आपल्यापेक्षा कितीतरी मोठे दु:ख ही मुले-मुली भोगत आहेत.यांचा तूलनेत आपले दू:ख काहीच नाही,या जाणिवेतून आपल्या दु:खाला विनाकारण कुरवाळीत बसण्याची कृती किती निरर्थक आहे, याचे आकलन होते.आसमंत ता पुरवणीत शेवटच्या ६ क्रमांकाच्या पानावरील घडीच्या खालच्या अर्ध्या भागातील डाव्या कोपऱ्यातील ही लेखमाला प्रत्येकाने पेफर हातात आल्यावर पहिल्यांदा वाचावीच,असी आहे. थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आडनाव असलेले या लेखमालिकेचे लेखक स्वत:च्या लेखाद्वारे आपणास अरे यांचे दु:ख बघ आणि स्वत:चा दुखातून 'सावर रे' असा जणू उपदेश देतायं,असे लेख वाचताना सातत्याने वाटते.साधरण: तात्कालीक, त्या त्या वेळी चर्चेत असणारे विषयांवर लेख प्रसिद्व करण्यावर वृत्तपत्रांचा भर असतो,मात्र या सारखे सार्वकालिक जनतेचे खरे दु:ख समाजासमोर आणल्याबद्दल तरुण भारत नागपूर च्या संपादकीय विभागाचे देखील कौतूक करायला हवे.
या लेखमालिकेत आतापर्यत प्रसिद्ध लेखांचा विचार करता, गुन्हेगारांच्या अपत्यांबाबतचा समाजाचा दृष्टिकोन, बांधकाम मजूरांची मुले, रस्त्यावर, सिग्नलवर फिरणारी, रेल्वे स्टेशन रेल्वेत राहणारी मुले, लहान भावंडाची जवाबदारी जवाबदारी पार पाडणारी मुले, रिमांड होम, बालसुधारगृहातील, अनाथालयातील मुले - मुली, तसेच पालकांच्या सवयीमुळे, आई-वडीलांच्या सतततच्या होणाऱ्या भांडणामुळे,झालेल्या घटस्फोटामुळे पालकांचा प्रेमाला मुकलेल्या मुला-मुलींविषयी माहिती मिळते.
समाजासाठी काही करु इच्छिणाऱ्या, महाविद्यालयात एम.एस डब्ल्यु या सारखे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी ही लेखमाला अत्यंत महत्त्वाची आहेच.मात्र लेखाच्या सुरुवातीला सांगितले, त्या प्रमाणे विनाकारण स्वत:,चे दू:ख मोठे आहे,असे समजून त्याला कुरवाळीत बसणाऱ्या,व्यक्तींना त्यांच्या वागण्यातील फोलपणा लक्षात यावा यासाठी देखील त्यांनी ही लेखमाला वाचायलाच हवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा