बाल साहित्य! लहान मुलांमधून मोठे मोठे वाचक घडावे. त्यांना लहानपणीच वाचनाची आवड लागावी यासाठी त्यांचा भाव विश्वासी मिळते जुळते असणारे आणि त्यांना रुचेल भावेल समजेल अशा पद्धतीने तयार केलेले साहित्य म्हणजे बाल साहित्य. सध्या साहित्यातील हा प्रकार काहीसा मागे पडलेला असला, अडगळीत गेलेला असला तरी सुद्धा श्यामची आई, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, गोट्या यासारखे अनेक नायक हे मराठीमध्ये बाल साहित्यात अजरामर झालेले आहेत.
फास्टर फेणे एक साधारणत 12 ते 15 वर्षाचा चणाक्ष, चुणचुणीत, काहीशा हाडकुळा मात्र बुद्धीने अत्यंत तीक्ष्ण असलेला एक कुमार वयीन डिटेक्टिव्ह. मराठीतील एक प्रतिभावान लेखक भा.रा. भागवत यांच्या कल्पनेतून साकारलेला पुणे शहराचे एक महत्त्वाचे असणाऱ्या उपनगथ हडपसर परिसरात वास्तव्यास असणारा मुळचा फुरसुंगीचा असलेला बबन फेणे अर्थात फास्टर फेणे.
विद्याविहार या शाळेत वस्तीगृहात रहात शिकत असताना बबन फेणे आपल्या अत्यंत जवळचा मित्र सुभाष देसाई, मामेबहीण माली यांच्या मदतीने, गुन्ह्यांची उकल करतो त्याच्या या गुन्हांच्या तपासकथा भा.रा. भागवत यांनी विविध कथांचा मार्फत वाचकांना उपलब्ध करून दिल्या. या कथा विविध भागात विभागलेल्या आहेत. फुरसुंगीचा फास्टर फेणे,आगे बढो फास्टर फेणेबाल बहाद्दर फास्टर फेणे,जवानमर्द फास्टर फेणे,फास्टर फेणेचा रणरंगट्रिंग ट्रिंग... फास्टर फेणे,फास्टर फेणेची एक्प्रेस कामगिरी,फास्टर फेणे टोला हाणतो
फास्टर फेणे डिटेक्टिव्ह,फास्टर फेणेची काश्मिरी करामत,प्रतापगडावर फास्टर फेणे
गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे,चिकूचे चाळे आणि फास्टर फेणे,फास्टर फेणेची डोंगरभेट
फास्टर फेणेच्या गळ्यात माळ,चक्रिवादळात फास्टर फेणे,चिकू, चिंपाझी आणि फास्टर फेणे
विमानचोर विरुद्ध फास्टर फेणे,जंगलपटात फास्टर फेणे,टिक-टॉक फास्टर फेणे हे ते भाग.
प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या मनात सुद्धा एके ठिकाणी खट्याळ बालक वास्तव करत असते, असे म्हटले जाते.माझ्या मनातील खट्याळ बालकास आनंद हवा म्हणून मी फास्टर फेणे चा वरचा परिच्छेदात सांगितलेल्या विविध भागांपैकी आगे बढो फास्टर फेणे फास्टर फेणेची एक्सप्रेस कामगिरी चक्रीवादळ फास्टर फेणे आणि फास्टर फेणे डिटेक्टिव्ह चार भाग नुकतेच वाचले
आगे बढो फास्टर फेणे या भागात अफिकम् विरूद्ध फास्टर फेणे, पिवळ्या संकटावर मात, सरपटीत गुहा व चेटकणीचे घर,पुण्याच्या पुरात फास्टर फेणे आणि अपूर्व सायकल शर्यत या चार कथांचा समावेश आहे. अफिकम् विरूद्ध फास्टर फेणे या या कथेत फास्टर फेणे मित्राबरोबर फुरसुंगी ला जात असताना काही अडचणीमुळे मित्राच्या
बंगल्यावर गेले असता घडणाऱ्या प्रसंगाचे वर्णन करण्यात आले आहे पिवळ्या संकटावर मात या कथेत तो त्याची मामे बहीण माली हीच्या बरोबर सुट्टीच्या दरम्यान लोणावळा मावळ परिसरात फिरायला गेला असता त्याची वाघा बरोबर झालेली झटापट सांगण्यात आलेली आहे. सरपटीची गुहा आणि चेटकणीचे घर या तिसऱ्या भागात रत्नागिरीतील कुख्यात गुंडास त्याने कशी पद्धतीने अटक करवली याविषयी सांगितले आहे तर चौथ्या आणि शेवटच्या कथेत पानशेतचे धरण फुटल्यावर त्याच्यावर ओढवणाऱ्या प्रसंगाचे वर्णन करण्यात आलेले आहे. फास्टर फेणेची एक्सप्रेस कामगिरी या भागात, फास्टर फेणेची एक्सप्रेस कामगिरी
बंगल्यावर गेले असता घडणाऱ्या प्रसंगाचे वर्णन करण्यात आले आहे पिवळ्या संकटावर मात या कथेत तो त्याची मामे बहीण माली हीच्या बरोबर सुट्टीच्या दरम्यान लोणावळा मावळ परिसरात फिरायला गेला असता त्याची वाघा बरोबर झालेली झटापट सांगण्यात आलेली आहे. सरपटीची गुहा आणि चेटकणीचे घर या तिसऱ्या भागात रत्नागिरीतील कुख्यात गुंडास त्याने कशी पद्धतीने अटक करवली याविषयी सांगितले आहे तर चौथ्या आणि शेवटच्या कथेत पानशेतचे धरण फुटल्यावर त्याच्यावर ओढवणाऱ्या प्रसंगाचे वर्णन करण्यात आलेले आहे. फास्टर फेणेची एक्सप्रेस कामगिरी या भागात, फास्टर फेणेची एक्सप्रेस कामगिरी
भागुबाईचा वाघ भाग बनला, 134 नाही 420, तंट्या भिल्लाचा खजिना, सायकल रेस अडली नाही आणि बलून चालून फास्टर फेणे कथा वाचवायला मिळतात या या भागातील पहिला कथेत अर्थात फास्टर फेणेची एक्सप्रेस कामगिरी यामध्ये बबन ने पुणे ते लोणारवळा दरम्यान एका चोराला कसे पकडले हे सांगितले तर भागुबाईच्या वाघ बनला या दुसऱ्या गोष्टीमध्ये जयंत जोशी नावाचा एक मित्र जो अत्यंत घाबरट होता तो धाडसी कसा बनला त्याविषयी सांगण्यात आलेले आहे या भागाच्या
तिसऱ्या गोष्टींमध्ये आपणास फास्टर फेणे बँकेत गेला असता गैरप्रकार करून पैसे काढणाऱ्याला त्यांनी कसे पकडले हे 134 नाही 420 हे शीर्षक असलेल्या कथेतून आपणास वाचता येते . तंट्या भिल्लाचा खजिना ही कथा हडपसर सासवड या भागात घडते जिथे एक इतिहास अभ्यासक या भागाच्या कोणत्या खजिना पुरल्याची घटना घडली हे सांगतात, आणि त्यानुसार खजिन्याचा शोध घेण्याची चित्तारकथा सांगण्यात आली आहे.सायकल रेस अडली नाही असे शीर्षक असलेल्या पाचव्या कथेमध्ये शाळेकडून सायकल स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना प्रतिस्पर्ध्याकडून त्याला कोणत्या प्रकारे त्रास देण्यात आला आणि त्याने त्यावर कोणत्या प्रकारे मात केली याविषयी सांगितले आहे तर बनवून फास्टर फेणे ही कथा मुंबईतील त्याच्या
पराक्रम सांगते.
चक्रीवादळात फास्टर फेणे या भागात आपणास चक्रीवादळात फास्टर फेने बच्चू भालू आणि फास्टर फेणे,चार खिशांची कथा भुताच्या मार्गावर फास्टर फेणे, फास्टर फेणेचा शंखनाद आणि मोगलेद्दीकरांचे रद्दी या कथा वाचायला मिळतात या भागाच्या पहिल्या कथेत फास्टर फेणेने त्याच शेख नावाचा सरांना त्यांचे घर चक्रीवादळामुळे उध्वस्त झाल्यास त्यांना कोणत्या प्रकारे मदत केली तसेच त्यांच्या वाम मार्गाला लागणाऱ्या मुलाला कोणत्या प्रकारे योग्य मार्गावर आणले याविषयी सांगितले आहे.या कथेचे शीर्षक हे भागाचेच शीर्षक
आहे. बच्चू भालू आणि फास्टर फेणे या गोष्टींमध्ये फास्टर फेणे मुंबईला त्याच्या निशा आत्याकडे आल्या असता निशा आत्याच्या ओळखीच्या एका कुटुंबातील लहान मुलाला कोणत्या पद्धतीने त्याने वाचवले याविषयी आपणास वाचायला मिळते एका जत्रेमध्ये फास्टर फेणे येणे कोणत्या पद्धतीने चोरांना पकडून दिले हे आपल्याला चार पिकाची कथा शीर्षक असलेल्या या भागातील खिशांची कथा कथेतून समजते एका पडक्या वाड्यामध्ये भूत आहे या अफवे मागचे सत्य त्याने कोणत्या पद्धतीने, जगासमोर आणले हे चौथ्या गोष्टीतून समजते या कथेचे शीर्षकभुताचा मागावर फास्टर फेणे असे आहे. या भागातील पाचवी कथेची पार्श्वभुमी देखील
आहे. बच्चू भालू आणि फास्टर फेणे या गोष्टींमध्ये फास्टर फेणे मुंबईला त्याच्या निशा आत्याकडे आल्या असता निशा आत्याच्या ओळखीच्या एका कुटुंबातील लहान मुलाला कोणत्या पद्धतीने त्याने वाचवले याविषयी आपणास वाचायला मिळते एका जत्रेमध्ये फास्टर फेणे येणे कोणत्या पद्धतीने चोरांना पकडून दिले हे आपल्याला चार पिकाची कथा शीर्षक असलेल्या या भागातील खिशांची कथा कथेतून समजते एका पडक्या वाड्यामध्ये भूत आहे या अफवे मागचे सत्य त्याने कोणत्या पद्धतीने, जगासमोर आणले हे चौथ्या गोष्टीतून समजते या कथेचे शीर्षकभुताचा मागावर फास्टर फेणे असे आहे. या भागातील पाचवी कथेची पार्श्वभुमी देखील
काहीशी चौथा कथेसारखीच अंधश्रद्धे विरुद्धची आहे या भागात एका देवी मंदिरात रात्री काही समाजकंटकांकडून देवी कोपली आहे तुम्ही घरात बसा असा तीचा संदेश अशी अफवा पसरवत केलेल्या गैर कृत्यांच्या बुरखा फाडला आहे या कथेचे शीर्षक फास्टर फेणेचा शंखनाद असे आहे. या भागाच्या सहाव्या आणि शेवटच्या कथेतफास्टर फेणे एका मुलीला कशी मदत करतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. फास्टर फेणे डिटेक्टिव्ह या भागात आपणास फास्टर फेणे डिटेक्टिव्ह ,नाटक रंगले दाट फास्टर फेणे भुस्सा करतो, एका दगडात तीन हेर आणि चोर दिवाळी या चार कथा वाचता येतात भागाचे शीर्षक असलेल्या पहिल्या कथेत आपणास डिटेक्टिव्ह चा फायदा घेत गैरप्रकार करणाऱ्या एका व्यक्तीच्या बुरखा फास्टर फेणेने कसा फाडला याविषयी सांगण्यात आलेले आहे, फास्टर फेणेच्या विद्या भवन शाळेतर्फे बसवण्यात आलेल्या नाटकाच्या प्रयोग लोणावळ्यात होत असताना फास्टर फेणे कोणत्या पद्धतीने चोरांना अटक करवतो हे नाटक रंगले दाट या कथेत आपणास वाचवण्यास मिळते, मित्राच्या घरी पुणे शहरातील कसबा पेठ आले असता फास्टर फेणेने भेसळ येणाऱ्या व्यापाराविरुद्ध कशी मोहीम करत त्याला पोलिसांच्या हवाली केले याची कथा भागाच्या तिसऱ्या गोष्टीत वाचावयास मिळते. या भागातील चौथ्या कथेचे शीर्षक आहे एका दगडात तीन हेर. चौथ्या गोष्ट मध्ये आपणास फास्टर फेणे यांनी याने केलेल्या एका अचाट परिक्रमाची गोष्ट समजते पाचव्या आणि शेवटच्या गोष्टींमध्ये फास्टर फेणे याने हडपसरच्या रेसकोर्स भागात पकडलेल्या चोरांविषयी आपणास समजते.
फास्टर फेणेचे सर्वच भाग मोठे रंजक असून ते वाचकाला खिळवून ठेवतात. सध्या बाजारात बाल साहित्यामध्ये असलेल्या छोटा भीम, बाल हनुमान डोरेमॉन, निंजा हातोरी, या सारख्या चरित्र नायकांच्या मालिकेतील पहिला आणि अत्यंत धाडसी हुशार चरित्र नायक तो देखील पूर्णता मराठी हडपसरचा. या फास्टर फेणेचा कथा आपणास खूप काही शिकवून जातात. आपण किमान एकदा त्यातील एखाद्या तरी भाग अवश्य वाचावा.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा