शिक्षणामुळे होणारा बदल दाखवून देणारे आत्मचरीत्र म्हणजे 'माज्या जल्माची चित्तरकथा' असे या आत्मचरीत्राबाबत आपण म्हणू शकतो. पहिले दलित महिला आत्मचरीत्र असी ओळख असलेले हे आत्मचरीत्र अन्य विद्रोही साहित्यातील आत्मचरीत्राप्रमाणेच गावकुस्यात झालेला अन्याय, त्यावर मात करण्यासाठी केलेलासंघर्षाचे दर्शन घडवते.या प्रकारच्या अन्य आत्मचरीत्रात असते, त्याचप्रमाणे सुरुवातीला बोली भाषा आणि पुस्तकाचा साधरणत: अर्ध्यापसून प्रमाण मराठी भाषेतील लेखन आढळते.
लेखिकेने जुनी सातवीपस होऊन शिक्षिका नोकरीस सुरुवात केली आणि शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाली. या दरम्यान दलित म्हणून अपमानाचे प्रसंग तीला सामोरे जावे लागले . घरची गरिबी आणि सभोवताली शिक्षणास अनुकूल वातवरण नसणे यामुळे तिच्या क्षिक्षणाला अनेकदा विरोध झाला मात्र या अडचणींवर मत करत सांगली जिल्ह्यातील पहिली दलित शिक्षणाधिकारी म्हणून लेखिकेने आपली कोणत्या प्रकारे छाप सोडली तिची स्थिती सुधारल्यावर लेखिकेचे आप्तेष्ट तिच्याशी कसे वागले,किंबहुना ती तिच्याशी कोणत्या प्रकारे वागली हे सर्व समजून घेयचे असल्यास हे पुस्तक वाचायलाच हवे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा