सुमारे पावणेतीनशे पानाचे हे पुस्तक, चीनचे नेतृत्व, राजकारण, अर्थकारण, करोनाचे हत्याकांड या चार भागात विभागले आहे. प्रत्येक भाग विविध प्रकरणात विभागला असून पुस्तकात एकुण ४५ प्रकरणे आहेत. मुखपृष्ठावर लाल रंगाच्या पार्श्वभुमीवर पृथ्वीला गिळू पाहणाऱ्या ड्रॅगनचे छायाचित्र पुस्तक कोणत्या विषयावर आहे, आणि पुस्तकाचा रोख कोणत्या बाजूने आहे, हे सहज दाखवून देते. पुस्तकात देखील चीन जागतिक महासत्ता होण्यासाठी किती आसुसलेला आहे, तो अमेरीका आणि आपल्या भारताच्या प्रगतीसाठी स्पर्धक नसुन शत्रू आहे.हे स्पष्ट करुन सांगितले आहे.हे.मी या आधी चीनविषयक वाचलेल्या पुस्तकाच्या तूलनेत पुस्तकाची भाषा काहीशी कठिण आहे. अर्थात इतर पुस्तकापेक्षा यामध्ये चीनविषयक सखोल चर्चा करण्यात आलेली आहे ,हे सुद्धा खरे आहे. पुस्तक चीनविषयक जाणकार व्यक्तीने लिहले आहे,मराठी भाषा जाणकराने नाही त्यामुळे भाषेचा अवघडपणा क्षम्य आहे.
पुस्तकाची पहिली आवृत्ती ही जानेवारी २०२३रोजी निघाली असल्याने, पुस्तकात अगदी आताची ताजी माहिती मिळते, असे म्हटलास वावगे ठरणार नाही.मराठीतील अन्य चीनविषयक पुस्तकांमध्ये प्रामुख्याने १९७८ नंतर चीन कोणत्या प्रकारे बदलला यावर अधिक भर देत असताना (किमानपक्षी मी वाचलेल्या) हे पुस्तक त्याचा ओझरता ऊल्लेख करत मुख्य भर विद्यमान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यावरच करते.पुस्तकात चीनबाबत योग्य ती रणनिती आखण्याबाबत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन कसे कमी पडले.या चूकीच्या रणनितीचा चीनला कोणत्या प्रकारे फायदा झाला यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. नविन सिल्क रूटमुळे जागतिक स्तरावर व्यापारात होणारे बदल ,चीनचे चलन युऑन हे डॉलरला पर्याय म्हणून उभे करण्यासाठी चीन करत असलेले प्रयत्न, चीनमुळेनव्या शीतयुद्धाचा धोका कोणत्या प्रकारे तयार होत आहे.व्यापारी प्रश्नांवरुन चीन आणि अमेरिका या दोन देशातील संबंध कसे ताणले गेले आहेत? चीनच्या कर्जाचा विळख्यात कोणत्या प्रकारे देश सापडत आहे.कोव्हिडमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेमुळे कोणते बदल झाले.या काळात चीन आणि अमेरीका राजनैतिक संबंधात कोणत्या प्रकारे बदल झाला.शि जिनपिंग यांच्या राजकीय प्रवास कोणत्या प्रकारे झाला. चीनमधील छळछावण्या, तैवानप्रश्नी सर्वसामान्य चीन नागरिकांची,आणि चीनी सरकारची भुमिका आणि वस्तूस्थिती, शि जिनपिंग यांची चीनमधील एकाधिरशाही हुकुमशाही, चीनमधील मानवी मुल्यांच उल्लंधन आदी विविध विषयांवर पुस्तकात सविस्तर चर्चा केली आहे.
आपल्या भारतीयांसाठी कळीचा मुद्दा असलेल्या भारत चीन संबधावर लेखकाने अन्य चीनविषयक पुस्तकाप्रमाणे स्वतंत्र्य प्रकरणाद्वारे भाष्य केलेले नाही. तर भारत चीन संबंधांवर, भारत चीन यांच व्यापारयुद्ध आणि भारताला संधी,युरोप चीन भारत या तसेच चीनची पुन्हा जीत:भारताची हार या प्रकरणाद्धारे भाष्य केले आहे सुमारे पावणेतीनशे पानांच्या या पुस्तकात सुमारे १८पाने लेखकाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यरीता भारत चीन संबंधावर भाष्य करण्यासाठी खर्ची घातली आहेत. यामध्ये चीनचे युरोपीय यूनीयसी असणारे ताणलेले आर्थिक हितसंबंध आणि त्यामुळे होणारा भारताचा फायदा, चीन भारत राजनैतिक चर्चांमध्ये भारत पुर्वीपासून घेत असलेली मवाळ काहीशी पराभुताच्या मानसिकतेची भुमिका तसेच चीन घेत असलेली आढ्यतेची अहंपणाची भुमिका, मोदींमुळे या भुमिकेत होणारे बदल, भारताचे लष्करी,हवाई बळ आणि चीनचे लष्करी हवाई बलाबळ, तसेच अमेरिका चीन व्यापारी युद्धाचा भारतातील कारखानदारीला कोणत्या प्रकारे फायदा होवू शकतो आदी बाबींचा समावेश आहे.
पुस्तकाची भाषा समजण्यास थोडी कठिण असली,पुस्तक वाचताना कंटाळा येण्यासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असली तरी पुस्तक खुपच माहितीपुर्ण आहे हे नाकारता येत नाही.मी आतापर्यत मराठी भाषेत चीनविषयक वाचलेल्या पुस्तकापैकी सर्वात माहितीपुर्ण पुस्तक म्हणून या पुस्तकाची निवड करेल.चीनविषयक आपल्या अनेक धारणा या पुस्तकामुळे दुर होवून आपणास वस्तूस्थिती समजते.मग वाचणार ना पुस्तक.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा