संदर्भ शब्दसूचीचा अपवाद वगळता २८६ पाने असलेल्या या पुस्तकात १५ प्रकरणाद्वारे लेखकाने पी व्ही नरसिंहराव यांचे चरित्र आपल्यासमोर मांडले आहे . पुस्तकाचे पहिले प्रकरण सध्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा होऊ शकेल अश्या काँग्रेसने नरसिंहराव यांच्या कायमद्वेषच केला का ? या मुद्याभोवती गुंफलेले आहे अर्धवट जळलेले पथिक असे शीर्षक असलेल्या या प्रकरणात नरसिंहराव यांचे निधन झाल्यावर त्यांचे अत्यंसंस्कार नवीदिल्लीत का झाले नाहीत ? काँग्रेसकडून त्यांच्या कुटूंबियांच्या इच्छा कोणत्या प्रकारे अव्हेरण्यात आली. हे सांगण्यात आले आहे यानंतरच्या दुसऱ्या ते चवथ्या प्रकरणाप्रर्यंत त्याचे राष्ट्रीय राजकारणात प्रवेश कारण्यापर्यंतचे जीवनप्रवास सांगण्यात आला आहे ज्यामध्ये त्यांनी हैदराबादच्या निझामाविरोधात घेतलेला सहभाग त्यांनी भूषवलेले अंधरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद मुख्यामंत्री पदावरून झालेली त्यांची गच्छन्ति त्या नंतर त्यांना भोगवायला लागलेला राजकीय संन्यास याविषयी सांगितले आहे
पाचव्या प्रकरणापासून चौदाव्या प्रकरणापर्यंत त्यांचे राष्ट्रीय राजकारण उलगडण्यात आले आहे तर शेवटच्या पंधराव्या प्रकरणात त्यांचा राजकीय जीवनाचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला आहे , पाचव्या प्रकारांपासून चौदाव्या प्रकरणापर्यंत पी व्ही नरसिंहराव यांच्या राष्ट्रीय जीवनाचा आढावा घेताना त्यांचे आणि गांधी परिवाराशी विशेषतः सोनिया गांधी यांच्याशी असणारे संबंध , त्यांच्या गळ्यात मारलेले काँग्रेसचे अधयाक्षपद ते पंतप्रधानपदी येण्याच्या आधी त्यांनी भूषवलेली विविधे केन्द्रीय मंत्रीपदे त्यांना एका मठाकडून आलेली अध्यक्ष होण्याची देण्यात आलेली संधी ,पंतप्रधानपदी आल्यावर त्यांनी जागतिक परिस्थितीचे भान राखत भारताच्या परराष्ट्र धोरणात केलेला बदल ,भारताला अण्वस्त्रक्षम करण्यासाठी त्यांनी उचललेली पाऊले तसेच लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे अयोद्धा प्रकरण , मुक्त अर्थव्यवस्था यांची त्यांनी केलेली सोडवणूक, त्यांनी केलेले प्रशासनातील बदल सांगितले आहेत शेवटच्या सिंह कोल्हा मूषक असं शीर्षक असेल्या पंधराव्या प्रकरणात त्यांनी स्वनुभावातून तयार केलेली राजकीय नीतीवर लेखकाने प्रकाश टाकला आहे
सध्या राजकीय नेते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांवर आरोप करतात आता जिवंत नसलेल्या व्यक्तीविषयी विविध दावे प्रतिदावे करतातत्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो तो गोंधळ न होण्यस्साठी वस्तुस्थिती आपणस माहिती असणे आवश्यक ठरते . हि वास्थुस्थिती माहिती करून घेण्याच्या उत्तम उपाय म्हणजे त्यांचे चरित्र आत्मचरित्र वाचून घेणे आणि त्यासासाठीच हे पुस्तक किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा