रविवार, २२ जून, २०२५

गुप्तहेरांच्या विश्वाची सफर घडवणारे पुस्तक, 'शेरलॉक्स होमच्या कथा'

गुप्तहेर आणि गुप्तहेरांचे विश्व हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा विषय‌.याचे नाव ऐकले तरी भुवया उंचवणारा विषय‌.आपल्या मराठीत याविषयी थोडेसे कमीच बोलले गेले आहे‌.रा.ना वडप यांनी आपल्या कथांमधून पुढे आणत या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.मात्र वडपांखेरीज अन्य साहित्यीकांनी या विषयापासून दुरच राहणे पसंत केले.गेल्या काही दिवसात मराठीत गुप्तचर संस्थेच्या बाबत मोठ्या प्रमाणात लिहले गेले असले तरी आजदेखील गुप्तहेरांच्या कथेबाबत मराठी भाषिकांना अन्य भाषा प्रामुख्याने इंग्रजीवरच अवलूंबन रहावे लागते‌. इंग्रजीमध्ये स्कॉटलंडचे रहिवासी असलेल्या सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या गुप्तहेरांचा कथा संपुर्ण जगात प्रसिद्ध आहेत. या कथांचा नायक शेरलॉक होम्स नावाची व्यक्तीरेखा आहे.या नायकाचा नावावरुन शेरलॉक होम्सच्या कथा या नावाने या प्रसिद्ध आहे‌. मराठीसह जगभरात अनेक भाषांमध्ये या कथांचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.या अनुवादीत कथांच्या पुस्तकांपैकी एक असलेल्या  आणि गोयल प्रकाशनामार्फत प्रसिद्ध  करण्यात आलेले पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचानालयच्या मदतीने वाचले.
जीवन आनंदगावर यांनी अनुवादीत केलेल्या या २४६ पानांच्या पुस्तकात शेरलॉक होम्सच्या बारा कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तांबूस रंगाच्या केसांच मंडळ या  पहिल्या कथेमध्ये बँक चोरीची कथा  सांगण्यात आली आहे.दुसऱ्या कथेचे शीर्षक  नील माणकाची कहाणी असे आहे.ज्यात अत्यंत मौल्यवान रत्नाच्या चोरीची कथा मांडण्यात आली आहे.
ब्रिटीश घराण्यासी संबंधीत एका उमरावाच्या लग्नाची रहस्यमय कथा  'नव वधूचे पलायन' या तिसऱ्या कथेमध्ये सांगण्यात आली आहे‌ शेरलॉक्स होम्स च्या पराभवाची कहाणी ती बाई या चवथ्या कथेतून आपल्याला समजते. बॉस्कोम्बे व्हॅलीतील नाट्य पाचव्या कथेत मांडण्यात आलयं तर सहाव्या कथेत कॉपर बीचचे रहस्या दाट  बांबूचे नाट्य या शीर्षकाखाली उलगडून सांगण्यात आले आहे. रॉयलॉट चा मृत्यू सापाच्या चावण्याने झाला,हे आपणास ठिपक्या ठिपक्याचे रहस्य असे शीर्षक असलेल्या सातव्या गोष्टीतून समजते‌.आठव्या कथेमध्ये आपणास  हॅथरेच्या बोटांच्या रहस्याचा उलगडा होतो .तर नवव्या कथेत राजमुकुटाचे थरारक असणारे रहस्य आपणास समजते.होम्सरचे नक्की काय झाले याचा आपणास हेच शीर्षक असलेल्या दहाव्या कथेत उलगडा होतो .तर अकराव्या आणि बाराव्या कथेत अनुक्रमे आपणास संत्र्याचा पाच बिया आणि ओठ मुडपेला कुरुप मानसाच्या विषयी शेरलॉक्स होम्स विषयी आकलन समजते.
   सर्व पुस्तकची भाषा संवादी असल्याने ते वाचल्यावर चटकन समजते‌.‌जागतिक स्तरावर विख्यात असलेल्या या पुस्तकामुळे जागतिक स्तरावरचे साहित्य कसे असते हे आपणास समजते.तरी ज्यांना गुप्तहेर याविषयी उत्सुकता नाही अस्यांनीसुद्धा हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...