लेखाचे विषय

रविवार, १ डिसेंबर, २०२४

प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक,'सायबर अटॅक'

 सध्याचे जग सातत्याने विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे,हे कोणीही  नाकारू शकत नाही. कोव्हिड १९ च्या साथरोगानंतर तर आपल्या आयुष्यातील त्याचा वापर अजुनच वाढलेला आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजियन्स क्षेत्रातील प्रगतीमुळे तो अधिकाधीक वाढतच जाणार आहे,हे सुद्धा नाकारता येणे अशक्य.त्यामुळे तंत्रज्ञान स्नेही असणे सध्याचा काळात अत्यंत आवश्यक आहे.जर आपण काळानुरुप बदललो नाही तर  कोडॉक, नोकिया या एकेकाळच्या डॉन  म्हणता येईल, मात्र आज अस्तिवासाठी  लढणाऱ्या कंपन्यासारखे नष्ट होवू
   तंत्रज्ञानाचाच फायदा घेत त्यात पारंगत होण्याचा विचार केला असता,आपली फसगत होण्याचा धोका देखील मोठा प्रमाणात आहे. ऑफलाईन जगात ज्याप्रमाणे चांगले लोक  आहेत वाईट लोक आहेत.तोच प्रकार ऑनलाईन जगात आहे. ऑफलाईन जगात व्यक्ती समोर असल्याने त्याचा देहबोलीतून आपण सदर व्यक्ती चांगली की वाइट हे ओळखु शकतो‌.मात्र तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारी व्यक्ती समोर नसल्याने, सदर व्यक्ती चांगल्या हेतूने संवाद साधत आहे की, त्याचे हेतू वाइट आहे.हे समजत नाही. सध्या गाजत  असणारे 'डिजीटल अरेस्ट'  हे फसवणूकीचे प्रकार हे या धोक्याचे एक उदाहरण म्हणता येईल.मात्र लेखाच्या सुरवातीलाच सांगितले त्या प्रमाणे आपल्याला आपले जीवन  तंत्रज्ञान स्नेही सध्या काळाची गरज आहे. या कात्रीतून मार्ग काढायचा असल्यास आपणाला विश्वासार्ह्य मार्गदर्शकाची गरज निर्माण होते, आणि ही गरज आपली सहजतेने पुर्ण होते.ती राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ.संजय तुंगार,आणि सुधीर साबळे यांनी एकत्रीतपणे लिहलेल्या, 'सायबर अटॅक' या पुस्तकामुळे.
नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने मी सदर पुस्तक नुकतेच वाचले.
या पुस्तकात सध्या विशेष चर्चेत असलेल्या ,तूमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, ही भुलथप तसेच हनी  ट्रॅप, व्हाटसप हॅक होणे,धर्मांतराचा खेळ, ऑनलाईन गेमचे मोहजाल, डेबीट कार्ड क्लोनिंग,सेक्शटार्शन  ,झूम मिटिंगद्वारे होणारी,फिशिंगद्वारे होणारी,टिंडर सारख्या प्लॅटफॉर्म होणारी फसवणूक, ऑनलाईन कर्जाद्वरे फसवणूक, कशी होते,त्यापासून कोणत्या प्रकारे बचाव करावा, ऑनलाईन जगात अती घाई कशी अडचणीची ठरते.तसेच ऑनलाईन जगात क्लिक करताना,काय काळजी घेयला हवी, ऑनलाईन सुविधेमुळे घर सोडून गेलेल्या व्यक्ती कोणत्या पद्धतीने सापडू शकतात ,या सारख्या सुमारे 35 गोष्टी वेगवेगळ्या प्रकरणाद्वारे सांगण्यात आलेल्या आहेत.पुस्तक तांत्रीक माहिती देत असले तरी पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे.पुस्तकाच्या शेवटी तीन परिशिष्टाद्वारे सायबर गुन्हेगारीबाबतची भारतातील सद्यस्थिती, आपल्याबाबत सायबर गुन्हा घडल्यास कोणती पाउले उचलावीत,तसेच पोलीस स्टेशन आणि बँकेला कोणत्या स्वरूपात अर्ज करावा याबाबत सांगण्यात आले आहे.

   या पुस्तकाच्या दोन लेखकांपैकी एक असणारे  डॉ.संजय तूंगार हे पोलिस दलात कार्यरत आहेत.डॉ. तुंगार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आयक्तलयात कार्यरत असताना, तेथील सायबर ठाण्याचे काम बघीतले.या दरम्यान त्यांनी अनेक गुन्ह्मांची उकल केली आहे.सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिकारी
कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमात, एस.ओ.पी.तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता .तर दुसरे लेखक सुधीर साबळे  हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.त्यांना पत्रकारीतेचा २५वर्षाचा अनुभव आहे. सुधीर साबळे यांनी पत्रकारीता करताना, सायबर गुन्हांविषयी मोठ्या प्रमाणात वार्तांकन केले आहे तसेच सायबर गुन्हे याबाबत त्यांनी अनेक प्रबोधनपर लेख आणि कथा लिहल्या आहेत. दोन्ही लेखकांना सायबर गुन्हे याबाबत असे सविस्तर ज्ञान असल्यामुळे पुस्तक अत्यंत माहितीपुर्ण झाले आहे.त्यामुळे डिजीटल अरेस्टया सारख्या फसवणूकीची बातमी आपल्याबाबत प्रसिद्ध होवू नये असे वाटल्यास पुस्तक नक्कीच वाचा.




गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

'चीन, रंग आणि ढंग', कोरोना पश्च्यातील चीन उलगडणारे पुस्तक

   
गेल्या दोन तीन वर्षापासून मराठीत विविध विषयांवर  माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत.पुर्वी या विषयांवर मराठीत अभ्यासपुर्ण पुस्तक येणे शक्यच नाही असे वाटे, त्या विषयांवर देखील माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत .जे अत्यंत उत्तमतेचे लक्षण म्हणता येईल. सातत्याने वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह,भारताच्या  परराष्ट्र धोरणावर परीणाम करणाऱ्या चीन सारख्या देशांवर देखील आता मोठ्या संख्येने पुस्तके निघत आहेत.याच मराठी पुस्तकांमध्ये समावेश होवू शकेल असे एक पुस्तक, मी नूकतेच वाचले.'चीन, रंग आणि ढंग',  या ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ. अनंत पा. लाभसेटवार यांनी लिहलेल्या या पुस्तकात कोव्हिड नंतरच्या जगात चीनचे आर्थिक,राजकीय,आणि लष्करी स्थान काय असेल.याबाबत माहिती मिळते. 
       सुमारे पावणेतीनशे पानाचे हे पुस्तक, चीनचे नेतृत्व, राजकारण, अर्थकारण, करोनाचे हत्याकांड या चार भागात विभागले आहे. प्रत्येक भाग विविध प्रकरणात विभागला असून पुस्तकात एकुण ४५ प्रकरणे आहेत. मुखपृष्ठावर लाल रंगाच्या पार्श्वभुमीवर पृथ्वीला गिळू पाहणाऱ्या ड्रॅगनचे छायाचित्र पुस्तक कोणत्या विषयावर आहे, आणि पुस्तकाचा रोख कोणत्या बाजूने आहे, हे सहज दाखवून देते. पुस्तकात देखील चीन जागतिक महासत्ता होण्यासाठी किती आसुसलेला आहे, तो अमेरीका आणि आपल्या भारताच्या प्रगतीसाठी स्पर्धक नसुन शत्रू आहे.हे स्पष्ट करुन सांगितले आहे.हे.मी या आधी चीनविषयक वाचलेल्या पुस्तकाच्या तूलनेत  पुस्तकाची भाषा काहीशी कठिण आहे. अर्थात इतर पुस्तकापेक्षा यामध्ये चीनविषयक सखोल चर्चा करण्यात आलेली आहे ,हे सुद्धा खरे आहे. पुस्तक चीनविषयक जाणकार व्यक्तीने लिहले आहे,मराठी भाषा जाणकराने नाही त्यामुळे भाषेचा अवघडपणा क्षम्य आहे.
          पुस्तकाची पहिली आवृत्ती ही जानेवारी २०२३रोजी निघाली असल्याने, पुस्तकात  अगदी आताची ताजी माहिती मिळते, असे म्हटलास वावगे ठरणार नाही.मराठीतील अन्य चीनविषयक पुस्तकांमध्ये प्रामुख्याने १९७८ नंतर चीन कोणत्या प्रकारे बदलला यावर अधिक भर देत असताना (किमानपक्षी मी वाचलेल्या) हे पुस्तक त्याचा ओझरता ऊल्लेख करत मुख्य भर विद्यमान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यावरच करते.पुस्तकात चीनबाबत योग्य ती रणनिती आखण्याबाबत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन कसे कमी पडले.या चूकीच्या रणनितीचा चीनला कोणत्या प्रकारे फायदा झाला यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. नविन सिल्क रूटमुळे जागतिक स्तरावर व्यापारात होणारे बदल ,चीनचे चलन युऑन हे डॉलरला पर्याय म्हणून उभे करण्यासाठी चीन करत असलेले प्रयत्न, चीनमुळे
नव्या शीतयुद्धाचा धोका कोणत्या प्रकारे तयार होत आहे.व्यापारी प्रश्नांवरुन चीन आणि अमेरिका या दोन देशातील संबंध कसे ताणले गेले आहेत? चीनच्या कर्जाचा विळख्यात कोणत्या प्रकारे देश सापडत आहे.कोव्हिडमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेमुळे कोणते बदल झाले.या काळात चीन आणि अमेरीका राजनैतिक संबंधात कोणत्या प्रकारे बदल झाला.शि जिनपिंग यांच्या राजकीय प्रवास कोणत्या प्रकारे झाला. चीनमधील छळछावण्या, तैवानप्रश्नी  सर्वसामान्य चीन नागरिकांची,आणि चीनी सरकारची भुमिका आणि वस्तूस्थिती, शि जिनपिंग यांची चीनमधील एकाधिरशाही हुकुमशाही, चीनमधील मानवी मुल्यांच उल्लंधन आदी विविध विषयांवर पुस्तकात सविस्तर चर्चा केली आहे.
    आपल्या भारतीयांसाठी कळीचा मुद्दा असलेल्या भारत चीन संबधावर लेखकाने अन्य चीनविषयक पुस्तकाप्रमाणे स्वतंत्र्य प्रकरणाद्वारे भाष्य केलेले नाही. तर भारत चीन संबंधांवर, भारत चीन यांच व्यापारयुद्ध आणि भारताला संधी,युरोप चीन भारत या तसेच चीनची पुन्हा जीत:भारताची हार या प्रकरणाद्धारे भाष्य केले आहे सुमारे पावणेतीनशे पानांच्या या पुस्तकात सुमारे १८पाने लेखकाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यरीता भारत चीन संबंधावर भाष्य करण्यासाठी खर्ची घातली आहेत. यामध्ये चीनचे युरोपीय यूनीयसी असणारे ताणलेले आर्थिक हितसंबंध आणि त्यामुळे होणारा भारताचा फायदा, चीन भारत राजनैतिक चर्चांमध्ये भारत पुर्वीपासून घेत असलेली मवाळ काहीशी पराभुताच्या मानसिकतेची भुमिका तसेच चीन घेत असलेली आढ्यतेची अहंपणाची  भुमिका, मोदींमुळे या भुमिकेत
होणारे बदल, भारताचे लष्करी,हवाई बळ आणि चीनचे लष्करी हवाई बलाबळ, तसेच अमेरिका चीन व्यापारी युद्धाचा भारतातील कारखानदारीला कोणत्या प्रकारे फायदा होवू शकतो आदी बाबींचा समावेश आहे.
पुस्तकाची भाषा समजण्यास थोडी कठिण असली,पुस्तक वाचताना कंटाळा येण्यासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असली तरी पुस्तक खुपच माहितीपुर्ण आहे हे नाकारता येत नाही.मी आतापर्यत मराठी भाषेत चीनविषयक वाचलेल्या पुस्तकापैकी सर्वात माहितीपुर्ण पुस्तक म्हणून या पुस्तकाची निवड करेल.चीनविषयक आपल्या अनेक धारणा या पुस्तकामुळे दुर होवून आपणास वस्तूस्थिती समजते.मग वाचणार ना पुस्तक.

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'

          आपल्या महाराष्ट्राला मोठा समृध्द सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होणारे आणि बौद्धीक फराळ म्हणून सर्वांना परिचीत असलेले 'दिवाळी अंक' हे या समृध्द सांस्कृतिक परंपरेतील एक महत्तवाचा घटक, ज्याला शतकोत्तर वर्षाची समृध्द परंपरा आहे. आज विविध विषयावर दिवाळी अंक निघत आहेत.कोव्हिड साथरोगामुळे मंदावलेल्या अर्थकारणामुळे ते दोन वर्ष दिवाळी अंकाची परंपरा रोडावली असली तरी ते दोन वर्ष सोडल्यास पुन्हा एकदा ही परंपरा मोठ्या जोमाने पुन्हा एकदा सुरु झाली आहे 2024 या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे अनेक विषयावर  दिवाळी अंक निघाले आहेत.त्यापैकी एक उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेला 'भवताल' हा दिवाळी अंक मी नुकताच वाचला.
          नेहमीप्रमाणे भवतालचा हा अंक देखील संग्रही ठेवावा,असाच झाला आहे.प्रत्येकवेळी एक पर्यावरणाशी संबंधीत संकल्पना घेवून, त्यावर आधारीत सुमारे 150 पानाचा अंक काढणारे,  लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक अभिजित घोरपडे यांची यावेळची संकल्पना देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' या पर्यावरणाच्या विचार करता काहीशी वेगळ्या वाटणाऱ्या संकल्पनेवर आधारीत दिवाळी अंक ही यावेळी काढण्यात आला आहे. कोणतीही संस्कृती पूर्णपणे अलिप्त राहून विकसीत होवू शकत नाही.कोणत्याही संस्कृतीत वेळोवेळी अन्य संस्कृतीतील चांगल्या बाबींचा स्विकार करणे सुरुच असते. त्यामुळे आमच्याकडे सर्वच होते.आम्हाला सर्वकालीक महान  संस्कृतीचा वारसा आहे. हा अभिमान खोटा आहे.दांभिकपणा आहे.तसेच आमच्या संस्कृतीवर परिणाम होईल,म्हणून अन्य संस्कृतीतील उत्तम गोष्टी स्विकारण्यास तयार नसणे चूकीचे आहे.‌आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीने देखील इतर संस्कृतीच्या अनेक बाबी सहजतेने स्विकारलेल्या आहेत. इतर संस्कृतीकडे आपण स्वीकारलेल्या बाबी आता आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की आता त्यांना वेगळे म्हटले तर आपले हसु देखील होवू शकते.या देवाण घेवणीचा वारसा आम्ही मांडत आहेत,असे संपादकीयात सांगत अभिजित घोरपडे यांनी या अंकामागची पार्श्वभुमी स्पष्ट केली आहे.
       भवतालच्या 2024च्या दिवाळी अंकात आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीवर स्थापत्यशैली, मराठी भाषा, खाद्यसंस्कृती,मुंबईची जडणघडण, इराणी लोकांशी कोणत्या माध्यमातून आणि कश्या प्रकरे भारतीयांचा संबंध आला,ते भारतात कोणत्या प्रकारे समावून गेले, तसेच आता कोणत्याही देवळांचा अविभाज्य घटक म्हणता येईल असा महिरप हा घटक आपण इस्लामी संस्कृतीकडून घेतला यासारख्या अनेक विषयाबाबत वेगवेगळ्या 18 लेखातून सविस्तर माहिती मिळते.या 18 लेखांपैकी 3 लेखांचा अपवाद वगळता अन्य सर्व लेख संबंधित विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या तज्ञ व्यक्तींनी लिहलेले आहेत.त्यामुळे अंक खुप माहितीपुर्ण झाला आहे.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही‌.बटाटा, मिरची या सारखे आपल्या खाण्याचा अविभाज्य भाग झालेले खाद्यपदार्थ मुळातील भारतीय नाहीत तसेच आपल्याकडे पुर्वापार असलेले मात्र सध्या काहीसे मागे पडलेले भरडधान्य बी 12 या जीवनसत्वाचे मोठे स्त्रोत आहेत.महिरप ही वास्तूरचनेतील संकल्पना भारतात कशी रुजली.इस्लामी परंपरेत तीचे स्थान काय आहे?या सारखी अनेक विषयावरची माहिती आपणास या दिवाळी अंकाच्या वाचनातून मिळते. भवतालच्या या आधीच्या दिवाळी अंकाप्रमाणेच याही अंकात  फोटो मोठ्या प्रमाणात वापरले आहेत,त्यामुळे अंकातील माहिती चटकन समजते‌
      दिवाळी अंकावर टिका करताना सातत्याने फक्त जाहिराती छापण्यासाठी दिवाळी अंक काढले जातात,असे म्हटले जाते‌.अनेक दिवाळी अंकात मोठ्या प्रमाणात असलेल्या जाहिरातीमुळे ते काही अंशी खरे देखील वाटते मात्र भवताल च्या या अंकात आपणास फक्त मलपृष्ठावरील दोन जाहिराती वगळता अन्य जाहिराती आढळत नाहीत.त्यामुळे वाचताना सातत्य रहाते वाचताना जाहिरातीमुळे येणारा अडथळा येत नाही.सध्याचा महागाईच्या काळात कोणत्याही प्रकाशनास आपले पुस्तक मासिक वाचकांपर्यत पोहोचण्यासाठी लागणारा खर्च वसूल करत आपले साहित्य कमी किमतीत देण्यासाठी जाहिरातदार अत्यावश्यकच आहे.अस्या परिस्थितीत अन्य प्रकाशनाइतकीच किंमत (300रूपये) ठेवत जाहिरात देखील कमी घेत अंक काढण्यासाठी अभिजित घोरपडे आणि संपुर्ण भवताल टिमचे करावे तितके कौतूक कमीच आहे.त्यामुळे नविन काही जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांनी अंक वाचावाच तसेच त्यांच्या धडपडीला बळ देण्यासाठी आपण देखील हा अंक विकत घेवून वाचावा,आणि इतरांना देखील तसे सांगावे.

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारी कादंबरी 'मुंबई दिनांक'

           


   १६ नोव्हेंबर १९७९ ही  फक्त एक तारीख नहिये.  आपल्या मराठीतील ज्याला ऑल टाइम ग्रेट सिनेमा म्हणता येईल अश्या 'सिहासन' या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ती तारीख आहे .  आपल्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिगर्शक निर्माते असलेल्या जब्बार  पटेल यांची कलाकृती असलेला हा चित्रपट आज त्याला निर्माण होऊन ४५ वर्षे अर्थात २५ वर्षाची एक पिढी या हिशेबाने दोन पिढ्याच्या कालावधी होत असला असला तरी  कालसुसंगत वाटतो, कंटाळवाणा होत नाही. यातच त्याचे महत्त्व  अधोरेखित होते. चित्रपट यशस्वी होण्यामागे चित्रपटात अभिनय करणारे कलाकार जितके महत्वाचे असतात तीतकीच महत्वाची असते चित्रपटाची पटकथा.  चित्रपटाची  पटकथा सशक्त होणार का . यामध्ये पटकथा लिहणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाची असते पटकथा. ज्या  कथा कादंबरीवर आधारित आहे त्याचे सशक्त असणे  सिंहासन हा चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारित आहे त्या देखील तितक्याच सशक्त असल्याने चित्रपट जवळपास पन्नाशीत आला तरी आपल्याला खिळवून ठेवतो त्यामुळे या चित्रपटाची पटकथा ज्या दोन कादंबरीवर आधारित आहे त्या वाचण्याची मला पूर्वीपासून इच्छा होती सिंहासनच्या दोन कादंबरीपपैकी मी सिंहासन ही कादंबरी मी खूप दिवसापूर्वीच वाचली.  मात्र 'मुबई दिनांक' ही कादंबरी वाचण्याची माझी इच्छा मात्र काही करणाने अपूर्णच राहत होती मात्र  नुकतीच माझी  'मुबई दिनांक' ही कादंबरी वाचण्याची इच्छा पूर्ण झाली .  मला ही कादंबरी कशी वाटली हे आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या या लेखाचे प्रयोजन (ज्यांना माझ्या सिंहासन या कादंबरीच्या लेखाविषयी जाणून घेयचे असेल त्यांनी लेखाच्या शेवटी असलेल्या लिंकवर क्लिक करावे 

         सिंहासन या कादंबरीप्रमाणे मुबई दिनांक या कादंबरीचे लेखन सुद्धा अरुण साधू यांनी केलेले आहे मात्र सिंहासन ही कादंबरी जशी वाचताना आनंद देते, सहजतेने समजते तसे दुर्दैवाने या कादंबरी विषयी म्हणता येऊ शकत नाही.  कादंबरी अनेक ठिकाणी काहीशी कंटाळवाणी होते काही प्रसंग उगीचच काही गरज नसताना काहीसे ताणले गेले आहेत असे वाटते.  सिंहासन या कादंबरीत जशी  नाट्यमयता आहे पुढे काय घडू शकेल याचा अंदाज  बांधता येत नाही.  तसे मुबई दिनांक याबाबत होत नाही पुढे काय घडू शकेल याचा अंदाज बांधता येतो

सिंहासनपेक्षा अधिक ठळकपणे डिकास्टा याचा उल्लेख येतो  डिकास्टावर लेखकाने जवळपास ५५ ते ६० पाने खर्ची घातली आहेत मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे यांचे पात्र देखील या कादंबरीत अधिक ठळक केले आहे तसेच मूळ चित्रपटात दाखवण्यता आलेला आणि सिंहासन या कादंबरीत ओझरता देखील उल्लेख नसणारा, स्मग्लर्स चे काळे विश्व दाखवणारा प्रसंग 'मुंबई दिनाक या कादंबरीत अधिक ऊतमपणे रंगवण्यात आला आहे डिकास्टा एव्हढीच सुमारे ५० ते ५५ पाने हा प्रसंग आणि या वेळी ज्याची हत्या होते त्या पाणीटकराचे भावविश्व उभारण्यासाठी लेखकाने उभारलेली आहे 

      सिंहासन ही कादंबरी मुख्यतः  मंत्रीमंडळातील अंतर्गत राजकारणावर भाष्य करते तर मुंबई दिनांक ही कादंबरी मुख्यतः मंत्रिमंडळाबाहेरील सत्ता नाट्यावर मार्मिक भाष्य करत बोट ठेवते . मुबई दिनांक या कादंबरीतील कथानक प्रामुख्याने पाच नायकांभोवती फिरते. स्टार वेस्टर्न या इंग्रजी दैनिकाचा मुख्य वार्ताहर, जो एका वारांगनेवर प्रेम करत असतो आणि ज्याने आपल्या प्रेमापोटी तिला ते काम करायला परावृत्त केले असते असा  अय्यर, कामगार नेता डिकास्टा,,मंत्रालयात  काम करणारा ३० वर्षीय अविवाहित आणि एका  दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम करणारा लहान भावाच्या तुलनेत स्वतःला कमी समजणार किरण वझे

आणि काही कौटूंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी वाममार्गाला लागलेला आणि आणि आता त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असलेला पत्नी आणि बारा वर्षाची मुलगी असलेला पाणीटकर आणि मुखमंत्राची जिवाजीराव शिंदे हे कादंबरीचे मुख्य पाच नायक संपूर्ण कादंबरी त्यांच्या भोवती फिरते. कादंबरीची रचना प्रकरणनिहाय करण्यात आलेली असून प्रत्येक पात्राबाबत दोन प्रकरणे लेखकाने रचली आहेत जी एकामागून एक येतात सर्व पात्रांची पहिले प्रकरणे विस्तृत असून त्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश पुस्तक लेखकाने खर्च केले आहे मी लेखाच्या सुरवातीला सांगितले त्या प्रमाणे पुस्तक काहीसे कंटाळवाणे होते ते या मोठ्या असणाऱ्या ठळक रुपाने मांडलेल्या पात्र रचनेमुळेच 

सिंहासन या मराठीतील ऑल टाइम ग्रेट म्हणता येईल अश्या  चित्रपटाची मूळकथा आपल्यास चित्रपट समजण्यासाठी मदत तर करतेच मात्र राजकारण कसे चालते ? या बाबत देखील आपणास खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. आपल्या येथील इंधनाचे भाव काय असतील आपण आपल्या घामाच्या पैशातील किती रक्कम कररूपाने देणार आहोत आपला कर सरकार कोणत्या कारणास्तव खर्च करणार आहे? आपल्या प्रदेशात कोणत्या  नवीन उदयोग धंद्याच्या संधी निर्माण होणार आहेत हे सर्व राजकारणी व्यक्तीमार्फत समजते त्यामुळे राजकारण समजल्यास आपणस जवाबदार नागरिक होण्याच्या प्रक्रियेत मदत होऊ शकते  त्यामुळे आपण हे पुस्तक वाचघायलाच हवे 


सिंहासन या कादंबरीविषयी मी याच्या आधी लिहलेला लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा


https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2023/11/blog-post.html 

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीची साविस्तर माहिती देणारे पुस्तक, 'नॅनोदय'

       
 आपल्या सर्वांचेच आयुष्य गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बदलले आहेत १९९० ते २००० या दहा वर्षाच्या  आसपास जन्मलेल्या माझ्यासारख्याव्यक्तींचे  आयुष्य त्यांच्या पालकांपेक्षा पुर्णतः वेगळे ठरले  या बदलला या काळात अत्यंत झपाट्याने  झालेली  तंत्रज्ञनातील प्रगती असे ठराविक साच्याचे उत्तर देता येते असले तरी अधिक सविस्तरपणे आणि बिनचूकपाने उत्तर देयचे झाल्यास या मागे या मागे  नॅनो टेक्नॉलॉजी आणि आता आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग होऊ घातलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामुळे आपले जीवन मागच्या पिढीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे हे नाकारून चालणार नाही .तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा नॅनो टेक्नॉलॉजी  आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजिनयस )  या डाँग गोष्टीमुळे आपले जीवन मोठ्या प्रमाणात बदलले आहे त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) हे क्षेत्र अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हण्टले तरी चालू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामध्ये  भविष्यातअजून मोठ्या प्रमाणात प्रगती होऊन  आपण सध्या कल्पनाही करू शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील हे नक्की तर नॅनो टेक्नॉलॉजी  हे क्षेत्र पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहे.आज  नॅनो टेक्नॉलॉजीची या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात संशोधन होत असले तरी त्याचे आकर्षण काहीसे कमी झाले आहे मात्र गेल्या काही वर्षात मानवी राहणीमानात काय बदल झाला हे अभ्यासण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीची मुळातून माहिती  आहे. आणि आपली ही  गरज पूर्ण होते ती, राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित  'नॅनोदय' या पुस्तकामुळे.  अच्युत गोडबोले यांनी डॉ. माधवी सरदेसाई यांची मदत घेऊन लिहलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
            'नॅनोदय'या पुस्तकामुळे आपणस आपणास  नॅनो टेक्नॉलॉजीचा इतिहास, त्यामागची तांत्रिक माहिती, आणि तिचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारे होत आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान अजून कोणत्या प्रकारे वापरता येऊ शकते याविषयी रंजक माहिती मिळते अच्युत गोडबोले यांच्या अन्य माहितीविषयक पुस्तकात  असते त्याप्रमाणे या पुस्तकात देखील इंग्रजी संकल्पनाच वापरलेल्या आहेत अन्य शास्त्राविषयक
पुस्तकात जसे संकल्पना मराठीत स्पष्ट करताना संकल्पनांचे ओढून ताणून संस्कृतचा आधार घेत मराठीकरण केले असते त्याचा मागसुस देखील या पुस्तकात नाही व्यवहारात वापरण्यात येणारया इंग्रजी संकल्पनाच या मराठी भाषेतील पुस्तकात वापरल्या आहेत त्यामुळे पुस्तक सहजतेने समजते 
            सुमारे २७५ पानाच्या या पुस्तकात १५ प्रकरणाद्वारे नॅनो टेक्नॉलॉजी ही संकप्लना समजवून सांगताना लेखनाने या विकास केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी , या क्षेत्रात कोणत्या प्रकारे होते हे स्पष्ट केलेलं आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री या विज्ञानाच्या शाखेत नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर कसा होतॊ हे सांगतान लेखकाने अणूची अंतर्गत  रचना, रेणूची अंतर्गत रचना, एखाद्या पदार्थातील अणूचे परस्परांमध्ये  असणारी  विविध बले आकर्षण तसेच क्वाटम मॅकेनझीम . या संकल्पना सविस्तरपणे स्पष्टतसे केल्या आहेत तसेच या संकल्पना आणि नॅनो टेक्नॉलॉजी याच्याही सहसंबंध सविस्तरपणे उलगडून सांगितला आहे . बायोलॉजी विषयी सांगताना त्यांनी सूक्ष्मजीवांच्या मानवी आयुष्यात असणारे महतव आणि त्यामुळे  होणारे नुकसान  नॅनो टेक्नॉलॉजीकसे टाळता येईल   तसेच क्लोन तंत्रज्ञानाचे फायदे तोटे आणि त्याच्या  नॅनो टेक्नॉलॉजीशी असणारा सहसंबंध  शस्त्रकियेमध्ये होणारे चांगले बदल ,शेतीत कोणत्या प्रकारे चांगली पिके घेता येतील या विषयी सांगितले आहे  नॅनो टेक्नॉलॉजीमुळे होणाऱ्या बदलात अच्युत गोडबोले यांनी औद्योगिक उत्पादनात काय बदल
होतील यावर प्रकाश टाकताना रोबोनॅनोटिक्स  ही संकल्पना पुस्तकाची सुमारे १० पाने खर्च करून सविस्तर सांगितली आहे   नॅनो टेक्नॉलॉजीमुले माहिती आणि दूरसंचार क्षेत्र पूर्णतः बदलून जाईल  देखील शकणार नाही असे बदल या क्षेत्रात होतील असे अच्युत  या पुस्तकात  सांगितले आहे त्यासाठी पुस्तकातील २० पाने खर्च करण्यात आलेली आहे पुस्तकातील सुरवातीचा एक त्रितीयांश भाग अर्थात ८० पाने लेखकाने  नॅनो टेक्नॉलॉजीच्या इतिहासावर सांगितला आहे यामध्ये लोक  तंत्रज्ञान वापरत होते का ? असल्यास कोणत्या पद्धतीने वापरत असतील तसेच १९९० पर्यंत  नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काय संशोधन झाले याविषयी सांगितले आहे 
           सध्या सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी बोलले जात असले तरी  नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपल्या  आमूलार्ग बदल झाला आहे त्यामुळे तंत्रज्ञान आपणास माहिती असल्यास सोन्याहून पिवळे आपण जी गोष्ट वापरतो त्यातील मूलभू समजणे ती गोष्ट वापरण्यास आवश्यक नसले तरी तो आनंद अवर्णनीयच त्यासाठी  तरी हे पुस्तक वाचणे आवश्यक 
 

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

एका दुर्देवी प्रेम त्रिकोणाचा समग्र वेध घेणारे पुस्तक ' व्यस्त ओढीचा त्रिकोण'

       

  आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त  गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव  जवळ आलेल्या  एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू  या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील,  मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी .  गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अनेक माध्यमात आणि अनेक भाषेत लेखन प्रसिद्ध झाले आहे मात्र तरीदेखील लोक त्यांच्या मृत्यूस ६० वर्षे झाली तरी अजूनही लिहीत आहेत . यातच त्यांचे थोरपण दिसून येते त्यांचा या अकाली जाण्याविषयीच लिहलेले एक पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्वाची सांस्कृतिक संस्ख्या असेलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशियक यांच्य सहकार्याने वाचले . 

 'व्यस्त ओढीचा त्रिकोण या प्रतीक प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि कृ, दा. परांजपे लिखित या सुमारे १५० पानी पुस्तकात १० प्रकरणाद्वारे या दुर्दवी घटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे यातील पहिल्या ५ प्रकरणात गुरुदत्त यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द कॊणत्या प्रकारे बहरात गेली. याचा सविस्तर आढावा घेण्यात अली या आढाव्यात त्यांची वहिदा रेहमान यांच्याशी कोणत्या प्रकारे ओळख झाली हे सांगण्यात आले आहे तर शेवटच्या पाच प्रकरणात मोठ्या प्रमाणात वहिदा रेहमान यांच्यामुळे गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्यात तणावाचे प्रसंग येऊ लागले त्याला गीता दत्त आणि गुरुदत्त वहिदा रेहमान यांच्या जवळपासच्या व्यक्तीमुळे कसे प्रकारे खतपाणी मिळाले याविषयी सविस्तरपणे सांगण्यात आले आहे पुस्तकाचे शीर्षक असलेल्या विषयाबाबत अर्थात गुरुदत्त गीता दत्तआणि वहिदा रहेमान यांच्यातील वादाबाबात भाष्य करताना लेखकांनी   पुस्तकाची ६० %जागा व्यापली   आहेतर ४० % जागा गुरुदत्त यांचा एकूण चित्रपट सृष्टीतील प्रवाश्यावर भाष्य करणारी आहे  

पिवळ्या  रंगाचे मुखपृष्ठअसलेल्या या पुस्तकावर असलेले गुरुदत्त गीता दत्त आणि वहिदा रहमान याचे कृष्णधवल फोटो आपले लक्ष चटकन वेधून घेतात, आणि ज्यांना या विषयाचे थोडीतरी पार्श्वभूमी असलेल्या ,माझ्यासारख्या अनेकाना वाचायला प्रवृत्त करताच .या पुस्तकात शेवटच्या पाच प्रकरणात गुरुदत्त  यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्याद्वारे गुरुदत्त आणि वहिदा रहेमान हे एकत्र येत आहे असा गैरसमज गीता दत्त यांच्यात कसा बळकावला तो दूर कारण्यासासाठी गुरुदत्त यांनी काय काय प्रयत्न  केले  याविषयी माहिती देण्यात आला आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर आणि सुरवातीच्या प्रास्ताविकेत कादंबरी असा उललके असला तरी हे पुस्तक कोणत्याच प्रकारे कादंबरी असे वाटत नाही तर अत्यंत सोप्या भाषेत  अनेक तांत्रिक गोष्टीला बगल देत ज्यांना या विषयाची काहीच माहिती नाही सध्या सर्वसामान्य व्यक्तींना या विषयाची माहिती देणारे

पुस्तक म्हणून या कडे बघावे लागेल मी जेव्हा हे पुस्तक हातात घेतले तेव्हा हा कादंबरी हा उल्लेख वाचला तेव्हा मला गो . नि . दांडेकर यांनी लिहलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या 'दास डोंगरी राहतो ' या गोष्टीवेल्हाळ चरित्रासारखे हे पुस्तक असेल असे वाटले होते मात्र हे पुस्तक त्या प्रकारचे बिलकुल नाही गोष्टीवेल्हाळ पणा या पुस्तकात मला औषधाला अगदी १ % देखील आढळला नाही या पुस्तकात संपूर्णपणे गुरुदत्तचा उल्लेख एकेरी तो गुरुदत्त या प्रमाणे केलेला असला तरी त्यामुळे हे पुस्तक कादंबरी प्रकारात मोडता येऊ शकत नाही सुरवातीलाच्या एक दोन प्रकारात आपणस लेखन कादंबरीप्रमाणे काहीसे वाटते मात्र त्यानंतरच्या प्रकारांमध्ये हे पुस्तक पूर्णतः माहितीप्रधान लेखाचे स्वरूप घेते 

आपणास या घटनेची संपूर्ण माहिती असली तरी हि माहिती किती सहजतेने सांगता येऊ शकते या साठी किना ज्यांना या विषयी काहीही माहिती नाही त्यांना या विषयाची टॉड ओळख होण्यासाठी आपण सर्वांनी किमान एकादफा तरी हे पुस्तक वाचायलाच 

 

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

जपानच्या कार्यसंस्कृतीतून देशाची ओळख करून देणारे पुस्तक 'जपान'

             
      जेव्हा आपण कोणतेही कारण असो आपला प्रदेश सोडुन दुसऱ्या देशात जातो,तेव्हा नवीन प्रदेश आपल्याशी विविध प्रकारे संवाद साधत असतो.तेथील पर्यटनस्थळे आपण ज्या प्रदेशात आलोय,त्या प्रदेशाचा ऐतिहासिक वारसा तसेच त्या प्रदेशावर निसर्गाने केलेली उधळण सांगत असतात, तर आपल्या वास्तवात आपल्या ज्या लोकांशी संपर्क येतो ते लोक त्या लोकांची परदेशी लोकांविषयीची भावना, तेथील कार्यसंस्कृती, तेथील समाजजीवनातील व्यक्तींचे स्थान, त्यांची स्वत:च्या प्रदेशाविषयीची भावना तसेच दुसऱ्या ज्या प्रदेशातून आपण आलेलो असतो,त्या प्रदेशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता याविषयी माहिती देत असतात.या संवादातून आपणास त्या प्रदेशाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते.या माहितीमुळे आपले त्या प्रदेशाशी आपली नाळ देखील जोडली जावू शकते असी नाळ जोडली गेल्यास आपण सातत्याने त्या प्रदेशात जावू इच्छितो,तेथील लोकांशी आपली मैत्री देखील होते. आपण दुसऱ्या प्रदेशात गेल्यावर आपणास आलेले अनुभव जर लिहुन प्रसिद्ध केले तर आपले अनुभव वाचून इतर लोकसुद्धा त्या प्रदेशाविषयी माहिती करुन घेवू शकतात.त्यामुळे प्रवासवर्णने अत्यंत महत्ताची ठरतात.आपल्या मराठीत पु.ल.देशपांडे यांची प्रवासवर्णने अत्यंत प्रसिद्ध आहेत.सध्याचा काळात मीना प्रभू यांनी लिहलेली प्रवासवर्णने विशेष प्रसिद्ध आहेत.याच प्रवासमालिकेत समाविष्ट होवू शकेल असे प्रवासवर्णन मी नुकतेच सार्वजनिक वाचानावल नाशिक या नाशिकमधील सर्वात जून्या सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित संस्थेच्या सहकार्याने वाचले.
                          अविनाश भिडे यांनी त्यांच्या सुमारे पाच ते सहा महिन्याचा जपानच्या वास्तव्यात  जपानची जी कार्यसंस्कृती अनुभवली त्याचे शब्दरूप म्हणजे मी वाचलेले हे पुस्तक होय. व्यवसायाने इंजिनियर आणि एका  मेकॅनिकल कंपनीत उच्चपदस्थ असलेले, अविनाश भिडे हे भारतात कार्यरत असणाऱ्या, आपल्या कंपनीत बसवण्यात येणाऱ्या, एका यंत्राचे तांत्रीक प्रशिक्षण घेण्यासाठी, क्योटो मशिन कंपनीत गेले होते.त्यावेळी त्यांनी जपानची कार्यसंस्कृती जवळून अनुभवली. आपण अनुभवलेली जपानची संस्कृती त्यांना इतरांनी देखील अनुभवावी,असे वाटले.त्यामुळे त्यांनी आपले अनुभव पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले.तेच हे सुमारे २००पानांचे पुस्तक. या पुस्तकाचे प्रकाशन सुकृत प्रकाशन करण्यात आलेले आहे.

                सुमारे २०० पानाच्या या पुस्तकात ५७ विविध प्रकरणातून लेखकाने आपले वैयक्तिक अनुभव मांडले आहेत. या पुस्तकातून आपणास जपानी लोकांची आपल्या कार्याप्रती असलेली आत्मियता, त्यांची देशाप्रती असणारी निष्ठा, देशाचे अतिप्रगत तंत्रज्ञान, तेथील सामाजिक समरसता, परदेशी लोकांप्रती विशेषत: भारतीयांबाबत असणारी आपुलकी अस्या विविध गोष्टीची माहिती मिळते.प्रत्येक प्रकरणाच्या सुरवातीला  या प्रकरणात काय वाचायला मिळणार हे पानाच्या एका बाजूला वेगळ्या रंगसंगतीत दिले आहे,त्यामुळे प्रत्येक प्रकरण सहजतेने समजते.पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे.तसेच प्रत्येक प्रकरण जास्त लांबण न लावता आटोपशीर पद्धथतीने लिहलेले असल्याने अत्यंत वाचणीय झाले आहे,जे सहजतेने समजते.पुस्तकाची भाषा खुप सोपी  सहजतेने समजणारी आहे.
                       जपानची कार्यसंस्कृतीविषयी बोलताना लेखकाने  त्यांची झिरो डिफेटेव्ह पद्धत,त्यांचे वेळेचे नियोजन, कायझेन पद्धत, टिम स्पिरीट,कोणत्याही गोष्टीचे सुक्ष्म नियोजन,इतरांचा साहनभुतीपुर्वक विचार करण्याची वृत्ती, क्वालिटी सर्कल ही संकल्पना वाडवडीलांच्या कर्तुत्वावर टिमकी वाजवण्यापेक्षा  स्वकर्तृत्वाला जपानला देण्यात आलेले महत्व आपणास सांगितले आहे. जपानी लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाविषयी बघायचे झाल्यास पुस्तकाचे वाचन केल्याने आपणास जपानची खाद्यसंस्कृती, तेथील लोकांची परिसर स्वच्छतेबाबतची खोलवर रुजलेली जाणिव, आपल्या वारकरीसारखी तेथील दिंडीची परंपरा, तेथील पोलीसी व्यवस्था,लोकांंची दुसऱ्यास मदत करण्याबाबतचा सहजभाव, वाहतूकीचे नियम पाळण्याचा त्यांची सहजवृत्ती,आदिंविषयी माहिती मिळते‌.तर त्यांचा बुलेट
ट्रेन,डायव्हरविरहीत ट्रेन ,टोकियो  टॉवर यांच्यविषयी वाचल्याने आपणास जपानचे तंत्रज्ञानातील हुकूमत समजून येते. तर लेखकाने आपल्या कामाच्या ठिकाणी, राहण्याचा ठिकाणी  बरोबर असलेल्या लोकांबरोबर केलेल्या चर्चेतून आपणास जपानी लोकांचा भारताविषयीचा स्नेह,तसेच जपानी लोकांचा देशाभिमान, याविषयी माहिती मिळते..
आपण स्वत: जपानला गेले असल्यास आपले अनुभव ताडून बघण्यासाठी आणि न गेल्यास भारतात राहुन देखील जपान अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे..





उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...