मुळातील लंडन येथील Reaktion Publishication चे The indus: Lost civilization नावाच्या 2015 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे.नाशिकमधील सर्वात जूने वाचानालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीतून मी हे पुस्तक नुकतेच वाचले .
या पुस्तकात 240 पानांमधून 12प्रकरणांमधून या संस्कृतीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.ज्यात या संस्कृतीच्या अधिकृत शोध लागण्याचे मानण्यात येते त्या 1923 चा रेल्वेमार्ग तयार करण्याचा घटनेच्या आधीपासून या ठिकाणाबाबतची विविध तज्ञ्ज व्यक्तींची मते काय होती.मोहोंनजारो आणि या संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या अन्य ठिकाणी आतपर्यतच्या उत्खनातून काय सापडले आहे.? या संस्कृतीचे समाज जीवन, व्यापारी जीवन कसे होते? या संस्कृतीच्या धार्मिक कल्पना काय असू शकतात.?सिंधु सरस्वती संस्कृतीचा बाहेरील जगाशी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून संपर्क होता, ही संस्कृती कोणत्या कारणाने नष्ट झाली? या संस्कृतीचाविकास कोणत्या कालखंडात आणि कस्या प्रकारे झाला? तीच्या लिपीच्या कितपत उलगडा झाला आहे,?उलगडा करण्यातील अडचणी आणि सुगम बाजू कोणत्या ? या सांस्कृतिक विविध बाबींचा हिंदू धर्मातील बाबींवर कोणत्या प्रकारे प्रभाव आहे.?सिंधू संस्कृतीने आपल्यासाठी कोणता वारसा ठेवला आहे याचा प्रामुख्याने समावेश करता येईल.
मी वाचले तो मुळच्या इंग्रजी पुस्तकाचा शीतल भांगरे यांनी केलेला मराठीतील अनुवाद होता.मी मराठीत अनुवादीत झालेली काही पुस्तके वाचली आहेत,त्या अनुभवावर सांगतोय,या पुस्तकाची भाषा खुपशी बोजड, कृत्रिम वाटते. पुस्तक माहितीपुर्ण असल्याने देखील भाषा अशी असू शकते मात्र या भाषेमुळे पुस्तक वाचताना काहीसे कंटाळवाणे होते.वाचताना वाचकाला खिळवून ठेवण्यात पुस्तक काहीसे कमी पडते असे माझे निरीक्षण आहे.मात्र
पुस्तकात ठिक ठिकाणी गरजेनुसार सिंधू सरस्वती संस्कृतीतील अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यामुळे विषय समजायला मदत होते.अन्य अनुवादीत पुस्तकांप्रमाणे अनुवादकाचे मनोगत ही गोष्ट या पुस्तकात आढळत नाही. पुस्तकाच्या सुरवातील देण्यात आलेल्या कालानुक्रमामुळे सिंधू सरस्वती संस्कृतीचा विकास कधी झाला ,तिचा शोध कधी लागला ,या दरम्यान त्या प्रदेशात मोठ्या कोणत्या घटना घडल्या हे समजते.
पुस्तकात ठिक ठिकाणी गरजेनुसार सिंधू सरस्वती संस्कृतीतील अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यामुळे विषय समजायला मदत होते.अन्य अनुवादीत पुस्तकांप्रमाणे अनुवादकाचे मनोगत ही गोष्ट या पुस्तकात आढळत नाही. पुस्तकाच्या सुरवातील देण्यात आलेल्या कालानुक्रमामुळे सिंधू सरस्वती संस्कृतीचा विकास कधी झाला ,तिचा शोध कधी लागला ,या दरम्यान त्या प्रदेशात मोठ्या कोणत्या घटना घडल्या हे समजते.
सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये सांडपाण्याची भुमिगत व्यवस्था उत्तम होती, तसेच मोठे रुंद रस्ते असल्याचे पुरावे सापडले आहेत.दुर्देवाने आज याच प्रदेशात मोडणाऱ्या आपल्या भारतात याची उणीव आहे.या उणीवांवर मात करायची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्यावरुन जाहिरपणे सांगावे लागल्याचे आपणास आठवत असेलचं, जे आपणासाठी भुषणावह नाहीये.तरी हा कलंक दुर होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नामध्ये आपल्याला या प्राचीन वारस्याची मोठी मदत होवू शकते मात्र त्यासाठी आपल्याला त्याची माहिती असणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा