महान व्यक्ती कोणतेही वेगळे काम करत नाहीत तर आपण जे काम करतो तेच काम करतात मात्र आपण करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतात त्यामुळे ते महान होतात असे एक सुप्रसिद्ध इंग्रजी वाचन आहे. हा वेगळेपणा त्यांनी त्यांच्या आयुष्याला एक शिस्त लावून घेतल्यामुळे आलेला असतो आपण सुद्धा आयुष्याला शिस्त लावून घेतल्यास आपण सुद्धा सहजतेने महान म्हणून देऊ शकतो मात्र केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीनुसार सुरुवात करायची तीच काय अडचण.
आता जर आता तुम्हाला वाटले की आपल्याला सुरुवात करायची पण कुठून सुरुवात करायची कोण मार्गदर्शन करेल तर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित दिनचर्या याशिवाय उत्तम पर्याय तो कोणता असेच म्हणावे लागेल मी नुकतेच हे पुस्तक वाचले आहे त्या पुस्तक वाचनातून आलेल्या अनुभवातून हे सांगत आहेत
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त निमित्त साधत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाश विभागातर्फे तीन पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली होती ज्यामध्येअत्यंत सोप्या चटकन आकलन होणाऱ्या भाषेत एकनाथजी रानडे यांचे विचार भाषणे प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यातील पहिले पुस्तक म्हणजे दिनचर्या .
एकनाथजी रानडे यांनी जरी कार्यकर्त्यांना उद्देशून संदेश दिलेला असला तरी तो संदेश खूप महत्त्वाचा आहे सर्वसामान्य व्यक्तींना रोजच्या जगण्यात अत्यंत उपयुक्त पडणाऱ्या अनेक बाबी यामध्ये सहज सोप्या शब्दात सांग उघडून सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे विवेकानंद केंद्राशी माझा काही संबंध नाही असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःचा पायावर धोंडा पाडून घेणे ठरवू शकते आजचा काळात अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या सॉक्स स्किल याचे अत्यंत सोप्या भाषेत केलेले विवेचन म्हणजे हे पुस्तक म्हणता येऊ शकते आणि हे पुस्तक फार मोठे सुद्धा नाहीये जेमतेम चाळीस पानांचे जे एका बैठकीत सहज वाचून होते मात्र यामध्ये सांगितलेल्या बाबी आयुष्य काढता हे नक्की
आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान जीवनात वेळेचे नियोजन अधिकच महत्त्वाचे झाले आहे. मोबाईल, सामाजिक माध्यमे आणि मनोरंजनाच्या विविध साधनांमुळे वेळ कसा निघून जातो, हे अनेकदा लक्षातही येत नाही. अशा परिस्थितीत ‘दिनचर्या’ आपल्याला वेळ कमी नसतो, तर त्याचा योग्य उपयोग करण्याची शिस्त आवश्यक असते, याची जाणीव करून देते.
दिनचर्या या पुस्तकात वेळेचे व्यवस्थापन, काम आणि विश्रांती यांच्यातील समतोल, पैश्याचे व्यवस्थापन, कायम जगाशी जोडलेले कसे रहावे, (सोशल मिडीयद्वारे नव्हे तर ऑफलाईन पद्धतीने ) मनुष्याला वेगवेगळ्या भाषा येणे का आवश्यक आहे? नोटस काढणे, मुद्दे लिहुन घेणे का आवश्यक आहे. यासारख्या अनेक मुद्द्यावर सविस्तर मात्र सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तक उपदेशाचे डोस देणारे न वाटता, मित्रत्वाच्या नात्याने आपुलकीने ज्येष्ठ व्यक्तीने दिलेला सल्ला वाटतो.जो चटकन अंमलात आणावासा वाटतो.
‘दिनचर्या’ हे वाचून बाजूला ठेवण्याचे पुस्तक नाही; तर त्यातील विचार आपल्या जीवनात उतरविण्याचे पुस्तक आहे. माझी दिनचर्या माझ्या ध्येयाला पूरक आहे का? माझा वेळ योग्य ठिकाणी खर्च होतो का? माझ्या वैयक्तिक विकासाचा समाज आणि राष्ट्राच्या विकासाशी संबंध आहे का? अशा प्रश्नांचे आत्मपरीक्षण करण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते.म्हणूनच ‘दिनचर्या’ म्हणजे केवळ वेळेचे वेळापत्रक नव्हे, तर शिस्तबद्ध, ध्येयवादी, सेवाभावी आणि राष्ट्रनिष्ठ जीवनाकडे नेणारा विचारमार्ग आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा