नाशिक, रंगपंचमीच्या दिवशी रहाडामध्ये उतरुन रंग खेळण्याची अनोखी प्रथा असलेले शहर, कुरमुऱ्यांचा तिखट चिवडा, मिसळ आणि वाइनसाठी प्रसिद्ध असलेले शहर,आदिवासी ,खानदेशी ,आणि पश्चिम महाराष्ट्राच्या संगमावर वसलेले शहर म्हणजे नाशिक., दक्षीण काशी असी ओळख असलेले तांब्याच्या वैशिष्टपुर्ण भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे नाशिक.या नाशिकला फार पुर्वीपासूनचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आतापर्यतच्या वाटचालीत,इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अनेकांची जन्मभुमी कर्मभुमी नाशिक शहर आहे.या नाशिक शहरालगत असलेल्या लेण्यांना मोठा वैभवशाली इतिहास आहे. या सर्व खजिन्याची माहिती करुन घेयची असल्यास महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत कार्यरत असलेल्या रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या 'नाशिक डायरी या पुस्तकाखेरीज दुसरा उत्तम पर्याय तो कोणता? नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या संग्राहालयात असलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले.रमेश पडवळ सरांनी नाशिकवर हे पुस्तक धरुन ५पुस्तके लिहली आहेत.त्यापैकी मी वाचलेले हे दुसरे पुस्तक. मी या आधी त्यांचे तपोभूमी नाशिक हे पुस्तक वाचले होते.ते या पुस्तकाप्रमाणेच माहितीपुर्ण होते. त्या पुस्तकाविषयी ज्यांना जाणून घेयचे असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असलेल्या लिंकवर क्लिक करावे.
272 पानांच्या या पुस्तकात लेखकाने 24प्रकरणाद्वारे प्राचीन युगातील नाशिकच्या परीसरात राज्य करणारे सातवाहन राज घराणे, नाशिकमधील कर्तुत्वान महिला, नाशिकमधील शिक्षणक्षेत्र, नाशिकमध्ये झालेला ख्रिस्ती धर्माचा प्रसार,रामकुंड परीसरात असलेल्या समाधी, नाशिकमधील विविध शाहीर, स्वातंत्र्यवीर सावरकर, रामदास स्वामी यांनी टाकळी परीसरात केलेले केलेले कार्य, नाशिक शहरात असलेल्या पांडवलेणी आणि चामरलेणी, नाशिक परीसरात जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पेशवेकालीन सरदार या सारख्या घटकांची माहिती दिलेली आहे. तसेच नाशिकचा विविध ग्रंथात आलेला उल्लेख,नाशिक परीसरातील महानुभाव पंथाची धार्मिक स्थळे, तसेच ब्रिटीश काळातील नाशिकची छायाचित्रे आणि चित्र काढणारे छायाचित्रकार आणि चित्रकार नाशिक परीसरातील मारुतीची मंदिरे, नाशिक शहरातील जूनी पाणी पुरवठ्याची व्यवस्था कशी होती या विषयीची माहिती आपणास या पुस्तकातून समजते.
पडवळ सरांनी कोव्हिड 19 च्या साथरोगात लागू करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात नाशिककरांचे धैर्य अबाधित राहावे यासाठी फेसबुकवर लिहलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे सदर पुस्तक होय.पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे.पुस्तक हे नाशिकविषयी माहिती देणारे असून देखील लिहतांना वापरलेल्या पुस्तक अत्यंत वाचणीय झाले आहे,कंटाळवाणे वाटत नाही.विषय कितीही कठीण असला तरी तो सहजसोप्या दुसऱ्याला सहजतेने समजेल या पद्धतीने मांडू शकतो तो उत्कृष्ट शिक्षक असतो असे म्हणतात या कसोटीचा विचार करता हे पुस्तक या कसोटीवर 100टक्के खरे ठरते.पुस्तक माहिती देणारे असले तरी पुस्तकाची गोष्टीवेल्हाळ स्वरूपाची भाषा हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ठ म्हणता येईल.
आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहराला काहीना काही इतिहास आहे.जो शालेय अभ्यासक्रमात शिकवला जातोच असं नाही.मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या सध्याचा सामाजिक ,राजकीय जीवनावर या इतिहासाचा मोठा प्रभाव असतो.आपणाला सध्या भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे मुळ या इतिहासात दडलेले असते.त्यामुळे आपणास तो माहिती असणे आवश्यक ठरते.याला नासिक डायरी सारखी पुस्तके मोलाची मदत करतात..नाशिक सारख्या मोठ्या शहराछा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव असतो त्यामुळे नाशिकचा इतिहास नाशिककरांखेरीज अन्य लोकांनी देखील वाचणे अत्यावश्यक आहे ज्यात हे पुस्तक मदत करते, मग वाचणार ना हे पुस्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा