लेखाचे विषय

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

                

मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे  सांगत समर्थ रामदास स्वामी १७व्या शतकातच एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी निरोगी प्रसन्न मनाचे किती महत्व आहे हे सांगितले समर्थ रामदास स्वामी यांच्याच मनाचे श्लोकात देखील मन किती महत्वाचे आहे  "हे मना सांगा मना रावणा काय झाले अकस्मात राज्य ते राज्यही सर्वही बुडाले या सारख्या श्लोकातून मन खंबीर असणे किती आवश्यक आहे हे पुन्हा पुन्हा सडांगितले आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्यानंतर २० व्या शतकात जळगावच्या कवियत्री बहिणाबाई यांनी त्यांच्या "मन वढाय  वढाय" सारख्या कवितेतून मनाच्या चंचलतेबाबत  सांगितले आहे आपल्या दुर्दैवाने या सारख्या  मोजक्या व्यक्तींचा अपवाद वगळता  आपल्या आयुष्यातील महत्वाच्या मात्र दुर्लक्षित अश्या मन या गोष्टीकडेआपण दुर्लक्षच केलेलं दिसते . मानवी वर्तनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या मन या गोष्टीबाबत सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगत फक्त रुग्णासाठीच नव्हे तर सर्वसामन्य व्यक्तींच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती,  संस्था त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.  या अश्या महत्त्वाच्या गोष्टीपैकीच एक म्हणजे ठाणे  या शहरातील इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ  अर्थात आय  पी एच आणि तिचे संस्थापक सुप्रसिद्ध मनोविकारतज्द्न्य डॉ  आनंद नाडकर्णी 

           इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल  हेल्थ   ही संस्था कोणत्या स्थितीत स्थापन झाली?  या संस्थेचे कार्य कोणकोणत्या समाजघटकासासाठी आहे ? संस्थेचेभौगोलीक कार्यक्षेत्र काय आहे ? संस्थेच्या कार्यामुळे समाजात काय काय फरक पडला ? समाजातून त्यांना कशा पाठिंबा मिळाला ? त्यात बदल झाला का ? संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत कोणत्या अडचणी आल्या .? त्यावर कॊणत्या उपाययोजना कऱण्यात आल्या? संस्थेचे दैनंदिन कामकाज कश्या प्रकारे चालते ? तिथे काम करणारे कोणत्या सामाजिक आणि मानसिक अवस्थेतून गेलेलेअसू शकतात ? संस्थापक  डॉ  आनंद नाडकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या संस्था कार्यावर परिणाम झाला का ? असल्यास तो कश्या प्रकारे सकारात्मक होता ? संस्थेने समाजातील दृलक्षित अश्या मनोरुग्ण या घटकांना समाजात उजळ माथ्याने जगता यावे या साठी काय उपक्रम राबविले अश्या अनेकविध प्रश्नाची उत्तरे आपणास हवी असतील तर आपण  इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्प अर्थात आय  पी एच संस्थापक सुप्रसिद्ध मनोविकारतज्द्न्य डॉ  आनंद नाडकर्णी  यांनी लिहलेले शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट हे पुस्तक वाचायलाच हवे मी हि हे पुस्तक नुकतेच वाचले 

       सुमारे पावणेतीनशे पानाच्या या पुस्तकात २६ विविध प्रकरणांतून लेखकाने तो स्वतः मानसशास्त्राकडे कश्या प्रकारे ओढला गेला ? त्याला याबाबत घरच्यांकडून कश्या प्रकारे आणि का विरोध झाला /? मात्र त्या विरोधावर लेखकाने आपले मित्र प्राध्यापकांच्या मदतीने कशी मात्र केली संस्था उभारावी याची कल्पना त्यांच्या मनात कशी आली ? संस्थेच्या श्रीगणेशा करताना त्यास कोणकोणत्या अडचणी आल्या मात्र या अडचणीत सुद्धा मदत करणारे हात कसे पुढे आले या हाताच्या मदतीने स्वतःच्या मानसशास्त्रीय ज्ञानाचा आधाराने त्याने या संकटाचा कसा यशश्वी सामना केला ? संस्थेचे कार्य कसे तळागाळापर्यंत नेले ? हे नेताना संस्था उभारण्यापूर्वी मुंबईच्या रुग्णालयात दिलेल्या सेवेतील अनुभवाचा  कशा फायदा करून घेतला . आपला व्यस्त दिनक्रम यशस्वीपणे पुढे नेताना संस्थेतील कर्मचाऱ्यांची त्यास कशी मदत होते ? संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवताना ते उपक्रम कोणकोणत्या टप्यातून गेले आदी विषय उलगडले आहेत 

      काही जणांना हे संक्षिप्त स्वरूपाचे आत्मचरित्र वाटेल मात्र  हे कोणत्याही अंगाने आतमचरित्र  नाही या पुस्तकात सुरवातीची हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी पाने सोडता कुठेही लेखकाने स्वतःच्या उल्लेख केला आहे असे आपणास आढळत नाही सुरवातीची पाने वगळता  लेखकाने आपल्या लेखनात कायम आपल्या संस्थेला आणि

संस्थेतील कर्मचारीवृन्द लेखनाच्या केंद्रस्थानी येतील अशी काळजी घेतल्याचे वारंवार दिसून येत  आहे सुरवातीच्या ज्या पानांमध्ये स्वतःच्या उलेल्ख केला आहे त्यामध्ये कुठेही स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केला आहे असे जाणवत नाही किंबहुना पुस्तकाची गरज म्हणून अपरिहार्यतेतून केलेला उल्लेख म्हणूनच स्वतःचा उल्लेख केलेला आहे हे लेखनातून जाणवते एका अर्थाने हा माहितीपटच  आहे . माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट 

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

चीनच्या प्रगतीची कुळकथा सांगणारे पुस्तक "चिनी महासतेचा उदय - डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग"

    

चीन,भारता  इतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश , भारताच्या महासत्ता पडला अडथळा ठरणारा देश , भारताबरोबर सीमावाद असणारा आणि त्या वादाला वेळोवेळी ताजे करणारा देश म्हणजे चीन भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तानसह भारताच्या सर्व शेजाऱ्यांना आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी धडपडणारा देश म्हणजे चीन भारताबरोबर शांघाय को ऑपरेशन हे संघटन तसेच  ब्रिक्स संघटना  आदी विविध आंतराष्ट्रीय व्यासपीठवरील सहकारी.   स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या पहिल्या अमेरिकी दौऱ्यात ज्या २ देशांचा उल्लेख हे देश  निद्रिस्त ड्रॅगन  आहेत आणि हे  ड्रॅगन जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवेल असा केला होता त्यापैकी एक देश म्हणजे चीन  (दुसरा देश जपान ) स्वामी विवेकानंद यांनी निद्रिस्त ड्रॅगन म्हणून उल्लेल्ख केलेला चीन हा खरोखर १९७८ पासून जागा झाला आणि तो आता खरोखर जगाची झोप उडवत आहे या दरम्यानचा त्याचा प्रवास सांगणारे पुस्तक म्हणजे निवृत्तीनंतर नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेले सनदी अधिकारी सतीश बंगाल यांनी लिहलेले आणि साधना प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तक  "चिनी महासतेचा उदय - डेंग  झिओपेंग ते क्षी जिनपिंग" जे मी नुकतेच नाशिकमधील सांस्कृतिक संघटना असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना ) च्या पुस्तक संग्रहाच्या मदतीने वाचले 

      सन २०२० साली साधना मासिकात लेखमालिका स्वरूपात प्रसिद्ध लेखांचे विस्तारित स्वरुपाप्त केलेले एकत्रीकरण म्हणजे सदर पुस्तक मूळच्या लेखांमध्ये वाढ करत लेखकाने  लिहलेले आहे सुमारे चारशे पानाचे हे हे पुस्तक ९ भागात विभागले असून प्रत्येक भाग सुमारे तीन  ते पाच प्रकरणात विभागाला आहे पुस्तकात

३९ प्रकरणे असून त्याद्वारे लेखकाने आपणास चीनरूपी ड्रॅगन कसा जागा झाला?  याची ओघवत्या शैलीत मात्र तपशीलवारपणे माहिती दिली आहे 

         पहिल्या भागात एकच प्रकरण असून या मध्ये लेखकाने नेतृत्वाच्या पाच पिढ्या या प्रकरणातून माओ यांच्या कालखंडातून क्षी जिनपिंग यांच्या कालखंडातपर्यंत चीन कसा प्रकारे बदलत गेला याविषयी माहिती दिली आहे या प्रकरणाद्वारे पुस्तकाची बैठक आपल्याकडे तयार होते समाज आणि क्रांती या या दुसऱ्या भागात चीनच्या सुप्रसिद्ध क्रांतीची पार्श्वभूमी दोन प[प्रकरणातून लेखकाने आपल्या समोर मांडली आहे तिसऱ्या भागात सहा प्रकरणातून माओचा कालखंडात चीन कसा होता ?याविषयी आपणस माहिती मिळते आर्थिक सुधारणांचे पहिले पर्व असे नाव असलेल्या चवथ्या भागात आपणास १९७६ ते १९८८या कालखंडात चीनमध्ये कसे बदल झाले या बदलामागे तैवान आणि हाँगकाँगमधील बदल कसे कारणीभूत होते स्पेशल इकॉनॉमी झोन या आपल्याकडे काहिस्या उशिरा आलेल्या संकल्पनेद्वारे चीनचा विकास कश्या प्रकारे झाला याविषयी समजते पाचवा भाग  चीनमध्ये मानवी हक्कांची कशी पायमल्ली होते चीनमध्ये कशी लोकशाही नाही याविषयी बोलताना नेहमी केला जातो त्या तिआनमेन चौकातील हत्याकांडविषयीच्या घटनांवर प्रकाश टाकतो चार  प्रकरणातून हि दुर्दैवी घटना होण्यामागे पहिल्या  सुधारणा पर्वामुळे झालेल्या आर्थिक समृद्धीचा कसा रोल होता हे सांगण्यात आले असून पहिल्या दोन प्रकरणात यामागची पार्श्वभूमी सांगण्यात आलेली आहे तर तिसऱ्या प्रकारांत प्रत्यक्ष घटनेची माहिती दिली आहे या भागाच्या शेवटच्या चवथ्या प्रकरणात या घटनेमुळे निर्माण झालेल्या नंतरच्या घटना कश्या हाताळल्या ते सांगितले आहे सहाव्या भागात चार प्रकरणाद्वारे डेंग  झिओपेंग यांच्याकडून  हू जिंताओ यांच्याकडे सत्ता जाताना काय बदल झाले यावर आर्थिक सुधारणानाचे दुसरे पर्व या शीर्षकाखाली माहिती देण्यात आलेली आहे सातव्या भागात क्षी जिनपिंग" यांच्याकडे सत्ता कशी आली त्यांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या याबाबत सांगण्यात आले आहे आठव्या भागात बदलत्या आर्थिक समीकरणात चीनच्या परराष्ट्र धोरणात काय बदल;झाले याबाबत

महत्वकांक्षी चीन या शीर्षकाखाली आढावा घेण्यात आला आहे शेवटच्या ९ व्या भागात भारत चीन संबंध कसे आहेत ?त्यामध्ये काय बदल होणे भारताला उत्तम ठरेल याबाबत तसे चीनची भविष्यतील वाटचाल कशी असेल याबाबत सांगण्यात आले आहे

       हार्ड बाउंड कव्हर असेले चीनचा रंग म्हणून विख्यात असणाऱ्या  लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर  डेंग  झिओपेंग  आणि क्षी जिनपिंग" यांच्या फोटो असलेले मुखपृष्ठ बघता क्षणी आपले लक्ष वेधून घेते ५०० रुपयाचा या पुस्तकात मलपृष्ठावर पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देण्यात आलेली आहे इंग्रजीत या विषयावर लिहलेली अनेक पुस्तके ताहेत मात्र आपल्या मातृभाषा असलेल्या मराठीत या विषयावर माहितीपूर्ण असणाऱ्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात वानवा आहे हि अडचण हे पुस्तक मोठ्या प्रमाणात कमी करते मग वाचणार ना हे पुस्तक 

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

वर्तमान जागतिक राजकारणाचे पैलू उलगडणारे पुस्तक ; तेल नावाचे वर्तमान

 एखाद्या व्यक्तीची एखाया विषयावरची मते आपणास पटली नाहीत ,म्हणून त्या व्यक्तीच्या सर्वच कामाकडे कानाडोळा कारणे तसे चुकीचेच .समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे "उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळीत ते टाकुनी द्यावे हे वचन याबाबत अमलात आणले तर आपला फायद्याचं असतो . ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुमार यांना हे वचन चपखल लागू होते त्यांची देशातील\राजकारणाविषयीची  मते काहीही असो ते  क्षणभर बाजूला ठेवत बघितले तर  त्यांच्या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नैसर्गिक इंधनाच्या विषयातील हुकूमत नाकारता येणे अवघडच .  या विषयावर त्यांनी चार पुस्तके लिहली आहेत ती म्हणजे हा "तेल नावाचा इतिहास आहे. एका तेलियाने  अधर्म युद्ध आणि तेल नावाचे वर्तनमान. या पुस्तकातील तेल नावाचे वतर्मान हे पुस्तक मी नुकतंचसार्वजनिक वाचनायलाय  नाशिक यांच्यासहकार्याने  वाचले  (त्यातील हा "तेल नावाचा इतिहासआहे   .आणि  एका तेलियाने हि पुस्तके मी या आधीच  वाचली आहेत ज्यांना त्याविषयी जाणून घेयचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे )  

      सुमारे सव्वा दोनशे पानाच्या या पुस्तकात तेरा प्रकरणाद्वारे या पुस्तकात तेल आणि सध्याच्या जागतिक राजकारणाची माहिती दिली आहे दक्षिण मलेरिकेतील व्हेनिझुला या देशातील आणि अमेरिकेचे संबंध कोणत्या कारणामुळे खराब झाले? तेल किमतीतील चढउताराराचा आपल्या देशातील राजकारणावर कशा फरक पडला ?इस्लामिक स्टेट ऑफइराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेची निर्मिती होण्यामागची पार्श्वभूमी काय होती ?अन्य दहशतव्वदी संघटनेच्या तुलनेत ती अधिक धोकादायक कशी ? २०११ साली झालेल्या अरब स्प्रिंग मागे
तेलाच्या राजकारणाची काय भूमिका होती ? आफ्रिका खंडातील तेल उत्पादक देशातील दहशत्वादला साह्य ठरतील अश्या राजकीय घटना कोणत्या ? पश्चिम आशियाई देशांच्या तेल विषयक काहीश्या मनमानी कारभाराला छाप बसावा या ससाठी भारत आणि अमेरिकेने काय उपाययोजना केल्या या तेल विषयक घडामोडींसह भविष्यात इलेट्रीक वाहने आल्यावर ते राजकारणे कसे बदलू शकते / इलेट्रीक वाहन निर्मितीचा काय इतिहास आहे याबाबत पुस्तकामध्ये आपणास मिळते 
       पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी असल्याने पुस्तक सहजतेने समजते पुस्तक कुठेही कंटाळवाणे बोजड होत नाही लेखाच्या ओघात ज्यांचे नामउल्लेख आलेले आहेत  त्यांच्या फोटो वापरला असल्याने फक्त मजकुराचीच भारंभार भरती असल्यावर लेखाला येणारा बोजडपणा कुठेही जाणवत नाही पुस्तकासाठी वापरलेली फॉन्टसाईझ देखील उत्तम आहे त्यामुळे डोळ्यांवर विशेष ताण येत नाही त्यामुळे पुस्तक वाचनाची रंजकता वाढते 
           आपल्या मराठीत सध्या अनेक विषयावरची   नवनवीन पुस्तके येत आहेत ज्यामुळे मराठी समृद्ध होत आहे  हे नक्की मात्र या जागतिक राजकारण आणि त्याचा केंद्रबिंदू असलेल्या ऊर्जासाधनाची मालकी या
विषयवरची पुस्तके काहीशी कमीच आहे हि उणीव हे पुस्तक काही अंशी भरून काढते गिरीज कुबेराचा भारतीय राजकारांविषयीचा दृष्टिकोन काहीसा संजमान्यतेच्या विरोधात जात असला तरी तो क्षणभर बाजूला ठेवत हे पुस्तक वाचल्यास आपणस नवीन माहिती नक्कीच मिळू शकेल याबाबत खात्री बाळगा मग वाचतायना हे पुस्तक 
( हा "तेल नावाचा इतिहास आहे  .आणि  एका तेलियाने या  पुस्तकाविषयी मी आधी लिल्ल्या लेखाविषयी जाणून घेण्यासासाठी पुढील लिंकवर क्लीक करा )

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/12/blog-post.html 

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

तंत्रज्ञानाची अत पासून इती पर्यंत माहिती देणारे पुस्तक इन्फोटेक

               
सध्याचे आपले संपूर्ण विश्व हे तंत्रज्ञाने व्यापलेले आहे हे कोणीही मान्यच करेल आपल्यास तंत्रज्ञाने निर्मण केलेले उपकरण वापरतना त्यामागील तांत्रिक बाजूचे ज्ञान नसले तरी फारसे बिघतड नाही मात्र ते तांत्रीक ज्ञान समजल्यावर होणारा  आंनद काय तो वर्णावा . मात्र ते ज्ञान इंग्रजीत असल्याने अनेकजण त्यापासून मुकतात . बरे या माहितीचा  मराठी अनुवाद वाचून या संकल्पना समजून घ्याव्यात तर मूळच्या इंगजी भाषेतील मात्र रोजच्या दैनंदिन जीवनात वापरताना सहजतेने वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेचे संस्कृतच्या प्रभावाखालील भाषांतर वाचून मुळात अवघड नसलेला विषय अवघड झाल्याने समजत नाही त्यामुळे अनेकजण ज्ञानाचा आनंदाला पारखे होतात.  हीच बाब लक्षात घेऊन या संकल्पना मराठी भाषिकांना सहजतेने समजावा या उद्देश्याने  मूळच्या इंगजी भाषेतील संकल्पना तसाच ठेवत संकल्पनेतील आशय मराठीत मांडणारे लेखक म्हणजे अच्युत गोडबोले . अच्युत गोडबोले यांनी मानसशात्र, अर्थशास्त्र, बायोलॉजी नॅनोशास्त्र ,फिजिक्स  ,वेस्टन म्युझिक , आदी विविध विषयांची माहिती सोप्या मराठी भाषेत जवळपास २९ पुस्तके लिहली आहेत यातीलच एक पुस्तक म्हणजे त्यांनी इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाची माहिती देणारे इन्फोटेक हे पुस्तक 
                      नाशिक जिल्ह्यातील घोटी या गावचे मूळ प्रकाशन असलेलय मधुश्री प्रकाशनतर्फे प्रकाशित हे पुस्तक आपणास इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी च्या विविध गोष्टींची अत्यंत सोप्या भाषेत ज्यांचे आठवावीपर्यंत शिक्षण झाले आहे अश्या व्यक्तीला देखील समजले अश्या भाषेत अत्यंत सविस्तर माहिती देते . मराठीत ब्लॉकचेन सारख्या तांत्रिक विषयाची माहिती  देणारे पुस्तक असो किंवा ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या द फ्री व्हाईस या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणारे पुस्तक अश्या नवनवीन विषयावरची माहितीपूर्ण पुस्तके प्रसिद्ध करणारे प्रकाशन म्हणून घोटीचे मधुश्री प्रकाशन ओळखले जाते त्यांची हीच परंपरा हे पुस्तक पुढे नेते ४८८ पानाच्या या पुस्तकात ९ भागामध्ये आपणास इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाच्या विविध घटकांची सविस्तर म्हणता येईल अशी ओळख होते या पुस्तकाच्या प्रत्येक भागाची विभागणी विविध प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे त्याद्वारे
लेखकाने ही माहिती आपल्यासमोर मांडली आहे नाशिकमधील महत्वाची अग्रगण्य साहित्यिक संस्था असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना ) च्या पुस्तक संस्ग्रहातून मी हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
                ९ घटाकांमध्ये विभागलेल्या या पुस्तकातील पहिला घटक डेटा या विषयाबाबत माहिती देतो या घटकामध्ये सहा प्रकरणामध्ये बिट्स आणि बाइट्स म्हणजे काय आपण सहजतेने म्हणतो कि कम्प्युटरला फक शून्य आणि एकची भाषा समजते ते नक्की काय असते  मल्टिमीडिया  डेटा कॉम्प्रेशन -एन्क्रिशन . डीएमएस  एफएमएस तसेच डीबीएमएस या सारख्या डेटा मॅनेजमेंट सिस्टीम , डेटा मायनिंग आणि डेटा वेअर  हाऊस बिग डेटा आदी विषयी माहिती मिळते दुसऱ्या घटकाचे नाव जीपीएस गूगल मॅप्स जी आय एस हे आहे यामध्ये ४ प्रकरणाद्वारे सॅटेलाईट्स जिओग्राफ़िकल पोझीशनींग सिस्टीम अर्थात (जीपीएस ० गूगल मॅप्स आणि जी आय एस गूगल स्ट्रीट व्ह्यू , गूगल अर्थ याविषयी महती मिळते ४ प्रकणात विभागलेल्या सेन्सर्स IOT , IIOT असे नाव असलेल्या तिसऱ्या प्रकरणात बारकोडस एनएफसी  आणि रिमोट सेन्सिंग इंटरनेट ऑफ थिंग्स , सेन्सर्स आणि एंबेडेड सिस्टीम आदींची माहिती देण्यात आली आहे इतर महत्वाची तंत्र असे नाव असलेलय चवथ्या घटकात ६ प्रकरणाद्वारे ब्लॉकचें बिटकॉइन ३ डी प्रिंटींग , व्हर्चुएल रियालिटी , क्लाउड काम्पुटिंग गूगलग्लास आणि अंगमेन्डेतड रियालिटी आदींची तर नेटवर्किंग आणि इंटनेट या विषयीच्या विविध गोष्टींची माहिती आपणस पाचव्या घटकामध्ये मिळते सध्यासगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या मोबाईलच्या विषयी त्याच्या इतिहास , फ्रिक्वेन्सी रियुज जीपीएस आणि सीडीएम .एस एमएसएस ,जनरेशन्स आणि
कॉन्ह्र्जन या घटकाच्या आधारे माहिती सहाव्या भगत तीन प्रकरणाद्वारे मिळते  सध्या खूप चर्चेत असलेल्या अर्टिफीशियल इंटेलनजन्स या घटकाची माहिती आपणास ४ प्रकरणाद्वारे होते ती सातव्या घटकांमधून भविष्याचे तंत्रज्ञान असे नाव असलेल्या आठव्या भागात इंडस्ट्री ४ पाईंट ओ , बायो कम्प्युटर नॅनो कम्प्युटर क्वांटम कॉम्पुटर आदीची ओळख आपणस होते नववे प्रकरण आधीच्या तुलनेत बरेच किचकट असून यामध्ये पहिल्या प्रकरणात सांगितलेल्या बाईविषयी सविस्तर सर्व तांत्रिक बाबीचा समावेश करत माहिती देण्यात आली आहे 
      सध्या अनेकदा ऐकू येणारी बँडविथ ही संकल्पना मुळात काय आहे ईमेलचे कार्य कोणत्या कार्यपद्धतीवर चालते नेटवर्क टोपोलॉजीज म्हणजे काय ?नेटवर्क ट्रान्समिशनच्या पद्धती कोणत्या आहेत ? आदी संस्ख्या अनेक बाबींची ओळख आपणस हे पुस्तक वाचल्यावर होतेआपण इंटरनेटवर अनेकदा डेटा एककीकडून दुसरीकडे नेताना फाईल कॉम्प्रेस करतो त्यावेळी फाईलवर प्रत्यक्षात काय प्रकीर्या होते हि कॉम्प्रेस फाईल मूळ रूपात येते म्हणजे नक्की काय प्रक्रिया होते हे करण्यामागची मुळातील संकल्पना काय आहे नेटफ्लिक्सह सारख्या कंपन्यांचे कार्य असे कसे विस्तारित गेले आदींची माहितीआपणास या पुस्तकाद्वारे मिळते  पुस्तकामध्ये निव्वळ शाब्दिक माहिती देण्यात आलेली नसून योग्य त्या ठिकाणी योग्य अश्या आकृत्या वापरून विषय अधिकाधिक सोपा करण्याच्या लेखकाने  प्रयत्न केल्याचे आपणस पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते 
ज्यांना  इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाचा काहीच गंध नाही अश्या व्यक्तीला या विषयात बऱ्यापैकी साक्षर करण्याचे कार्य हे पुस्तक वाचल्यामुळे होते मग वाचताय ना हे पुस्कात 

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

१८५७च्या जिहाद : स्वातंत्र्य समराची नव्या अंगाने मांडणी करणारे पुस्तक

एखाद्या घटनेकडे  बघायचे अनेक दृष्टिकोन असू शकतात जर घटना इतिहासातील असेल तर हि गुंतागुंत अधिकच वाढते त्यातही देशाच्या इतिहासावर परिणाम करणारी घटना असेल तर हे दृष्टिकोनाचे कंगोरे अजूनच वाढतात त्यातील सर्वच मोठ्या प्रमाणात समाजमान्य असतील असेही  दृष्टिनच्या बाबतीतसमर्थकांपेक्षा विरोधातकांची टीकाकारांचीच संख्या जास्त असन्यासाच्या देखील संभव असू शकतो  मात्र असे असले तरी त्या दृष्टिकोणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नसते हाताची पाचही बोटे सारखी नसली तरी आपण त्यांच्या स्वीकार करतोचना त्या प्रकारे याही दृष्टिकोचा पण स्वीकार करायला हवा जरआपण तो स्वीकार केला तर आणि तरच आपण त्या इतिहासीक घटनेला पूर्णपणे न्याय देणारे ठरू अन्यथा नाही भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तर याचे महत्व अजूनच वाढते अल्पमतातील असले तरी त्यांचे मत समजवून घेणे त्यास योग्य अश्या नैतिक मार्गाचा अवलंब करत विरोध कारे यालाच खरी लोकशाही म्हणतात हाच दृष्टिकोन मनात घेत मी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या मदतीने १८५७ चा जिहाद हे पुस्तक वाचले

      आपल्या भारताच्या इतिहासाचा विचार केला असता १८५७चा उठाव याकडे भारताचे स्वातंत्र्ययुद्ध या दृश्ष्टिकोनातून बघणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे मी सुद्धा याच मताचा पुरस्कर्ता आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या देशप्रेमींचा प्रयत्नामुळे समाजात या घटनेचा तयार झालेल्या प्रतिमेच्या विरुद्ध मत मांडणाऱ्या या पुस्तकात १० प्रकरणे आणि एक परिशिष्ट यांच्या मदतीने याचा पूर्णतः विरुद्ध मतप्रदर्शन केले आहे ३७६

पानाच्या या पुस्तकात पानाच्या तळाशी दिलेल्या तळटीपा आपल्याला लेखकाने दिलेल्या माहितीला पूरक अशी माहिती देत लेखकाचा मुद्दा अखोरेखित करण्यास मदत्तच देतात ,पुस्तकात लेखकाने वेळोवेळी संदर्भ पुरवले आहेत संदर्भ कसे अभ्यासावे हे पुस्तकाच्या सुरवातीला स्पष्ट केले आहे पुस्तकाच्या शेवटी पानमध्ये १६० पुस्तकांची संदर्भ यादी दिली आहे

     पुस्तकाच्या १० प्रकारांममध्ये पाचवे प्रकरण पूर्ण आणि आठवे प्रकरणाचा अपवाद वगळता अन्य सर्व पुस्तकामध्ये १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध नसून एका विशिष्ट धर्मियांनी ब्रिटिशनमुळे गेलेले त्यांचे राज्य सिहासन पुन्हा मिळावे यासाठी छेडलेलेले धर्मयुद्ध होते याचे दाखले देण्यात आले आहे पाचव्या प्रकरणात १८५७ चा उठाव कश्या प्रकारे लढण्यात येऊन ब्रिटिशांनी तो कोणत्या प्रकारे मोडूनकाढला हे सांगितले आहे तर आठव्या प्रकरणात दक्षिण भारतात या स्वातंत्र्य समराचे काय प्रतिसाद उमटले हे सांगितले आहे या प्रकरणात काही प्रमाणत धार्मिक टीका कमी आढळते पहिल्या प्रकरणात प्रास्ताविक असून लेखकाने हा ग्रन्थ का लिहला ? त्यासाठी संदर्भ ग्रंथ कसे एकत्रित केले याविषयी विवेचन करण्यात आली आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात १७५७ च्या प्लासीच्या लढाईपाससून धार्मिक चळवळीद्वारे उठावाची स्थिती कशी निर्माण करण्यात अली हे सांगितले आहे चवथ्या

प्रकरणात उठावाची तत्कलीन परिस्थी सांगण्यात आली आहे सहाव्या सातव्या आणि आठवाव्या प्रकरणात भारताच्या विविध भगत उठावाचे प्रेरक आणि लाभधारक कोण होते या विषयी विवेचन करण्यात आले आहे व्य प्रकरणात स्वातंत्र्य समरातविविध सत्ताधिकारी वर्गाकडून प्रसिद्ध करण्यात  आलेल्या फतव्याची माहिती देण्यात आली आहे शेवटच्या दहाव्या प्रकरणात त्यावेळची सामाजिक सौदार्ह्य कसे होते याविषयी सांगितले आहे

         एखादी गोष्ट आपणास नावडू शकते एखादी गोष्ट आवडू शकते नावडत्या गोष्टीचा विरोध देखील आपण करू शकतो त्यात व्वगे देखील काही नाही मात्र आपण ज्या गोष्टीचा विरोध करत आहोत तिचे आपणास किमान काही नाही तरी माहिती असणे आवश्यक आहे एखाद्या गोष्टीची काहीच माहिती नसताना तिचा ईरोध करणे गैर आहे शेषराव मोरे यांच्या या पुस्तकात मांडलेल्या निष्कर्षाशी आपण असहमत असाल म्हणून आपण त्यास विरोध करत असू तर त्या पुस्तकात नाकी काय लिहले आहे याची आपणस काही अंशी तरी माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी तरी आपण हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे मग वाचताय ना हे पुसतक

रविवार, २९ जानेवारी, २०२३

इंडो चायनाची सफर घडवणारे अप्रतिम पुस्तक अपूर्वरंग

 

आपल्या मराठीतील आमची काशी प्रवाशाची हकीगत या १९  व्य शतकाच्या पुस्कापासून प्रवास वर्णनाची मोठी पंरपरा आहे . जगातील विविवध प्रदेशाची माहिती मराठी भाषिक व्यक्तींनी प्रवास करून  मराठीत आणली आहे त्यामुळे ज्यांनी  काही कारणाने  त्या प्रदेशात प्रवास केलेला नाही .अश्या व्यक्तींना देखील त्या प्रदेशातलं प्रवास करण्याची अनुभूती मिळते आपल्या मराठीत अंशी अनेक प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत सुप्रसिद्ध लेखिका मीना प्रभू आशयाचे काही प्रसिद्ध प्रवास वर्णने प्रसिद्ध असलेल्या लेखकांपैकी एक. त्यांनी जगभरातील अनेक पदेशनानं भेट देत त्या ठिकाणचे आपले अनुभव पुस्तकरूपाने  शब्दबद्ध केले आहेत त्यांच्या आशयाचे एका पुस्तकांपैकी एक ज्यात  त्यांनी इंडॉ चायना भागातील अनुभव मांडलेलं आहेत असे पुस्तक अर्थात अपूर्वरंग भाग २ मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या सहकार्याने वाचले 

सुमारे ३५० पाणी असलेल्या या पुस्तकात त्यांनी  भारतातील अंदमान निकोबार बेटांसह म्यानमार , कंबोडिया , थायलंड व्हिएतनाम . मलेशियाया पाच देशांची सफर घडवली आहे  पुस्तकाची भाषा अत्यंत सहजसोपी असून वर्णातम्क असल्याने पुस्तक कुठेही कंटाळवाणे झालेलं नाही मात्र या पुस्तकासाठी वापरलेली पाने फारशी उत्तम नाहीत पुस्तक सार्वजनिक वाचनालयाचे आहे हे मान्य केले तरी पुस्तक प्रसिद्ध होऊन फारशी वर्षे झालेली नाहीत असे असून देखील त्यांची पाने बरीच पिवळी पडलेली मला दिसली तसेच पुस्तकात चित्रे सुद्धा फारशी नाहीत मात्र चित्रांसाठी तुलनेने चांगला कागद वापरला आहे हीच ती समाधानाची बाब त्यामुळे पुस्तक काहीसे कंटाळवाणे होते त्यावर विशेष मेहनत घेयला पाहिजे होती असो 

 पुस्तकाची सुरवात त्यांच्या पास्पोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी त्या पुण्यातील कार्यालयात गेले असता त्यांना आलेल्या अनुभवांपासून होते त्यांनतर लेखिका आपणास घेऊन जाते अंदमान निकोबार बेटांवर तेथील पोर्ट ब्लेयरचे सेल्युलर जेल , तसेच अन्य  बेटांवर  ,यावेळी लेखिका त्यानाच फिरताना आलेले अनुभव कथन करते 
यामध्ये तेथील खाद्य संस्कृती , तेथील विविध पर्यटनस्थले , तेथील समाजजीवन , लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्याने विविध समाज घटक कोणत्या प्रकारे विमानप्रवास करतात विमान प्रवास्यांबाबतचे बदलते विश्व पर्यटकांविषयीचा स्थानिकांचा दृष्टिकोन आपल्या भारतीयांची पर्यटनविषयीची आस्था  याविषयी भाष्य करते आणि पहिले प्रकरण संपते दुसऱ्या प्रकरणात लेखिकेने त्यांचे म्यानमार मधील अनुभव सांगितले आहे त्या ठिकाणी त्यांनी मंडाले ,रंगून आदी ठिकाणी भेटी दिल्या . त्या ठिकणाशी असणारे भारताचे नटे त्यांनी आपल्या लेखांत हळुवारपणे मांडले आहे भारतीय संस्कृतीचा म्यानमारच्या संस्कृतीशी असणारा संपर्क , तेथील खाद्यप्रकार ,तेथील बौद्ध धर्माचा प्रभाव असणारी जीवनशैली आदी गोष्टींबाबबत लेखकेने भाष्य केले आहे संस्कृतीचे धागेदोरे स्पष्ट करताना त्यांनी भारतीय नांवे आणि म्यानमारची नवे यांची तुलना केली आहे
         तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारांत व्हिएतनाम आणि कंबोडियाविषयी बोलताना त्यांनी येथीलअंतर्गत यादवी कम्युनिष्ट राजवटीत तेथील जनतेने भोगलेले त्रास हाल अपेष्टा , अमेरिकेच्या युध्दमुळे त्यांच्यावर झालेले अत्याचार त्यांच्या एकमेकांत गुंफलेला इतिहास तेथिल वाहतूक व्यवस्था तेथील संस्कृतीवर भारतीयांसह चीनचा असलेलेआ प्रभाव तेथिल जतनतेने स्वीकारलेल्या चिनी रूढी पंरपरा , तेथील समाजजीवनवर असणारा बौद्ध धर्माचा
प्रभाव , तेथील जनतेची भारतीयांशी असणारी नाळ तेथिल बौद्ध पॅगोडे ,देऊळ यांपाचव्या ची सफर लेखिका घडवते पाचव्या आणि सहाव्या प्रकरणात थायलंड आणि मलेशियाचे सफर घडवताना लेखिकेने थायलंडमधील कुप्रसिद्ध वेश्याव्यवसाय आणि मलेशियातील इस्लामी प्रभाव यावर आपली मते मांडत तेथील फिरण्याचा  अनुभव स्पष् केला आहे  या दोन्ही प्रवाश्यात त्यांनी तेथील वाहतूक व्यवस्था तेथील इऐतहासिक वास्तु धार्मिक महवताच्या वास्तु भौगोलिक कर्मातीच्या वस्तूंची सफर लेखिकेने घडवली आहे 

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

अथांग मनाचा थांग घेणारे मनकल्लोळ

 १७व्या शतकात समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्र्लोकात एखादे कार्य यशस्वी होण्यसासाठी मन करावे  प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या सारख्या  श्र्लोकाद्वारे  मनाचे  मानवी आयुष्यतील महत्व स्पष्ट केले आहेच  आहे सध्याच्या स्पर्धेच्या काळात याचे महत्व अधिकच वाढलेले आहे. त्यामुळे मन अप्रसन्न का होते ? मन अप्रसन्न झाले हे ओळ्खह्ण्याची लक्षणे कोणती ? हे सर्वांनां माहिती असणे अत्यावश्यक झाले आहे .त्यामुळे अनेक विषयावर अत्यंत सोप्या मराठी भाषेत माहितीपूर्ण लेखन करणारे अच्युत गोडबोले यांनी नीलांबरी जोशी  यांची सहलेखक म्हणून मदत घेऊन  मानसिक आजार या  संकल्पनेवर  लिहलेले मनकल्लोळ हे पुस्तक अत्यंत महत्व्वाचे ठरते.  या पुस्तकाच्या  पहिल्या भागाचे वाचन करण्याचे सौभाग्य मला सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या मदतीने मिळाले दोन भागात प्रकशित या पुस्तकाच्या पहिल्या भागात  विविध मानसोपचार पद्धती , विविध प्रकारचे मानसिक आजाराची माहिती ,आजारांवर आजार होण्यामागची कारणे ,त्यावर कोणत्या प्रकरचे उपचार करण्यात येतात ? मानसिक आजाराच्या वर्गीकरणात हा आजार कोणत्या उपप्रकारात अंतर्भूत करण्यात आला आहे  आजारावर   या आधी आलेल्या जगभरातील चित्रपटाच्या माहितीसह देण्यात आलेली  आहे .       पुस्तकाचा विषय तांत्रिक असला तरी अच्युत गोडबोले यांच्या अन्य   पुस्तकासारखीच या पुस्तकाची भाषा देखील सहजसोपी आहे . या पुस्तकात देखील त्यांच्या अन्य शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकासारखीच तांत्रिक संकल्पना या मुळातीडिसॉर्डर्सचील इंग्रजी भाषेतच ठेवली आहेत विनाकारण मूळच्या इंग्रजी संकल्पाचे मराठीत भाषांतरणं करण्याचा मोह त्यांनी यावेळी देखील टाळलेला आहे जे खोरोखऱच अभिनंदनास्पद आहे . ३५७
पानाच्या या पुस्तकात १० प्रकरणातुन हि माहिती देण्यात  आली आहे ज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणात अनुक्रमे मानसिक आजाराबतचा इतिहास , मानसिक आजाराचे वर्गीकरण तसेच विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे मानसिक उपचार पद्धतीची माहिती देताना मानसिक आजारांच्या उपचाराच्यावेळी औषधाची भूमिका किती महत्त्वाची आहे ? समुपदेशनाचा  उपचार करताना कसा उपयोग होतो ? समुपदेशनाचे फॅमिली काऊन्सलिंग , बिवेहेर थेरपी असे प्रकार कसे पडतात ? त्याचा उपयोग कसा होतो /योगा आणि अन्य उपचार पद्धती याची रोग बरे करण्यातील भूमिका सायको फार्मास्युटिकल औषधांचे प्रकार यावर प्रकाश टाकण्यात आला आहे . तर पहिल्या प्रकारात मनोविकारणाचा इतिहास सांगताना सायकॉलॉजिस्ट, सायकिऑस्ट्रीस्ट यांच्यातील फरक स्पष्ट करण्यात आला आहे तिसऱ्या प्रकरणापासून दहाव्या प्रकरणात मनोविकाराची  विविध प्रकारचे वर्गीकरण करून देण्यात आली आहे तिसऱ्या प्रकणात डिसोसिएटिव्ह डिसॉर्डर्सची तर चौथ्या प्रकरणात
सेक्शुअल डिसॉर्डर्सची पाचव्या प्रकरणात पॅराफिलियाज आणि जेंडर आयडेंटी डिसॉर्डर्सची माहिती देण्यात आली आहे सहाव्या सातव्या आणि आठव्या प्रकरणात अनुक्रमे इटिंग डिसॉर्डर्सची , सॉमटो फॉर्म डिसॉर्डर्सची आणि सबटन्स युज डिसॉर्डर्सची माहिती देण्यात आलेली आहे आठव्या प्रकरणात व्यसनाधीनतेवर भाष्य करण्यात आले आहे शेवटच्या दोन प्रकरणात एन्झायटी डिसॉर्डर्सची आणि भयगंडाची माहिती देण्यावर लेखकांचा भर आहे

  तुम्ही मानसशात्रज्ञांचे विद्यार्थी असा अथवा नसा . तुमच्या परिचयात कोणी मानसिक रुग्ण असो अथवा नसो  प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे असे झाले आहे मी तर पुस्तक वाचले मग तुम्ही कधी घेताय पुस्तक वाचायला 

साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम

आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत  थांबलेला ...