लेखाचे विषय

गुरुवार, २३ जुलै, २०२६

साधना’ साप्ताहिक – प्रबोधनाची परंपरा जपणारे मराठी साप्ताहिक


साप्ताहिकांनी फार पूर्वीपासून समाजाचे मनोरंजन करण्यासह त्यांना विविध प्रकारची माहिती देण्यात मोठी भूमिल्का बजावली आहे . रोज प्रसिद्ध होणाऱ्या न्यूजपेपरमधून ज्या गोष्टी वेळेच्या प्रेशरमुळे  येणे अवघड आहे . महिन्याच्या अंतराने दिल्यास खूप उशीर झालेला असू शकतो त्या गोष्टी देण्याचे मोठे काम साप्ताहिकाने  केल्याचे आपणास सहजतेने दिसते .  आपल्या मराठीत अनेक विषयावरची अनके विचारधारणेची साप्ताहिके आली आणि अनेक  कारणाने बंद  देखील  पडली मात्र विविध अडचणींना तोंड देत काही अजून देखील सुरु आहेत .या सुरु असलेल्या साप्तहिकापैकीच एक म्हणजे पुणे शहरातील शनवार पेठ येथून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक साधना 
साधना’ हे मराठीतील एक प्रतिष्ठित साप्ताहिक आहे ज्याची  स्थापना १९४८ साली साने गुरुजी यांच्या प्रेरणेने झाली. समाजातील प्रबोधन, समता, न्याय आणि मानवी मूल्ये यांचा प्रसार करणे हा या साप्ताहिकाचा मूलभूत उद्देश आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी ‘साधना’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजच्या काळात मागे पडलेल्या किंबहुना आज देशाच्या प्रगतीला खीळ बसवणारी विचारधारा अशी ओळख असलेल्या समाजवादी विचार धारणेचे साप्ताहिक अशी ओळख असली तरी साधनाचे महतव अजून देखील कमी झाले नाही मी नियमितपणे नाही मात्र अनेकदा साधना मासिक वाचतो 
‘साधना’ साप्ताहिकात राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, साहित्य, ग्रामीण प्रश्न, मानवाधिकार, स्त्री-पुरुष समानता यांसारख्या विविध विषयांवर सखोल आणि चिकित्सक लेख प्रसिद्ध होतात.  वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, विचारांची मोकळीक आणि सामाजिक बांधिलकी. केवळ बातम्या देण्यापेक्षा विचार प्रवृत्त करणारे लेख हे ‘साधना’चे वैशिष्ट्य आहे असे मला वाटते 
या साप्ताहिकाने अनेक प्रगतिशील विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा इतिहास आहे  समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धा यांविरुद्ध ठाम भूमिका घेणे ही ‘साधना’चीपरंपरा समजण्यात येते त्यामुळे हे साप्ताहिक केवळ माहिती देणारे माध्यम न राहता समाजपरिवर्तनाचे साधन आहे अशी समाजमान्यता अजून देखील टिकून आहे आजच्या आर्टिफिशियल
इंटेलिजियन्सच्या युगातही ‘साधना’ साप्ताहिक आपली वैचारिक परंपरा जपत आधुनिक विषयांवर भाष्य करत आहे. समाजातील जाणीव जागृत ठेवणे आणि विवेकनिष्ठ विचारसरणीला चालना देणे या दृष्टीने ‘साधना’चे योगदान अत्यंत मोलाचे आहे. म्हणूनच मराठी वाचकांसाठी ‘साधना’ हे केवळ साप्ताहिक नसून एक विचारप्रवाह आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताच्या विकासदृष्टीचे समग्र दर्शन घडवणारी मासिके

आपल्याकडे  भारताच्या विकासाबाबत विविध दावे प्रतिदावे सातत्याने करण्यात येतात.आपण ज्या माध्यमातून याबाबत माहिती घेतो आहोत त्या माध्यमाच्या वि...