लेखाचे विषय

रविवार, २६ जुलै, २०२६

नादवेध संगीताची अदभूत सफर घडवणारे पुस्तक

संगीत , आपल्या मानवी जीवनातील अविभाज्य घटक .मानवी जीवनातील ताण तणाव अडचणीनं क्षणभर का होईना विसरायला लावून मनुष्याला आनंदाचेक्षण समाधानाची अनुभूती करायला लावणारी अदभूत अशी नैसर्गिक शक्ती म्हणजे संगीत.  .याच संगीताच्या या विलक्षण शक्तीमुळे वैद्यकीय उपचार पद्धतीत संगीताचा उपयोग मानसशास्त्रीय तसेच शारीरिक आजारांच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरतो. ‘म्युझिक थेरपीद्वारे ताणचिंतानैराश्य यांसारख्या मानसिक आजारांमध्ये आराम मिळतोशांत संगीत मन स्थिर करतेभावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि सकारात्मक विचार वाढवतेशारीरिक आजारांमध्येही संगीत वेदना कमी करण्यासरक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि झोप सुधारण्यास सहाय्यक ठरतेतसेच मेंदूच्या कार्यक्षमतेवरही चांगला परिणाम होतोत्यामुळे औषधोपचारांसोबत संगीताचा वापर केल्यास रुग्णाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळते.आपल्या प्राचीन ऋषीमुनींना संगीताच्या या सामर्थ्याचीजाणिवावं होती त्यामुळेच  त्र्यांनी संगीताचे मानवी जीवनातील  महत्त्व सांगताना सांगितले की 

साहित्यसंगीतकलाविहीन
साक्षात् पशुः पुच्छविषाणहीनः।

आताच्या मराठीत सांगायचे झाल्यास ज्या मनुष्याला साहित्य, संगीत आणि कला यांची आवड नसते, तो प्रत्यक्षात शेपूट आणि शिंगे नसलेला पशूच आहे 

तर या संगीताचा विचार करता अत्यंत महत्वाचा धडक म्हणजे राग . सामान्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने बहुसंख्य जनता याच्या पुरेपूर आंनद घेण्यास मुकते हे टाळले जावे या साठी मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील असणारे अच्युत गोडबोले पुन्हा एकदा आपल्याला मदत करायला पुढे येतात त्यांनी सुलभ पिशवीकर त्यांच्या मदतीने लिहलेले 'नादवेध' हे पुस्तक आपली संगीतातील विविध रागाची नसलेली माहितीची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी करते . 

 ‘नादवेध’ या पुस्तकाकडे ताच्या विश्वाचा सखोल आणि रसपूर्ण वेध घेणारे एक महत्त्वपूर्ण साहित्य म्हणून  आपण सहज बघू शकतो. या पुस्र्कात या पुस्तकात भारतीय आणि पाश्चात्य संगीताच्या विविध पैलूंवर अत्यंत सोप्या, चटकन समजणाऱ्या मात्र वाचताना वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या भाषेत माहिती देण्यात आलेली आहे संगीताची सुरुवात त्याची प्रगती तसेच स्वर, ताल आणि लय यांसारख्या मूलभूत घटकांची  सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.

‘नादवेध’चे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही लेखकांनी संगीत या विषयाकडे केवळ तांत्रिक दृष्टीकोनातून न पाहता त्यामागील मानवाला धावणाऱ्या गोष्टी जसे  संगीत ऐकताना येऊ शकणाऱ्या भावना त्यांचे सांस्कृतिक संदर्भ गायकाच्या गायनांतील भावना यांच्या देखील विचार केल्याचे पुस्तक वाचताना जाणवते. 
पुस्तकात भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच पाश्चात्य संगीताचीही माहिती दिली आहे. या दोन्ही संगीतप्रकारांतील साम्य-भेद स्पष्ट करताना लेखकांनी वाचकाला जागतिक संगीताची  व्यापक दृष्टीकोनातून ओळख करून देण्यात आली आहे.त्यासाठी  अनेक नामवंत संगीतकार, गायक आणि त्यांच्या कार्याचा संदर्भ देत संगीताचा प्रवास अधिक जिवंत आणि प्रभावी केला आहे 

पुस्तक आधी लोकसत्तामध्ये स्तंभ स्वरूपात प्रसिद्ध झालेले असल्याने लेख लहान आहेत ज्यामुळे पुस्तक वाचनता दडपण येत नाही पुस्तक वाचताना  आपण सहजतेने एक एक प्रकरण वाचत पुस्तकांच्या शेवटाकडे येतो लेखनशैली अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकांसारखीच  संवादात्मक आणि सहज असल्यामुळे अवघड वाटणाऱ्या संकल्पनाही सोप्या पद्धतीने समजतात. उदाहरणे, किस्से आणि संदर्भ यांच्या मदतीने पुस्तक अधिक रोचक बनते. एकूणच, ‘नादवेध’ हे पुस्तक संगीताच्या गूढ आणि सुंदर विश्वात प्रवेश करण्यासाठी एक उत्कृष्ट दार आहे. नवशिक्या असो वा जाणकार, प्रत्येक संगीतप्रेमीसाठी हे पुस्तक प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि मार्गदर्शक ठरते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नादवेध संगीताची अदभूत सफर घडवणारे पुस्तक

संगीत , आपल्या मानवी जीवनातील अविभाज्य घटक .मानवी जीवनातील ताण तणाव अडचणीनं क्षणभर का होईना विसरायला लावून मनुष्याला आनंदाचेक्षण समाधानाची अ...