लेखाचे विषय

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

वारसा ६७ वर्षाचा

१३ ऑगस्ट १९६० या दिवसाला मराठी पत्रकारितेत अनन्य साधारण महत्व आहे .नुकत्याच काही महिन्यापूर्वी द्विभाषिक मुंबई राज्यातून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य साकारले होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी मराठी व्यक्तीने मोठा लढा उभारला होता. या संघर्षातून मिळालेल्या महाराष्ट्राचा तेथील जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न सर्वच जण करत होता.मात्र से असून देखील  त्यावेळी असणाऱ्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यात येत नव्हते .मात्र ते विषय महत्वाचे होते समाजावर या समस्यांचा मोठा परिणाम होत होता   अश्या या वातावरणात ज्याच्या घरात समाज सुधारणेचा मोठा वारसा आहे अश्या तिशीतील एक युवक  जो मुळात एका नावाजलेल्या साप्ताहिकात व्यंगचित्रकार म्हणून काम करत आहे तो तेथील नोकरी सोडून स्वतःचे एक व्यंगचित्राद्वारे सामाजितल उणिवा अवगुणांवर कोणालाही त्रास होणार नाही मात्र अचूक संदेश देता येईल  असे साप्ताहिक सुरु करण्याचा तो दिवस आहे. त्या तिशीतील युवकाने सुरु केलेले साप्ताहिक अजून देखील सुरु आहे आज या साप्तहिकाला पण मार्मिक म्हणून ओळखतो आणि ते सुरु करणारे होते श्रद्धेय आदरणीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे .  २०२६ ऑगस्ट  १३ रोजी  मार्मिक सुरु होऊन ६७ वर्ष  पूर्ण होत आहेत त्यामुळे पूर्वी अनेकांचेअत्यंत  आवडते असणारे मात्र आता सध्याच्या राजकीय स्थितीमुळे काहीसे कमी आवडणाऱ्या मार्मिकच्या वर्धापनदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 

मराठी पत्रकारितेच्या इतिहासात ‘मार्मिक’ या साप्ताहिकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. . त्या काळात समाजातील अनेक प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळत नव्हते. अशा वेळी ‘मार्मिक’ने केवळ बातम्यादेण्यापेक्षा समाजातील विसंगती, अन्याय आणि राजकीय ढोंग यांवर व्यंगचित्रे व लेखांच्या माध्यमातून थेट प्रकाश टाकला.

‘मार्मिक’ची खरी ओळख म्हणजे त्यातील धारदार व्यंगचित्रे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशल हातातून साकारलेली ही व्यंगचित्रे तिखट, टोचणारी आणि वास्तववादी होती. सामान्य माणसाच्या मनातील भावना आणि नाराजी यांना चित्ररूप देण्याची ताकद ‘मार्मिक’मध्ये होती. त्यामुळे वाचकांना केवळ माहिती मिळत नव्हती, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडले जात होते.

या साप्ताहिकाने मराठी माणसांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. विशेषतः मुंबईतील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी ‘मार्मिक’ने

सातत्याने भूमिका मांडली. याच विचारसरणीमधून पुढे सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठी चळवळ उभी राहिली. त्यामुळे ‘मार्मिक’ हे केवळ साप्ताहिक न राहता एका परिवर्तनशील आंदोलनाचे माध्यम बनले.

‘मार्मिक’ची भाषा साधी, थेट आणि प्रभावी होती. त्यामुळे ते सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचले. लेखनातील स्पष्टता आणि व्यंगचित्रातील नेमकेपणा यामुळे या साप्ताहिकाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. अनेक तरुण व्यंगचित्रकार आणि लेखकांसाठी ‘मार्मिक’ हे प्रेरणास्थान ठरले.

.सध्याच्या राजकीय वातावरणामुळे मार्मिक आता काहीसे मागे पडले असले तरी एकेकाळी मराठी पत्रकारितेत व्यंगचित्रांचा प्रभावी वापर करून समाजमनावर ठसा उमटवण्याचे कार्य ‘मार्मिक’ने केले होते हे नाकारता येणे अशक्यच . . हसवत-हसवत विचार करायला लावणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे साप्ताहिक मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून मार्मिक  सदैव स्मरणात राहीलहे नक्की 

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वारसा ६७ वर्षाचा

१३ ऑगस्ट १९६० या दिवसाला मराठी पत्रकारितेत अनन्य साधारण महत्व आहे .नुकत्याच काही महिन्यापूर्वी द्विभाषिक मुंबई राज्यातून मराठी भाषिकांचे महा...