लेखाचे विषय

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

अति तिथे माती किती खरे समजण्यासाठी वाचावे असे पुस्तक The evil eye of Chess


   
                           आपल्याकडे एक संस्कृत वचन प्रसिद्ध आहे ,"अति सर्वत्र वर्जयते" ,अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.रोजच्या जीवनात आपण याचा अनुभव सुद्धा घेत असतो. आपल्या रोजच्या जगण्यात सर्वच क्षेत्राला हे तत्व लागू  होते. अगदी बुद्धिबळ सारख्या खेळात सुद्धा हे तत्व लागू होते.चमकलात ना ? हो बुद्धीबळ सारख्या खेळात देखील अति तिथे माती हे तत्व लागू होते. ते कसे लागू होते,हे समजण्यासाठी आपण आशिया खंडातील पहिले बुद्धीबळविषयक ऍप आणि संकेतस्थळ तयार करणाऱ्या श्री . विनायक वाडीले यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक " The evil eye of Chess" जे मी नुकतेच वाचले.

                               या पुस्तकात आठ अस्या जगविख्यात बुद्धीबळपटुंची ओळख करून देण्यात आली आहे की, ज्यात बुद्धीबळाविषयक मोठी गुणवत्ता अगदी ठासून भरली होती. मात्र मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे तत्व त्यांनी आचरणात आणल्यामुळे त्यांचा अंत फारच हृदयदायक झाला,एकाला आयुष्याचा शेवटची काही वर्षे मनोरुग्णालयात काढावी लागली,तर एका बुद्वीबळपटूला आयुष्याचा अखेरच्या टप्प्यात रस्त्यावर

भीक मागावी लागली. गोष्ट चांगली असो किंवा वाईट तिच्या आहारी जाणे नेहमीच मनुष्याचा घात करणारे असते, हा संदेश हे पुस्तक आपणास देते‌.

                  सुमारे ५५पानाच्या या पुस्तकात आपणास ज्या ८बुद्वीबळपटुंविषयी लेखक आपणास माहिती देतो,त्यामध्ये बॉबी फिशर, मिखाईल ताल, पॉल मोर्फी, विल्हेम स्टाइनिट्ज़, ,अकीबा रूबीनस्टेन,अलेक्जेंडर अलेखीन,कार्लोस टोरे रेपेटो   सारखे जगविख्यात बुद्धीबळ खेळाडू आहेत. ज्यांना जून्या बुद्धीबळपटुंची माहिती आहे,त्यांना या सर्व बुद्धीबळपटुंची खेळ किती उत्कृष्ट पद्धतीचा होता हे सर्व माहिती असेलच,ज्यांना या खेळाडुंना खेळ माहिती नाही,ते इंटरनेटवर याविषयी सहजतेने माहिती घेवू शकतात.सर्वोत्तम अस्या वर्गवारीत मोडणाऱ्या या सर्व खेळाडुंचा अंत फारच दूर्दैवी झाला याला कारणीभूत ठरले ते एक निमित्य, ते म्हणजे खेळात किती झोकुन देयचे? वैयक्तिक आयुष्यात खेळ कुठे थांबवायचा, आणि सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य व्यतीत करायचे या बाबत त्यांची झालेली गल्लत. या चूकीची शिक्षा त्यांनी स्वतः.च्या आयुष्याचे मातेरे करत भोगली. आपण रोजच्या

जगण्यात खेळात नाही पण इतर क्षेत्रात असी चूक टाळण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या वाक्प्रचारानुसार मोठी गुणवत्ता असून देखील ती वाया गेलेल्या या बुद्धीबळपटुंच्या चरित्रातून अति तिथे माती या म्हणीचा अनुभव घेण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे, मग वाचणार ना हे पुस्तक?

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400

      

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

परग्रहवासीची अदभुत कहाणी,..प्रेषित...

 पृथ्वीखेरीज अन्यत्र कुठे जीवसृष्टी आहे का? याबाबत मोठी उत्सुकता राहिलेली आहे.परग्रहवासीयांना बघीतले असल्याचे दावेही वारंवार करण्यात येतात.काही दिवसांपूर्वी मेस्किको या देशांमध्ये परग्रहवासीयांची दोन प्रेते सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. उडत्या तबकड्यामधून परग्रहवासी आपल्या  पृथ्वीवर वारंवार  येत असल्याचे सातत्याने  सांगितले जाते.परग्रहवासी या विषयावर हॉलीवूडमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील  चित्रपट  येवून गेले आहेत. इंग्रजी आणि मराठीत यावर मोठ्या प्रमाणात लिहले गेले आहे, जे मुख्यतः माहितीपर आहे. इंग्रजीमध्ये हा विषय साहित्याचा कलाने सुद्धा लिहिला गेला आहे.मात्र आपल्या मराठीचा विचार करता साहित्याचा अंगाने तूरळकच लिहले गेलेले आहे. मराठीत जे काही तूरळकच साहित्याचा अंगाने लिहले आहे,त्यातील एक प्रमुख पुस्तक म्हणजे, डॉ.जयंत नारळीकर यांनी लिहलेली प्रेषित ही मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित कांदबरी. जी मी नुकतीच वाचली.
     सूमारे सव्वाशे पानांची ही लघू कांदबरी विविध प्रकरणांमध्ये विभागली गेली आहे. या कादंबरीत एका प्रगत जीवसृष्टीतील एक मुलगा एका अपघातामुळे एकटाच आपल्या पृथ्वीवर येतो ,त्यांचे संगोपन भारतात केले जाते‌.ही प्रगत जीवसृष्टी त्यांचा तारा मृत्यूपंथाला लागला असल्याने इतर ठिकाणी जगण्याचा आधार शोधत असते. अपघातामुळे पृथ्वीवरआलेला हा मुलगा त्याचा मुळ ग्रहातील लोकांशी संवाद साधू शकतो का? त्याला संवाद  साधण्यासाठी पृथ्वीवरील  लोकांची मदत होते का? पृथ्वीवरील लोकांना तो आपला नाही,तर परग्रहवासी आहे? हे समजते का? जर समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असते? या सारख्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
     पुस्तकाचे लेखन करताना डॉ.जयंत नारळीकरांनी भाषा अत्यंत प्रवाही केली आहे.त्यामुळे विविध वैज्ञानिक संकल्पना सहजतेने समजतात. विज्ञानातील क्लिष्टपणा त्यांनी मोठ्या खुबीने टाळलायं. डॉ.जयंत नारळीकरांचे हे दूसरे पुस्तक मात्र हा नवखापणा त्यांचा लेखनात दिसत नाही. . जर समजा परग्रहवासी सापडले तर ते आपल्या पृथ्वीवरील व्यक्तींशी कसे वागतील? हे सांगता येणे अवघड आहे. ते प्रगत असतील तर आपल्याला प्रगत होण्यासाठी मदत करतील की, आपल्या पृथ्वीवर ज्याप्रमाणे प्रगत युरोपीय राष्ट्रांनी रेड अमेरीकन लोकांना त्रास देवून जवळपास नष्ट केले तसे आपणास नष्ट करतील  याबाबत काहीच सांगता येत नाही.त्या पार्श्वभूमीवर पुस्तकाचे
नाव विशेष महत्त्वाचे ठरते‌ तसे बघायला गेले तर, "प्रेषित" यांचा अर्थ खरेतर देवाचांदूत या अर्थाने घेतला जातो. प्रेषित हा लोकांचे कल्याण करतो.तेच नाव त्यांनी आपल्या पुस्तकाला दिले आहे. त्यामुळे कांदबरीत वर्णन केलेला परग्रहवासी खरोखरच प्रेषित होतो का,? हे समजण्यासाठी पुस्तक वाचायलाच हवे.

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400





अतिशय रंजक भाषेत विश्वाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक A brief history of Time


       आपल्या रामायण आणि महाभारत अस्या पौराणिक मालिकांमध्ये अनेकदा "मे समय हुं!" असे म्हटले गेल्याचे आपण बघितले असेलच. तर समय किंवा ज्याला आपल्या मराठीत वेळ म्हणतात, ही संकल्पना आपल्याला मुळातून समजावून घेयची असेल तर, आपण वाचायलाच हवे असे पुस्तक म्हणजे, जेष्ठ खगोलभौतिकी शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी मुळातील इंग्रजी भाषेत लिहिलेले, मात्र ज्याच्या मराठी भाषेत देखील अनुवाद झाला आहे, असे  "A brief history of Time". या पुस्तकाचा मराठीत  अनुवाद झाला असला तरी मुळातील पुस्तक वाचण्याचा आनंद काही औरच. तो आनंद मिळवण्यासाठी मी नुकतेच मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तक वाचले.

 अत्यंत सोप्या इंग्रजी  भाषेत हे पुस्तक लिहिले आहे.तसेच या पुस्तकात जी माहिती देण्यात आली आहे.तीची मांडणी देखील रंजकतेने करण्यात आली आहे. त्यामुळे ज्याला खगोलभौतिकी या विषयाचे फारसे ज्ञान नाही,असी व्यक्ती देखील हे पुस्तक वाचून खगोलभौतिकी या विषयात बऱ्यापैकी पारंगत होवू शकते.शिवाय आधीच सांगितलेल्या प्रमाणे यांची भाषा देखील सोपी आहे.त्यामुळे ज्यांना

खगोलभौतिकी शास्त्रचा अभ्यास करायचा आहे , मात्र सध्या त्यांची या विषयाची पाटी पुर्णतः कोरी आहे, अस्याव्यक्तींनी खगोलभौतिकी या विषयाचा अभ्यासाचा श्रीगणेशा या पुस्तकाद्वारे करणे सर्वोत्तम राहिल. मुलभूत ते मध्यम प्रगत स्वरूपाचे ज्ञान ते यातून मिळवू शकतील.

    खगोलभौतिकी शास्त्रचा  विचार करता वेळ म्हणजे काय ?वेळ कधी अस्तित्वात आला ?तो अस्तित्वात येण्याचा आधी काय होते? आपण ज्या विश्वात राहतोय,ते विश्व कधी अस्तित्वात आले? या विश्वाचा विस्तार किती मोठा आहे? विश्वाच्या विस्ताराचा बाहेर काय आहे? मुळात हे विश्व कसे अस्तिवात आले? विश्वाच्या अस्तित्वाचा आधी काय होते?विश्वाचा कधी मृत्यू होवू शकतो का? असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या पुस्तकाच्या वाचन केल्यास सहजतेने मिळतात.

    मुलीची शालेय फी भरण्यासाठी पैसे नसल्याने ते मिळावेत, या हेतूने लिहलेले हे पुस्तक आपणास खगोलभौतिकी या विषयाची मोठ्या प्रमाणात माहिती देते. पुस्तकाचे लेखक स्टिफन हॉकिंग हे  त्यांनी  विश्व जन्म या संकल्पनेवर केलेल्या संशोधनासह ज्या शारिरीक विकलांगतेवर मात करत त्यांनी खगोलशास्त्रात संशोधन केले, त्यामुळे जगप्रसिद्ध आहेत. मात्र या पुस्तकात कोठेही मोठेपणाचा हेका पुढे केल्याचे दिसत


नाही.भौतिकशास्त्र जाणण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्याला तस्याच उत्सुक शिक्षकाने दिलेले ज्ञान म्हणजे सदर पुस्तक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे पुस्तक ज्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे असी व्यक्ती देखील समजू शकते असे आहे,तर मग वाचणार ना हे पुस्तक?

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

परंपरावाद्यांविरोधात एका महिलेने केलेल्या बंडाची कहाणी,--गार्गी अजून जिवंत आहे.

      
सध्या आपल्या भारतात सर्वत्र नारी शक्ती विधेयकाबाबात चर्चा सुरु आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी  एका स्तंभात अर्थात विधीमंडळात त्यामुळे महिला वर्गाचा सहभाग त्यामुळे नक्कीच वाढेल. आज असे कोणतेही क्षेत्र नसेल ज्यामध्ये महिलावर्ग पुरुषांना खांद्याला खांदा लावून सक्षमतेने काम करत नसेल. अगदी एखाद्या माणसाचे निधन झाल्यावर स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कार विधीचा देखील अपवाद याला नाहीये‌. उत्तर प्रदेश सारख्या अजूनही जाती भेद उच्च निच्चता मोठ्या प्रमाणात पाळले जाणाऱ्या राज्यातील इलाहाबाद या शहरात देखील आपणास हे कार्य करणारी एक महिला कार्यरत आहे. हे मला समजले ते मी पुर्वी  वाचलेले असुन देखील सध्या पुन्हा एकदा  वाचत असलेल्या एका पुस्तकामुळे . "गार्गी जिवंत आहे", हे त्यांचे नाव. .राजहंस प्रकाशनातर्फेप्रकाशित या पुस्तकामुळे मला ही माहिती समजली.
    हे पुस्तक प्रसिद्ध होवून बराच काळ लोटला आहे, त्या अर्थी हे पुस्तक जून्या या वर्गवारीत मोडते.माझे देखील हे पुस्तक पहिल्यांदा वाचले त्यास कैक वर्षे लोटले, मात्र स्वतः कडे असून देखील या बाबत लिहले नव्हते, जे आता लिहित आहे. देर से आये मगर दूरूस आये, हे हिंदी भाषेतील तत्व आचरण्यात आले, असे समजूया.
     तसे बघायला गेले तर जेमतेम सव्वाशे पानांचे हे पुस्तक ,आपल्या अनेक समजुतींना मोडीत काढते. पुस्तकाच्या विषय मांडणीत लेखिकेने फारसी पाने खर्ची पाडलेली नाही. विषयाच्या प्रास्ताविकात फारसे न लिहता लेखिका थेट
विषयाला स्पर्श करते, लेखिकेने विषयाचे प्रास्तविक फारसे मोठे केले नसले तरी, विषय  सहजतेने समजेल अस्या पद्धतीने मांडणी केली आहे.जेमतेम सहा सात पानात आपणास विषय पुर्णतः समजतो.सहा ते सात पानानंतर लेखिका थेट आपल्यास गुलाबोचे चरीत्र सांगायला सुरुवात करते. गुलाबो ही सुमारे 85 वर्षीय महिला या पुस्तकाची नायिका संपूर्ण पुस्तक तिच्या भोवतालीच फिरते.जी गेल्या पंचाहत्तर इलाहाबादच्या मनकर्णिका घाटावर प्रेतांना दाहसंस्कार करण्याचे काम करत आहे. वयाच्या सातव्या वर्षी लग्न झालेल्या गुलाबोला वयाच्या दहाव्या वर्षी अपत्यप्राप्ती होते आणि वयाच्या अकराव्या वर्षी तिच्या पतीचे निधन होते. पतिनिधनानंतर ती  वडीलांच्या  प्रेतांवर दाह संस्कार करण्याचा व्यवसायात येते,तीची कहाणी म्हणजे सदर पुस्तक होय.एका अर्थाने हे गुलाबोचे चरीत्रच.
 आपल्या महाराष्ट्रात स्मशानजोगी नावाचा एक समाजघटक गावापासून  दुर असणाऱ्या स्मशानात राहतो. आणि स्मशानात क्रियाक्रम करायला येणाऱ्या लोकांच्या मदतीने आपला चरितार्थ चालवतो,या समाजाची लग्ने देखील स्मशनात होतात.गावातील लोकांच्या अंतिम प्रवास सुकर करणे हे या समाजघटकाचे काम.हे काम बहुतांशी वेळा पुरुषवर्गच करतो.महिला अन्य ठिकाणी मोलमजूरी करते. आपल्या महाराष्ट्राला समाजसुधारणेची मोठी परंपरा असल्याने,आता हा समाज मुख्यधारेत सहभागी होत आहे. मात्र आता आतापर्यंत समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे? हे त्यास उघडपणे
विचारले जाणाऱ्या, उत्तर प्रदेशात असे कार्य करणारी महिला म्हणजे गुलाबो .आणि त्यामुळेच महत्त्वाची ठरते,तिचे हे चरीत्र. 
 आपण अनेकदा महिला सबलीकरणाचा गोष्टी बोलतो.त्याबाबतच भाष्य करणारे हे पुस्तक आपण त्यामुळे वाचायला हवे आपण

अजिंक्य तरटे 
9552599495
9423515400

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

स्वामी विवेकानंद यांची पत्रे...मनाला नैराश्यापासून दूर ठेवणारे पुस्तक

   
समर्थ
रामदास स्वामी यांनी मन या अवयवाचे मानवी आयुष्यातील महत्व स्पष्ट करताना  सांगितले आहे की, "मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" जे अत्यंत खरे असल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले देखील असेल.मात्र आपल्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या या मनाला प्रसन्न कसे करायचे याचे उत्तर आपणास हवे असेल तर त्याचे उत्तर अत्यंत सोपे आहे, ते म्हणजे,स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले साहित्य वाचायचे. आपण कितीही मोठ्या नैराश्यात असो, स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले कोणतेही पुस्तक वाचले की, नैराश्य आपल्यापासून कैक मैल दुर गेलेच पाहिजे. स्वामी विवेकानंद यांचे साहित्य रामकृष्ण मठाच्या नागपूर शाखेमार्फत मराठीत आणले गेले आहे. त्यामुळे भाषेचा प्रश्न देखील निकालात निघाला आहे, तसेच त्याची किंमत देखील अत्यंत कमी आहे, मात्र त्यातील विचारलं मोठे अनमोल आहे.स्वामी विवेकानंद यांनी लिहलेल्या भक्तीयोग, राजयोग,प्रेमयोग सारखी पुस्तके समजली तर मोठा ज्ञानसाठा आपल्यासाठी खुला होईल. मात्र ते जर जमले नाही तर स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले पत्रांचे वाचन केले तरी आपल्याला कधीही संपणारा चैतन्याचा झरा सापडेल हे नक्की ‌.हे मी स्व अनुभवाने सांगते आहे.मी नुकतेच स्वामी विवेकानंद यांची पत्रे असणारे पुस्तक वाचले.

स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे  निधन झाल्यानंतर संन्यासधर्म स्वीकारुन भारतभ्रमण केले. भारतभ्रमण केल्यानंतर ते सर्वधर्म परीषदेसाठी अमेरीकेला गेले. (तेथील त्यांचे भाषण प्रसिद्धच आहे.)सर्वधर्म परिषदेनंतर ते सुमारे चार वर्ष अमेरिका आणि इंग्लंडमध्ये

वास्तव्यास होते. या भारतभ्रमण आणि पाश्चात्य देशात असताना त्यांनी गुरुबंधू आणि आपल्या विविध शिष्यांना त्यांनी पत्रे लिहिली ,जी यात समाविष्ट करण्यात आली आहे ‌.वर्षांच्या हिशोबाचे सांगायचे तर इसवीसन 1888

ते 1898 या काळातील सुमारे साडेपाचशे पत्रे या सुमारे साडे आठशे पानाच्या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. जी खुद्द स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेली असल्या कारणाने अत्यंत तेजस्वी झाली आहेत. या ग्रंथातील कोणतेही पान उघडुन वाचन करायला सुरुवात करावी,आपण कितीही नैराश्याने ग्रासलेलेस असाल, आपण प्रसन्न होणारच, यात कोणालाही तिळमात्र शंका नसावी.

    स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांचे आणि पाश्चात्य देशांतील नागरिकांचे चांगले गुण आणि अवगुण ओळखले होते,आणि दोन्हींचा चांगल्या गुणांचा मिलाफ बांधत ते उत्तम अस्या समाजासाठी झटत होते,यामागची त्यांची तळमळ आपणास या पत्रांचा शब्दाशब्दात दिसते. भारतासारख्या विविधांगी समाजात एखादे संघटन कोणत्या प्रकारे उभारता येवू शकते?ते उभारताना काय अडचणी येवू शकतात, या अडचणींवर कमी मात करता येते?याचा वस्तूपाठच स्वामीजींनी त्यांचा गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रातील दिसून येते.स्वामी विवेकानंद यांच्यावेळी भारत पारतंत्र्यात  होता, तरी पाश्चात्यांच्या चांगल्या गुणांची त्यांनी अवहेलना केली नाही.पाश्चात्यांची संघटन क्षमता आपण आपल्यामध्ये रूजवलीच पाहिजे याबाबत त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांनी गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रातून हे आपणास सहजतेने दिसून येते. गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांच्या विविध दौषांवर प्रखर

शद्बात कोरडे आसुड ओढलेले आहेत, त्याचवेळी गुरुबंधू या शद्बानी निरास होवु नये म्हणून त्याचं पत्रात मायेची पाखरण देखील केली आहे.किंबहुना स्वामी विवेकानंद यांनी लिहलेल्या सर्वच पत्रांमध्ये आसुड आणि मायेची सावली यांचा उत्कृष्ट मिलाफ झालेला दिसतो,असे म्हटल्यास वावगे ठरु नये, अत्यं कडक आणि त्याचवेळी अत्यंत मायाळू, प्रेमळ अस्या मार्गदर्शकाची भुमिका घेवून स्वामी विवेकानंद यांनी ही पत्रे वाचताना पदोपदी जाणवते.

    ही पत्रे स्वामीजींनी बंगाली आणि इंग्रजी भाषेत लिहलेली आहे. मी  वाचलेल्या मराठी भाषांतरात बंगाली पत्रांना तारांकित केले आहे, त्यामुळे आपण मुळ बंगालीत लिहलेली पत्रे कोणती? हे आपण सहजतेने समजू शकतो. आपण सर्वांनी ही सर्व पत्रे किमान एकदातरी नजरेखालून घातलीच पाहिजे.सध्या जगभरातील लोकांच्या मृत्यूचे पहिल्या क्रमांकाचे कारण असलेल्या आत्महत्येचा विचार आपल्याकडे येणारच नाही.किंबहुना जर आपणास कधीही नैराश्य वाटले तर यातील कोणतेही एक पान वाचलेच पाहिजे असे मी स्व अनुभवातून सुचवतो आहे.मग वाचणार ना हे पुस्तक 


साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम

आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत  थांबलेला ...