विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे संस्थापक मा.एकनाथजी रानाडे, यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत अद्वैत प्रकाशनातर्फे प्रकाशित स्वामी विवेकानंद यांचे चरीत्र, प्रबुद्व भारतचे जूने अंक यासारख्या अधिकृत संसाधनातून स्वामी विवेकानंद यांच्या संदेशाचे एकत्रीत संकलन करत पुस्तक प्रसिद्व केले ते म्हणजे रायझींग कॉल टु इंडिया. मुळच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा १९८६साली विवेकानंद केंद्र, मराठीप्रकाशन विभागातर्फे ज्ञान प्रबोधिनी येथील स्वर्णलता भिशीकर यांच्या मदतीने अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला. अत्युत स्फुर्तीदायी, चैतन्याने भारलेले वाचल्यावर रोमारोमात उत्साहाचा संचार होईल असेच या पुस्तकाबाबत म्हणता येईल
१६०पानी हे अनुवादीत पुस्तक ४ भागात विभागले आहे. प्रत्येक भाग पुढे आणखी विभागून प्रकरणात उपविभाजन करण्यात आला आहे. अनुवादीत पुस्तकाची भाषा सहजसोपी जणूकाही हे पुस्तक मराठी भाषेतच लिहले गेले आहे, असी वाटावी असी आहे.त्यामुळे काहीसा अवघड विषय असून देखील चटकन समजतो. संदेश. व्याख्याने, मुलाखती आणि लेख यातील निवडक वेचे आणि काही भाष्ये, काही आवाहने तसेच व्यक्तित्व-विकास अथवा कार्यकर्त्यांचे शिक्षण हे ते चार भाग आहेत.
पहिल्या संदेश या भागात स्वामीजींचे राष्ट्रविषयक विचार हे प्रामुख्याने सांगण्यात आले आहेत. त्यांच्या असंख्य व्याख्यानांमधून, पत्रांमधून आणि लेखांमधून त्यांनी जे विचार मांडले आहेत, त्यांचे हे प्रबंधवजा संकलन आहे. हे विचार जरी विविध भागांतून एकत्रित केलेले असले तरी त्यांची रचना अशी केलेली आहे, की त्यातून स्वामीजींच्या राष्ट्रचिंतनाची सहज सुलभ मनातून असलेली भावना प्रकट होते.
व्याख्याने, मुलाखती आणि लेख यांतील निवडक वेचे या दुसऱ्या भागात पहिल्या भागात नेमके बसू शकणार नाहीत; परंतु स्वामीजींच्या मुख्य संदेशांशी जे अत्यंत निगडित आहेत असे स्फुट महत्वाचे विचार सांगितले आहेत
काही भाष्ये, काही आवाहने या तिसऱ्या भागात स्वामीजींच्या मनात कोणते विचार घोळत होते. त्यांच्या हृदयाची भावना काय होती, भारताविषयीची त्यांची तळमळ काय होगी याचे चित्र उभे करणारे काही वेचे या भागात वाचयला मिळतात. स्वामी विवेकानंद यांच्या स्थिर आणि वस्तुनिष्ठ वैचारिक मांडणीच्या मागे भावनेचे रहस्य काय होते ते या भागात आपल्याला समजते
व्यक्तित्व-विकास अथवा कार्यकर्त्यांचे शिक्षण असे शीर्षक असलेल्या शेवटच्या भागात स्वामीजींचे लेखन समाविष्ट केले आहे. स्वामीजींच्या या लेखनातून आणि वक्तव्यांतून समजते की, ते हिंदु मनाची घडण एका विशिष्ट पद्धतीने व्हावी अशी ते अपेक्षा करीत आहेत. राष्ट्रघडणीच्या कामासाठी आसुलेल्या कार्यकर्त्यांजवळ काही बुद्धिगुण आणि अन्य जीवनावश्यक कौशल्ये असावी असा त्यांचा आग्रह आहे. हे सांगताना मा.एकनाथजींनी या भागाला ४ प्रकरणात विभागले आहे.१. संघटना, २. नेतृत्व ३. गुरुपदाचे दायित्व, ४. यशस्वी जिवनाचे रहस्य असे ते चार भाग आहेत. प्रत्येक भागात विषयानूसार स्वामी विवेकानंद यांचे विचार संकलित केले आहेत.
स्वामी विवेकानंद यांच्या सगळ्या कामाची विचारांची आपल्याला थोडक्यात मात्र एकही मुद्दा न वगळता माहिती हवी असल्यास पुस्तक वाचणे अतिशय आवश्यक आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा