माझा बाबत बोलायचे झाल्यास मी 'माझे वाचन' या मालिकेच्या आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे, माझे कथासंग्रह, कादंबरी या प्रकारचे साहित्य वाचन काहीसे कमीच आहे. मी मुख्यतः विविध प्रकारची माहिती देणारी पुस्तके वाचतो. काही प्रमाणात विविध व्यक्तींनी लिहिलेली आत्मचरीत्र आणि चरीत्र मी वाचतो. आता काही जण माझे कथासंग्रह आणि कांदबरी वाचन कमी असल्याने माझे वाचनच नाही, असे म्हणू शकतात.मात्र मी आहे असा आहे, स्विकारा अथवा नका स्विकारू हा माझा दृष्टिकोन असल्याने मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही.
माझ्या आतापर्यतच्या अनुभवानुसार तयार झालेली आवड आणि माझी व्यावसायिक गरज लक्षात घेत, माझ्यात माहितीपर आणि चरित्र वाचनाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या सुप्रसिद्ध कादंबऱ्या ते लोक सांगतात, त्यातील काही मी वाचलेल्या नसतात.मात्र त्यामुळे माझे फारसे अडत नाही. मात्र मला जी लोक पुस्तकाविषयी विचारतात. त्यांचा मते वाचन म्हणजे कांदबरीवाचन असे म्हणता येवू शकते. त्यांना वाचण्याचे विविध पर्याय माहिती नसावेत,असेच त्यांच्याशी बोलल्यावर जाणवते.वाचनातील विविधतेचा त्यांना गंध देखील नसतो.अर्थात वाचनाचा आनंद काय असतो.हे त्यांना माहिती नसल्याने ते स्वाभाविक आहे. त्यात त्यांना बोल लावून चालणार नाही,हे ही तितकेच खरे.
माझे वाचन या मालिकेतील तिसरा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/03/blog-post_10.htmll
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा