स्वामी विवेकानंद हे केवळ एक संन्यासी किंवा आध्यात्मिक पुरुष नव्हते, तर भारताच्या पुनर्जागरणाचे मंत्रद्रष्टे होते. भारतीय अध्यात्माची वैश्विक ओळख निर्माण करतानाच त्यांनी भारतीय समाजाला आत्मविश्वास, आत्मभान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
अस्या भारत मातेचे थोर सुपुत्र असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग आणि हरिभक्त परायणकार अनंतबुवा मेहेंदळे यांनी लिहिलेले मंत्र दृष्टा स्वामी विवेकानंद हे लघु चरित्र मी नुकतेच वाचले तसं बघायला गेलं तर मी याआधी रामकृष्ण मठातर्फे प्रकाशित स्वामी विवेकानंद यांचे सखोल सविस्तर चरित्र वाचलेले आहे मूळचे बंगाली भाषेत प्रसिद्ध झालेले मात्र राजहंस प्रकाशातर्फे अज्ञात विवेकानंद या नावाने मराठीत अनुवादित करण्यात आलेले स्वामी विवेकानंद यांचे वैयक्तिक आयुष्यभर भाष्य करणारे चरित्र सुद्धा मीवाचले आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची छोटीशी ओळख करून देणाऱ्या विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित गोष्टी सुद्धा वाचल्या आहेत. मी आत्ता वाचलेले स्वामी विवेकानंद चरित्र या आधीच्या चरीत्रांपेक्षाखूप मोठ्या अर्थाने वेगळे आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशे व्या जयंतीचे औचित्य साधत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे स्वामी विवेकानंद विषयीची अनेक पुस्तके मराठीत प्रकाशित करण्यात आली त्याच मालिकेत हे ८८ पानांचे चरित्र प्रकाशित करण्यात आले. आपण एखादे कीर्तन तर वाचत नाही ना असे वाटावे अशा पद्धतीच्या लेखन शैलीत सदर पुस्तक लिहिलेले आहे अर्थात कीर्तनात असतात तसे तीन भाग या पुस्तकात नाहीये. कीर्तनात जसा एखादा अभंग उघडला जातो त्या पद्धतीने स्वामी विवेकानंद यांचे चरित्र हे काव्यात्मक स्वरूपात पुढे मांडत पुढे त्या काव्याचे गद्य स्पष्टीकरण असे पुस्तकाचे सर्वसाधारण स्वरूप आहे
पुस्तक आठ प्रकरणात विभागले आहे पहिले प्रकरण स्वामी विवेकानंद यांच्या आजोबांविषयी आजोबांनी घेतलेला संन्यास त्यानंतर वडील विश्वनाथ यांच्या आयुष्यात झालेल्या बदल यावर भाष्य करते दुसरे प्रकरण स्वामी विवेकानंद यांचे वडील विश्वनाथ यांचे आयुष्य आपल्यासमोर आणते तर तिसऱ्या प्रकरणापासून स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राच्या खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. तिसऱ्या प्रकरणात नरेंद्रनाथ दत्त याची रामकृष्ण परमहंस यांच्या भेट होण्यापर्यंतचे आयुष्य सांगते. चौथ्या प्रकरणात नरेंद्रनाथ दत्तचा प्रवास स्वामी विवेकानंद या नावाने कसा होतो याविषयी तसेच रामकृष्ण आणि विवेकानंद यांच्या सबंधाविषयी कथन करते पाचवे प्रकरण स्वामी विवेकानंद यांच्या सर्वधर्म परिषदेतील सहभाग सांगते सहाव्या प्रकरण त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्य उलगडते सातवे आणि आठवे प्रकरण अनुक्रमे स्वामी विवेकानंद यांच्यामुळे भारताची प्रतिमा कशी जगात उजळली याविषयी तसेच आजचा काळा सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या विचार का महत्त्वाचा आहे याविषयी सांगते ज्यांना कमी वेळेत अधिक प्रमाणात आणि सविस्तर सखोल प्रमाणे स्वामी विवेकानंद समजून घ्यायचे आहेत त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा