मात्र मराठीत ज्या विषयावर माहितीचा अभाव तिथे अच्युत गोडबोले हजर या सुप्रसिद्ध फॉर्मुल्याप्रमाणे अच्युत गोडबोले यांनी डॉ वैदेही लिमये यांना बरोबर घेऊन रक्त या विषयावर पुस्तक लिहले आहे. जे मी नुकतेच वाचले. अच्युत गोडबोले यांनी एकट्याने लिहलेली आणि सहलेखक/सहलेखिका घेऊन लिहलेल्या ७५ पुस्तकांचा
एकत्रित विचार करता अच्युत गोडबोले यांनी लिहलेले आणि मी वाचलेले हे १८ वे पुस्तक (त्यातील ९ पुस्तके माझ्या वैयक्तिक संग्रहात आहेत. तर उर्वरित पुस्तके मी वाचनालयातून आणून वाचली आहेत )अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये लिखित ‘रक्त’ हे पुस्तक विज्ञान, इतिहास आणि मानवी जीवन यांची एकत्रितपणे माहिती देणारे विविध गोष्टीना साजेने स्पर्श करणारे लेखन आहे. सुमारे ३५० पानांच्या या पुस्तकात ‘रक्त’ या जीवनावश्यक घटकाचा सर्वांगाने विचार केल्याचे जाणवते. . केवळ शरीरशास्त्रापुरते मर्यादित न राहता, हे पुस्तक वाचकाला विज्ञान, संस्कृती, समाज आणि मानवी अनुभव यांची सविस्तर माहिती पुस्तकातून मिळते
पुस्तकात रक्ताचे स्वरूप, त्याचे घटक आणि घटकांची कार्ये जसे लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स, यांची कार्ये अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत. रक्त शरीरात ऑक्सिजन वाहून नेते, रोगांशी लढते आणि संतुलन राखते, हे स्पष्ट करताना उदाहरणांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. त्यामुळे गुंतागुंतीचा विषयही सहज कळतो.
या पुस्तकाचीएक चांगली बाजू म्हणजे रक्ताच्या शोधाचा आणि प्रयोगांचा इतिहास. प्राचीन काळातील अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती आणि सुरुवातीचे धाडसी प्रयोग यांचे वर्णन वाचताना खिळवून ठेवले जाईल अश्या पद्धतीने
केले आहे. पुढे रक्ताभिसरणाचा शोध, रक्तगटांची ओळख आणि रक्तसंचार तंत्रज्ञानाचा विकास यामुळे वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती छान पद्धतीने सांगितली आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रक्तपेढ्यांची गरज आणि त्यांचा विकास कसा झाला, हेही सांगितले आहे.याशिवाय, रक्ताशी संबंधित आजार, फॉरेन्सिक सायन्समधील उपयोग आणि गुन्हे उलगडण्यात रक्ताची भूमिका यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. रक्तदानाची संकल्पना आणि त्यामागील मानवतावादी दृष्टिकोन हा देखील पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. रक्तदान हे केवळ वैद्यकीय गरज नसून सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणिव हे पुस्तक वाचनातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते
पुस्तकात रक्ताचा सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थही मांडला आहे. साहित्य, कला आणि परंपरेत रक्त कधी शौर्याचे, तर कधी नातेसंबंधांचे प्रतीक म्हणून दिसते. या विविध दृष्टिकोनामुळे विषय अधिक समृद्ध होतो.एकूणच, ‘रक्त’ हे पुस्तक ज्ञान, इतिहास आणि भावना यांचा सुंदर मेळ साधणारे आहे. सोपी भाषा, सखोल मांडणी आणि व्यापक दृष्टीकोन यामुळे हे पुस्तक वाचकाची जिज्ञासा वाढवते आणि विज्ञानाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा