पुस्तक मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सखोल आणि वास्तववादी वेध घेणारे महत्त्वपूर्ण साहित्य म्हणता येईल “डोंगरी ते दुबई” या गाजलेल्या पुस्तकाचा हा पुढचा भाग आहे ज्यात दाऊद इब्राहिम सोडून मुंबईतील अन्य गुन्हेगारांच्या जसेर छोटा राजन टोळी , नाईक टोळी, अरुण गवळी टोळी या सारख्या १९९० नंतरच्या काळातील मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचा मागोवा घेण्यात आला आहे या पुस्तकात या कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांच्या आयुष्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या बालपणापासून ते गुन्हेगारी जगतातील प्रवेश आणि पुढील वाटचाल हा प्रवास लेखक पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी अत्यंत तपशीलवार
आणिवास्तवदर्शी पद्धतीने मांडला आहे. साध्या कुटुंबातील तरुण कशा परिस्थितीत गुन्हेगारीकडे वळतात, यामागील सामाजिक, आर्थिक आणि मानसिक करणे देखील आपल्याला या पुस्तकाच्या वाचनातून समाजात
या पुस्तकाचे एक प्रमुख वैशिष्ट म्हणजे पत्रकार झैदी यांची संशोधनाधारित मांडणी. पोलीस नोंदी, प्रत्यक्ष मुलाखती आणि विविध ऐतिहासिक संदर्भ यांच्या आधारे त्यांनी घटनांची माहिती दिली आहे . त्यामुळे हे पुस्तक केवळ गुन्हेगारी कथा न राहता, त्या मागील यंत्रणा, सत्तासंघर्ष आणि वास्तव परिस्थिती यांचेही खरे चित्र आपल्या समोर मांडते .
पुस्तकात मुंबई पोलिसांच्या ‘एनकाऊंटर स्पेशालिस्ट’ अधिकाऱ्यांचाही उल्लेख आहे. गुन्हेगार आणि पोलिस यांच्यातील संघर्ष, त्यातील धाडस, ताणतणाव आणि निर्णयप्रक्रिया यांचे प्रभावी चित्रण वाचकांना गुंतवून ठेवते. यामुळे पुस्तकाला थरारक आणि चित्रपटासारखी गती मिळते . याशिवाय, आधीच्या परिच्छेदात उल्लेख केला त्या प्रमाणे गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईत झालेले सामाजिक बदल,ज्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने उदयास आलेली नवी गुन्हेगारी आणि या सर्व घटकातील गुंतागुंतीचे नातेही उलगडते. गुन्हेगारी ही केवळ वैयक्तिक चुकीचा परिणाम नसून, ती परिस्थिती, संधी आणि सामाजिक रचनेशी निगडित असते, हा महत्त्वाचा मुद्दा झैदी यांनी ठळकपणे अधोरेखित केल्याचे पुस्तक वाचनातून अप[नास समजते . एकूणच, “भायखळा ते बँकॉक” हे पुस्तक गुन्हेगारी विश्वाचा इतिहास, मानवी स्वभाव आणि समाजातील बदल यांचा अभ्यास घडवणारे, माहितीपूर्ण आणि अत्यंत वाचनीय असे साहित्य ठरते.
गुन्हेगारीविषक रिपोर्टींग मुळे प्रसिद्ध झालेले पत्रकार एस. हुसेन झैदी यांच्या याशिवाय प्रसिद्ध असलेल्या डोंगरी ते दुबई या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा