लेखाचे विषय

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

भारताच्या विकासदृष्टीचे समग्र दर्शन घडवणारी मासिके



आपल्याकडे  भारताच्या विकासाबाबत विविध दावे प्रतिदावे सातत्याने करण्यात येतात.आपण ज्या माध्यमातून याबाबत माहिती घेतो आहोत त्या माध्यमाच्या विचारसरणीनुसार आपणास माहिती मिळते .जर माध्यम  केंद्र सरकारच्या माताच पुरस्कर्ता असेल तर वास्तवात नसलेली आदर्श स्थिती थंडी अधिक उजळ करून आपल्यापुढे सादर करेल.याउलट जर माध्यम विरोधी पक्षाच्या बाजूचे असेल तर वास्तवातील चांगली बाजू कारण नसताना ऋणात्मक दाखवत भारताची प्रगती दाखवणार नाही . अश्या स्थितीत भारताचे जसे आहे तसे चित्र उभे करणारे कोणतेच माध्यम नाही का स प्रश्न आपणस पडलं असेल तर सांगतो चित्रफारच निराशजनक  नाहीये  आपणास खरे चित्र  समोर करणारी दोन मासिके सहज सापडतात ती म्हणजे स्पर्धा परिक्षतेची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांच्या मुखाशी असणारी मासिकाने अर्थात योज़ना आणि कुरुक्षेत्र . मी हो दोन्ही मासिके गेली सुमारे १५ वर्ष नियमिपणे वाचत असे सुरुवातीला मराठी भाषेतील वाचत असे आता मात्र थेट इंग्रजी भाषेतील वाचतो 

. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित होणारी ही दोन्ही मासिके देशाच्या विकास प्रक्रियेच्या वेगवेगळ्या बाजू  समजावत .ज्यामुळे ही मासिके  केंद्र सरकाच्या यशापयशाच्या अभ्यास करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आणि आपल्या सारखे देशाच्या प्रगतीबाबत नवीन खरी माहिती जाणण्याची इच्छा असलेले सर्वसामान्य  नागरिक यांना खरी स्थिती समजवून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात.  हि दोन्ही मासिक जरी भारत सरकारकडून प्रकशित करण्यात आलेली असली तरी सरकारी प्रचार यात डोकावत नाही .सरकारची विचारसरणी काहीही असो त्याचे प्रतिबिब मासिकात पडल्याचे मला तरी दिसून आलेले नाही 

‘योजना’ मासिकाची सुरुवात १९५७ साली झाली. या मासिकाचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र सरकारच्या विविध योजना, धोरणे आणि विकास उपक्रमांची सविस्तर माहिती देणे. अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, डिजिटल परिवर्तन, पर्यावरण अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख ‘योजना’मध्ये प्रकाशित होतात. या लेखांमधून केवळ योजनांची माहितीच मिळत नाही, तर त्यांच्या परिणामांचे विश्लेषण आणि भविष्यातील दिशा देखील स्पष्ट होते. मराठीच नाही तर सोपी, समजण्यासारखी इंग्रजी  भाषा आणि वस्तुनिष्ठ मांडणी ही ‘योजना मासिकाचा स्ट्रॉंग पॉईंट म्हणता येईल मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे हे मासिक जवळपास सर्वच भारतीय सहजतेने वाचून दंशाची खरी स्थिती समजवून घेऊ शकतो

तर  ‘कुरुक्षेत्र’ मासिक १९५२ पासून प्रकाशित होत असून ते मुख्यतः ग्रामीण विकासावर केंद्रित आहे. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास हा राष्ट्रीय प्रगतीचा कणा मानला जातो. ‘कुरुक्षेत्र’मध्ये शेती, जलसंधारण, ग्रामीण उद्योग, स्वयंसहायता गट, पंचायत राज व्यवस्था, शाश्वत विकास यांसारख्या विषयांवर सखोल माहिती दिली जाते. ग्रामीण भागातील समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांचा समतोल आढावा या मासिकातून मिळतो. शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, संशोधक आणि

ग्रामीण प्रशासनाशी संबंधित व्यक्तींसाठी ‘कुरुक्षेत्र’ उपयुक्त आहेच  त्याशिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांची तयारी करण्यासाठी हे मासिक महत्त्वाचे संदर्भसाहित्य म्हणूस सुद्धा खूप मदत करणारे ठरते 

‘योजना’ आणि ‘कुरुक्षेत्र’ ही दोन्ही मासिके एकमेकांना पूरक ठरणारी आहेत. ‘योजना’ राष्ट्रीय स्तरावरील धोरणे आणि त्यामागील विचारधारा सांगते , तर ‘कुरुक्षेत्र’ त्या धोरणांची अंमलबजावणी खेडयात कशी होते आणि त्याचे परिणाम काय होतात , हे दाखवते . त्यामुळे या दोन्ही मासिकांचे एकत्रित वाचन केल्यास देशाच्या विकासाचे खरे वास्तव समजू शकते असे माझे दोन्ही पुस्तके वाचुन झलेले मत आहे 

थोडक्यात  समाजजीवन, प्रशासन, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकास यांविषयी माहिती मिळवण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी मजबूत करण्यासाठी ‘योजना’ आणि ‘कुरुक्षेत्र’ ही मासिके ज्ञानाचा समृद्ध आणि विश्वासार्ह स्रोत आहेत 

मी स्पर्धा परीक्षा क्षेत्राचा अभ्यास सोडून कितीतरी वर्ष झाली आहेत तरी देखील मी  ती अजून वाचतोय आपण देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे  नसाल तरी ही मासिके आवर्जून वाचाच असे मी तुम्हाला संगी इच्छितो कारण या दोन्ही मासिकांमधून मिळणारे ज्ञान तुम्हला रोजच्या जगण्यात सुद्धा नक्कीच उपयोगी पडेल अशी माझी खात्री आहे मग करणार ना वाचायला सुरुवात 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास एका ध्यासपुर्तीचा 'माझंही एक स्वप्न होतं’

अमिताभ बच्चन यांच्या नेत्रदानाविषयी टिव्हीवरील एका   जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे त्यावेळेस कॅमेरा त्यांच्या पायावर स्थिर असतो कुछ लोगों के लि...