लेखाचे विषय

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

ग्रामीण भागातील कष्टकरी व्यक्तींचे भाव विश्व उघडणारा कथासंग्रह 'हस्ताचा पाउस

आपल्या मराठीत विविध प्रकारचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच या साहित्यात समाजातील सर्व जातीच्या व्यवसायाच्या ,आर्थिकदृष्ट्या श्रीमंत,गरीब ,मध्यमवर्गीय असा सर्व स्तरातील व्यक्तींच्या जीवनाचे खुबीने चित्रण केलेले आढळते‌. साहित्याचा वैवध्येतेची परंपरा मराठी साहित्यात खुप वर्षापासून आढळते‌. या वैभवशाली  साहित्यातील  एक घटक म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांनी लिसलेला हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह .नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या पुस्तक संग्राहलायतून मी  हे पुस्तक. मी नुकतेच वाचले.
   सुमारे ८ते १० पानी असलेल्या १२कथा या कथा संग्राहात समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक कथेचे सुत्र ग्रामीण जीवनात अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीभोवती गुंफण्यात आले आहे‌. कथेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषेचा वापर देखील खुबीने केल्याचा दिसून येते.प्रत्येक कथा उलगडताना पार्श्वभुमीवर जास्त चर्चा लेखकाने केलेली नाही‌.अत्यंत हळुवारपणे मात्र न रेंगाळता सुरवातीच्या अर्ध्या ते एक पानात लेखकाने पात्र परिचय आणि पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे‌.
पहिल्या कथेचे शिर्षक 'देवा सटवा महार' हे आहे.या कथेत अज्ञानामुळे आणि गरिबीमुळे  एक महार समाजबांधव कसा नागवला जातो,त्याने बघितलेल्या स्वप्नाचा कसा चकाचूर होतो,हे १०पानांत लेखकाने मांडलयं वडार समाजबांधवांचे दैन्य दु:ख आपणास ९पानाच्या 'वडारवाडीच्या वस्तीत',या दुसऱ्या कथेतून समोर येतेय. पडकं खोपट या  कथेतून काही कारणाने गुन्हेगारीच्या चक्रात अडकलेल्या दोन कुटुंबप्रधान व्यक्तीमुळे कुटुंबाची कसी वाताहात हे समजते.ही या पुस्तकातील तिसरी कथा आहे. काळ्या तोंडाची आणि एकटा या अनुक्रम चौथ्या पाचव्या कथेतून प्राण्याचा भावना कथेतून डोकावतात.या दोन्ही कथांचे नायक आणि नायीका हे कुत्रे आहेत‌.पोकळी असे शिर्षक असलेल्या सहाव्या कथेतून काही कारणाने नोकरी न मिळाल्याने आणि व्यवसाय देखील करु न शकलेल्या प्रेमभंग झालेल्या माधव कुलकर्णी याचे व्यक्तीचित्र लेखक आपणासमोर उभे करतो‌.

 सातव्या कथेत श्याम नावाच्या आईवडील नसलेल्या आणि मोठ्या विवाहीत बहीणीच्या आधाराने लहान कुटुंबियांना सांभाळणाऱ्या श्याम नावाच्या प्रेमप्रकरणात अयशस्वी ठरलेल्या, आणि आपले दुःख कोणाला तरी सांगण्यासाठी आसुसलेल्या व्यक्तिरेखेसी लेखक आपली भेट करवून देतो.या कथेचे शिर्षक वसाण आहे.विपरीत घडले नाही या आठव्या कथेत एका जोगीण आणि तीला मदत करणाऱ्या विठ्ठलाचे भावविश्व आपणास दिसते. हस्ताचा पाऊस या कथेत आपणास गाढव आणि मालक यातील सबंध लेखक उलगडून सांगतो .हस्ताचा पाऊस ही या कथासंग्रहातील नववी कथा आहे.याच कथेवरून कथासंग्रहाचे नाव हस्ताचा पाऊस हे घेतले आहे.मायलेकाचा मळा या दहाव्या कथेत गावात एकेकाळी कुलकर्णीपद भुसवणाऱ्या मात्र घरातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर ते सोडून शांतपणे जीवन व्यतीत करणाऱ्या मात्र त्यावेळीच गावातील सावकरांकडून त्रास सहन करणाऱ्या मायलेकाची गोष्ट लेखक आपल्यापुढे सादर करतो. शेवटून दुसऱ्या असलेल्या ११व्या कथेत सुद्धा सांदीपान आणि त्याची आई येशा या मायलेकांची गोष्ट आहे.हे दोघे महार बांधव आहेत परिस्थितीने पिचलेले आहे.तर कथा संग्रहातील शेवटची बारावी कथा पती असताना प्रचंड श्रीमंती बघितलेल्या मात्र पती निधनानंतर गरीबीत जिवन जगणाऱ्या विधवा पत्नींची आणि तिच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे‌
पुस्तकाच्या कथा सहजसोप्या चटकन समजणाऱ्या, आणि छोट्या आहेत.तसेच त्यामुळे मनोरंजन देखील उत्तम होते .तरी किमान एकदा तरी त्या वाचल्याच पाहिजे असे माझे मत आहे.

मंगळवार, २९ जुलै, २०२५

इस्राइलच्या गुप्तचर संस्थेची रंजक कहाणी सांगणारे पुस्तक 'मोसाद'

सध्या आपल्या मराठीत अनेक नवनविन विषयांवरील अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.  महाराष्ट्राच्या शहरी भागातीलच नव्हे  ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या सर्वच प्रकाशकांकडून ही पुस्तके प्रसिद्ध करण्यात येत आहेत. पुर्वीपासून मराठीत असणारी इतर भाषेतील पुस्तके मराठी भाषेत अनुवादीत करण्याची परंपरा सध्या वेगाने विस्तारत आहे‌. याच मराठीच्या उत्तमोत्तम पुस्तकांचा परंपरेतील पुस्तके प्रसिद्ध करणारे एक महत्तवाचे प्रकाशन म्हणून आपण मधूश्री प्रकाशनाकडे   बघू शकतो‌.मुळचे नाशिक जिल्ह्यातील तालूक्याचे गाव देखील  नसणाऱ्या घोटीतून सुरवात केलेले आणि आता पुण्यात स्थिरावलेल्या  या प्रकाशनाकडून अच्युत गोडबोले यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत‌ हे आपणास माहिती असेलच‌.या पुस्तकांशिवाय मधूश्री प्रकाशनांकडून विविध देशांच्या गुप्तचर संस्थांची माहिती देणारी पुस्तके प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यापैकी रॉ, एफबीआय, सीआयए, केजीबी या संस्थांवरील प्रत्येकी एक तर मोसादवरची दोन पुस्तके प्रमुख म्हणता येतील. मोसादवरील दोन पुस्तके  १६० आणि ३७६पानांची आहेत.त्यातील १६०पानांचे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील प्रमुख वाचानालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेंचा मदतीने वाचले‌.
१६० पानांच्या या पुस्तकात ३० प्रकरणाद्वारे इस्राइलला मोसादची स्थापना करण्याची गरज का भासली,इस्राइल स्थापनेपुर्वीच मोसादच्या स्थापनेची सुरवात कसी झाली? मोसादची स्थापना झाल्यावर सुरवातीच्या काळात तीचे नियमन करताना इस्राइली पंतप्रधांनांकडून झालेल्या चूका, या चूकांवर त्यांनी कसे नियंत्रण मिळवले. मोसादबरोबरच स्थापन झालेल्या इस्राइलच्या अन्य गुप्तचर संस्था मोसादमध्ये कोणत्या पद्धतीने विलीन करण्यात आल्या.मोसादच नाही तर कोणत्याही देशातील गुप्तहेर संस्थांचे काम कसे चालते? मोसादने आतापर्यत यशस्वी केलेल्या मोहिमा, मोसादवर झालेले आरोप,त्यामागची कारणे,मोसादचा आपल्या गुप्तहेरांविषयी असलेला दृष्टिकोन, मोसादच्या सुरवातीच्या काळात तीला मिळालेली अमेरीकेची मदत या विषयी माहिती मिळते.
मूळ पुस्तक इंग्रजी आणि तामिळ भाषेत अनेक विषयांवर संशोधनपर मात्र रंजक आणि माहितीची वस्तुनिष्ठता जपत लिखाण करणाऱ्या नागसुब्रमणियन चोक्कनाथन यांनी इंग्रजी भाषेत लिहले आहे. एन चोक्कन या नावाने ते प्रसिद्ध आहे.मुळचा इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा अभय नरहर जोशी यांनी अनुवाद केला आहे‌.मी मराठी अनुवाद वाचला आहे.अनुवादाची भाषा प्रवाही,सहज समजणारी आहे.मोसादचे बोधचिन्ह असलेले निळ्या रंगातील मध्ये पिवळा पट्टा असलेले आणि पुस्तकाचे नाव पांढऱ्या रंगात छापलेले मुखपृष्ठ आपले लक्ष चटकन वेधून घेते.
सध्या आपल्या भारतात गुप्तहेर संस्था गुप्तहेर यांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.त्या पार्श्वभुमीवर जगप्रसिद्ध अस्या मोसादची माहिती देणारे फाफटपसारा टाळणारे हे पुस्तक आपण वाचायलाच हवे‌

शनिवार, १९ जुलै, २०२५

संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणीचे सद्य काळातील महत्त्व सांगणारे पुस्तक, तूका राम दास

आपल्याकडे संतपरंपरेची मोठी परंपरा आहे. या संतांनी जीवनाविषयीच्या अनेक समस्यांवर मोठा उपदेश केला आहे. मात्र आपल्या दुर्देवाने या संताच्या शिकवणीच्याऐवजी त्यांनी केलेल्या चमत्काराचीच चर्चा जास्त होताना दिसते. जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचा मुखातून गीता म्हणवली, भिंत चालवली.किंवा संत तूकाराम यांची कागदावर लिहलेली गाथा तीन दिवस पाण्यात राहुनसुद्धा तीन दिवसांनी जशीच्या तसी बाहेर आली‌.वगैरै. सध्याचा अत्यंत ताणतणावाच्या काळात या संताच्या उपदेशाचे महत्त्व अजूनच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.संताच्या या  सध्याचा काळातील  शिकवणीचे महत्त्व आपणास समजते ,दैनिक लोकसत्ताच्या प्रकाशनविभागाकडून करण्यात आलेल्या 'तूका राम दास' या पुस्तकातून. संत तूकाराम यांच्या नावातील राम आणि संत रामदास यांच्या नावातील राम एकत्रच घेतलेल्या या पुस्तकातून आपणास या संताच्या शिकवणीचे सध्याचा काळातील महत्त्व समजून येते‌. सन २०१६साली दैनिक लोकसत्तात संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या विषयी साप्ताहिक लेखमाला प्रसिद्ध झाली होती.याच लेखमालिकेचे हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सुप्रसिद्ध वाचनालय सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या मदतीने वाचले.
यात संत तूकाराम यांच्या विषयी २६ प्रकरणातून तर संत रामदास यांच्याविषयी २२प्रकरणातून सांगण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रकरणे आधी सदर स्वरूपात वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली असल्याने  छोटी आहेत. जी चटकन वाचून समजतात. या पुस्तकात दोन्ही संताचे चरीत्र सांगण्यात आलेले नाही तर तर सर्वच्या सर्व प्रकरणे संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणूतील वर्तमान संदर्भ आपणास उलगडून सांगतात.नाही म्हणायला पुस्तकाच्या संत तूकाराम महाराज यांच्या विषयीच्या भागातील पहिले दोन प्रकरणे संत तूकाराम महाराजांच्या वेळची परिस्थिती स्पष्ट करतात.तर शेवटचे प्रकरण संत तूकाराम यांच्या सदेह वैंकुठगमनाविषयी सांगतात. ते वगळता  पुस्तकातील अन्य ४५ प्रकरणे पुर्णत: या १७ व्या शतकातील संताचे सद्यस्थितीतील महत्त्व अधोरेखीत करतात. 
संत तूकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी या काहीस्या समकालीन संतांमुळे समाजात चैतन्य कोणत्या प्रकारे आले‌. त्यांनी केलेल्या रचनांमध्ये त्यांनी केलेल्या न केलेल्या रचना देखील कोणत्या बेमालूम पद्धतीने कालांतराने घुसवण्यात आल्या . याउलट स्थिती संत तूकाराम यांच्याबाबत कशी उद्भवली.त्यांच्या ह्यातीत त्यांनी केलेल्या रचना इतरांनी स्वत:चा म्हणून कश्या वापरल्या.याबाबत संत तूकाराम यांची प्रतिक्रिया काय होती.समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक वगळता अन्य कोणत्या रचना केल्या.कोणकोणत्या भाषेत केल्या.‌समर्थ रामदास स्वामी कोणकोणत्या विषयांत पारंगत होते.याविषयीची माहिती देखील या पुस्तकातून मिळते.
     पुस्तक मुळात वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह असले तरी  दोन तीन लेखांचा अपवाद वगळता लेख लोकसत्तात प्रसिद्ध झाले त्यावेळचा राजकीय स्थितीचा उल्लेख आढळत नाही‌. हे याचे वैशिष्ठच म्हणता येईल.मी या आधी वाचलेल्या या सारख्या पुस्तकात तत्कालीन राजकीय स्थितीचा उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतो .
पुस्तक वाचल्याने आपणास संत तूकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची सद्यस्थितीत देखील किती गरज आहे‌, हे समजते‌.पुस्तक फार मोठे नही जेमतेम २०६ पानांचे आहे‌.जे सहजतेने वाचून होते‌.पुस्तक छोटे असले तरी त्यातील आशय खुप मोठा आहे.मग वाचताय ना पुस्तक

रविवार, २९ जून, २०२५

गणिताची रंजक सफर घडवणारे पुस्तक नंबर्स

गणित ! अनेकांचा नावडता विषय.नको ते आकडे, नको ती समिकरणे.असाच आपल्यापैकी काहीचा आग्रह असण्याची शक्यता अधिक आहे.दहावीच्या शालांत परिक्षेत देखील ज्या विषयात मुल मुली सर्वात जास्त नापास होतात असा इंग्रजीनंतरचा विषय म्हणजे गणित होय. तर असा गणित विषय सुद्वा रंजक आहे. गणितात मनुष्याला खिळवून ठेवण्याची ताकद आहे असे सांगितले अनेकांना ते खोटे वाटण्याची शक्यता अधिक.गणित सोपे  प्रत्येक पायरी सविस्तर सांगून समजवता येईल,मात्र गणित रंजक करता येणार नाही असेच अनेकाचे म्हणणे असेल.मात्र गणित रंजक ,खिळवून ठेवण्याची किमया केली आहे‌.अच्युत गोडबोल आणि डॉ.विद्यागौरी प्रयाग यांनी लिहलेल्या नंबर्स या या पुस्तकाने. मधूश्री प्रकाशनाच्या सव्वा तीनशे पानाच्या पुस्तकात १२प्रकरणाद्वारे आपणास गणितातील रंजकता समजते‌.नाशिकमधील महत्तवाचे वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक याच्या पुस्तक संग्राहलयातून हे पुस्तक मी नुकतेच वाचले. 
या पुस्तकाच्या १२प्रकरणापैकी पहिल्या प्रकरणात आपणास संख्या कस्या निर्माण झाल्या?याविषयी २८पानामधून माहिती मिळते तर २८पानाच्या दुसऱ्या प्रकरणातून संख्याच अमुर्त अमर्यादित स्वरुपाची माहिती लेखक आपणास देतो.३रे प्रकरण २७पानाचे आहे.ज्यात आपणास पाय या स्थिरांकाविषयी माहिती मिळते‌ तर पुढच्या चवथ्या प्रकरणात ऑयलरच्या समिकरणाविषयीची माहिती मिळते.हे प्रकरण २१पानी आहे.पाचव्या प्रकरणात आणि सहाव्या प्रकरणात आपणास अनुक्रमे प्राईम नंबर्स आणि फिबोनाची क्रमिका याविषयी माहिती मिळते.सातवे प्रकरण २०पानी आहे.ज्यात संख्याविषयी लोकांचे असणारे समज गैरसमज यावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे. ३०पानाच्या ८व्या प्रकरणात आपणास संख्याचा गमती जमती कळतात तर नवव्या प्रकरणात काही गणितीय कोडी लेखकाने सांगितली आहेत.संख्या गणन पद्धत,दशमान ,बायनरी, ऑक्टल, हेक्झा याविषयी लेखकाने दहाव्या १८पानी प्रकरणात सांगण्यात आले आहे.तर शेवटून दुसऱ्या अकराव्या प्रकरणात १२पानाद्वारे लेखकाने वैदिक गणिताबाबत सांगितले आहे‌ तर शेवटच्या १२व्या प्रकरणात २५पानात लेखकाने अंकगणिताची मुलतत्वे आपणास सांगितली आहेत‌.
     अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखीच या पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे. गणिता सारख्या काहीस्या रूक्ष समजल्या गेलेल्या विषयातील बोजडपणा पुस्तकात कोठेही जाणवत नाही‌. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण सोप्या मराठीत स्पष्ट करुन सांगितले आहे‌.व्यवहारात रूढ नसणाऱ्या मराठी संज्ञा न वापरता, रुड असलेल्या इंग्रजी संज्ञाच या पुस्तकात देखील वापरल्या आहेत.गणिता सारखा किचकट विषय देखील रंजकतेने शिकवता येतो,हे आपणास पुस्तक वाचनातून समजते‌.तरी किमान एकदा तरी हे पुस्तक वाचावेच.





रविवार, २२ जून, २०२५

गुप्तहेरांच्या विश्वाची सफर घडवणारे पुस्तक, 'शेरलॉक्स होमच्या कथा'

गुप्तहेर आणि गुप्तहेरांचे विश्व हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा विषय‌.याचे नाव ऐकले तरी भुवया उंचवणारा विषय‌.आपल्या मराठीत याविषयी थोडेसे कमीच बोलले गेले आहे‌.रा.ना वडप यांनी आपल्या कथांमधून पुढे आणत या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.मात्र वडपांखेरीज अन्य साहित्यीकांनी या विषयापासून दुरच राहणे पसंत केले.गेल्या काही दिवसात मराठीत गुप्तचर संस्थेच्या बाबत मोठ्या प्रमाणात लिहले गेले असले तरी आजदेखील गुप्तहेरांच्या कथेबाबत मराठी भाषिकांना अन्य भाषा प्रामुख्याने इंग्रजीवरच अवलूंबन रहावे लागते‌. इंग्रजीमध्ये स्कॉटलंडचे रहिवासी असलेल्या सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या गुप्तहेरांचा कथा संपुर्ण जगात प्रसिद्ध आहेत. या कथांचा नायक शेरलॉक होम्स नावाची व्यक्तीरेखा आहे.या नायकाचा नावावरुन शेरलॉक होम्सच्या कथा या नावाने या प्रसिद्ध आहे‌. मराठीसह जगभरात अनेक भाषांमध्ये या कथांचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.या अनुवादीत कथांच्या पुस्तकांपैकी एक असलेल्या  आणि गोयल प्रकाशनामार्फत प्रसिद्ध  करण्यात आलेले पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचानालयच्या मदतीने वाचले.जीवन आनंदगावर यांनी अनुवादीत केलेल्या या २४६ पानांच्या पुस्तकात शेरलॉक होम्सच्या बारा कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तांबूस रंगाच्या केसांच मंडळ या  पहिल्या कथेमध्ये बँक चोरीची कथा  सांगण्यात आली आहे.दुसऱ्या कथेचे शीर्षक  नील माणकाची कहाणी असे आहे.ज्यात अत्यंत मौल्यवान रत्नाच्या चोरीची कथा मांडण्यात आली आहे.
ब्रिटीश घराण्यासी संबंधीत एका उमरावाच्या लग्नाची रहस्यमय कथा  'नव वधूचे पलायन' या तिसऱ्या कथेमध्ये सांगण्यात आली आहे‌ शेरलॉक्स होम्स च्या पराभवाची कहाणी ती बाई या चवथ्या कथेतून आपल्याला समजते.
बॉस्कोम्बे व्हॅलीतील नाट्य पाचव्या कथेत मांडण्यात आलयं तर सहाव्या कथेत कॉपर बीचचे रहस्या दाट  बांबूचे नाट्य या शीर्षकाखाली उलगडून सांगण्यात आले आहे. रॉयलॉट चा मृत्यू सापाच्या चावण्याने झाला,हे आपणास ठिपक्या ठिपक्याचे रहस्य असे शीर्षक असलेल्या सातव्या गोष्टीतून समजते‌.आठव्या कथेमध्ये आपणास  हॅथरेच्या बोटांच्या रहस्याचा उलगडा होतो .तर नवव्या कथेत राजमुकुटाचे थरारक असणारे रहस्य आपणास समजते.होम्सरचे नक्की काय झाले याचा आपणास हेच शीर्षक असलेल्या दहाव्या कथेत उलगडा होतो .तर अकराव्या आणि बाराव्या कथेत अनुक्रमे आपणास संत्र्याचा पाच बिया आणि ओठ मुडपेला कुरुप मानसाच्या विषयी शेरलॉक्स होम्स विषयी आकलन समजते.
   सर्व पुस्तकची भाषा संवादी असल्याने ते वाचल्यावर चटकन समजते‌.‌जागतिक स्तरावर विख्यात असलेल्या या पुस्तकामुळे जागतिक स्तरावरचे साहित्य कसे असते हे आपणास समजते.तरी ज्यांना गुप्तहेर याविषयी उत्सुकता नाही अस्यांनीसुद्धा हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे.

शनिवार, ३१ मे, २०२५

'केजीबी' रशियन गुप्तहेर संघटनेचा सविस्तर वृतांत

        केजीबी ....शीत युद्धाचा काळातील दोन महासत्तापैंकी एक असलेल्या  यू.एस.एस.अर
 अर्थात युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट ऑफ रिपब्लिक या देशाची  इस्राइलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनासारखीच प्रसिद्ध असलेली गुप्तहेर संघटना यु.एस.एस.आर ची शकले होवून  स्वतंत्र्य१४ देश निर्माण झाल्यावर पुर्वी केलेल्या कृष्णकृत्यांमुळे प्रसिद्ध झालेली संघटना, केजीबी .या केजीबीची सविस्तर आणि खऱ्या माहितीच्या पुस्तकांचा  आपल्या मराठीत काहीसा अभावच .मात्र ही पोकळी भरुन निघते आपल्या मराठीत अनेक उत्तोमोत्तम पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या मधूश्री प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले केजीबी  या पुस्तकामुळे .नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या घोटी या छोटयासा गावात मुख्यालय असलेल्या मधूश्री प्रकाशनाकडून मराठी भाषेत अच्युत गोडबोले यांची अनेक पुस्तके तसेच विविध तांत्रीक विषयावरची अन्य लेखकाची पुस्तके, आणि सीआयए, मोसाद एफबीआय, रॉ या सारख्या गुप्तहेर संघटनांवर माहितीपुर्ण पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत‌.त्यातील केजीबी वरचे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील सर्वात मोठे वाचनालय असलेल्या, सावाना अर्थात सार्वजनिक वाचानलय नाशिक यांचा संग्राहलयातून वाचले.

     
मुळ इंग्रजी भाषेत एन चोक्कन यांनी लिहलेल्या या पुस्तकाचे सुदर्शन आठवले यांनी मराठीत केलेले भाषांतर म्हणजे सदर 132पानाचे हे पुस्तक होय‌.या 132 पानाच्या छोटेखानी पुस्तकात 17प्रकरण आणि 2 परिशिष्टाद्वारे केबीजी या गुप्तहेर संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभुमी, स्थापनेनंतर झालेला विकास,  या संघटनेने केलेल्या स्वत:च्याच देशातील नागरिकांच्या हत्या, संघटनेने केलेल्या कृष्णकृत्ये जगासमोर आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न ,या संघटनेला वेळोवेळी दिलेले आणि काही प्रसंगी काढून घेतलेले अधिकार,या संघटनेची प्रशासकीय रचना आणि त्यात वेळोवेळी झालेले  बदल ,यु.एस.एस.आर मधील नागरिकांच्या संघटनेविषयच्या मतांमध्ये वेळोवेळी झालेला बदल,या संघटनेत कार्यरत असणाऱ्या नागरिकांचा स्वत:च्या संघटनेविषयीची मते,केजीबी या संघटनेने दुसऱ्या देशात पसरवलेले गुप्तहेरांचे जाळे,केबीजीच्या विरोधात अन्य देशाकडून झालेल्या कारवाया,यु.एस.एस.आर च्या पतनानंतर संघटनेचे विद्यमान स्वरूप याविषयी आपणास माहिती मिळते.अनुवादीत पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे.जी वाचून लगेच समजते.ओघवत्या भाषेत लिहलेल्या, या पुस्तकाचे वाचन केल्यास आपणास, केजीबीच्या पुर्वसुरी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,  चेका, ओजीपीयू, एनकेव्हीडी, जीयूजीबी,एनकेजीबी, एनजीबी, केआय,एमव्हीडी, या संघटनांची माहिती मिळते.
मराठीत गुप्तहेरांच्या कथा काही प्रमाणात असली तरी मराठीत गुप्तचर संघटनांची माहिती देणारी पुस्तके खुपच कमी आहेत. या अत्यंत मोजक्या पुस्तकांमध्ये समावेश होणारे हे पुस्तक आपण आंतराष्ट्रीय राजकराणात दिसते तसे मुळीच नसते, मित्र म्हणवणारी राष्ट्रे देखील एकमेकांच्या प्रदेशातच हेरगिरी करते.यासारख्या अनेक गोष्टीची माहिती मिळते. तरी या गोष्टीची माहिती करुन घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
,
 
 

गुरुवार, २२ मे, २०२५

प्रत्येकाने वाचावाच असा ग्रंथ 'लोकमान्य ते महात्मा'

आपल्या मराठीला उत्तमोत्तम संदर्भग्रंथांची  मोठी दिर्घ परंपरा आहे‌.महाराष्ट्राच्या, भारताच्या जगाच्या इतिहास,सामाजिक जीवन,राजकीय जीवन यावर सविस्तर सखोलपणे माहिती देणारी कितीतरी ग्रंथ आपणास मराठीत आढळतात. त्याच प्रमाणे सुरवातीला एखाद्या दैनिकात,साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्त लेख मालिकेचे कालांतराने पुस्तक प्रसिद्ध केल्याचा समृद्ध इतिहास देखील मराठी पुस्तक विश्वाला आहे‌.आपल्या मराठीत असी अनेक पुस्तके आहेत जी ही दोन्ही निकषे, संदर्भ ग्रंथ  म्हणून उत्तम मुल्य आणि प्रथमत: मालिका स्वरूपात प्रसिद्धी नंतर पुस्तक रुपाने प्रसिद्धी हे पुर्ण करतात.पुस्तकाची गुणवत्ता उत्तम आहे हे दाखवणाऱ्या या दोन्ही निकषांची पूर्तता करणाऱ्या पुस्तकांच्या मांदियाळीतील मुकुटमणी होईल असे पुस्तक म्हणजे राजहंस प्रकाशनातर्फे आणि ज्येष्ट विचारवंत ,लेखक प्राध्यापक डॉ सदानंद मोरे यांनी लिहलेले लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक. मोठ्या आकाराच्या सव्वा साडे सहाशे पानाच्या या पुस्तकाच्या दोन भागापैकी पहिला भाग मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक अर्थात सावाना च्या ग्रंथ संग्राहालयाच्या मदतीने  वाचला. 
या ग्रंथाविषयी याच्या आधीच अनेकदा अनेक माध्यमात कित्येकांनी लिहलयं त्यामुळे या ग्रंथात काय आहे,हे आपणापैकी अनेकांना माहिती असणारचं. हे लेखन वाचणाऱ्यांपैकी बऱ्याच लोकांनी हा ग्रंथ सुद्धा वाचला असेल.याचा विचार करता मी हा ग्रंथ खुपच उशिरा वाचला असे कोणी म्हटत असल्यासह त्यात वावगे ठरणार नाही.मात्र देरसे आयें मगर दुरुस आये या हिंदी वाक्यप्रचारानुसार अखेर का होईना ,मी हा ग्रंथ वाचला हे उत्तम असे म्हणूया. आधीच सांगितल्यानूसार हा खुप प्रसिद्ध आणि बराच जूना संदर्भ ग्रथ असल्याने याच्याविषयी आधीच माहिती आहे असे समजून यात काय आहे, हे सांगण्यात मी वेळ घालवू इच्छित  नाही.मी मला हा ग्रंथ वाचून काय वाटले हे सांगतो  तरी जेन झी जनरेशनसाठी सांगायचे झाल्यास इसवीसन 1908ते इसवीसन 1945/48 पर्यत महाराष्ट्राचे भारतातील महत्त्व कसे बदलत गेले तसेच महाराष्ट्रातील जातीय राजकारण ,समाजकारण कसे बदलत गेले याविषयी सांगण्यात आले आहे असो
   तर मित्रानों या ग्रंथाच्या वाचनातून मला ब्राह्मण ब्राह्मणेत्तर संघर्ष त्याच्या विविध पैलुंसह समजला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज निर्मितीच्या कार्याचे विविध राजकीय पैलू, तेथून महाराष्ट्राने देशाला दिलेली दिशा, महाराष्ट्रातील विकासात ब्राह्मणांचे त्यातही अधिक ठळकपणे बोलायचे झाल्यास कोकणस्थ ब्राह्मणांचे योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीची पार्श्वभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू महासभा यांच्यातील अन्योन्य संबंध,लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या अनुयनांचा उडालेला गोंधळ ,लाल बाल पाल या देश पातळीवर महत्त्वाच्या तीन नेत्यांपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळकाच्या निधनानंतर महाराष्ट्र पुन्हा देशपातळीवर सर्वमान्य होईल असे नेर्तत्व का उभा करु शकला नाही. लोकमान्य टिळकांच्या नंतर महाराष्ट्रात उदयास आलेले नेर्तत्व कसे विशिष्ठ जनसमुदायापर्यतच सिमित मर्यादीत का राहिले‌ ?महात्मा गांधीचा खुन एका महाराष्ट्रीय व्यक्तीने केल्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशपातळीवर कशी डागळली  या कलंकित प्रतिमेमुळे महाराष्ट्राला काय सोसावे भोगावे लागले या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली‌.नाही म्हणायला सदर ग्रंथातील लेख जेव्हा मालिकेच्या स्वरुपात साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्व होत होते.त्यावेळी काही लेख वाचले होते‌.मात्र तेव्हाची माझी राजकीय समज यथातथाच असल्याने आणि तेव्हा लेख सलगपणे न वाचल्यामुळे मला फारसे समजले नव्हते.तेव्हापासून आतापर्यतचा विचार करता तूकड्यात न वाचता सलगपणे वाचणे आणि  यू.पी.एस.सी च्या परीक्षेमुळे आलेली समज,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  पुणे  विद्यापीठातून घेतलेल्या शिक्षणामुळे वाढलेले आकलन यामुळे तेव्हापेक्षा मला यावेळी हा ग्रंथ अधिअ उत्तमतेनेह समजला असे म्हटल्यास ते चूकीचे होणार नाही .
पूर्वी वाचले तेव्हा जेव्हढा ग्रंथ समजला त्यापेक्षा अधिक व्यापकतेने समजण्यासाठी या ग्रंथाचे पुनर्वाचन करण्यासाठी आणि महाराष्ट सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचावाच असे मी जाताजाता सांगू इच्छितो.


उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...