केळकर सरांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने पुस्तकाला परीपुर्ण केले आहेच हे सांगायला नकोच. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.केल्यामुळे डॉ.भूषण केळकर सरांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रेष्ठत्व वेगळे सांगायलाच नको. डॉ.भूषण केळकर सरांनी लोकमतच्या ऑक्सिजन या तरुणाईसाठीच्या पुरवण्यांसाठी लिहलेल्या लेखांचे पुस्तकस्वरुपात पुनर्प्रकाशन म्हणजे हे पुस्तक .डॉ.भुषण केळकर सरांच्या त्या लेखमालिकेला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील लेखमालिकेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आपणास आठवत असेलच.
त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या 53लेखांचे हे 144 पानाचे पुस्तक आपणास आर्टिफिशीयल इंटेलिजियन्स, ब्लॉक चेन, क्लाउड कम्प्युटिंग, इंडस्ट्री 4.0 भविष्यात येवू घातलेली इंडस्ट्री 5.0 या सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांची विविध अंगाने माहिती देते.माहिती देताना या बदलला सामोरे जाण्यासाठी स्वत:मध्ये असण्याची गरज असलेली कौशल्ये आपणास कोणत्या प्रकारे आत्मसात करता येतील, हे देखील लेखकाने सांगितल्याने हे पुस्तक खऱ्या अर्थाने जीवनावश्यक झाले आहे.पुस्तक पुर्वी वृत्तपत्रात लेख मालिके स्वरूपात प्रसिद्ध झाले असल्याने असेल कदाचित पुस्तकातील प्रत्येक प्रकरण सुटसुटीत चटकन समजणारे, आणि सहजसोप्या भाषेत लिहलेले जास्त मोठे नसणारे झाले आहे.ज्यामुळे पुस्तकाचे आकलन सहजतेने होते
येणारा काळ हा फक्त आणि तंत्रज्ञानाचा असल्याने त्यात पारंगत होण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा