आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत थांबलेला किंबहुना जाणीपूर्वक थांबवण्यात आलेला विकास समाजाच्या सर्व थरात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेगाने व्हावा . गुलामीचे जोखड जुगारून हा देश पुन्हा कधीही गुलामीच्या साखळीत अडकू नये.मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित राहावे .यासासाठी देदश्तील प्रत्येक घटक नव्या उत्सहात काम करू लागला/ या भारलेल्या वातावरणात काम करणी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक काम करत होते . तसेच त्यांचे मार्ग सुद्धा वेगवेगळे होते विचारसरणी आणि कार्यपद्धती वेगवेगळे असले तरी त्यांचे उद्दिष्ट एकच होते भारताचं सर्वांगीण विकास. या एकाच उद्दिष्टसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती समूहामध्ये नाव घ्यावेच लागेल असा समूह म्हणजे हिंदुस्थान प्रकाशन आणि त्यांनी २६ सप्टेंबर १९४८ पासून सुरु केलेले साप्ताहिक विवेक

स्वातंत्र मिळाल्यानंतरच्या नव्या ऊर्जेच्या वातावरणात अनेक साप्ताहिके सुरु झाली त्यातील बहुतांशी विविध कारणांनी बंद पडली त्यानंतर सुरु झालेली देखील बंद पडली मात्र आज ७५ वर्ष होऊन सध्या दिमाखात सुरु असलेली ‘साप्ताहिक विवेक’ हे मराठी पत्रकारितेतील एक महत्त्वपूर्ण आणि विचारप्रधान नियतकालिक आहे. समाजजीवनातील विविध अंगांचा अभ्यास करून राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूककरण्याचे कार्य या साप्ताहिकाने सातत्याने केले आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रभावना आणि सामाजिक जाणीवा यांचा प्रसार करण्यासाठी ‘विवेक’ची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरते.
या साप्ताहिकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेखनाची सखोलता आणि अभ्यासपूर्ण मांडणी. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, विज्ञान, इतिहास, साहित्य आणि सामाजिक घडामोडी अशा विविध विषयांवर ‘विवेक’मध्ये नियमितपणे लेख प्रसिद्ध होतात. त्यामुळे वाचकांना केवळ माहिती मिळत नाही, तर त्या मागील विचारसरणी आणि व्यापक संदर्भ समजून घेण्याची संधी मिळते. अनेक नामवंत लेखक, विचारवंत आणि अभ्यासक या साप्ताहिकातून आपले विचार मांडत असतात. साप्ताहिक विवेक एका विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे असा आरोप त्यावर सातत्याने केला जातो मात्र मी गेल्या कित्येक महिन्यापासून मी साप्ताहिक विवेकाचा वाचक आहे मला तरी तसे आढळले नाहीये. नाही म्हणायला देशविघातक प्रवृत्ती विरोधात यावर सातत्याने बोलले जाते आता देशविघातक शक्तींच्या प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना साप्ताहिक विवेक एकांगी वाटणारच,असो .

‘विवेक’चा उद्देश केवळ माहितीपुरता मर्यादित नसून वाचकांच्या विचारप्रक्रियेला चालना देणे हा आहे. सामाजिक प्रश्नांवर तर्कसंगत विश्लेषण, मूल्याधिष्ठित भूमिका आणि सकारात्मक दृष्टीकोन यांमुळे हे साप्ताहिक वाचकांमध्ये वेगळी ओळख निर्माण करते. भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न साप्ताहिक विवेकमधून केला आत असल्याचे या साप्ताहिकाचे सात्यत्याने वाचन केल्यास सहजतेने लक्षात येते
याशिवाय ‘विवेक’चे विशेषांक आणि दिवाळी अंक हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या अंकांमधून विविध विषयांवर सखोल, संशोधनपर आणि दर्जेदार लेखन वाचकांना उपलब्ध होते. विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींचे लेख, मुलाखती आणि लेखमालिका यांमुळे साप्ताहिकाची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होते.
एकंदरीत, ‘साप्ताहिक विवेक’ हे केवळ एक नियतकालिक नसून समाजजागृती, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय विचारांची रुजवण करणारे प्रभावी माध्यम आहे. समाजाला सजग, संवेदनशील आणि राष्ट्राभिमानी बनविण्यात त्याचे योगदान निश्चितच मोलाचे आहे.हे नाकारता अशक्यच.