या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
लेखाचे विषय
- पुस्तक प्रकार - नियतकालिके (14)
- पुस्तक प्रकार - वाचनीय वृत्तपत्रीय सदरे (1)
- पुस्तक प्रकार -मराठीत अनुवादित (11)
- पुस्तक प्रकार ईबुक (2)
- पुस्तक प्रकार छापील (28)
- पुस्तक प्रकार- चर्चेत असणारी (1)
- पुस्तक प्रकार- विवेकानंद केंद्रातर्फे प्रकाशित (5)
- भाषा - इंग्रजी (4)
- भाषा - मराठी (40)
- माझे स्वत:चे वाचनाच्यावेळचे अनुभव (8)
- लेखक - स्वातंत्र्यवीर सावरकर (1)
- लेखक- अच्युत गोडबोले (19)
- लेखक- गिरीश कुबेर (6)
- लेखिका मीना प्रभू (4)
- विचसारसरणी -हिंदुत्ववादी (2)
- विचारसरणी - दलित साहित्य (1)
- विचारसरणी - विद्रोही साहित्य (3)
- विचारसरणी - समाजवादी (1)
- विषयानुसार - पर्यावरण (3)
- विषयानुसार - क्रीडाविश्व (3)
- विषयानुसार - अभिनेता गुरुदत्त (4)
- विषयानुसार - अर्थशास्त्राविषयक (4)
- विषयानुसार - इतिहास (4)
- विषयानुसार - गुन्हेगारी (3)
- विषयानुसार - चीन (3)
- विषयानुसार - तंत्रज्ञान (2)
- विषयानुसार - नाशिक (4)
- विषयानुसार - महिलांचे भावविश्व (6)
- विषयानुसार - मानसशास्त्र (6)
- विषयानुसार - व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित (1)
- विषयानुसार -वैद्यकीय (3)
- विषयानुसार :संगीत (1)
- विषयानुसार- पश्चिम आशिया (3)
- विषयानुसार- राजकीय (11)
- सर्वसाधारण (9)
- साहित्य (11)
- साहित्य प्रकार - विनोदी या प्रकारात मोडणारे. (1)
- साहित्य प्रकार - कथासंग्रह (4)
- साहित्य प्रकार - कांदबरी (7)
- साहित्य प्रकार - काव्यसंग्रह (1)
- साहित्य प्रकार - नाटक (1)
- साहित्य प्रकार- निबंध (2)
- साहित्येत्तर (15)
- साहित्येत्तर प्रकार - चरित्र (24)
- साहित्येत्तर प्रकार - प्रवासवर्णन (6)
- साहित्येत्तर प्रकार - माहितीप्रधान (29)
- साहित्येत्तर प्रकार - वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह (2)
रविवार, १ सप्टेंबर, २०२४
पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'
बुधवार, २४ मे, २०२३
टाटायन ...प्रवास एका सामाजभान असलेल्या उद्योग घराण्याचा
टाटा, आपल्या रोजच्या जगण्यातील अनेक उत्पादनाचे निर्माते . निव्वळ उत्पादनाचे निर्माते म्हणूनच टाटांची ओळख पुरेसी नाही. उत्तम उत्पादनाची विश्वासाह्यर्ता असणारा आणि त्याचवेळी सामाजिक भान असणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुह ओळखला जातो.स्वातंत्र्यपुर्व काळापासून अवाह्यत सुरु असणारा 150हुन अधिक वर्षाचा गौरवशाली इतिहास असणारा उद्योगसमुह म्हणजे टाटा उद्योगसमुह .आपल्या भारतात लोह पोलाद उद्योग, जलविद्युत प्रकल्प, विमान वाहतूक सेवा अस्या अनेक उद्योगाची पायाभरणी करणारा उद्योग समुह म्हणून टाटा उद्योगसमुह ओळखला जातो.या टाटासमुहाची सविस्तर माहिती हवी असल्यास आपणास ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहलेले "टाटायन", या पुस्तकाशिवाय अन्य उत्तम तो पर्याय तो कोणता? गिरीश कुबेर यांची भारतीय राजकारणाविषयीची मते अनेकांना आवडत नसली तरी ते क्षणभर बाजूला सारून हे पुस्तक वाचल्यास टाटा समुहाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते.मी सुद्धा हे पुस्तक नुकतेच वाचले.
शुक्रवार, ३१ मार्च, २०२३
वर्तमान जागतिक राजकारणाचे पैलू उलगडणारे पुस्तक ; तेल नावाचे वर्तमान
एखाद्या व्यक्तीची एखाया विषयावरची मते आपणास पटली नाहीत ,म्हणून त्या व्यक्तीच्या सर्वच कामाकडे कानाडोळा कारणे तसे चुकीचेच .समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे "उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळीत ते टाकुनी द्यावे हे वचन याबाबत अमलात आणले तर आपला फायद्याचं असतो . ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुमार यांना हे वचन चपखल लागू होते त्यांची देशातील\राजकारणाविषयीची मते काहीही असो ते क्षणभर बाजूला ठेवत बघितले तर त्यांच्या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नैसर्गिक इंधनाच्या विषयातील हुकूमत नाकारता येणे अवघडच . या विषयावर त्यांनी चार पुस्तके लिहली आहेत ती म्हणजे हा "तेल नावाचा इतिहास आहे. एका तेलियाने अधर्म युद्ध आणि तेल नावाचे वर्तनमान. या पुस्तकातील तेल नावाचे वतर्मान हे पुस्तक मी नुकतंचसार्वजनिक वाचनायलाय नाशिक यांच्यासहकार्याने वाचले (त्यातील हा "तेल नावाचा इतिहासआहे .आणि एका तेलियाने हि पुस्तके मी या आधीच वाचली आहेत ज्यांना त्याविषयी जाणून घेयचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे )
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/12/blog-post.html
मंगळवार, ७ एप्रिल, २०२०
ओळख एका हुकूमशहा सताधिकाऱ्याविषयीच्या पुस्तकाची -
जगातील एके काळच्या
असणाऱ्या 2 महासत्तेपैकी एक असणाऱ्या रशियाचा
इसवीसनाच्या 9व्या
पुस्तकाची प्रस्तावना ही श्री गिरीश कुबेर यांनीच लिहलेली असून त्यामध्ये त्यांनी सदर विषयावर पुस्तक का लिहले ? हे सांगताना त्यांचा लेखनप्रवास कोणत्या वळणाने झाला ? या प्रवासात त्यांना कोणा कोणाची साथ मिळाली याबाबत सांगितले आहे ? पुस्तकाची रचना एकूण 16प्रकरणात केलेली आहे . पहिल्या चार प्रकरणात पुतीन सत्तासिहासनावर आरूढ होण्यापर्यंतचा रशियाचा इतिहास सांगितला आहे . पुढील दोन प्रकरणात पुतीन यांच्या वैयक्तिक इतिहासावर लेखकाने प्रकाश टाकला आहे . अंतिम दोन प्रकरणात त्यांच्या समस्त वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच रशियाची पुनः एकदा महासता बनण्यामागची मानसिकता विशद केली आहे . अन्य प्रकरणामध्ये पुतीन यांच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून आणि केलेल्या कृतीमधून घेतलेला आहे . मात्र या प्रकारांमध्ये त्याचे चित्रण काहीश्या नकारत्मकतेने केल्याचे मला वाटते .
राजहंस प्रकाशन सारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे . पुस्तकाची रचना नेहमीच्या कागदाच्या कव्हरमध्ये केलेली आहे . जर त्याची रचना हार्ड बाउंड मध्ये केलेली असली तर पूस्तक अधिक आकर्षक झाले असते , असो . आपल्या मराठीत अश्या
विषयांवर हाताच्या बोटावर मोजता
येतील इतकेच लेखक
लेखन करतात , त्या
पार्श्वभूमीवर गिरीश कुबेर यांचे
हे पुस्तक प्रत्येकाने
किमान एकदा तरी
डोळ्यासमोरून घातलेच पाहिजे . मला
माहिती आहे , कुबेरांची ते
लोकसताच्या संपादकीयातून मांडत असणारी मते
काही जणांना आवडत
नाहीत , मात्र कुबेरांच्या त्या
मताच्या मागमूसदेखील या पुस्तकातून
आढळत नाही . त्यामुळे
ज्यांना जागतिक इतिहास आणि
त्याचे वर्तमानातील परिणाम याचा
मराठीमध्ये अभ्यासयाचा आहे ,अश्या
व्यक्तींनी त्यांची संपादकीयेतून येणारी
मते क्षणभर बाजूला
ठेवून हे पुस्तक
वाचायलाच हवे
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०
"युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " आजच्या काळात वाचायलाच हवे असे पुस्तक
सध्या आपल्या भारतात सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय कोणता असेल ? याचा धांडोळा घेतला असता आपणास चीनमार्फत जगात पसरलेला कोरेंना व्हायरस याचा विचार करावाच लागतो . व्हॉटसपव्दारे या विषयी विविध प्रकारची माहिती सांगितली जात आहे . त्यात काही प्रमाणात खोटी माहिती देखील सांगण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर या विषयाची मराठीत शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचे "युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " या पुस्तकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते . जैविक युद्ध आणि रासायनिक हल्ल्यासारख्या किचकट आणि काहीसा कंटाळवाणा विषय या पुस्तकामध्ये अत्यंत सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला आहे . पुस्तकाची भाषा काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी असल्याने पुस्तक खूपच रंजक झाले आहे .
पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पध्द्तीने न करता पारंपरिक पद्धतीने केली आहे . पुस्तकाची रचना दोन भागात केलेली असून पहिल्या भागात सध्या सर्वांच्या कळीच्या मुद्दा झालेल्या जैविक हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे . ज्याचा सुरवातीला याचा इतिहास सांगितलं आहे ज्यामध्ये प्राचीन काळाच्या युरोपात पसरल्या एका अनामिक रोगाच्या साथीपासून सध्याच्या काळातील अँथ्रेक्स , सार्स आदी रोगांच्या आढावा घेण्यात आला आहे . जैविक हल्ल्याची संकल्पना ही आधुनिक संकल्पना नसून प्राचीन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात असल्याचे आपणास या पुस्तकांद्वारे कळते . फक्त ही संकल्पना प्राचीन काली काहीशी विस्कळीत होती . तीला व्यवस्थित स्वरूप आधुनिक काळात देण्यात आले इतकाच तो काय फरक . प्राचीन काळी सुद्धा विविध जैविक हत्यारे वापरण्याचे प्रयोग झाले होते , या बाबत अनेक उदाहरणे या पुस्तकात देण्यात आलेली आहेत . जसे रोमन साम्राजाची विविध युद्धे . गिरीश कुबेर यांच्या या पुस्तकातीलबहुसंख्य उदाहरणे हि युरोप खंडातील किंवा प्राचीन चीनमधील आहेत . त्याच्यातही युरोपातील उद्धरणे संख्यने अधिक आहेत .भारत आणि जपान वगैरे भागात यावेळी काय घडत होते , याविषयी सादर पुस्तकाच्या या भागात काहीच सांगितले नाहीये . प्राचीन काळी संपूर्ण अमेरिका खंड आणि आफ्रिका खंडाचा उत्तर भाग वगळता इतर भाग जगाला माहिती नसल्याने त्या भागाचा प्रश्नच येत नाही . मात्र हान्याय भारत जपान आदी भागाला लावता येत नसल्याने या भागातील युद्धांचा समावेश करण्यात येईल पाहिजे होता असे मला वाटते .
पुस्तकाच्या
दुसऱ्या भागात विविध रासायनिक
शस्त्रांची माहिती देण्यात आली
आहे .ज्यामध्ये जमिनीचा
क्रूरकर्मा हिटलर यांनी या
रासायनिक शस्त्रांचा कसा, वापर केला
? याची
माहिती देण्याबरोबर सध्या पोलीस
दलांच्यामार्फत सहजतेने वापरात असलेला
अश्रूधूर या सारख्या
शास्त्रांची माहिती तर देण्यात
आली आहेच त्या
प्रमाणे अनेक प्राणघातक
शस्त्रांची माहिती देण्यात आली
आहे . या भागात
महाभारताचा उल्लेख करण्यात आला
आहे . लेखकाच्या मते
प्राचीन इतिहासात याचे फारसे
दाखले मिळत नाहीत सुरवात
झाल्यावर हा प्राणघातक
शस्त्रांचा वापर सुरु
झाला . लेखकाने या प्रकारचानरसंहारककशग्स्त्रांच्या
निर्मितीचे श्रेय पुन्हा एकदा
पाश्चात्य देशांना दिले आहे
, त्यातही याच्या निर्मितीचे पातक
प्रामुख्याने जर्मनीच्या माथी मारलें
आहे मात्र पुस्तक
खूपच माहितीपूर्ण झाले
आहे .
मराठीत अर्थशास्त्र , विज्ञानाच्या
संदर्भात शास्त्रीय माहिती देणारी
पुस्तके सध्या पूर्वीपेक्षा अधिक
संख्येने निघत आहे
. त्या पुस्तकांच्या मालिकेतील हे पुस्तक
त्याच्या भाषाशैलीमुळे खूपच
रंजक झाले आहे
. प्रत्येकाने हे पुस्तक
वाचायलाच हवे . गिरीश कुबेर त्यांच्या
संपादकीयेतून बहुसंख्य लोकांना न
रुचणारी मते मांडत
असले तरी
त्यांची राजकीय मते बाजूला
ठेवून खऱ्या ज्ञानावर
प्रेम करणाऱ्या व्यक्तीने
वाचावेच असे हे
पुस्तक आहे . मग कधी
घेताय पुस्तक वाचायला
.
सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८
तेलाचे राजकारण आणि मराठी पुस्तके -
आपल्या मराठीत इतक्या सोप्या भाषेत या
विषयातील गुंतागुंत समजून सांगणारी
पुस्तके मला तरी
आढळली नाहीत कोणाला
माहीती असल्यास
सांगावे मला आवडेल.
एका तेलियाने या पुस्तकात
आखाती देशातील सत्ताधिकाऱ्याविषयी
माहिती मिळते . अमेरिकेची या
सत्ताधिकाऱ्याना कश्या प्रकारे फूस
होती , या विषयी
माहिती मिळते. तेल
आपल्या जीवनातील अविभाज्य घटक
आहे . त्याच्या किमती
"ओपेक" या संघटनेमार्फत
कश्या प्रकारे नियंत्रित
करून जगाच्या आर्थिक
मुठ्या आवळल्या जातात ? लोकशाहीविरोधी
असूनही व्हिएतनाम सारखी भूमिका
न घेता सौदी
अरेबिया या देशातील
राजघराण्याविषयी अमेरिकेची सहानभूती का
? अमेरिकेवर कुप्रसिद्ध असणारा ९/११ चा
दहशतवादी हल्ला करणारा ओसामा
बिन लादेन मुळात
कशी अमेरिकेचीच निर्मिती
आहे ?तसेच नंतर ज्या
सत्ताधिकाऱ्यांची त्याच्याकडे प्राणघातक शस्त्रे
आहेत या आरोपातून
हत्या करण्यात आली
तो सत्ताधिकारी म्हणजे
सद्दाम हुसेन कश्या प्रकारे
अमेरिकेचीच
निर्मिती आहे अशीही
रंजक माहिती या
पुस्तकातून मिळते .
तर हा तेल नावाचा इतिहास" या मध्ये आपणास तेलाच्या शोध कश्याप्रकारे लागला; युरोपातील लोकांनी कश्या प्रकारे कंपन्या स्थापून आखाती देशातील लोकांचे शोषण केले याची माहिती मिळते, त्याच प्रमाणे आशियातील पहिली विहिर पश्चिम आशियात नव्हे तर भारतातील आसाम मध्ये खणण्यात आली . .या तेलाची
किमंत युरोपीय लोकांनी आणि अमेरिकी लोकांनी ओळखून सुरवातीला आखाती देशातील लोकांना कश्या प्रकारे मूर्ख बनवले ; त्यांच्यातील दुहीचा स्वतःच्या फायद्यासाठी कश्या प्रकारे फायदा करून घेतला; आज पेट्रोल आणि डिझेलच्या आपण ज्या मोठ मोठया कंपन्या बघतो त्यांची सुरवात कश्या प्रकारे झाली , या विषयीची माहिती मिळतेदोन्ही पुस्तके राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत .तेलाच्या राजकारणाविषयी माहिती पाहिजे असल्ल्यास हि पुस्तके वाचायलाच हवीत .गिरीश कुबेर यांनी तेलावर एकूण तीन पुस्तके लिहली आहेत ती म्हणजे हि दोन आणि "अधर्म युद्ध" हे पुस्तक
प्रत्येक ध्येयवादी व्यक्तीने वाचायलाच हवे असे पुस्तक "सेवा समर्पण
मनुष्याने ध्येयवादी का असावे, हे सांगणारे एक संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः, प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्र...












