवाणा वाटतो . मात्र गोडबोले यांनी आपल्या खास सोप्या आणि संवादात्मक शैलीत हा गैरसमज दूर केला आहे.

या पुस्तकात अकाउंटिंगची  मूलभूत संकल्पना अगदी ग्राउंड लेव्हलपासून स्पष्ट केली आहे. “अकाउंटिंग म्हणजे काय?”, “ते का आवश्यक आहे?” यापासून सुरुवात करून व्यवहारांची नोंद, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांसारख्या संकल्पना टप्प्याटप्प्याने समजावून सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक संकल्पना दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट केल्यामुळे वाचकाला ती सहज कळते 

याशिवाय, पुस्तकात केवळ सैद्धांतिक माहिती न देता व्यवहारात अकाउंटिंग कसे उपयोगी पडते, आर्थिक निर्णय कसे घ्यावेत, याबाबतही मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे वाचकाला फक्त ज्ञानच मिळत नाही, तर ते प्रत्यक्षात वापरण्याची दिशा देखील मिळते.पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे पुस्तकाच्या  शेवटी २७ पानांमध्ये अकॉंटिंगच्या वेगवेगळ्या संकल्पांची सुमारे २० ते २५ शब्दात एक संकल्पना या प्रकारे करून दिलेली ओळख ज्यामुळे पुस्तकात शिकलेल्या गोष्टीची सहजतेने उजळणी होते. तसेच याच्या आधी वाचकला पुस्तक किती कळालेले आहे हे समजावे यासाठी काही प्रश्न देखील दिलेली आहेत 

एकूणच, "अकाउंट फॉर डमीज' हे पुस्तक अकाउंटिंग विषयाची भीती दूर करून त्याला सोप्या, उपयुक्त आणि समजण्यासारख्या स्वरूपात मांडणारे उत्कृष्ट मार्गदर्शक आहे.

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

खगोलशास्त्रातील काही बेसिक कंसेप्ट सहजसोप्या भाषेत स्पष्ट करणारे पुस्तक 'स्पेस ट्रॅव्हल'

रात्री प्रवास करताना, मानवी वस्तीपासून दुर, जिथे लाईटची अडचण नाहीये,अस्या ठिकाणी आपण प्रवासादरम्यान थांबलो आणि वर आकाशात बघीतले तर आपणास असंख्य तारे ग्रह,उपग्रह दिसतात. आपल्या मनुष्याला याचे पार अश्मयुगापासून आकर्षण. मात्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या पन्नास वर्षात मनुष्याचे याविषयीचे गुढ बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाले त्याला कारणामुळे होते या काळात झालेली प्रगती.  जगातील सर्वात श्रीमंत असणारा एलोंड मास यांच्या स्पेस एक्स या कंपनीत मार्फत काही प्रमाणात सुरू करण्यात आलेली अवकाश पर्यटन हे या प्रगतीचेच सध्याचे स्वरूप किंवा भारताचे आदित्य एलवन मिशन असो तर गणयान मिशन असो ही सुद्धा याचेच काही उदाहरणे. हा प्रवास कसा झाला याची कहाणी मोठी रंजक आहे आणि आपल्याला ही माहिती करून घ्यायची असेल तर मराठी ज्ञानभाषा हवी यासाठी मराठीमध्ये अनेक विषयांवर माहितीपूर्ण तरी रंजक भाषेत पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले ट्रॅव्हल हे पुस्तक आपणास उपयोगी ठरते मी काही दिवसापूर्वीच हे पुस्तक वाचले. 

या पुस्तकात ३२३ पानातून १२ प्रकरणाद्धारे पृथ्वीचे वातावरण नक्की कुठे संपते,आणि अंतराळ सुरु होते? ज्या रॉकेटमधून आपण अंतराळात जातो त्याची मुळातील रचना काय असते? या रॉकेटचा विकास कोणत्या प्रकारे झाला. आपल्या भारताची इस्रो असेल किंवा जगात अत्यंत प्रसिद्ध असलेल्या नासा सारख्या किंवा युरोपीय युनियनची युरोपीय स्पेस एजन्सी असो या सारख्या स्पेस एजन्सीची सुरवात कोणत्या प्रकारे झाली? अमेरिका
आणि यु.एस.एस.आर मधील जमिनीवरील युद्ध खगोलशास्रात कसे शिरले ?, याचा संपुर्ण मानवजातीला फायदा झाला की तोटा, झाला.फायदा झाला असल्यास कोणत्या प्रकारे झाला? अवकाशास्त्राचा विचार अत्यंत प्रसिद्ध

असलेल्या अपोलो मोहिमेची सुरवात कशी झाली? त्यात काय घडले? आपला भारत जे बांधायचा प्रयत्न करतोय ते अवकाश स्थानक म्हणजे काय ? अवकाश स्थानकाशीवाय अन्य कोणत्या घटकाद्वारे खगोलशास्त्राचा पृथ्वीबाहेर राहुन अभ्यास केला जातो?, या रंजक वाटणाऱ्या अवकाश संशोधन क्षेत्रात प्राणहानी करणाऱ्या घटना घडल्या आहेत का?घडल्या असल्यास त्या कोणत्या प्रकारे घडल्या, त्यात काय नुकसान झाले ? आपल्या भारताच्या अभिमानाची संस्था असलेल्या इस्रोची स्थापना कशी झाली ? अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणारे भारतीय कोण आहेत?, अवकाश संशोधन क्षेत्राची भविष्यातील वाटचाल कसी असेल,? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत.

पुस्तकाची भाषा अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखीच सहजसोपी समजणारी आहे.विषयाची गरज
नसली तरी सलग शब्द वाचण्यास कंटाळा येऊ शकतो हे लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चित्रे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही‌.

खगोलशास्त्रासारखा काहीसा किचकट वाटणारा विषय सुद्धा किती रंजकतेने मांडता येतो. तसेच खगोलशास्त्रातल्या अवघड संकल्पना जसे की क्वांटम मेकॅनिक्स, नॉन युक्लीड जॉमेट्री, वर्म होल, डार्क एनर्जी, डार्क मॅटर,  स्टिंग्युलेरिटी  या संकल्पना म्हणजेच खगोलशास्त्र नव्हे तर सर्वसामान्यांना रंजक वाटेल अश्या अनेक संकल्पना खगोलशास्त्रात आहेत. या संकल्पना वाचून सर्वसामान्यांना खगोलशास्त्रात इंटरेस्ट वाटू शकतो. यातून ते मी वरती सांगितल्या त्या संकल्पना सुद्धा माहिती करून घेऊ शकतात हे मला या पुस्तकातून पुन्हा एकदा समजले. 

   तसं बघायला गेलं तर मी तिसरी चौथी  पासून समाजात खगोलशास्त्राचा प्रचार प्रसार करणाऱ्या खगोल मंडळ या संस्थेत सक्रिय होतो. त्यामुळे या पुस्तकात असणारी बरीच माहिती मला आधीच माहिती होती. मात्र ती किती रंजकतेने मांडता येते हे मला अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकातून समजले. ज्यांना खगोलशास्त्राची काहीच माहिती नाही किंवा ज्यांना आपल्या मराठी किती सहजतेने माहिती देता येऊ शकते हे जाणून घ्यायचे आहे ते सुद्धा हे पुस्तक वाचू शकतात

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

मानसशास्त्राची सर्व बाजूने सविस्तर आणि रंजक पद्धतीने माहिती देणारे पुस्तक 'मनात'

मानसशास्त्र , आपल्या शरीरातील सर्वात विस्मयकारी अवयवव असलेल्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. काही अपवाद वगळता प्रामुख्याने कला शाखेच्या विद्यर्थ्यांनी शिकण्याचा विषय म्हणजे मानसशास्त्र . आता काही परिस्थिती वेगाने बदलतीये, अनेक हुशार विद्यार्थी ठरवून कला शाखेत प्रवेश घेत आहेत. मात्र पूर्वी ज्याला इतर कुठे प्रवेश मिळाला नाही, अश्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळवण्यासासाठी कुठे प्रवेश घ्यावा तर कला शाखेत. आणि अश्या कला शाखेतील एक विषय म्हणजे मानसशात्र . मुळात  हा विषय ज्या शाखेत प्रामुख्याने शिकवला जातो ती शाखाच दुर्लक्षित त्यामुळे विषयाकडे सुद्धा दुर्लक्ष होणे आलेच. मात्र आपल्या सर्व हालचालीवर , वर्तनावर, अन्य लोकांशी असलेल्या नातेसंबंधावर भावनांवर, पर्यायाने आपल्या संपूर्ण आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे मानसशास्त्र  हि जाणीव सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याने सध्या विविध आस्थापनात नोकरी भरती करणाऱ्या व्यक्ती आपण ज्यांना भरती करून घेत आहोत र्त्यांची मानसिक स्थिती काय आहे ? हे विविध चाचण्यांतून समजून घेत आहेत. 

त्यामुळे आपल्या सर्वाना मानसशास्त्राची किमान तोंडओळख असणे सध्याच्या काळात आवश्यक आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्या मराठीत सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल, समजेल अश्या पद्धतीने आणि प्रकारची मानसशात्राची  माहिती देणाऱ्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. आपल्या मराठीतील मानसशास्त्राची माहिती देणारी बहुसंख्य पुस्तके अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने लिहण्यात आलेली आहेत ज्यामुळे ज्याला मानसशास्त्राची  फक्त तोंड ओळख करून घेयचीआहे त्यात पारंगत होण्याची इच्छा नाही त्याला देखील  कारण नसताना रटाळ पुस्तके वाचावी लागतात.तसेच या पुस्तकाची भाषा देखील परिभाषेत अडकलेली असल्याने समजायला अडचण येते. याला ऊत्तर काय तर  जे मानसशास्त्राचे अभ्यासक नाही अश्या सर्वसामान्य व्यक्तींना उपयुक्त ठरेल अश्या पद्धतींची माहिती ती देखील रंजक पद्धतीने देण्यात आलेली पुस्तके वाचणे आणि या कामात आपल्याला मदत करते . अर्थशास्त्र, संगीत, अकाउंटिंग, गणित नॅनो टेक्नॉलॉजी, ए  आय, साहित्य, नैसर्गिक शात्राच्या विविध शाखा, व्यवस्थापनशास्त्र, मानसशास्त्र  अश्या विविध क्षेत्रातील  विविध बाबींवर मराठीत सहजसोप्या  मराठीत माहितीपूर्ण पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहलेले 'मनात हे पुस्तक. जे मी नुकतेच वाचले 

अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात वापरलेल्या भाषसेबाबत त्यांना पूर्ण मार्क देणे आवश्यकच आहे.  याही पुस्तकांची भाषा सहजसोपी ज्याला मानशास्त्राची काहीही पार्श्वभूमी नाही, अश्या त्यांना देखील या शास्त्राची मोठ्या प्रमाणात माहिती करून देणारे पुस्तक म्हणून पण या पुस्तकाकडे बघू शकतो. क्रमिकपुस्तकात असलेला बोजडपणा या पुस्तकात आढळत नाही. पुस्तक सोप्या भाषेत लिहायचे आहे मग करा माहितीत काटछाट, हाही मुद्दा या पुस्तकात आढळत नाही. यात संगीतलेल्या घटकांविषयी मोठ्या प्रमाणात सविस्तर माहिती या पुस्तकातून आपणास मिळते. पुस्तक विविध विभागात विभागले आहे. त्यामुळे जर आपणास एखद्या ठराविक घटकाचीची माहिती हवी असेल तर आपण तो शोधू शकतो, प्रत्येक  विभाग प्रकरणात विभागाला आहे त्यामुळे विषय समजण्यात काहीही अडचण येत नाही. या पुस्तकात एकूण १७ विभाग आहेत. प्रत्येक विभाग हा स्वतंत्र्य पुस्तक म्हणून बघितला तरी हरकत नसावीअशी या पुस्तकांची रचना आहे ढोबळमानाने मानसशास्त्रावरच्या  १७ वेगवेगळ्या पुस्तकांचे एकत्रयीपणे छापलेले ७०० पानाचे पुस्तक म्हणजे सदर पुस्तक होय . मन कितीही अथांग आह. आपण त्यापैकी किती लहान भाग जाणतो ,हे सांगणारे पुस्तकाचे निळसर हिरव्या रंगातील हिमनगाच्या पार्श्वभूमीवरील मेंदूचे छायाचित्र आपणास पुस्तकाकडे सहजतेने खेचून घेते. 

अच्युत गोडबोले यांचे  मानसशास्त्रावरील मी वाचलेले हे सहावे पुस्तक. मी आधी अच्युत गोडबोले यांची मानसशास्त्रावरील मनकल्लोळ  भाग १ आणि २ ,सायकोथेरपीज . ऑटिझम, संवाद ही पुस्तके वाचली आहेत . मात्र मनात या पुस्तकातील माहिती उचलून पुन्हा दिली आहे. असे आढळत नाही. अपवादात्मक स्थितीत माहिती पुन्हा दिल्याचे आढळते मात्र याचे प्रमाण २ ते अडीच टक्क्याच्या पुढे नाही त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे असो .या पुस्तकात आपणास  भारतीय संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक दृष्टिकोन , युरोपीय आणि अमेरिकन मानशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास, त्यांनी मांडलेल्या विविध संकल्पना, मानसिक आरोग्याचा आणि विकारबाबत झालेले वेगवेगळे संशोधन , या संशोधनाचे विविध टप्पे, विविध मानसिक विकारांचे ,आजारांची,व्याधींची माहिती , मानसिक आजार बरे व्हावे किंबहुना होऊच नये  यासाठी कोणते मानसशास्त्रीय उपाय  योजले जातात  मानसशास्त्रांच्या विविध उपशाखांची माहिती, तसेच मानसशास्त्राशी जवळचा संबंध असलेले भावनांक, बुध्यांक  आदी विषयांची माहिती देण्यात  आली आहे.

भारतीय संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक दृष्टिकोन सांगताना लेखकाने हिंदू धर्म ,बौद्ध धर्म, जैन धर्म अन्य पारंपरिक बाबींची माहिती दिली आहे .तसेच भारतीय सारखीच प्राचीन संस्कृती असलेल्या ग्रीक संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक तसेच मनोरुग्णालायची स्थिती कशी सुधारत गेली मनोविकाराविषयी माहिती पहिल्या भागात सांगितली आहे दुसऱ्या भागात मेंदू आणि मज्जसंस्र्थानची माहिती देण्यात आली आहे तिसऱ्या आणि चवथ्या भागात अनुक्रमे सिग्मनफ्राईड पर्यतची मानसशास्त्राची वाटचाल आणि सिग्मनफ्राईड आणि युंग यांनी घातलेली भर सांगण्यात आली आहे. भाग क्रमांक ५ ,७, ,८,९ आणि १० मध्ये एक्सपिरिमेंटल सायकोलॉजी गेस्टेलास्ट सायकोलॉजी, डेव्हल्पमेंटल सायकोलॉजी, सोशल सायकोलॉजी ह्युमिनिस्टिक सायकोलॉजी यांची याचा क्रमाने माहिती देण्यात आली आहे सहाव्या भागात बिव्हेरिझम ची माहिती लेखकाने दिली आहे तर ११ व भाग आणि १२ तसेच भाग १३ वा अनुक्रमे बुध्यांक , व्यक्तिमत्व आणि भावना या घटकावर भाष्य करतो. १४ आणि १५ व भाग पुन्हा एकदा आपणांला अनुक्रमे कोंगीटीव्ह आणि परस्पेशन या मानसशास्त्राच्या उपशाखांबाबत माहिती देतो. शेवटून दुसरा भाग ऑटिझम,ओसीडी फोबिया, स्किझोफेनिया, डिप्रेशन, चिंता या आजाराविषयी माहिती देते .तर शेवटचे १७ वे प्रकरण विविध उपचार पद्धतीच्या थेअरीविषयी  आपणास माहिती देते 

लेखाच्या सुरवातीला सांगितले  त्या परिमाणे मानसशास्त्र  सध्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याने आपणास या विषयाची तोंड ओळख होण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे

रविवार, २९ जून, २०२५

गणिताची रंजक सफर घडवणारे पुस्तक नंबर्स

गणित ! अनेकांचा नावडता विषय.नको ते आकडे, नको ती समिकरणे.असाच आपल्यापैकी काहीचा आग्रह असण्याची शक्यता अधिक आहे.दहावीच्या शालांत परिक्षेत देखील ज्या विषयात मुल मुली सर्वात जास्त नापास होतात असा इंग्रजीनंतरचा विषय म्हणजे गणित होय. तर असा गणित विषय सुद्वा रंजक आहे. गणितात मनुष्याला खिळवून ठेवण्याची ताकद आहे असे सांगितले अनेकांना ते खोटे वाटण्याची शक्यता अधिक.गणित सोपे  प्रत्येक पायरी सविस्तर सांगून समजवता येईल,मात्र गणित रंजक करता येणार नाही असेच अनेकाचे म्हणणे असेल.मात्र गणित रंजक ,खिळवून ठेवण्याची किमया केली आहे‌.अच्युत गोडबोल आणि डॉ.विद्यागौरी प्रयाग यांनी लिहलेल्या नंबर्स या या पुस्तकाने. मधूश्री प्रकाशनाच्या सव्वा तीनशे पानाच्या पुस्तकात १२प्रकरणाद्वारे आपणास गणितातील रंजकता समजते‌.नाशिकमधील महत्तवाचे वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक याच्या पुस्तक संग्राहलयातून हे पुस्तक मी नुकतेच वाचले. 
या पुस्तकाच्या १२प्रकरणापैकी पहिल्या प्रकरणात आपणास संख्या कस्या निर्माण झाल्या?याविषयी २८पानामधून माहिती मिळते तर २८पानाच्या दुसऱ्या प्रकरणातून संख्याच अमुर्त अमर्यादित स्वरुपाची माहिती लेखक आपणास देतो.३रे प्रकरण २७पानाचे आहे.ज्यात आपणास पाय या स्थिरांकाविषयी माहिती मिळते‌ तर पुढच्या चवथ्या प्रकरणात ऑयलरच्या समिकरणाविषयीची माहिती मिळते.हे प्रकरण २१पानी आहे.पाचव्या प्रकरणात आणि सहाव्या प्रकरणात आपणास अनुक्रमे प्राईम नंबर्स आणि फिबोनाची क्रमिका याविषयी माहिती मिळते.सातवे प्रकरण २०पानी आहे.ज्यात संख्याविषयी लोकांचे असणारे समज गैरसमज यावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे. ३०पानाच्या ८व्या प्रकरणात आपणास संख्याचा गमती जमती कळतात तर नवव्या प्रकरणात काही गणितीय कोडी लेखकाने सांगितली आहेत.संख्या गणन पद्धत,दशमान ,बायनरी, ऑक्टल, हेक्झा याविषयी लेखकाने दहाव्या १८पानी प्रकरणात सांगण्यात आले आहे.तर शेवटून दुसऱ्या अकराव्या प्रकरणात १२पानाद्वारे लेखकाने वैदिक गणिताबाबत सांगितले आहे‌ तर शेवटच्या १२व्या प्रकरणात २५पानात लेखकाने अंकगणिताची मुलतत्वे आपणास सांगितली आहेत‌.
     अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखीच या पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे. गणिता सारख्या काहीस्या रूक्ष समजल्या गेलेल्या विषयातील बोजडपणा पुस्तकात कोठेही जाणवत नाही‌. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण सोप्या मराठीत स्पष्ट करुन सांगितले आहे‌.व्यवहारात रूढ नसणाऱ्या मराठी संज्ञा न वापरता, रुड असलेल्या इंग्रजी संज्ञाच या पुस्तकात देखील वापरल्या आहेत.गणिता सारखा किचकट विषय देखील रंजकतेने शिकवता येतो,हे आपणास पुस्तक वाचनातून समजते‌.तरी किमान एकदा तरी हे पुस्तक वाचावेच.





बुधवार, २३ एप्रिल, २०२५

मनोव्यापाराची इत्यंभुत माहिती देणारे पुस्तक मनकल्लोळ भाग 2

मन, आपल्या मानवाच्या सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारा मात्र सहजतेने न दाखवता येणारा शरीराचा भाग .आपण जे हसतो रडतो, चिडतो, दुसऱ्याशी व्यवहार करतो, निराश होतो, ते आपल्या मनामुळे.आपल्या व्यक्तीमत्वाचा बराच मोठा भाग नियंत्रीत केलेल्या मनाविषयी आपल्याला खुप कमी माहिती असते, असे एक सर्व्हेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले होते. आपल्याला मनाविषयी असलेल्या माहितीत शास्त्रीय  ठोस आधारावर माहितीपेक्षा ऐकिव, बिनबुडाच्या माहितीचाच भरणा अधिक असल्याचे या सर्व्हेक्षणातून आढळून आले होते.तर या मनाविषयी अचूक माहिती करुन घेण्यासाठी काय करावे ,तर या ठिकाणी आपल्या मदतीला येते, अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी यांनी लिहलेले मनकल्लोळ भाग 1 आणि मनकल्लोळ भाग 2. त्यातील मनकल्लोळ भाग 1 मी या आधीच वाचले होते.तेव्हापासून याचा दुसरा भाग कधी वाचतो असे मला झाले होते.सा.वा.ना. या नाशिकमधील सर्वात जुन्या सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्यामुळे माझी ही इच्छा नुकतीच पुर्ण झाली.
         पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भाग देखील माहितीने परीपुर्ण आहे.पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागात विविध उदाहरणे देवून अनेक संकल्पना, संज्ञा अत्यंत सोप्या सहज समजणाऱ्या. भाषेमध्ये स्पष्ट केलेले आहेत. काहीजण पहिला भाग वाचण्याच्या ऐवजी थेट दुसरा भाग वाचू शकतात, हे लक्षात घेऊन, पहिल्या भागात असणाऱ्या काही संकल्पना जसे मानसशास्त्रीय उपचारांच्या इतिहास, सी.बी.टी. सारख्या काही महत्त्वाचा उपचार पद्धती या दुसऱ्या भागातील पहिल्या दोन प्रकरणात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. अर्थात पहिल्या भागात या संकल्पना सविस्तरपणे विस्तृत माहिती देऊन स्पष्ट केलेल्या आहेत मात्र या दुसऱ्या भागात या संकल्पनांची तोंड ओळख करून देण्यात आलेली आहे.  
            पहिल्याभागाप्रमाणेच याही भागात काही काही मानसिक विकारांची आजारांची माहिती आठ प्रकरणाद्वारे करून देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये स्क्रीझोफेनिया, मूड  डीसऑर्डर, पर्सनालिटी डीसऑर्डर, अतिरीक्त ताणतणावामुळे उद्भवणाऱ्या मानसिक व्याधी, न्युरो डेव्हलपमेट डीसऑर्डर,न्युरो कॉग्नेटिव्ह 
डीसऑर्डर यांची माहिती देण्यात आलेली आहे.या माहितीत या आजारांवर पुर्वी झालेले संशोधन, हे आजार होण्याची कारणे, यावर कोणते वैद्यकीय उपचार करण्यात येतात.या आजरांवर आधारीत चित्रपट , तसेच अन्य साहित्य निर्मिती यांची माहिती देण्यात आलेली आहे
 सध्याच्या इंटरनेटवर सर्च केल्यावर धबधबा कोसळावा,या पद्धतीने माहितीचा महापूर येत असण्याचा काळात, निव्वळ माहिती आणि  ज्ञान यातील फरक विश्वासात घेवून बिनचूक, सदोष परीपुर्ण माहिती जी ज्ञानाकडे झूकत आहे, ती मिळवण्याचा मार्ग म्हणून आपण या पुस्तकाकडे बघू शकतो‌.ज्यांना मानसशास्त्रातील 'म'सुद्धा माहिती नाही,त्यांना योग्य मार्ग या पुस्तकाच्या वाचनातून मिळू शकतो. तस बघायला गेलो तर हे मानसशास्त्राचा विद्यापीठाच्या क्रमिक अभ्यासक्रमाला नेमलेले पुस्तक नाही.मात्र तरीसुद्धा विद्यापीठाच्या स्तरावर मानससशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या  विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होवू शकतो‌
कोणत्याही रुग्णात सुरवातीला उपचार दिल्यास त्याचा आजार चटकन बरा होतो.आजार बळावत नाही.
        सध्या मानसिक रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय, त्या पार्श्वभुमीवर मानसिक आजारांची मुलभुत माहिती होण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक किमान एकदा वाचायलाच हवे.




बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

आजच्या तंत्रज्ञानाची सविस्तर ओळख करुन देणारे पुस्तक, 'अर्टिफिशियल इंटेलिजियन्स'

      सध्या आपल्यापैकी अनेकांचा दिवस ए.‌आय. हा शद्ब कूठेना कुठे ऐकल्याशिवाय जात नसेल .ए.आय.ने ने जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात प्रवेश केल्याचे चित्र आपणास दिसतयं. आता ए.आय.अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स, हे तंत्रज्ञान मुळात काय आहे? हे तंत्रज्ञान कोणत्या प्रकारे काम करते,? यंत्रामध्ये कोणते घटक असले म्हणजे आपण ए.आय.चा वापर करत असलेले यंत्र वापरतोय असे म्हणू शकतो. आपल्याला होतोयं त्या पेक्षा वेगळा असा ए.आय.चा उपयोग इतर व्यक्तींना होत असेल का? ए.आय. तंत्रज्ञानाचा विकास कधीपासून सुरू झाला, आतापर्यत ए.आयच्या विकासातील टप्पे कोणते?भविष्यातील ए.आय.ची वाटचाल कशी असेल.?यामुळे कोणते सामाजिक प्रश्न निर्माण होतील? त्यावर कोणते उपाय करता येईल ? भविष्यातील धोके ओळखून आताच पाउले उचलायला सुरवात झाली आहे?या सारखे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने आपल्या मनात येत असतील. मनात आलेल्या या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करात असाल त्यात काही प्रश्नांची उत्तरे मिळाली देखील असतील.मला देखील यासारखे काही प्रश्न पडले होते.त्याची उत्तरे शोधताना मला एक खजिना गवसला.या खजिन्यामुळे माझ्या सर्व ए.आय विषयक प्रश्नांची उत्तरे मिळाली.बुकगंगा प्रकाशनातर्फे प्रकाशित, अच्युत गोडबोले लिखीत आर्टिफिशीयल इंटेलिजियन्स नावाचे ४०२पानाचे पुस्तक, हे त्या खजिन्याचे नाव.
        या ४०२पानाच्या पुस्तकात इतिहास, संकल्पना, आर्टिफिशयल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग १  आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग२, ए.आय.चा भविष्यवेध आणि मशिन लर्निंग (सखोल विवेचन ) या सहा प्रकरणाद्वारे लेखकाने लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.शेवटचे मशिन लर्निग (सखोल विवेचन) हे प्रकरण वगळता अन्य सर्व प्रकरणाची भाषा आठवी, नववी पास विद्यार्थ्याला समजेल या प्रकारची आहे.शेवटच्या प्रकरणाची भाषा काहिसी कठिण आहे.या शेवटच्या प्रकरणात अनेक तांत्रीक संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत.३५पानाच्या या शेवटच्या प्रकरणात तांत्रीक संकल्पना असल्याने या प्रकरणाची भाषा कठिण झाली आहे. अच्युत गोडबोले यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्यांना तांत्रिक विषयात शिरायचे नाही.त्यांनी तो भाग नाही वाचला तरी चालेल असे सांगितले आहेच.
  सहावे प्रकरण वगळता अन्य सर्व प्रकरणे उप प्रकरणात विभागली आहेत.इतिहास या पहिल्या प्रकरणात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स या आणि रोबॉटिक्स याचा इतिहासात समजते. संकल्पना या  दुसऱ्या प्रकरणात अच्युत गोडबोले यांनी, ए.आय.मशिन लर्निंग,डीप लर्निंग,एक्स्पर्ट सिस्टीम, नॅचरल लँग्वेज  प्रोसेसिंग, ए आय,  चॅटबॉक्स, चॅटजीपिटी, सेल्फ डायव्हिंग कार्स आणि ऑटोनॉमस वाहन यांची ओळख आपल्याला करुन दिली आहे. आर्टिफिशयल इंटेलिजियन्सचा उपयोग भाग १आणि २ या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणात आपणास ए.आय चा उपयोग कंपन्यांमध्ये  कारखान्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये, फायनान्समध्ये, अकाउंटमध्ये कस्टमर केअर सर्विसमध्ये, मार्केटरिसर्चमध्ये, रिटेलमध्ये, सेल्स आणि मार्केटिंगमध्ये, आरोग्य सेवेत, शिक्षणात, वकिलांसाठी, शेतीमध्ये, मासेमारीमध्ये, पर्यटनामध्ये, विविध कलांमध्ये, संगीतात, पत्रकारितेमध्ये, लीडरशिपमध्ये, अंतराळ संशोधनात,प्रिंटिंगमध्ये  स्मार्टफोनमध्ये कोणत्या प्रकारे होऊ शकतो? तसेच भारतीय उद्योजकांनी आर्टिफिशियल  इंटेलिजियन्सचा वापर कोणत्या प्रकारे करावा, याविषयी अच्युत गोडबोले यांनी चर्चा केली आहे‌.सर्वसामन्यांचा ज्यांना तंत्रज्ञानाची विशेष ओळख नाही अस्या व्यक्तींसाठी शेवटच्या अस्या पाचव्या  ए.आय.चा भविष्यवेध या प्रकरणात ए.आय आणि उद्याच जग , नोकऱ्या, आणि युनीव्हर्सल बेसिक इनकम या मुद्द्यांवर प्रकाश पाडला आहे.
सध्या ए.आय हा उत्तम करीयर पर्याय म्हणून समोर येत आहे. ज्यांना ए.आय.या क्षेत्रात करियर करायचे आहे.त्यांनी माझ्यामते या पुस्तकाचे वाचन करताना प्रकरण क्रमांक २,६,३,४,५,१ या प्रमाणे वाचन करावे.त्यांनी पहिले प्रकरण नाही वाचले तरी चालेल.  ज्यांना फारसे तांत्रीक ज्ञान नाही.त्यांना शेवटचे प्रकरण मोठ्या प्रमाणात त्रासदायक वाटू शकते.असो.
     कोणतेही तंत्रज्ञान वापरताना, त्यामागचे  विज्ञान समजणे आवश्यक नसले तरी ते समजल्यास तंत्रज्ञान वापरताना होणारा आनंद शब्दात मांडता येणे अशक्यच.तरी त्या आनंदाची अनुभुती घेण्यासाठी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे.

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

मुळातून नैसर्गिकशास्त्र शिकवणारे पुस्तक, 'किमयागार'

 
        आपल्याकडे वारंवार मराठी भाषा टिकली पाहिजे,असा घोष लावला जातो. मात्र सध्याचा २१व्या शतकात  भाषा  किती जुनी आहे.तीला अभिजात दर्जा आहे का? यापेक्षा त्या भाषेत किती ज्ञाननिर्मिती होते.यावरच भाषा वाढणार आहे. हा महत्तवाचा मुद्दा मराठी भाषा हितचिंतकांकडुन दुर्लक्षिला जातो. फारच थोड्या व्यक्ती मराठी भाषा ज्ञानवर्धक होण्यासाठी प्रयत्नशील राहतात.या मोजक्या व्यक्तीमध्ये समाविष्ट होणारे नाव म्हणजे 'अच्युत गोडबोले'. आतापर्यत अच्युत गोडबोले यांनी मराठी भाषेत आतापर्यत विविध विषयांवर सविस्तर माहिती देणारी पुस्तके लिहली आहेत.जी सर्वच्या सर्व बेस्ट सेलर ठरली आहेत. त्यातीलच एक असलेले 'किमयागार' हे पुस्तक मी ंनाशिकमधील सर्वात जूने सार्वजनिक वाचनालय असलेल्या 'सावाना'च्या मदतीने वाचले. मनूष्य कोणत्याही जाती,धर्माचा आस्तिक अथवा नास्तिक असो, त्याच्या आयुष्यावर परिणाण करणाऱ्या 'नैसर्गिक शास्त्रांच्या भौतिकशास्त्र (फिजिक्स ),रसायनशास्त्र (केमिस्टी) पृथ्वी विज्ञान (अर्थ सायन्स), जीवशास्त्र (बायोलॉजी) या शाखांची ओळख करून देण्यात आली आहे.
                 संदर्भ सुची आणि व्यक्तीनाम सुची तसेच सुरवातीच्या प्रास्ताविकाची नावे वगळता ५६९ पानांच्या या पुस्तकात आपणास, प्राचीन भारताच विज्ञानाचे योगदान,प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ, युरोपाती प्रबोधनाच्या सुरवातीच्या काळातील शास्त्रज्ञ,चौथी मिती (फोर्थ डायमेशन) न्यूक्लिअर सायन्स,क्वांटम मेकॅनिक्स,
आईन्स्टाईनची जनरल थेअरी, आईन्स्टाईन ची स्पेशल थेअरी ऑन रेलेटिव्हीटी, रेडिओलॉजी रेडिओ ऍक्टिव्हिटी यांचे संशोधन कसे झाले?, बिग बँग थेअरी आणि स्टेडी युनिव्हर्स थेअरी, स्टिंग थेअरी, क्वार्स पार्टिकल्स, पृथ्वीचा जन्म,आणि आतापर्यतची वाटचाल, पृथ्वीची अंतर्गत रचना, पृथ्वीची सर्वसाधरण माहिती,  वेगनरची थेअरी,भुकंप,ज्वालामुखी,रसायनशास्त्राचा विकास कोणत्या प्रकारे झाला? ऑर्गनिक केमिस्टीचा विकास, रसायनशास्त्रातील महत्तवाचे शास्त्रज्ञ,  त्यांनी काय संशोधन केले कसे केले? बायोलॉजीमधील संशोधनाचे विविध टप्पे, व्हायरस, बॅक्टेरिया,डार्विनचा उत्क्रांतीविषयक सिद्धांत आणि त्याची आतापर्यतची वाटचाल,अनुवंशिकता,डीएनए,जेनेटिक कोड,ह्युमन जिनोम कोड,डबल हेलिक्स आदि विविध विषयांवर सखोल माहिती मिळते.
      अच्युत गोडबोले यांच्या अन्य लेखनाप्रमाणे याही पुस्तकाची भाषा सर्वसाधरण शिक्षण झालेल्या व्यक्तीला देखील समजेल असीच आहे.पुस्तकात योग्य त्या ठिकाणी आकृत्या, उदाहरणांचा वापर करण्यात आला आहे,त्यामुळे विषय चटकन समजतो. पुस्तकाच्या शेवटी व्यक्तीनाम सुची देण्यात आली आहे.ज्यामध्ये एखाद्या
व्यक्तीचे नाव पुस्तकात कोणकोणत्या पानावर आले आहे,याची यादी देण्यात आलेली आहे.सच पुस्तकाच्या सुरवातील अनुक्रमणिका देखील सविस्तर देण्यात आली आहे‌ ज्यामुळे आपणाष एखादा संदर्भ हवा असेल तर चटकन सापडतो.या पुस्तकात सर्वसामान्य व्यक्तीला प्रत्येक विषयाची किमान ओळख व्हावी,याची काळजी घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते.या पुस्तकात  विषयाचे बारीकसारिक सविस्तर तपशील फारच कमी देण्यात आले आहेत.या पुस्तकातून विषयाची तोंड ओळख करुन घेवून विषयाचा सविस्तर अभ्यासासाठी दुसरे पुस्तक वाचणे योग्य ठरेल.
कोणतीही नविन गोष्ट व्यक्तीला त्याचा मातृभाषेत शिकवल्यास, सहजगत्या समजते. कोणत्याही गोष्टीच्या मुलभुत संकल्पना मातृभाषेत समजावून घेवून, त्या गोष्टीचे सविस्तर ज्ञान दुसऱ्या भाषेत घेतल्यास अधिक उत्तम असे शिक्षणतज्ञ वारंवार सांगत असतातच.त्यामुळे नैसर्गिक शास्त्रांचा संकल्पना समजावून घेण्यासाठी किमान एकदा आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीची साविस्तर माहिती देणारे पुस्तक, 'नॅनोदय'

       
 आपल्या सर्वांचेच आयुष्य गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बदलले आहेत १९९० ते २००० या दहा वर्षाच्या  आसपास जन्मलेल्या माझ्यासारख्याव्यक्तींचे  आयुष्य त्यांच्या पालकांपेक्षा पुर्णतः वेगळे ठरले  या बदलला या काळात अत्यंत झपाट्याने  झालेली  तंत्रज्ञनातील प्रगती असे ठराविक साच्याचे उत्तर देता येते असले तरी अधिक सविस्तरपणे आणि बिनचूकपाने उत्तर देयचे झाल्यास या मागे या मागे  नॅनो टेक्नॉलॉजी आणि आता आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग होऊ घातलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामुळे आपले जीवन मागच्या पिढीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे हे नाकारून चालणार नाही .तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा नॅनो टेक्नॉलॉजी  आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजिनयस )  या डाँग गोष्टीमुळे आपले जीवन मोठ्या प्रमाणात बदलले आहे त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) हे क्षेत्र अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हण्टले तरी चालू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामध्ये  भविष्यातअजून मोठ्या प्रमाणात प्रगती होऊन  आपण सध्या कल्पनाही करू शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील हे नक्की तर नॅनो टेक्नॉलॉजी  हे क्षेत्र पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहे.आज  नॅनो टेक्नॉलॉजीची या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात संशोधन होत असले तरी त्याचे आकर्षण काहीसे कमी झाले आहे मात्र गेल्या काही वर्षात मानवी राहणीमानात काय बदल झाला हे अभ्यासण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीची मुळातून माहिती  आहे. आणि आपली ही  गरज पूर्ण होते ती, राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित  'नॅनोदय' या पुस्तकामुळे.  अच्युत गोडबोले यांनी डॉ. माधवी सरदेसाई यांची मदत घेऊन लिहलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
            'नॅनोदय'या पुस्तकामुळे आपणस आपणास  नॅनो टेक्नॉलॉजीचा इतिहास, त्यामागची तांत्रिक माहिती, आणि तिचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारे होत आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान अजून कोणत्या प्रकारे वापरता येऊ शकते याविषयी रंजक माहिती मिळते अच्युत गोडबोले यांच्या अन्य माहितीविषयक पुस्तकात  असते त्याप्रमाणे या पुस्तकात देखील इंग्रजी संकल्पनाच वापरलेल्या आहेत अन्य शास्त्राविषयक
पुस्तकात जसे संकल्पना मराठीत स्पष्ट करताना संकल्पनांचे ओढून ताणून संस्कृतचा आधार घेत मराठीकरण केले असते त्याचा मागसुस देखील या पुस्तकात नाही व्यवहारात वापरण्यात येणारया इंग्रजी संकल्पनाच या मराठी भाषेतील पुस्तकात वापरल्या आहेत त्यामुळे पुस्तक सहजतेने समजते 
            सुमारे २७५ पानाच्या या पुस्तकात १५ प्रकरणाद्वारे नॅनो टेक्नॉलॉजी ही संकप्लना समजवून सांगताना लेखनाने या विकास केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी , या क्षेत्रात कोणत्या प्रकारे होते हे स्पष्ट केलेलं आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री या विज्ञानाच्या शाखेत नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर कसा होतॊ हे सांगतान लेखकाने अणूची अंतर्गत  रचना, रेणूची अंतर्गत रचना, एखाद्या पदार्थातील अणूचे परस्परांमध्ये  असणारी  विविध बले आकर्षण तसेच क्वाटम मॅकेनझीम . या संकल्पना सविस्तरपणे स्पष्टतसे केल्या आहेत तसेच या संकल्पना आणि नॅनो टेक्नॉलॉजी याच्याही सहसंबंध सविस्तरपणे उलगडून सांगितला आहे . बायोलॉजी विषयी सांगताना त्यांनी सूक्ष्मजीवांच्या मानवी आयुष्यात असणारे महतव आणि त्यामुळे  होणारे नुकसान  नॅनो टेक्नॉलॉजीकसे टाळता येईल   तसेच क्लोन तंत्रज्ञानाचे फायदे तोटे आणि त्याच्या  नॅनो टेक्नॉलॉजीशी असणारा सहसंबंध  शस्त्रकियेमध्ये होणारे चांगले बदल ,शेतीत कोणत्या प्रकारे चांगली पिके घेता येतील या विषयी सांगितले आहे  नॅनो टेक्नॉलॉजीमुळे होणाऱ्या बदलात अच्युत गोडबोले यांनी औद्योगिक उत्पादनात काय बदल
होतील यावर प्रकाश टाकताना रोबोनॅनोटिक्स  ही संकल्पना पुस्तकाची सुमारे १० पाने खर्च करून सविस्तर सांगितली आहे   नॅनो टेक्नॉलॉजीमुले माहिती आणि दूरसंचार क्षेत्र पूर्णतः बदलून जाईल  देखील शकणार नाही असे बदल या क्षेत्रात होतील असे अच्युत  या पुस्तकात  सांगितले आहे त्यासाठी पुस्तकातील २० पाने खर्च करण्यात आलेली आहे पुस्तकातील सुरवातीचा एक त्रितीयांश भाग अर्थात ८० पाने लेखकाने  नॅनो टेक्नॉलॉजीच्या इतिहासावर सांगितला आहे यामध्ये लोक  तंत्रज्ञान वापरत होते का ? असल्यास कोणत्या पद्धतीने वापरत असतील तसेच १९९० पर्यंत  नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काय संशोधन झाले याविषयी सांगितले आहे 
           सध्या सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी बोलले जात असले तरी  नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपल्या  आमूलार्ग बदल झाला आहे त्यामुळे तंत्रज्ञान आपणास माहिती असल्यास सोन्याहून पिवळे आपण जी गोष्ट वापरतो त्यातील मूलभू समजणे ती गोष्ट वापरण्यास आवश्यक नसले तरी तो आनंद अवर्णनीयच त्यासाठी  तरी हे पुस्तक वाचणे आवश्यक 
 

सोमवार, ४ मार्च, २०२४

जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्यिकांची ओळख मराठी भाषिकांना करून देणारे पुस्तक "झपुर्झा भाग ३"

 
 साहित्याला जगाचा आरसा समजण्यात येते. जगात जे काही चांगले वाईट घडते,ते सर्व साहित्यिक आपल्या लेखनाद्वारे समाजापुढे मांडतो. त्यामुळे साहित्याचे वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष अनुभव आला नाही,तरी समाजातील चांगल्या वाटायची आपणास योग्य प्रकारे जाण होते. त्यामुळे साहित्याची निर्मिती करणारा साहित्यिक अत्यंत महत्त्वाचा आहे,समाजाचे जमेच्या बाजू उणिवा त्याला कश्या दिसतात,यावर त्याचे साहित्य कसे असेल?ते खरंच समाजाचे प्रतिनिधित्व करेल का,?हे ठरते‌.विचारवंता सारखाच साहित्यिक हा त्या विशिष्ट काळाचे अपत्य असतो. त्यामुळे साहित्यिकांचा चरित्रांचा  अभ्यासावरून त्या काळाचा अंदाज बांधता येतो.तसेच त्या साहित्यिकांचे लेखन किती अस्सल समजायचे ते समजते.
आपल्याकडे साहित्यिकांच्या चरित्रांचा अभ्यास करणारी पुस्तके कमीच आहेत.त्यातही जी आहेत ती मुख्यतः इंग्रजीतच.अस्सलिखित इंग्रजी समजू शकणारा बोलू शकणारा वर्ग आजही कमीच आहे. आजही बहुसंख्य भारतीय त्यांचा मातृभाषेतच संवाद करतो‌.त्यामुळे बहुसंख्य भारतीय या अभ्यासापासून दूरावतात.नेमकी हीच बाब हेरून मराठीला ज्ञानभाषा होण्यासाठी झटणारे अच्युत गोडबोले यांनी जागतिक स्तरावर नावाजलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारी झपुर्झा ही वृत्तमालिका एका वर्तमानपत्रासाठी लिहली‌.पुढे ही वृत्तमालिका त्यांनी विविध भागाच्या पुस्तकांसाठी अधिक विस्ताराने लिहिली याच विस्तारीत मालिकेतील तिसरे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील सर्वात जूनी सांस्कृतिक संस्था सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सहकार्याने वाचले.
झपुर्झाच्या या तिसऱ्या भागात १९ साहित्यिकांचा परिचय सुमारे 400पानाच्या माध्यमातून करुन देण्यात आला आहे.ज्यामध्ये स्वामी विवेकानंद यांना ज्याचा कवितेद्वारे ईश्वर भेटीची आस लागली ,असे कवी विल्यम वर्डसवर्थ, इंग्रजी भाषेतील पहिले कवी म्हणून ओळखले जाणारे जेफरी चॉसर, अमेरीकेतील प्रमुख विनोदी लेखन करणारे मार्क टेनी, जिवंत असताना दुर्लक्षी गेलेली मात्र  मृत्यूपश्चात  आपल्या लेखणीद्वारे सुप्रसिद्ध झालेली जॉर्ज इलीयट ही लेखिका आदि प्रमुख आहेत.
      साहित्यिकांची ओळख करून देताना सदर लेखक इथे जन्मला,त्यांचा पालकांचे हे नाव आणि हा व्यवसाय होता.त्याचे शिक्षण इथे झाले त्याचा मृत्यू वयाचा इतक्या वर्षी या प्रकारे इथे झाला.त्याने हा व्यवसाय केला ?त्यांनी हीपुस्तके लिहिली.त्याचा लेखनाचे वैशिष्ट्य हे वैशिष्ट्य होते‌.असी ठोकळेबाज माहिती वजा ओळख करुन न देता, काहीस्या अलंकारिक पद्धतीने सुरवातीला त्यांचा ठळक नामोल्लेख टाळत, त्यांच्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाचे वर्णन करत नाट्यमय केला आहे.ज्यामुळे पुस्तक चरीत्राचे असून देखील कंटाळवाणे,नुसतीच माहिती देणारे न होता वाचणीय वाचकाला गुंतवून ठेवणारे झाले आहे. मात्र हे करत असताना संबंधित साहित्यिकांची संपूर्ण तपशिलवार माहिती वाचकाला मिळेल वाचकास  फक्त वरवरचीच माहिती मिळेल ,त्यास साहित्यिकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा उलगडा होणार नाही,या उणीवांपासून आपले लेखन दूर राहिलं.वाचकाला अभ्यासाचे क्रमिक पुस्तक वाचले असे वाटेल.विद्यापीठाच्या अभ्यासास मदत करणारे लेखन वाटेल याची लेखकाने काळजी घेतल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.     
      या पुस्तकाच्या वाचनातून आपणास १९ व्या शतकाचा दुसऱ्या अर्ध्या भागात(१८५०नंतर) आणि १९ शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात (१९५० पर्यंत) पश्चिम युरोप आणि अमेरिकेतील समाजजीवन कसे होते? त्यावेळच्या साहित्यिकांना लेखन करताना कोणत्या समस्या येत असत. साहित्यिक कोणत्या आर्थिक सामाजिक वर्गातून येत
असत.ते कोणत्या विषयावर प्रामुख्याने लेखन करत.साहित्यीकांचा या प्रकारच्या लेखनामुळे इंग्रजी, फ्रेंच आदि भाषेत साहित्याची परिभाषा कस्या प्रकारे विकसित झाली. याविषयी माहिती मिळते‌.
     निलांबरी जोशी यांच्या मदतीने अच्युत गोडबोले यांनी  लिहिलेल्या या पुस्तकामुळे भारताच्या बाहेरील जगात साहित्य कसे विकसित होत आहे? कसे विकसित झाले? .तेथील समाजजीवनाचा तेथील साहित्यावर कसा परीणाम झाला ?आदि प्रश्नांबाबत आपणास सविस्तर माहिती मिळते ,मग वाचणार ना पुस्तक 

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

एका महत्त्वाच्या मात्र दुर्लक्षित गोष्टींकडे लक्ष वेधून घेणारे पुस्तक, "ऑटीझम

पुर्वीच्या तूलनेत सध्याचा काळातआपल्या भारतात अनेक विकारांबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करण्यात येत असले, तरी काही विकार अजुन देखील समाज प्रबोधनाच्या बाबतीत बरेच मागे आहेत.या विकारांनी ग्रस्त लोकांची संख्या लाखोत असली तरी त्याबाबत फारसे बोलले जात नाही.समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम असलेल्या चित्रपटातच नव्हे, तर वैद्यकीय स्तरावर सुद्धा त्याबाबत व्यापक चर्चा होत नाही.परीणामी या धोक्याची जाणीवच जन सामन्यांना होत नाही, ऑटीझम हा असाच फारसा चर्चिला न जाणारा विकार . सुमारे २टक्के (अचूकपणे सांगायचे झाल्यास दर ५४पैकी १) इतक्या लोकांना होणारा एक गंभीर स्वरुपाचा विकार.ज्या अभागी जणांना हा विकार होतो त्या व्यक्तींचेच नव्हे तर त्यांचे कुटुंबियांचे भावविश्व पुर्णतः नष्ट करणारा हा विकार. आपल्या मराठीचा विचार करता या विषयी जवळपास काहीच लिहलेले आढळत नाही..त्यातही जे काही आढळते,त्यात शास्त्रीय माहितीचा अभावच दिसतो..मात्र ही पोकळी भरुन येते, ती मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी झटणाऱ्या अच्यूत गोडबोले यांच्या "ऑटीझम या पुस्तकामुळे. स्वतःच्या मुलाला ऑटीझम झाल्यामुळे त्यातील दाहकता जवळुन अनुभवलेल्या अच्यूत गोडबोले यांनी आपल्याला जो त्रास  सहन करायला लागला तसा त्रास अन्य व्यक्तींना होवू नये, यासाठी लिहलेले हे पुस्तक आपणास या विकाराबाबत आपणास सखोलतेने माहिती देते.जे मी नाशिकमधील आघाडीची सांस्कृतिक संस्था सावानाच्या सहकार्याने नुकतेच वाचले.
       सुमारे पावणे दोनशे पानांच्या या पुस्तकात ८प्रकरणाद्वारे अच्युत गोडबोले यांनी या विकारांची, हा विकार ज्या व्यक्तींना आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांची यामुळे काय होरपळ होते‌? तसेच स्वतः च्या मुलाला असणाऱ्या या विकारामुळे त्यांना कसे कष्ट सहन करावे लागले ?या विषयीची माहिती दिली आहे. या विकाराविषयीच्या माहितीत, मुळात हा विकार काय आहे? वैद्यकीय परिभाषेत यांचे वर्गीकरण कसे करतात? हा विकार का होतो? कोणकोणत्या प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींना हा विकार असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे, ती कितपत  खरी असू शकते? सांस्कृतिक विश्वात ,या ऑटीझम विकारांचे चित्रण करण्यात आलेले आहे? हे संकट भविष्यात असे अक्राळविक्राळ स्वरुप धारण करु शकते? ऑटीझमवर कोणते आणि कस्या प्रकारचे उपचार केले जातात?हा विकार वयाच्या विविध टप्प्यांवर कोणती वळणे घेतो?अन्य मानसिक विकारापेक्षा हा विकार कसा वेगळा आहे? याबाबत कोणते गैरसमज आहेत? या गैरसमजाची वास्तविक स्थिती काय आहे ?ऑटीझमची सुरवातीची लक्षणे काय? ती वयाच्या कोणत्या टप्प्यावर दिसून येतात?भारतात आणि जगात ऑटीझमबाबत काय स्थिती आहे? ऑटीझमचे शिकार झालेल्या व्यक्ती कस्या प्रकारे वर्तन करतात,? कुटुंबियांनी आपल्या पाल्यास हा विकार आहे,हे कसे ओळखावे? ऑटीझमबाबत कोणत्या संस्था, व्यक्ती मदत करतात?
याविषयी सांगितले आहे.
लेखनाची भाषा अच्युत गोडबोले यांच्या अन्य लेखनासारखीच सहजसोपी चटकन समजणारी आहे या सारखीच शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकात आढळणारा मराठी परीभाषेचा वापर अच्युत गोडबोले यांचा या पुस्तकात देखील टाळला आहे. अच्युत गोडबोले यांनी समाजात रूढ झालेले मुळातील इंग्रजी शद्ब आपल्या लेखनात तसेच ठेवले आहेत, ज्यामुळे विषय चटकन समजतो.
    आपण स्वतः एखाद्या समस्येने ग्रस्त नसलो भविष्यात देखील ग्रासणार नसू तरी देखील समाजातील दुःखाबाबत माहिती असणे हे निरोगी मानसिकतेचे लक्षण समजले जाते.त्यामुळे आपल्या निरोगी मानसिकतेसाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा करणारे पुस्तक इंडस्ट्री 4.0

       

  आताच काळात आपले सर्व जीवन  तंत्रज्ञानाशिवाय चालणे अशक्यच आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही उठल्यापासून झोपेपर्यंत आपले सर्व जीवन हे तंत्रज्ञानाने व्यापून राहिलेले आहे . ऑफिसमधील काम असो किंवा ऑफिस सुटल्यावर आपण घरी येण्यासाठी वापरत असलेली साधने असो हि सर्व तंत्रज्ञानाचीच किमया असो जास्त दूर कश्याला जायचे आता तुम्ही हा जो मजकूर वाचत आहात ती पण तंत्रज्ञानाचीच किमया . जगात कोणतीही  गोष्ट कायमस्वरूपी नसते असे म्हणतात मात्र या गोष्टीला एक अपवाद आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास हो तंत्रज्ञाचा विकास पूर्वीपण होत होता आताही होत आहे आणि भविष्यलत देखील होता असेल भले त्याची गती कमी जास्त असेल मात्र तंत्रज्ञाचा विकास याला मरण नाही त्या अर्थाने तो अमर आहे 
             आता अश्या तंत्रज्ञाचा वापर करताना या गोष्टी कश्या प्रकारे कार्यान्वित होतात ? हे कळलेच पाहिजे हि अट  नसली तरी आपण जी गोष्ट वापरत आहे त्या गोष्टीमागचा कार्यकारण भाव समजल्यास सोन्याहून पिवळे म्हणतात ते हेच असे सहजतेने म्हणता येते
          इंग्रजीत या बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती देणारी अनेक पुस्तके सध्या आहेत आणि दिवसोंदिवस त्यात भरच पडत आहे मात्र कोणतीही गोष्ट आपल्या मातृभाषेत समजल्यास अधिक सहजतेने समजते एखाद्या  गोष्टीची किमान तोंडओळख मातृभाषेत  झाल्यास त्या गोष्टीचे अधिकचे सखोल ज्ञान आपण दुसऱ्या भाषेत सहजतेने घेऊ शकतो .असे जागतिक संशोधन आहे  मात्र कोणतीही गोष्टीचे सखोल अध्ययन करण्यासाठी मुळात ती गोष्ट समजणे आवश्यक असते आपल्या दुर्दैवाने मोठी साहित्यिक परंपरा असलेली पंरपरा असलेली आपली मराठी याबाबत बरीच मागे आहे सध्याच्या तंत्रज्ञांचा काळात एखाद्या भाषेत किती वर्षाची साहित्य पंरंपरा आहे यावरून भाषा टिकणारी नाही तर त्या भाषेत किती ज्ञान निर्मिती होते का,?  ती भाषा ज्ञान भाषा होणार का? यावरून हे टिकणार आहे आणि मराठीचा हा कलंक पुसण्याचे काम आपल्या मराठीत अच्युत गोडबोले सातत्याने करत असतात त्यांचा याच धडपडीचे प्रतीक ज्याला मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा करणारे पुस्तक म्हणता येईल असे इंडस्ट्री 4.0 हर पुस्तक मी नुकतेच 
 नाशिकमधील सर्वात जुनी सांस्कृतिक संघटना सावानाच्या सहकार्याने वाचले 
      सध्या कोणी काही म्हणो एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी पुस्तके नेहमीच उपयोगी पडतात स्वतःच्या नोटस काढण्यासाठी एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी व्हिडीओ पेक्षा पुस्तके नेहमीच उपयोगी पडतात . व्हडिओमुळे एखादी गोष्ट समजते असे वाटते मात्र कालांतराने तो गोष्ट तितक्याच सहजतेने विसरले जाण्याची शक्यता देखील
मोठी असते या उलट पुस्तकामुळे एखादी गोष्ट समजावून घेतल्यास ती गोष्ट लवकर विसरत नाही त्यामुळे पुस्तकांना मरण नाही त्यातही अत्यंत वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञाच्या मुळातील संकल्पना समजण्यास तर आपणास पुस्तकाचाच आधार घ्यावा लागणार आणि इंड्रस्टी 4.0  हे पुस्तक या कसोटीवर पूर्णतः खरे ठरते सुमारे ३६० पानाच्या या पुस्तकात ६ भागातून आपणास या अतिशय नव्या असणाऱ्या तंत्रज्ञाची आपणास आपल्याला समजले अश्या सोप्या मराठीत लेखकाने ओळख करून दिली आहे 
 मराठीत असणाऱ्या तंत्रज्ञ विषयक पुस्तकांची एक समस्या असेलेली मराठी परिभाषेचा अतिशय जास्त प्रमाणात वापर आणि रूढ झालेल्या इंग्रजी शब्दाचा खूपच तुरळक वापर हि समस्या अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखी याही पुस्तकात आढळत नाही रूढ झालेल्या इंग्रजी संकल्पनाच त्यांनी पुस्तकात वापरलेल्या असल्याने या बदलत्या तंत्रज्ञाची मूलभूत माहिती घेऊन वाटल्यास अधिकची माहिती आपण इंग्रजीत सहजतेने घेऊ शकतो 
या पुस्तकांतच्या पहिल्या भागात  4.0 हि संकल्पना समजावून सांगितली आहे या भागात औद्योगिक विकास कसा झाला याचा आढावा घेत हि संकल्पना समजवून सांगितली आहे दुसऱ्या भागात सध्या विशेष चर्चेत असलेली आर्टिफिशियल इंटेलिजियन्स हि संकल्पना ४ प्रकरणातून स्पष्ट केली आहे या भागाच्या पहिल्या प्रकरणात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स म्हणजे काय हे सांगितले आहे दुसऱ्या प्रकरणात रोबोटिक्स हि संकल्पना तर तिसऱ्या प्रकरणात एक्स्पर्ट सिस्टीम आणि नॅचरल प्रोसेसिंग विषयी महती देण्यात अली आहे मशिन लर्निग आणि चाटबॉक्स विषयीची माहिती अनुक्रमे पुढच्या दोन प्रकरणातून आपणस मिळते तिसऱ्या भागात आपणास बिग डेटा हि संकल्पना आपणस माहिती होते चवथ्या भागात इंटरनेट ऑफ थिंग्स . ऑर्ग्यूमेंट रियालिटी आणि क्लाउड कॉम्पयटिंगविषयीची माहिती आपणस तीन प्रकरणातून मिळते पाचव्या आणि सहाव्या प्रकारांत आपणस ३ डी प्रिटिंग ब्लॉकचेन,५ जी आणि भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती मिळते 
   लेखात सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी पुस्तकाला मरण नाही आणि गोष्ट जर तंत्रज्ञांविषयी असेल तर विचारायलाच नको मग वाचणार ना हे पुस्तक 

शुक्रवार, १९ मे, २०२३

अर्थशास्त्रातील गुंतागुंत सहजतेने मांडणारे पुस्तक अर्थात

एखाद्या विषयात प्रचंड गुंतागुंत असली,  तरी तो विषय रंजकतेने मांडल्यास विषय समजून घेणाऱयांवर या गुंतागुंतीचा काहीही परिणाम नाही, त्यांना संबंधित विषय सहजतेनं समजतो  मराठी साहित्य विश्वात ज्येष्ठ साहित्यिक  पु. ल . देशपांडे यांनी अजरामर केलेल्या चितळे मास्तर आणि हरितात्या ही अवघड विषय सोपा करणारी व्यक्तिमत्व म्हणून ओळखली तर वावगे वाटायला नको हरितात्यानी इतिहास कश्या प्रकारे शिकवला तर रंजकता येते ज्यामुळे तो विषय सहजतेने समजतो हे आपल्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले . चितळे मास्तरांनी लहान मुलांना विद्याभ्यासाची सवय कशी लावावी हे दाखवून दिले . आता साहित्यविश्वात अजरामर झालेल्या या व्यक्ती प्रत्यक्षात  अस्तित्वात होत्या का ? कि हि फक्त कल्पना होते हे पु. ल देशपांडेचंच जाणो . सध्याच्या वर्तमानात अशी विषयातील क्लिष्टता दूर करून मराठीत वाचकांना विषय रंजकतेने समजवणारा लेखक कोणता ? याची माहिती घेतल्यास एक नाव चटकन समोर येते ते म्हणजे अच्युत गोडबोले .नुकतेच त्यांनी अर्थशास्त्रातील क्लिष्टता दूर करण्यासाठी लिहलेले "अर्थात हे पुस्तक मी वाचले 

          अर्थशास्त्र अवघड वाटण्याचे कारण म्हणजे त्याचे विविध सिद्धांत आणि त्याची परिभाषा . मात्र सदर पुस्तकात अर्थशात्रातील विविध सिद्धांत स्पष्ट करताना अनेक उदाहरणे दिलेलीअसल्याने सिद्धांत सहजतेने समजतो त्यातील अवघडपणा सहजतेने समजतो. या पुस्तकात निव्वळ अर्थशात्रातील सिद्धांताच्या मागून सिद्धांत दिलेले नाहीत तर हे सिद्धांत मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांची माहिती देखील अत्यंत रंजकतेने दिली आहे त्यामुळे अन्य अर्थशात्रताविषयक पुस्र्के जशी कंटाळवाणी वाटतात तसे या पुस्तकाबाबत वाटत नाही परिभाषेतबाबत या पुस्तकात विशेष काळजी घेतल्याचे पुस्तक वाचताना समजते पुस्तक मराठीत आहे ना ? मग रोजच्या व्यवहारामध्ये वापरण्यात न येणाऱ्या संस्कृतचा पराभवा जाणवणाऱ्या अवघड परिभाषा या पुस्तकात जाणिवपूर्वक टाळलेली दिसतात  पुस्तकात व्यवहारात रुळलेल्या इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरलेल्या आहेत रोजच्या वापरण्यात येणारे शब्द यांचा वापर केल्याने सिद्धांत चटकन समजतात मराठीत  एखादा विषय समजून घेताना येणारा पारिभाषिक संज्ञांचा अडथळा यावेळी येत नाही 

        पुस्तक आठ प्रकरणात विभागले असून पहिल्या प्रकरणात अर्थशास्त्राची पार्श्वभूमी स्पष्ट करताना अर्थशात्र म्हणजे काय ? त्याचे किती आणि कोणते उपप्रकार पडतात ? आदी प्रशांबाबत उहापोह करण्यात आला आहे . तर शेवटच्या आठव्या प्रकरणात अर्थव्यवस्थेत अर्थशास्त्रात आता जाणवणाऱ्या समस्येबाबत, प्रश्नाबाबत  भाष्य केले आहे पुस्तकाच्या दुसऱ्या ते सातव्या प्रकरणात विविध अर्थशास्त्रीय सिद्धांतआणि महागाई , परकीय चलन , जीडीपी सारख्या संकल्पना आणि मार्क्स केन्स सारख्या अर्थशात्रज्ञांची माहिती देण्यात आलेली आहे भांडवलशली साम्यवाद  ,बँकिंग सिस्टीम यांची सुरवात कशी झाली /प्राचीन युगातील अर्थशाश्त्रज्ञाच्या अर्थशास्त्राबाबत कोणत्या संकल्पना होत्या प्राचीन काळातील भारतीय आणि ग्रीकांचे अर्थशास्त्रीय ज्ञान काय होते याविषयी आपणास या पुस्तकात अत्यंत रंजक माहिती मिळते हार्ड बाउंड कव्हर असलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत रंजक आहे ज्यामध्ये एका बाजूला श्रीमती तर दुसऱ्या बाजूला गरीबीचे चित्र रेखाटले आहे ज्यामध्ये एका हातातून दुसऱ्या हातात नाणी बाहेर जाताना दिसतात निळ्या रंगांच्या पार्श्वभूमीवर असणारे हे चित्र बघून कोणालाही पुस्तक हातात घ्यावेशे वाटते मग वाचणार ना तुम्ही हे पुस्तक 

गुरुवार, १८ मे, २०२३

मानसोपचारावर इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक सायको थेरपीज !

;           
   समर्थ रामदास स्वामी यांनी " मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"  या सारख्या अभांगातून कोणत्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी मनाची निरोगी अवस्था; का आवश्यक असते हे सांगितले आहे मन हा अवयव अतिशय चंचल आहे हे ज्येष्ठ कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेतून सांगितले आहेच तर अश्या चंचल मात्र कोणतेही कार्य यशस्वीतेसासाठी आवश्यक असणाऱ्या मनाला; काही आजार जडला तर त्या मनावर उपचार करणे आलेच सध्या हे मानसोपचार करणे पूर्वीच्या तुलनेत सहजसोपे आणि कमी कलंकित असले तरी हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता मानवाच्या अस्तित्वापासूनच सुरू झालेल्या या मानसिक उपचारांच्या; अघोरी म्हणता येतील अश्या कृती कार्यक्रमांना ; पूर्वी मानसिक रोग्यांना सामोरे जावे लागले आहे आता मानसोपचार पद्धती मोठ्या प्रमाणत विकसित झाली असली उपचार पद्धतीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असले तरी हे मानसोपचार या पातळीपर्यंत येण्यासासाठी अनेक मानसोपचार तज्ज्ञांचे यासाठी अथक श्रम कारणीभूत राहिले आहेत . हे श्रम काय होते ?; मानसोपचार तज्ज्ञांनी कोणत्या प्रकारे हि उपचार पद्धती विकसित केली सध्या या उपचार पद्धतीचे स्वरूप काय आहे ? या सर्व प्रक्रियेत मानसिक रोग्यांना कोणकोणत्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले ? पूर्वीच्या काळातील मनोरूग्णालये कशी होती या विषयी आपणास माहिती करून घेयची असल्यास आपणास मराठीत विविध विषयांवर माहितीपूर्ण तरी सह्ससोप्या भाषेत सुमारे ४५ पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी आसावरी निफाडकर यांच्या मदतीने लिहलेल्या ;सायको थेरपीज या पुस्तकांखेरीज अनु पर्याय तो कोणता असणार ; मी नुकतेच नाशिकमधील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था सार्वजनिक वाचनालय नाशिक याच्या मदतीने सदर पुस्तक वाचले 
       सायकॉलॉजी सायकास्टीटी ; आणि सायको थेरपीज बहुदा आपण एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणून वापरतो मात्र या तिन्ही शब्दांना वेगळा अर्थ आहे हे शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द नाहीत या सारख्या असंख्य बाबी या साडेतीनशे पानाच्या पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत पुस्तक दोन भागात विभागले आहे .पहिल्या भागात 2 मुख्य प्रकरणे आहेत. ही दोन प्रकरणे ; 3ते,4उपप्रकरणात विभागली आहेत. दूसऱ्या भागात 3प्रकरणे आहेत. पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात पुर्विची मनोरूग्णालये कसी होती? मानसिक आरोग्याविषयी पुर्वीच्या समजूती कस्या होत्या,यावर भाष्य करण्यात आले आहे. हा अपवाद वगळता पुस्तकात सर्वत्र मानसोपचार पद्धतीचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण कसे होते हे स्पष्ट करत एका एका भागानुसार या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.पहिल्या भागाच्या दुसऱ्या प्रकरणात मानसोपचाराच्या विविध पद्धतीची माहिती करुन देण्यात आली आहे.  तर पुस्तकाचा दुसरा भाग मानसोपचारमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सिबिटी आणि रिइबिटी या पद्धतीची संपुर्ण माहिती देतो .सुमारे साडेतीनशे पानांच्या पुस्तकातील पावणेदोनशे पानामध्ये सिबिटी आणि आरइबिटी याविषयी; माहिती देण्यात आली आहे. पानांच्या संख्येवरून ही माहिती किती सखोलपणे देण्यात आली आहे, हे समजू शकते. पहिल्या
भागाच्या दुसऱ्या प्रकरणात ; आठ विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली असून यामध्ये किचकट माहिती न देता ती पद्धती शोधणाऱ्या  संशोधकाची माहिती तसेच थोडक्यात उपचार पद्धतीची ओळख करुन देण्यात आली आहे. उपचार पद्धतीची ओळख करुन देतान काही ठिकाणी नाट्यमयता देखील वापरण्यात आल्याने पुस्तक सहजतेने समजते. पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात युरोपातील मनोरुग्णालयाचा विकास कसा झाला.? युरोपीय जगतात मानसिक रोगाबाबत काय काय समजूती होत्या.?मध्ययुगात मानसिक रोग्यांना बरे
करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला याविषयी सांगण्यात आले आहे. यातील काही पद्धती प्रचंड अमानुष होत्या, ज्यांचे वर्णन ऐकतानाच अंगावर काटा येवू शकतो
        मी अच्युत गोडबोले यांचे मानसशास्त्राविषयीचे वाचलेले हे दुसरे पुस्तक .मी या आधी  अच्युत गोडबोले यांचे; मानसशास्त्राविषयीचे; पुस्तक म्हणजे मनकल्लोळ .ज्यामध्ये विविध मानसिक आजारांची ओळख करुन देण्यात आली होती.तर आता वाचलेल्या या; पुस्तकात मानसिक आजरांविषयीच्या उपचार पद्धतींची माहिती देण्यात आली आहे.दोन्ही पुस्तके सहजसोप्या पद्धतीने लिहलेली असल्याने ज्यांची मानसशास्त्राविषयक काहिही पार्श्वभूमी नाही अस्या लोकांना सुद्धा सहजतेने समजतात मग वाचणार ही पुस्तके

प्रत्येक ध्येयवादी व्यक्तीने वाचायलाच हवे असे पुस्तक "सेवा समर्पण

मनुष्याने ध्येयवादी का असावे, हे सांगणारे एक संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः, प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध...