प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः,
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः।
विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः,
प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति॥
मराठीमध्ये याचे भाषांतर करायचे झाल्यास ते पुढीलप्रमाणे होते.
मनुष्याच्या तीन श्रेणी असतात.. कनिष्ठ (नीच) लोक : जे संकटांच्या किंवा अडचणींच्या भीतीने कोणत्याही चांगल्या किंवा ध्येयाच्या कामाची सुरुवातच करत नाहीत. मध्यम लोक : जे कामाची सुरुवात तर करतात, पण वाटेत एखादे संकट किंवा अडचण आली की काम मध्येच सोडून देतात.उत्तम (ध्येयवादी) लोक : जे एकदा ध्येय निश्चित करून काम सुरू करतात, मग वाटेत कितीही संकटे आली आणि कितीही वेळा अपयश आले, तरीही ते आपले ध्येय साध्य केल्याशिवाय थांबत नाहीत आणि काम कधीही सोडून देत नाहीत.
याचा भावार्थ विचारात घेतल्यास आपण पुढील गोष्टी लक्षात घेऊ शकतो.
ध्येयाशिवाय माणसाचे जीवन दिशाहीन होते. ध्येयवादी व्यक्तीला कठीण काळातही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.उत्तम आणि ध्येयवादी माणसे संकटांना घाबरत नाहीत. ती प्रत्येक अडचणीला एक आव्हान मानून त्यावर मात करतात. व्यक्ती आपल्या ध्येयावर ठाम राहते, तीच समाजात आदरणीय ठरते आणि आपले जीवन यशस्वी करते.त्यामुळेच, माणसाने नेहमी ‘उत्तम’ श्रेणीत जाण्यासाठी ध्येयवादी असले पाहिजे.
वरील संस्कृत सुभाषित मधून आपणास ध्येयवादी असणे का आवश्यक आहे हे समजत असले तरी याचा मार्ग आपणास उलगडतो तो विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित 'सेवा समपर्ण' या ग्रंथाच्या च्या माध्यमातून. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे संस्थापक एकनाथजी रानडे यांनी केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचे मराठी भाषांतरं असलेले हा ग्रंथ फक्त केंद्र कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील अनेक विषयावर सहजतेने मार्गदर्शक करतो असे म्हटल्यास आवाज
ठरणार नाही .व्यक्तीने आयुष्यात ध्येय निश्चित का करावे ? आपल्या प्राचीन भारतीय सनातन संस्कृतीचे माहात्म्य नक्की कश्यात आहे ? विवेकानंद केंद स्थापन करण्यामागची एकनाथजी त्यांची प्रेरणा, त्यासाठी त्यांच्याकडे असणारी सुसूत्रबद्ध योजना, विवेकानंद केंद्राची कार्यपद्धती, विवेकानंद केंद्राचे ध्येय , अन्य समविचारी संघटनेबाबत केंद्राची भूमिका यासह कोणत्याही प्रकारची सामाजिक संघटना यशस्वी पद्धतीने कार्यन्वित होण्यासाठी तिचे व्यवस्थापन कसे असावे ? कार्यकर्त्याचे आचरण कसे असावे ? संघटनाचे कामकाज करताना काय काय चुका वळू शकतात ? यांसारख्या असंख्य प्रश्नाची उत्तर म्हणजे सदर ४०० पानी ग्रंथ
'स्पिरिच्युअलॉइझिंग लाईफ ' या शीर्षकाखाली इंग्रजी भाषेत पाहिल्यान्दा १९८९ साली सुमारे १२५ पानांच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तकाचे पुढे जस जसे मा .एकनाथजी यांची भाषणे लिखित स्वरूपात संशोधित स्वरूपात जतन करण्यात आले त्या त्या प्रकारे विवेकानंद केंद्राच्या विद्यमान अध्यक्षा निवेदिता भिडे यांच्याकार्यकुशल नेतृत्वात अधिक उत्तम संपादित करून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रँथाचा सुनीता करकरे यांनी केलेला अनुवाद म्हणजे सदर ग्रंथ होय .
या ग्रथांत एकूण ४ प्रकरणे आहेत जी अनुक्रमे आध्यत्मिक जीवनासाठी तयारी, जीवनाचा प्रवास : स्वार्थाकडून निःस्वार्थाकडे, अध्यामप्रेरित सेवा संघटन, संघटकांची साधना या ४ भागात विभागली आहेत .आध्यत्मिक जीवनासाठी तयारी यामध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणतीही सेवा करताना कोणता दृष्टिकोन अंगिकारायला हवा. स्वयंसेवक होण्यासाठी कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्व असावे त्यास ध्यात्मक बैठक कशी असावी याबाबत २ प्रकरणातून सांगण्यात आले आहे . दुसऱ्या भागाचे शीर्षक जीवनाचा प्रवास : स्वार्थाकडून निःस्वार्थाकडे, असे आहे यात ९ प्रकरणातून मनुष्याला ध्येय का असावे ?, आपण निश्तित केलेले ध्येय सध्या करण्यासाठी आपले आचरण कसे असावे ? ध्येय आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर निश्चित करावेत ?मनुष्याचे आचरण कितपत
स्वार्थी असावे निस्वार्थी जिणं म्हणजे काय या विषयी माहिती देते .या पुस्तकाची रचना जो हेतू ठरवून कऱण्यात आली आहे तो विवेकानंद केंद्राची मध्यवर्ती संकल्पना आपणास अध्यामप्रेरित सेवा संघटन,या तिसऱ्या भागात उलगडते. या भागात ८ प्रकारांद्वारे आपणास विवेकानंद केंद्र हे संघटन कोणत्या प्रकारचे संघटन आहे ? हि एक समाजोपयोगी चळवळ का म्हणता येते ? विवेकानंद केंद्र या संघटनेतील कार्यकर्त्याचे वैशिष्ठये काय आहेत ? समविचारी असलेल्या रामकृष्ण मठापेक्षा विवेकानंद केंद्र वेगळे का आहे. ? विवेकानंद केंद्र सेवाभावी संघटन त्यातही अधिक बिनचूक म्हणायचे झाल्यास अध्यामप्रेरित संघटन का आहे ? विवेकानंद केंद्र्याचे साध्य काय आहे? या शिवाय मा एकनाथजी रानडे त्यांनी जीवनव्रतींशी संवाद साधताना जीवनव्रतींनि विचारलेल्या प्रश्नाविषयी माहिती मिळते. तर शेवटच्या ४ भागात १० प्रकरणाद्वारे सर्वसाधारण समाजसेवी संस्थांचे कार्य संचलित करताना काय काळजी घ्यावी याची माहिती देण्यात आलेली आहे तर याच भागाच्या शेवटच्या ११ प्रकरणात जीवनव्रतींशी सर्वसाधर्न संवाद साधला आहेविवेकानंद केंदाची सविस्तर मुद्देसुद्द तरीही कमीत कमीशब्दात महती होण्यासह व्यक्तीच्या आयुष्यात सध्या अत्यंत महत्वाचे ठरलेल्य्या गोल सेटिंग सह कोणत्याही समाजसेवी संस्थेचे कार्य कोणत्या पद्धतीने चालायला आव यांची माहिती करून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे
व


