लेखाचे विषय

रविवार, ९ मार्च, २०२५

निखळ आनंद देणारे पुस्तक,' माझा बायकोचा नवरा'

   
विनोदाचे मानवी जिवनातील‌ स्थान अत्यंत महत्तवाचे आहे. जिवंतपणी जाळते,तीला चिंता म्हणतात. मनुष्याने चिंतेपासून दुर राहण्यासाठी आनंदी राहिले पाहिजे.संकटे येतात आणि जातात.मानवाने आनंदी राहिले तर  या संकाटाचा तो सहजतेने तोंड देवू शकतो. या प्रकराची विधाने आपण अनेकदा वाचतो ,ऐकतो. आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय योजता येतात.त्यात अनेक व्यक्तींकडून वापरण्यात आलेला उपाय म्हणजे, विनोदी साहित्य वाचणे.आपल्या मराठीला मोठ्या प्रमाणात विनोदी साहित्याचा वारसा आहे.पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,
चि.वि.जोशी अस्या अनेक लेखकांनी विनोदाला एका उत्तम उंचीवर नेवुन ठेवला आहे.याच परंपरेतील एक पुस्तक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ साहित्यीक नरेश महाजन सरांनी लिहलेले आणि शद्बमल्हार प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक माझा बायकोचा नवरा'हे पुस्तक. मी नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय 'सार्वजनिक वाचनालय नाशिक' अर्थात सावानाच्या मदतीने नुकतेच वाचले.
        160 पानी या पुस्तकात 13 विनोदी कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.विनोद म्हटला की टिव्हीवरील कार्यक्रमांमुळे  सध्याचा काळात आपल्यासमोर सहजतेने येणारे चित्र अर्थात भाषेची पातळी घसरणे, पुरषांनी महिला वर्गाचे कपडे घालणे याचा लवलेषशी या कथांमध्ये आढळत नाही.तर असे न करताही सहजतेने रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंगही कोणत्या सहजतेने विनोद निर्मितीचा दृष्टीने खुलवता येतात,याचे दर्शन आपणाला नरेश महाजन सरांच्या या कथांमधून होते.
सध्या नाशिक परीसरात अनेकदा घडणाऱ्या वन्यप्राण्याचा मानवी वस्तीतील प्रवेशावर पहिली कथा आधारीत आहे.यामुळे घडणाऱ्या गमती जमंती,आणि मानवी स्वाभाव हे कथेचे बीज आहे.त्यानंतरच्या कथांचा विचार करता, दहावी परिक्षेचे पर्यवेक्षण, आदेश बांडेकर यांच्या होम मिनीस्टर या कार्यक्रमात प्रवेश मिळण्यासाठी महिलांची झुंबड, मृत पत्नीचे भुत दिसणे,  कथा, लेखकाच्या एका छोट्यासा गावातील मुलाखत,तंटामुक्ती अभियानात यश मिळावे या प्रयत्नात गावकरीच कसा अडथळा होतात, राजकीय पक्षांच्या साठेमारीत एक व्यक्ती कोणत्या पद्धतीने स्वत:चा फायदा करुन घेते, एका प्रसिद्ध व्यक्तीची हत्या कोणी केली,याचा पोलीसी तपास आदि अनेक प्रसंगावर आधारीत कथा या कथासंग्रहात आहे.ज्या वाचकाला पुस्तक वाचताना खिळवून ठेवतात.
पुस्तकातील प्रत्येक कथेतील प्रसंग लेखक नरेश महाजन सरांनी मोठ्या सहजतेने कथेत गुंफले आहेत.ज्यामुळे कथा
मोठ्या प्रमाणात वाचणीय झाल्या आहेत..कोणतीही कथा वाचताना कंटाळवणी होत,कथा अर्ध्यावर सोडून पुढची कथा वाचण्याची इच्छाच होत नाही.
पुस्तक वाचल्यावर कोणत्याही व्यक्तीचा तणाव सहजतेने पळून जाईल,यात शंका नसावी, तणावरहित आयुष्य जगल्यास आपलै आयुष्य वाढते.तर मग जास्त वर्ष जगण्यासाठी वाचणार ना हे पुस्तक!

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

भारताच्या वैभवशाली वारश्याची ओळख करुन देणारे पुस्तक, 'सिंधू -हरवलेली संस्कृती'

आपल्या भारताला आदिम काळापासून मोठा वैभवशाली वारसा मिळालेला आहे.  आहे.मानवाला लेखन कला अवगत नव्हती त्या म्हणजेच इतिहासकारांचा मते pre history काळ असो किंवा मानवाला लेखनकला अवगत होती मात्र अद्याप तीचा उलगडा मानवाला झालेला नाही अस्या कालखंडात अर्थात proto hostory कालखंड असो किंवा इतिहासकारांच्या मते ज्याला history peroid  (ज्याचे accient ,mideverial, modern असे तीन भाग पडतात) म्हणतात त्या कालखंडातील असो या सर्वच कालखंडात भारताला वैभवशाली वारसा  मिळाल्याचे इतिहासाच्या शास्त्रीय पद्धतीने संशोधनातून  वारंवार सिद्ध झाले आहे.याच विस्तीर्ण कालखंडातील एक महत्तवाचा टप्पा म्हणजे सिंधु सरस्वती संस्कृतीचा कालखंड होय. आपल्या दुर्दैवाने भारताच्या या प्राचीन वारस्याची माहिती  देणाऱ्या पुस्तकाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वानवा आहे.मात्र काळकुट्ट अंधारात मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड निर्माण करते त्याचप्रमाणे हा अभाव दुर करण्याचे काम सनय प्रकाशनतर्फे प्रकाशित अनुवादीत पुस्तक 'सिंधू हरवलेली संस्कृती' हे पुस्तक काही प्रमाणत करते .
मुळातील लंडन येथील Reaktion Publishication चे The indus: Lost civilization नावाच्या 2015 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे.नाशिकमधील सर्वात जूने वाचानालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीतून मी हे पुस्तक नुकतेच वाचले .
    या पुस्तकात 240 पानांमधून 12प्रकरणांमधून या संस्कृतीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.ज्यात या संस्कृतीच्या अधिकृत शोध लागण्याचे मानण्यात येते त्या 1923 चा रेल्वेमार्ग तयार करण्याचा घटनेच्या आधीपासून या ठिकाणाबाबतची विविध तज्ञ्ज व्यक्तींची मते काय होती.मोहोंनजारो आणि या संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या अन्य ठिकाणी  आतपर्यतच्या  उत्खनातून काय सापडले आहे.? या संस्कृतीचे समाज जीवन, व्यापारी जीवन  कसे होते? या संस्कृतीच्या धार्मिक कल्पना काय असू शकतात.?सिंधु सरस्वती संस्कृतीचा बाहेरील जगाशी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून संपर्क होता, ही संस्कृती कोणत्या कारणाने नष्ट झाली? या संस्कृतीचाविकास कोणत्या कालखंडात आणि कस्या प्रकारे झाला? तीच्या लिपीच्या कितपत उलगडा झाला आहे,?उलगडा करण्यातील अडचणी आणि सुगम बाजू कोणत्या ? या सांस्कृतिक विविध बाबींचा हिंदू धर्मातील बाबींवर कोणत्या प्रकारे प्रभाव आहे.?सिंधू संस्कृतीने आपल्यासाठी कोणता वारसा ठेवला आहे याचा प्रामुख्याने समावेश करता येईल.
       मी वाचले तो मुळच्या इंग्रजी पुस्तकाचा शीतल भांगरे यांनी केलेला  मराठीतील अनुवाद होता.मी मराठीत अनुवादीत झालेली काही पुस्तके वाचली आहेत,त्या अनुभवावर सांगतोय,या पुस्तकाची भाषा खुपशी बोजड, कृत्रिम वाटते‌‌. पुस्तक माहितीपुर्ण असल्याने देखील भाषा अशी असू शकते मात्र या भाषेमुळे पुस्तक वाचताना काहीसे कंटाळवाणे होते.वाचताना वाचकाला खिळवून ठेवण्यात पुस्तक काहीसे कमी पडते असे माझे निरीक्षण आहे‌.मात्र

पुस्तकात ठिक ठिकाणी गरजेनुसार सिंधू सरस्वती संस्कृतीतील अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यामुळे विषय समजायला मदत होते.अन्य अनुवादीत पुस्तकांप्रमाणे अनुवादकाचे मनोगत ही गोष्ट या पुस्तकात आढळत नाही. पुस्तकाच्या सुरवातील देण्यात आलेल्या कालानुक्रमामुळे सिंधू सरस्वती संस्कृतीचा विकास कधी झाला ,तिचा शोध कधी लागला ,या दरम्यान त्या प्रदेशात मोठ्या कोणत्या घटना घडल्या हे समजते. 
    सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये सांडपाण्याची भुमिगत व्यवस्था उत्तम होती, तसेच मोठे रुंद रस्ते असल्याचे  पुरावे सापडले आहेत.दुर्देवाने आज याच प्रदेशात मोडणाऱ्या आपल्या भारतात याची उणीव आहे.या उणीवांवर मात करायची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्यावरुन जाहिरपणे सांगावे लागल्याचे आपणास आठवत असेलचं, जे आपणासाठी भुषणावह नाहीये‌.तरी हा कलंक दुर होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नामध्ये आपल्याला या प्राचीन वारस्याची मोठी मदत होवू शकते मात्र त्यासाठी आपल्याला त्याची माहिती असणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

नाशिकचा इतिहास , समृध्द वारसा सांगणारे पुस्तक,'नासिक डायरी'

         नाशिक, रंगपंचमीच्या दिवशी रहाडामध्ये उतरुन रंग खेळण्याची अनोखी प्रथा असलेले शहर, कुरमुऱ्यांचा तिखट चिवडा, मिसळ आणि वाइनसाठी प्रसिद्ध असलेले शहर,आदिवासी ,खानदेशी ,आणि पश्चिम महाराष्ट्राच्या संगमावर वसलेले शहर म्हणजे नाशिक., दक्षीण काशी असी ओळख असलेले तांब्याच्या वैशिष्टपुर्ण भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे नाशिक.या  नाशिकला फार पुर्वीपासूनचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आतापर्यतच्या वाटचालीत,इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अनेकांची जन्मभुमी कर्मभुमी नाशिक शहर आहे.या नाशिक शहरालगत असलेल्या लेण्यांना मोठा वैभवशाली इतिहास आहे. या सर्व खजिन्याची माहिती करुन घेयची असल्यास महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत  कार्यरत असलेल्या रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या 'नाशिक डायरी या पुस्तकाखेरीज दुसरा उत्तम पर्याय तो कोणता? नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या संग्राहालयात असलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले.रमेश पडवळ सरांनी नाशिकवर हे पुस्तक धरुन ५पुस्तके लिहली आहेत.त्यापैकी मी वाचलेले हे दुसरे पुस्तक. मी या आधी त्यांचे तपोभूमी नाशिक हे पुस्तक वाचले होते.ते या पुस्तकाप्रमाणेच माहितीपुर्ण होते. त्या पुस्तकाविषयी ज्यांना जाणून घेयचे असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असलेल्या लिंकवर क्लिक करावे.
     272 पानांच्या या पुस्तकात लेखकाने 24प्रकरणाद्वारे प्राचीन युगातील नाशिकच्या परीसरात राज्य करणारे सातवाहन राज घराणे, नाशिकमधील कर्तुत्वान महिला, नाशिकमधील शिक्षणक्षेत्र, नाशिकमध्ये झालेला ख्रिस्ती धर्माचा प्रसार,रामकुंड परीसरात असलेल्या समाधी, नाशिकमधील विविध शाहीर, स्वातंत्र्यवीर सावरकर, रामदास स्वामी यांनी टाकळी परीसरात केलेले केलेले कार्य, नाशिक शहरात असलेल्या पांडवलेणी आणि चामरलेणी, नाशिक परीसरात जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पेशवेकालीन सरदार  या सारख्या घटकांची माहिती दिलेली आहे. तसेच नाशिकचा विविध ग्रंथात आलेला उल्लेख,नाशिक परीसरातील महानुभाव पंथाची धार्मिक स्थळे, तसेच ब्रिटीश काळातील नाशिकची छायाचित्रे आणि चित्र काढणारे छायाचित्रकार आणि चित्रकार नाशिक परीसरातील मारुतीची मंदिरे, नाशिक शहरातील जूनी पाणी पुरवठ्याची व्यवस्था कशी होती या विषयीची माहिती आपणास या पुस्तकातून समजते.
              पडवळ सरांनी कोव्हिड 19 च्या साथरोगात लागू करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात नाशिककरांचे धैर्य अबाधित राहावे यासाठी फेसबुकवर लिहलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे सदर पुस्तक होय.पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे.पुस्तक हे नाशिकविषयी माहिती देणारे असून देखील लिहतांना वापरलेल्या पुस्तक अत्यंत वाचणीय झाले आहे,कंटाळवाणे वाटत नाही.विषय कितीही कठीण असला तरी तो सहजसोप्या दुसऱ्याला सहजतेने समजेल या पद्धतीने मांडू शकतो तो उत्कृष्ट शि‌क्षक असतो असे म्हणतात या कसोटीचा विचार करता हे पुस्तक या कसोटीवर 100टक्के खरे ठरते.पुस्तक माहिती देणारे असले तरी पुस्तकाची गोष्टीवेल्हाळ स्वरूपाची भाषा हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ठ म्हणता येईल.
         आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहराला काहीना काही इतिहास आहे.जो शालेय अभ्यासक्रमात शिकवला जातोच असं नाही.मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या सध्याचा सामाजिक ,राजकीय जीवनावर या इतिहासाचा मोठा प्रभाव असतो.आपणाला सध्या भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे मुळ या इतिहासात दडलेले असते.त्यामुळे आपणास तो माहिती असणे आवश्यक ठरते‌.याला नासिक डायरी सारखी पुस्तके  मोलाची मदत करतात..नाशिक सारख्या मोठ्या शहराछा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव असतो त्यामुळे नाशिकचा इतिहास नाशिककरांखेरीज अन्य लोकांनी देखील वाचणे अत्यावश्यक आहे ज्यात हे पुस्तक मदत करते, मग वाचणार ना हे पुस्तक 

मी या आधी रमेश पडवळ सरांच्या वाचलेल्या पुस्तकाची अर्थात तपोभूमी नाशिक, या पुस्तकाची मी करुन दिलेली ही ओळख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/02/blog-post_55.html

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

भारत चीन संबंधांचा आत्ताच्या काळापर्यंत सविस्तर आढावा घेणारे पुस्तक 'भिंती आडचा चीन'

 
                   आपल्या मराठीत सध्या जागतिक राजकारणाविषयी अनेक नवं नवीन  पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. या पुस्तकांमुळे आता आतापर्यंत काहीसा अपरिचित असणारा भारताचे परराष्ट्र धोरण हा विषय मराठी जणांना मोठ्या प्रमाणात परिचित होत आहे. या सकारात्मक बदलातील एक घटक असलेले 'भिंती आडचा चीन',हे श्रीराम कुटे लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक मी नुकतेच सावाना या नाशिकमधील सुप्रसिद्ध सांस्कृतिक संस्थेच्या मदतीने वाचले.                
               भारत चीन संबंधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफशियल इंटेलिजियन्स क्षेत्रात चीन करत असलेली प्रगतीमुळे काय फरक पडू शकतो आणि का फरक पडणार ? याविषयी  सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.तसेच गेल्या दोन वर्षापासुन सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे भारत आणि चीन राजनैतिक संबंधावर देखील हे पुस्तक भाष्य करते.या खेरीज भारताला चीनच्या विचारसरणीचे, आर्थिक लष्करी आणि राजकीय आव्हान भविष्यात कसे असेल या मुद्द्यांवर देखील या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे‌
             या 360 पानांच्या पुस्तकाचे 4 भागात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या भागात इसवीसनाच्या पुर्वी दिड हजारापासून सन 1949मध्ये चीनमध्ये कम्युनिष्ट राजवट येण्यापर्यतच्या कालखंडातील चीनच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे‌.कोणतीही एका देशातील राजकीय राजवट दुसऱ्या देशाच्या बाबत विशिष्ट अशी भुमिका का घेते ?हे  समजण्यासाठी त्या देशातील ती विशिष्ट राजवट कोणत्या स्थितीत त्या देशात सत्ताधिकारी झाली ?हे माहिती असणे आवश्यक आहे.तसेच आताच्या राजवटीच्या भुमिकेशी त्याच्या आधीच्या राजवटीच्या भुमिकेचा काय संबंध आहे ?हे समजणे आवश्यक असते‌. हे माहिती करुन घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या प्रदेशाचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे असे स्पष्टीकरण
लेखकाने चीनचा इतिहास मांडतांना प्रस्तावनेत दिले आहे‌ सुमारे एक तृतीयांश पाने लेखकाने यासाठी खर्ची घातली आहेत. 
     दुसऱ्या भागात 1949ते 1989 या 40 वर्षात चीनमध्ये झालेले ग्रेट लिप फॉरवर्ड, सांस्कृतिक क्रांती सारखे उपक्रम तिआनमेन चौकातील आंदोलन, माओच्या कार्यकाळात झालेले अत्याचार ,त्याविषयीची सध्याच्या पिढीची मते ही मते होण्यामागची कारणे, तसेच जगात चीनविषयक दृष्टिकोन, माओचा चीनने जागतिक राजकारणात कोणते स्थान घ्यावे याबाबतची मते,चीन रशिया संबंध ,भारत चीन युद्ध ,त्यावेळच्या चीनची सामाजिक स्थिती, चीन पाकिस्तान राजनैतिक संबध ,रशिया चीन राजनैतिक संबंध माहिती देण्यात आली आहे यासाठी लेखकाने सुमारे 80 पाने खर्ची घातली आहेत.
    तिसऱ्या भागात 1989 नंतरच्या काळात चीनने कोणत्या पद्धतीने प्रगती केली? त्या काळात भारतात असलेली राजकीय स्थिती कशी होती?या राजकीय स्थितीमुळे आपले चीनकडे कसे दुर्लक्ष झाले.याच दरम्याने सेव्हियत सोशालिस्ट रशिया आणि पुर्व युरोपातील साम्यवादी राजवटी कोसळत असताना चीनमध्ये साम्यवादी राजवट कशी काय शिल्लक राहिली ? तिआनमेन चौकातील आंदोलनामुळे चीनमध्ये निर्माण झालेली अस्थिरता चीनने कोणती आर्थिक पाउले उचलून दुर केली.डेन जिंपिंग, यांच्याकडून हु जिताओ ,शी जिनपिंग यांच्यकडे सत्तेचा पट कसा फिरला ? चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महत्तकांक्षा काय आहेत?चीनने त्याचा इतिहासाचा व्हिटीम कार्ड म्हणून कोणत्या खुबीने वापर केला ? चीनचा बेल्ट अँड  रोड महाप्रकल्प काय आहे.चीनची ए.आय मधील प्रगती कसी झाली याविषयी 60पानातून आपणास माहिती मिळते‌.
     चौथ्या भागात सुमारे 60 पानात लेखक भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंध भविष्यात कसे असतील या राजनैतिक संबंधात आपणास कोणती आव्हाने पेलावी लागतील याविषयी चार प्रकरणातून माहिती देतो.पहिल्या प्रकरणात भारतीयांसह जगातील अनेकांना चीनच्या एकपक्षीय हुकुमशाहीचे वाटणारे आकर्षण आणि लोकशाहीत
त्यामुळे होणारे बदल.चीनचा आपली प्रगती एकपक्षीय राजवटीमुळे झाली?हे सांगण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे भारतीयांवर पडणारा प्रभाव त्यांचा साम्यवादाकडे झुकणारा कल याविषयी सांगण्यात आले आहे. चीनचे भारताला असणाऱ्या आर्थिक आव्हान स्पष्ट करताना दुसऱ्या प्रकरणात भारत आणि चीन या दोन्ही देशातील अर्थव्यवस्थेचा आकार त्यांच्या वाढीचा वेग, दोन्ही अर्थव्यवस्थेतील जमेच्या आणि नकारात्मक बाबी याविषयी लेखक सांगतो तिसऱ्या प्रकरणात लेखक चीनचे राजनैतिक आणि लष्करी संकट याविषयी लेखक माहिती देतो.ज्यात दोन्ही देशांचा संरक्षणावर होणारा खर्च, संरक्षण होण्यासाठी दोन्ही देशांची सीमावर्ती भागातील विकासकामे, चीनच्या परराष्ट्र धोरणातील भारताचे स्थान, पाकिस्तान चीन मैत्री, त्या दोघांनी एकाचवेळी आक्रमण केल्यास होणारी भारताची स्थिती, भारताच्या महासत्ता होण्यात चीन कोणत्या प्रकारे अडथळा आणत आहे, आणि या अडथळ्याचा धोरणाची भविष्यातील वाटचाल कोणत्या प्रकारे होईल.याविषयी लेखकाने सांगितले आहे‌ चौथ्या भागाच्या चौथ्या प्रकरणात लेखकाने पुस्तकाचा समारोप करताना भारताने चीनच्या प्रगतीमधून काय धडे घ्यावे ,हे सांगितले आहे
               आपला खरा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे.त्यामुळे तेथील समाजजीवनाची आणि त्या देशाची विविध क्षेत्रात प्रगती कशी झाली? तसेच या प्रगतीचे पुढील टप्पे काय असतील?हे आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे.या बाबींची माहिती होण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

मराठी गझल विश्वातील उत्तम पुस्तक, 'आतल्या आत मी'

आपल्या मराठीला साहित्याची मोठी परंपरा आहे कथा कादंबरी नाटक कविता निबंध चरित्रे प्रवासवर्णने यासारखे अनेक प्रकार आपल्या मराठी साहित्यात रूढ आहेत. या मुख्य प्रकारांचे अनेक उपप्रकार सुद्धा आहेत जसे कविता हा एकच प्रकार जरी विचारात घेतला असता कवितांचे वृत्तबद्ध कविता, मुक्त छंद कविता, चारोळी हायकु, गझल असे विविध उपप्रकार आढळतात. कवितेच्या  विविध प्रकारांवर आधारित अनेक पुस्तके मराठीत आहेत. व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असलेल्या नाशिकच्या संतोष हुंडलीकर यांनी लिहिलेला आतल्या आत मी हा काव्यसंग्रह त्यापैकीच एक. मूळचा उर्दू भाषेत असलेला मात्र  मराठी साहित्यिक सुरेश भट यांनी मराठीत रूढ केलेला गझल हा काव्यप्रकार यामध्ये हाताळण्यात आलेला आहे. हा मराठी गझल काव्यसंग्रह मी नुकताच वाचला
    एकूण 87 गझल या काव्यसंग्रहात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्या सर्वच गझल खूपच सुंदर आहेत. उत्कृष्ट गझलेचा कसोट्या असणाऱ्या रदिक,काफिया आणि अलामत आणि वृत्त  यांचे उत्तम भान या गझलांमध्ये राखलेले आपणास दिसते.सखोल आणि अथांग आशय याचा देखील या
गझल रचनांमध्ये उत्तम पद्धतीने भान राखल्याचे या रचनांचे वाचन केले असता आपणास दिसते.

 सोसताना उन्हाची काहीली
सावलीची धर्मशाळा पाहिली ओळखीच्या आरशाने जाणले 
 सुरकुत्यातुन ही जवानी राहिली 
 किंवा 
असे कसे मनतले जाणतात पुस्तके 
विचारही नवे -जूने खोडतात पुस्तके
जरी कधी न बोललो एकट्यात मोकळे
मनातल्या मनातही बोलतात पुस्तके
तसेच 
ही जरी लाचार काही सोबतीची माणसे
वाटती आधार काही सोबतीची माणसे
वादळाला झेलताना भोवताली पाहिलीर काही सोबतीची माणसे 
आणि 
कोरडा उल्लेख ओल्या नात्याचा
बेगडी आवेष खोट्या नात्याचा
शद्ब काही क्षेपणास्त्र होताना
पाहिला विध्वंस नात्यानात्याचा 

 यासारख्या उत्कृष्ठ उत्तमोत्तर गझला या काव्य संग्रहात आहेत. या गझला सहजसोप्या मराठीत लिहलेल्या आहेत.त्यामुळे सहजतेने समजतात. पुस्तक खुप मोठे नाही तर 96 पानी आहे.तसेच प्रत्येक गझल स्वतंत्र्य पानावर असून एक गझल सुमारे एक तृतीयांश पानावर छापलेली आहेत.त्यामुळे पुस्तक एका दिवसात सहजतेने वाचूनहोते.सूट्टीच्या दिवशी एका दिवसात किंवा रोज रात्री झोपताना दहा पंधरा मिनीटे पुस्तक वाचल्यास आठवड्याभरात पुस्तक सहजतेने वाचून होते‌.गझल हा काव्यप्रकार समजून घेण्यासाठी हे पुस्तक आपणास खुप उपयोगी पडते,मग वाचणार ना हे पुस्तक.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

काश्मिरी पंडितांची सखोल माहिती देणारे पुस्तक,' काश्मीर आणि काश्मिरी पंडित'


काश्मिरी पंडित भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय, त्यांचे काश्मीर खोऱ्यातील विस्थापन आणि आणि पुन्हा स्थापनेचे प्रयत्न याविषयी अनेक माध्यमात अनेक व्यक्तींकडून वारंवार बोलण्यात आलेले आहे. मात्र तरी देखील वारंवार चर्चा होणारा विषय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरमधून 370 कलम हटवल्यावर तर या विषयावर सातत्याने  चर्चा होऊ लागल्या. या चर्चांमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे योग्य पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला सर्व विषय काही प्रमाणात माहिती असणे आवश्यक. शिक्षण तज्ञांच्या मते कोणताही विषय मातृभाषेत समजल्यास अधिक उत्तम ठरते.  आपल्या मराठी भाषिकांच्या सुदैवाने  नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव सुद्धा नसलेल्या घोटी  या गावातील मधुश्री प्रकाशन आपली ही अडचण दूर करते. मधुश्री प्रकाशनाच्यातर्फे कश्मीर अँड कश्मीरी पंडित  या  मूळच्या इंग्रजी भाषेतील   पुस्तकाचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे या अनुवादित पुस्तकांमळे आपणास काश्मिरी पंडित हा विषय सहजतेने आणि सखोलतेने समजतो. नाशिक मधील महत्वाची सांस्कृतिक संस्था असलेल्या सावनाच्या  सहकार्याने मी हे पुस्तक नुकतेच वाचले. 
मुळातील इंग्रजी पुस्तक अशोक कुमार पांडेय यांनी लिहलेले असून त्याचा मराठी अनुवाद चंद्रकांत भोंजाळ यांनी केला आहे. मूळ लेखकाने काश्मीरमधील लोकांना  तसेच काश्मीरमधील समस्येविषयी माहिती असणाऱ्या लोकांना भेटून तसेच संशोधनाचा विचार करता प्राथमिक स्त्रोत आणि द्वितीय स्त्रोत म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल असा संसाधनांचा उपयोग करत पुस्तक लिहिले आहे पुस्तकाच्या शेवटी जवळपास सहा पानांची संदर्भसूची जोडण्यात आलेली आहे त्यामुळे पुस्तक किती  प्रयत्नपूर्वक लिहिले आहे तसेच पुस्तक किती माहिती पूर्ण आहे हे पुस्तक न वाचता सहजतेने समजून येते.
      440 पानाचा या पुस्तकात 11 प्रकरणाद्वारे आपणास काश्मिरी पंडित यांची माहिती देण्यात आली आहे. काश्मीरमध्ये लोकवस्तीची सुरुवात कोणत्या पद्धतीने झाली काश्मीर विषयी विविध ठिकाणी मुख्यत: आपल्या पुराणांमध्ये आणि इस्लामी संस्कृतीत काय काय सांगण्यात आले आहे याविषयी पहिल्या प्रकरणात सांगितले आहे तर दुसरे प्रकरण काश्मीरमध्ये इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून ते इस्लामी राजवटीच्या पर्यंत काश्मीरमध्ये कोण कोणते हिंदू राजे होऊन गेले त्यांची राजवट कशी होती?  या काळात काश्मीरमधील ब्राह्मण वर्ग कोणत्या स्थितीत जगत होता ? याविषयी आपणास सांगते. काश्मीर मध्ये इस्लामी राजवट कोणत्या पद्धतीने रुजली काश्मीरमध्ये इस्लामचा प्रसार प्रचार कोणत्या पद्धतीने झाला याविषयीची माहिती  तिसऱ्या प्रकरणाचे वाचन केले असता आपणास मिळते साधारणतः 11 व्या शतकापासून ते 18 व्या शतकात पंजाब मध्ये रणजीत सिंह यांचे साम्राज्य निर्माण होण्यापर्यंतची माहिती या तिसऱ्या प्रकरणात देण्यात आलेली आहे. चौथ्या प्रकरणात आपणास रणजितसिंह यांच्या पराभव होऊन काश्मीर मध्ये डोंगरी राजववस्था कशी प्रस्थापित झाली. डोंगरी राजवटीचा मध्याच्या शेवटचा  काळात म्हणजेच 1935 पर्यंत  काश्मीर पंडितांची स्थिती कशी होती. या कालखंडात काश्मिरी समाजजीवन  कसे कसे आधुनिक होत गेले. काश्मिरी समाज जीवनात सामाजिक सुधारणासुधारणा कसा होत गेल्या याविषयी लेखन आपल्याला माहिती करून देतो.तर पाचव्या प्रकरणात डोंगरी राजवटीच्या मधल्या कालखंडाचा शेवटचा अर्थात 1931 ते 1935 यादरम्यान काश्मीरमध्ये  राजकीय चळवळी कोणत्या पद्धतीने सुरू झाल्या,? त्याचा काश्मिरी पंडितांवर काय परिणाम झाला या  विषय भाष्य करण्यात आले आहे सहाव्या प्रकरणात पाचव्या प्रकरणातील घडामोडी अधिक सविस्तर पद्धतीने सांगण्यात येऊन त्यांना 1947 पर्यंत कोणते वळण मिळाले याविषयी आपणास लेखकाने अवगत केले आहे
     पहिल्या सहा पहिल्या सहा प्रकरणांमध्ये लेखकाने 50% पाने अर्थात 217 पाने खर्ची घातली आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपणास  काश्मिरी पंडित  हा वर्ग कोणत्या प्रकारे उदस आला. काश्मीरमधील हिंदू ब्राह्मणांना काश्मिरी पंडित ही संज्ञा का मिळाली ? कोणत्या राजवटीत काश्मीरमधील हिंदू ब्राह्मणांना काश्मीरी पंडित ही संज्ञा मिळाली काश्मिरी पंडित सत्तेचा प्रमुख स्थानी कसे आले. प्रशासनातील आपल्या स्थानाचा उपयोग करत कश्मीरी पंडितांनी आणि त्यावेळी काश्मीरचे प्रमुख असलेल्या राजांनी बहुसंख्य मुस्लिमांचे कसे शोषण केले. काश्मीर संस्थान कसे कसे क्षेत्रफळाने मोठे मोठे होत गेले. पंडित नेहरूंच्या घराण्यासारखी काश्मिरी पंडित घराणी कोणत्या स्थितीत
आणि कोणत्या कारणासाठी, तसेच कोणत्या कालखंडात काश्मीरचा बाहेर येऊन सध्याचा उत्तर प्रदेश आणि लगतच्या प्रदेशात आली. काश्मीरमध्ये सामाजिक सुधारणा कोणी सुरू केल्या ब्रिटिश राजवटीत चा आणि भारतातील इतर राज्यात होणाऱ्या घडामोडी यांच्या काश्मीरमध्ये काय परिणाम झाला ब्रिटिश राजवट आणि आणि काश्मीरची डोंगरी घराण्याची राजेशाही आहे यांचे आपसातील संबंध कसे होते? ब्रिटिशांमुळे काश्मिरी समाजात काय काय बदल झाले? काश्मीरचे भारतात पूर्णपणे एकत्रिकरण करण्यात  मोठ्या प्रमाणात अडथळा ठरलेले भारतीय संविधानातील आता रद्द पदाबद्दल करण्यात आलेले 35a हे कलम मुळात 1935 ते 1947 मधील काश्मीरमध्ये राजकीय बदलांमध्ये कोणत्या पद्धतीने समाविष्ट झाले. याविषयी लेखक आपणास माहिती देतो.
    फाळणी परिवर्तन आणि दुर्भाग्य असे शिर्षक असलेल्या २३पानाच्या सातव्या प्रकरणातील दोन अडीच पानाचा अपवाद वगळता संपुर्ण प्रकरण काश्मीरचे भारतातील विलीनीकरणाबाबत माहिती देते‌ काश्मीरी पंडीत या पुस्तकाचा मुख्य विषय असलेल्या विषयी या प्रकरणात अल्पसंख्यांक असलेला, सत्ताधिकांशी धर्माद्धारे नाते असलेला आणि तो पर्यत प्रशासनात महत्तवाची भुमिका असलेला कश्मिरी पंडीत हा वर्ग आता कसा सत्तेपासुन दूर झाला त्याचा राजाश्रय कसा संपला? काश्मीरमध्ये बहुसंख्य असलेला मुस्लिम बांधव कशाप्रकारे सत्तेच्या जवळ आला. डोंगरा राजघराणे हे राजपूत पंजाबी होते एका अर्थाने परकीय होते या परकीय घराण्याची सत्ता संपल्यावर काश्मीरी पंडीतांना सर्वसाधरण काय वाटले? या काश्मीरी पंडीतांच्या बाबी सातव्या प्रकरणात सांगितल्या आहेत.
     आठव्या प्रकरणाचे नाव, 'नवी व्यवस्था जून्या अडचणी' हे आहे ज्यात 1949 ते 1982 या काळात शेख अब्दूला यांनी जम्मू काश्मिरमध्ये राबवलेल्या जमिन सुधारणा कायद्यामुळे  प्रदेशात झालेले सामाजिक बदल ,या बदलांमुळे काश्मिरी पंडीतांमध्ये निर्माण झालेला असंतोष, त्यातून निर्माण झालेले आंदोलने, 370 कलमाबाबत जम्मू आणि काश्मीर या दोन्ही प्रदेशात असलेली भिन्न मते, त्यामागची पार्श्वभूमी, या काळात 370 या कलमांमध्ये करण्यात आलेले बदल, त्यामागची पार्श्वभुमी,झालेल्या निवडणूका, शेख अब्दूला यांची अटक आणि सुटका, झालेले जातीय दंगे,त्या दंग्याबाबतची काश्मीरी पंडीतांची मते,तसेच देशभरात या दंग्याविषयीचे मत, देशभरातील मतामागची कारणमिंमासा,या काळात बदलत गेलेले प्रशासनातील काश्मीरी पंडीत आणि मुसलमानांचे प्रमाण, केंद्र सरकारचे या काळातील काश्मीरमधील धोरण,केंद्रात काश्मीरविषयक असलेली नेहरु आणि  पटेल यांची परस्पराच्या पुर्णत: भिन्न असणारी मते, विविध राजकीय पक्षांचा जम्मू काश्मीरमध्ये झालेला उदय, जनसंघाच्या भुमिकेमागची पाश्वभुमी अस्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आलेली आहे. 
  नववे प्रकरण पुर्णपणे 1982ते 1987 या दरम्यान इंदिरा गांधी ,राजीव गांधी  या दोन पंतप्रधान आणि त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री फारुक अब्दूला यांनी केलेल्या राजकीय चूका, विधानसभेच्या निवडणूकीत  गांधी घराणे आणि फारुक यांनी केलेले गैरप्रकार, ते उघडकीस आल्याने समाजात केंद्र सरकारविषयी निर्माण झालेला असंतोष
धार्मिक पक्षांनी आंदोलने चूकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे संपुर्ण काश्मीरी समाजात गेलेला चूकीचा संदेश,  जम्मू काश्मीरमध्ये या दरम्यानचा काळात उद्भवलेला युवावर्गाच्या बेकारीचा प्रश्न हातळण्यात आलेले अपयश, त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या असंतोषाला पाकिस्तानकडून देण्यात फोडणी,1984 ते पुढील दोन अडीच वर्षात पंजाबमधील खलिस्तान दहशतवाद्यांनी जम्मुत घेतलेला आश्रय, अफगाणिस्तानमधून सेव्हियत रशियाने माघार घेणे,या सारख्या काही जागतिक घडामोडींचा काश्मीरमधील तरुणांनी घेतलेला अर्थ आणि या सर्वांचा एकत्रीत परीणाम म्हणून 1989च्या सुमारास दहशतवादाचा जन्म या मुद्द्यांना स्पर्श करते‌
     पुस्तकाचे नाव बघितल्यावर ज्या गोष्टीविषयी वाचायला लोक पुस्तक उचलतील असा भाग अर्थात काश्मीर खोऱ्यातून काश्मीरी पंडीतांचे पलायन या अतिशय संवेदनशील मुद्यावर लेखक पुस्तकाच्या अखेरच्या दोन प्रकरणात माहिती देतो.त्यातील शेवटून दुसऱ्या अर्थात दहाव्या प्रकरणात काश्मीर खोऱ्यात अतिरेकी कारवाया त्याच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना अर्थात 1989 ते 1996या काळात झालेल्या राजकीय हत्या, माध्यमात कार्यरत व्यक्तींच्या हत्या,काश्मीरी पंडीतांच्या हत्या, त्यांचे पलायन, अतिरेक्याकडून करण्यात आलेले विविध व्यक्तींचे अपहरण अतिरेक्यांनी सोडवलेले तुरूंगातील त्यांचे सहकारी पाकव्यात काश्मीर मधून काश्मीर मध्ये होणारा शस्त्र पुरवठा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणारे अतिरेक्यांचे प्रशिक्षण, या प्रशिक्षणाविषयी स्थानिक तरूणांना असणारे आकर्षण,ते रोखण्यात अपयश आलेले राज्य सरकार, त्यावेळच्या व्ही पी सिंग सरकारचे गृहमंत्री मुफ्ती यांचा काश्मीरी राजकारणाविषयीचा दृष्टिकोन, मुफ्ती यांचा त्यांचे राज्यांतर्गत विरोधक फारुक अद्बूला यांच्या विरोधाचे राजकारण,काश्मीरी पंडिताच्या पलायनाच्या वेळी राज्याचे राज्यपाल असणाऱ्या जगमोहनसिंग यांची भुमिका, किती पंडीतांनी पलायन केले याबाबत सांगण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आकडेवारीतील खरेपणा, अनुपम खेर सारख्या मुळच्या काश्मीरी पंडित असलेल्या मात्र व्यवसायानिमित्त खुप आधीच काश्मीर सोडलेल्या व्यक्तींचा याबाबतचा दृष्टिकोन, पंडितांच्या हत्येबाबतची आकडेवारी, यावेळी पंडितांना आलेले काही चांगले आणि वाईट अनुभव, यांची माहिती मिळते. भिती, राग, निराशा आणि काश्मीरी पंडीतांचे पलायन असे शिर्षक असलेल्या या 49 पानी प्रकरणात आधीच्या प्रकरणांप्रमाणेच लेखकाच्या पुस्तक लेखनासाठी केलेले संशोधनातील वैयक्तिक अनुभवांची जोड देण्यात आली आहे.
    शेवटच्या प्रकरणात 50 पानामध्ये जे काश्मीरी पंडित अजूनही काश्मीर खोऱ्यात रहात आहेत,त्यांच्या मुलाखती लेखकाने घेतलेल्या आहेत,मोठ्या संख्येने पंडीतांनी खोरे सोडले तरी त्यांनी का खोरे सोडले नाही याची कारणे या मुलाखतीतून आपणास समजतात.काश्मीरमध्ये असलेली मंदिरे तोडल्याची संख्या वेगवेगळी सांगितली जाते,या मागची सत्यता काय आहे.तसेच काश्मीरमध्ये पुन्हा पंडित वसवण्यात काय अडचणी आहेत? पंडीतांच्या ज्या कॉलनी जम्मूत वसवण्यात आल्या,त्याची स्थिती काय आहे.तसेच पंडितांचे काश्मीरमध्ये पुन्हा पुनर्वसन करण्याबाबत राजकारण कसे खेळले जात आहे.हे  सांगण्यात आले आहे.
काश्मीरच्या समस्येबाबत बोलताना सातत्याने ज्या समाज घटकाचा मुद्दा चर्चेला जातो त्याची विस्तृत सविस्तर माहिती होण्यासाठी पुस्तक किमान एकदा वाचायलाच हवे.


 

 

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

चरित्र भारताच्या अद्वितीय पंतप्रधानांचे ,नरसिंहालोकन'

         
 पी व्ही. नरसिंहराव.  स्वातंत्र्योत्तर भारताचा वाटचालीचा आढावा आपण जर पंतप्रधानानुसार घेण्याचे ठरवल्यास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे नाव . स्वतः पंतप्रधान होण्याच्या आधीचे सरकार बहुमत नसल्यामुळे कोसळले  असताना, स्वतःचे अल्पमतातील सरकार देशावर मोठ्या  प्रमाणात बदल होतील  असा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आधीपेक्षा पूर्णतः विरुद्ध  निर्णय  घेऊन तो अमलात आणणे तसेच देशातील धार्मिक विद्वेष कडेलोटाच्या स्थितीवर जाऊन पोहोचला असताना ती स्थिती नियंत्रणात आणणे य सारखे  महत्वाचे निर्णय घेत   पूर्ण  पाच चालवण्याचा भीम पराक्रम करणारे पंप्रधान म्हणून आज आपण त्यांना ओळखतो . पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे नेहरू गांधी परिवार सोडून झालेले पहिले पंतप्रधान होय.त्य्नाच्याच कार्यकाळात आपण मुक्त अर्थव्यवसंस्थेचे धोरण स्वीकारले. भारताच्या इतिहासातील काळा अध्याय असलेला बाबरी मशिदीचे पडणे मुबंईत बॉम्बस्फोट होणे या घटना देखील त्यांच्याच कार्यकाळातील इतकी सारी आव्हाने असताना त्यांना स्वतःच्या काँग्रेस पक्षातील नेत्याच्या पाडापाडीच्या राजकारणाला देखील सामोरे जावे लागले  १० भारतीय भाषा आणि इंग्रजी आणि स्पॅनिश उत्तम प्रकारे बोलू शकणाऱ्या या पंतप्रधानचे विनय सीतापती यांनी लिहलेले आणि अवधूत डोंगरे यांनी मराठीत अनुवाद केलेले चरित्र मी नुकतेच नाशिकमधील मोठी सांस्कृतिक संस्था सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने वाचले 
        संदर्भ शब्दसूचीचा अपवाद वगळता २८६ पाने असलेल्या  या पुस्तकात  १५ प्रकरणाद्वारे लेखकाने पी व्ही नरसिंहराव यांचे चरित्र आपल्यासमोर मांडले आहे . पुस्तकाचे पहिले प्रकरण सध्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा होऊ शकेल अश्या काँग्रेसने नरसिंहराव यांच्या कायमद्वेषच केला का ? या मुद्याभोवती गुंफलेले आहे अर्धवट जळलेले पथिक असे शीर्षक असलेल्या या प्रकरणात नरसिंहराव यांचे निधन झाल्यावर त्यांचे अत्यंसंस्कार नवी
दिल्लीत का झाले नाहीत ? काँग्रेसकडून त्यांच्या कुटूंबियांच्या इच्छा कोणत्या प्रकारे अव्हेरण्यात आली. हे सांगण्यात आले आहे यानंतरच्या दुसऱ्या ते चवथ्या प्रकरणाप्रर्यंत त्याचे राष्ट्रीय राजकारणात प्रवेश कारण्यापर्यंतचे जीवनप्रवास सांगण्यात आला आहे ज्यामध्ये त्यांनी हैदराबादच्या निझामाविरोधात घेतलेला सहभाग त्यांनी भूषवलेले अंधरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद मुख्यामंत्री पदावरून झालेली त्यांची गच्छन्ति त्या नंतर त्यांना भोगवायला लागलेला राजकीय संन्यास याविषयी सांगितले आहे 
           पाचव्या प्रकरणापासून चौदाव्या प्रकरणापर्यंत त्यांचे राष्ट्रीय राजकारण उलगडण्यात आले आहे तर शेवटच्या पंधराव्या प्रकरणात त्यांचा राजकीय  जीवनाचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला आहे  , पाचव्या प्रकारांपासून चौदाव्या प्रकरणापर्यंत पी व्ही नरसिंहराव यांच्या राष्ट्रीय जीवनाचा आढावा घेताना त्यांचे आणि गांधी परिवाराशी विशेषतः सोनिया गांधी यांच्याशी असणारे संबंध , त्यांच्या गळ्यात मारलेले  काँग्रेसचे अधयाक्षपद ते पंतप्रधानपदी येण्याच्या आधी त्यांनी भूषवलेली विविधे केन्द्रीय मंत्रीपदे  त्यांना एका मठाकडून आलेली अध्यक्ष होण्याची देण्यात आलेली संधी ,पंतप्रधानपदी आल्यावर त्यांनी जागतिक परिस्थितीचे भान राखत भारताच्या परराष्ट्र  धोरणात केलेला बदल ,भारताला अण्वस्त्रक्षम
करण्यासाठी त्यांनी उचललेली  पाऊले  तसेच लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे अयोद्धा प्रकरण , मुक्त अर्थव्यवस्था  यांची त्यांनी केलेली सोडवणूक, त्यांनी केलेले प्रशासनातील बदल सांगितले आहेत शेवटच्या सिंह कोल्हा मूषक असं शीर्षक असेल्या पंधराव्या प्रकरणात त्यांनी स्वनुभावातून तयार केलेली राजकीय नीतीवर लेखकाने प्रकाश टाकला आहे 
          सध्या राजकीय नेते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांवर आरोप करतात आता जिवंत नसलेल्या व्यक्तीविषयी विविध दावे प्रतिदावे करतातत्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो तो गोंधळ न होण्यस्साठी वस्तुस्थिती आपणस माहिती असणे आवश्यक ठरते . हि वास्थुस्थिती माहिती करून घेण्याच्या उत्तम उपाय म्हणजे त्यांचे चरित्र आत्मचरित्र वाचून घेणे आणि त्यासासाठीच हे पुस्तक किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे  

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...