लेखाचे विषय

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२६

कार्यकर्त्याची जडणघडण उलगडवणारे पुस्तक 'सेवा साधना'

व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण या तत्त्वावर श्रद्धा ठेवत गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या कार्याचा आज मोठा वटवृक्ष झालेला दिसतो. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आज भारतात अकराशे पेक्षा जास्त शाखा संपर्क केंद्रे च्या मार्फत केंद्राचे कार्य दिवसात दिवस वाढतच आहे यामध्ये स्थानिक पातळीवर काम करणारे स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर केंद्राचे कार्य हेच आपले जीवित कार्य समजून कार्यरत राहणाऱ्या जीवनव्रतींचे मोठे योगदान आहे.

जीवनव्रतींच्या पाहिल्या काही वर्षांमधल्या तुकड्यांना मा एकनाथजींसारख्या कुशल संघटकाकडून यासंबंधीचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्या या व्याख्यानांपैकी काही व्याख्यानांचा संग्रह त्यांच्या पश्चात Sadhana of Service या नावानं प्रसिद्ध झाला. या इंग्रजी पुस्तकाचंच मराठी रूपांतर आहे. मात्र, पुस्तकाच्या मांडणीत मुळापेक्षा बरंच परिवर्तन केलेलं आहे. एकाच विषयावरचा मुळात अनेक प्रकरणांत विभागलेला मजकूर या पुस्तकात एकत्र आणला आहे. त्या दृष्टीनं आवश्यक ते फेरफारकरण्याचं स्वातंत्र्यही घेतलं आहे. तरीही अनेक ठिकाणी पुनरावृत्ती झाल्याचं दिसेल. त्या त्या भागात विषय स्पष्ट होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आणि व्याख्यानाचा ओघ टिकावा म्हणून ही पुनरावृत्ती ठेवली आहे

हे पुस्तक दोन भागात विभागले आहे पहिल्या भागातील व्याख्यानांमध्ये प्रामुख्यानं विचार केला आहे, तो व्यष्टिजीवनाचा. माणसाच्या अगदी बाल्यावस्थेपासून प्रारंभ करून त्याच्या टप्प्याटप्यानं होणाऱ्या प्रगतीचं चित्र एकनाथजींनी इथं स्पष्ट केलं आहे. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय; अनेक जन्मांनंतरच हे ध्येय साध्य होत असल्यानं त्याचा टप्पा म्हणजे या जन्मीचं जीवितकार्य; या कार्यासाठी स्वीकारलेलं सेवेचं माध्यम आणि व्रत; एकदा हे सर्व ठरलं की, त्यानुसार करावा लागणारा जीवनाचा आराखडा; या आराखड्यानुसार व्रतस्थ जीवन जगत असताना पाळावे लागणारे विधिनिषेध, असावी लागणारी मनोभूमिका, स्वीकारावं लागणारं अनुशासन इत्यादी गोष्टींचा विचार या व्याख्यानांमध्ये आहे. हे विचार विवेकानंद केंद्रातला सेवाव्रती कार्यकर्ता डोळ्यांपुढे ठेवून सांगितलेले असले, तरीकार्यकर्ता नसणाऱ्या, पण आपल्या आयुष्याचं ध्येय समजून घेऊन ते गाठण्यासाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या सामान्य माणसाच्या दृष्टीनंही ते मोलाचे आहेत.

दुसऱ्या भागात आपण व्यष्टिजीवनाकडून समष्टीच्या विचाराकडे जातो. या सर्व व्याख्यानांमध्ये संघटना आणि राष्ट्र यांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याला केलेले मार्गदर्शन आहे. संघटना, तिची आवश्यकता; सेवाभावी संघटनेची वैशिष्ट्ये; संघटनेतील कार्यकर्त्यांत आवश्यक असणारे गुण; संघटनेचं कार्य सुरळीत चालण्यासाठी त्याची व्हावी लागणारी विशिष्ट प्रकारची घडण असा संघटनात्मक विचार पहिल्या काही व्याख्यानांत आहे. त्यानंतर 'विवेकानंद केंद्र' या

सेवाभावी संघटनेच्या तत्त्वज्ञानाचा विचार येतो. हे तत्त्वज्ञान, 'केंद्राची' कार्यपद्धती, 'केंद्राची' उद्दिष्टं; ज्यांनी ही उद्दिष्टं साध्य करायची ते समर्पित कार्यकर्ते अर्थात 'जीवनव्रती'; नवनवीन कार्यकर्त्यांचा शोध आणि त्यांची घडण असे विषय एकनाथजींनी नंतरच्या व्याख्यानांत चर्चिलेले आहेत. या सर्व विचारांचं वैशिष्ट्य हे की, केवळ विवेकानंद केंद्राच्याच नव्हे, तर कोणत्याही संघटनेतील कार्यकर्त्याला त्यांतून मोलाचं, महत्त्वाचं आणि मूलगामी मार्गदर्शन मिळेल!

सदर  पुस्तक हे थेट माननीय एकनाथजी यांच्या विचारांचे संकलन असल्याने ज्यांन केंद्र मुळातून जाणून घ्यायचे आहे अशांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र त्यांनीच हे पुस्तक वाचावे असे मात्र नाहीये‌. विवेकानंद केंद्र यांच्या जीवनवतींना उद्देश्यून केलेली ही भाषणे कोणत्याही संघटनेच्या स्वयंसेवकाला  सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहेत. किंबहुना तुम्ही कोणत्या संस्थेचे सदस्य असाल नसाल मात्र आपल्या भारत देशाचे उत्तम नागरिक होण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचावेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असेच हे पुस्तक आहे

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२६

विवेकानंद केंद्राच्या प्रार्थनेचा सविस्तर अर्थ उलगडणून सांगणारे पुस्तक :ध्येयमार्गानुयात्रा



कोणत्याही कार्यासाठी लोक जेव्हा संस्था स्थापन करतात तेव्हा त्या लोकांमध्ये एकता निर्माण व्हावी आपुलकीची आपण एक आहोत अशी भावना निर्माण हवी यासाठी विविध उपाय योजना जातात जसे झेंडा तसेच प्रार्थना यांची निर्मिती करणे होय. स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत व्यक्ति निर्मणातून राष्ट्र राष्ट्रनिर्मिती असे ध्येय अंगी बाणवत गेल्या पन्नासहून अधिक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या विवेकानंद केंद्राला सुद्धा एक प्रार्थना आहे

स्वामीजींच्या कल्पनेतील भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी मा. एकनाथजींनी अतिशय शिस्तबद्ध, निवडक आणि वेचक तरुण स्त्री-पुरुषांना एकत्र करण्याची आणि त्यांच्या विखुरलेल्या आध्यात्मिक व शारीरिक शक्तींना संघटित स्वरूप देण्याची एक योजना आखली. मातृभूमीची सेवा करण्याच्या ध्येयासाठी जीवन समर्पित करू इच्छिणाऱ्या युवक- युवतींना एकत्र करण्याचा त्यांचा उद्देश होता आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना एकत्र केले आणि त्यांना जीवनव्रती म्हणून प्रशिक्षण देण्याची परंपरा सुरू केली. राष्ट्रपुनरुत्थान हेच जीवनव्रतींच्या जीवनाचे उद्दिष्ट त्यांना अपेक्षित होते. अशा युवक जीवनव्रतींनी एकांतवासात साधू व्हावे, असा अर्थ त्यांना अपेक्षित नव्हता.

जीवनव्रती हे केंद्राच्या कार्याचा कणा बनावे, अशी एकनाथजींची इच्छा होती. आपल्या जीवनातील थोडासा काळ 'राष्ट्रपुनरुत्थानासाठी मनुष्यनिर्माण' या अवघड कामास देण्यास हजारो लोकांना प्रवृत्त करावे, असे स्वप्न एकनाथजींनी पाहिले. केंद्राचे हे ध्येय केंद्रप्रार्थनेत अंतर्भूत करण्यात आले आहे. हे आपणा सर्वांनी पटते ते मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित ध्येयमार्गानूयात्रा
 या प्रार्थनेची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाच्या वाचनाने

हे पुस्तक म्हणजे केंद्रप्रार्थनेचा अर्थ आणि महत्त्व विस्ताराने स्पष्ट करण्याचा एका अनुभवी केंद्रकार्यकर्त्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे असे कार्यकर्ते आणि हितचिंतक, जे या प्रार्थनेकडे सामर्थ्य, सहयोग आणि प्रेरणा यांचा अखंड स्रोत म्हणून पाहतात, त्यांना तिचा अर्थ सहज अवगत होईल. जे या केंद्र-प्रार्थनेच्या अर्थावर सखोल चिंतन करतील, त्यांना केंद्राने समोर ठेवलेले उद्दिष्ट समजू शकेल आणि ते त्या उद्दिष्टाप्रती न अडखळता जाऊ शकतील, 
आणि जे या केंद्राशी निगडित आहेत, ते या पुस्तकाचा जास्तीतजास्त उपयोग करून घेतील. कारण हे पुस्तक
म्हणजे दीर्घ आणि सखोल मनन आणि चिंतनाचे फल आहे.
राष्ट्रपुनरुत्थानासाठी मनुष्यनिर्माण' या माध्यमातून धर्मस्थापनेच्या प्रक्रियेला हातभार लावणे, हा केंद्राच्या आदर्शाचा गाभा आहे.स्वामी विवेकानंदांनी आधुनिक जगाला जी सनातन मूल्ये स्पष्ट करून सांगितली, त्याच सनातन मूल्यांवर राष्ट्रनिर्मितीचे ध्येय आधारलेले असेल. ही सनातन मूल्ये आणि या प्राचीन राष्ट्राचे आदर्श ही प्रार्थना तंतोतंत अंमलात आणते, हे या पुस्तकात सांगण्यात आलेल्या तीच्य स्पष्टीकरणातून अनुभवयास येते‌.सुमारे पावणे दोनशे पानाच्या या पुस्तकात फक्त तीचे भाषांतर देण्यात आलेले नसुन या प्रार्थनेमागची भावना उलगडवून देण्यात आली आहे‌.

सदर पुस्तक वाचल्यानंतर आपण प्रार्थनेचा अधिक जवळ जाऊ शकत असल्याने प्रत्येकाने केंद्र कार्यकर्त्यांनी किमान एकदा हे पुस्तक वाचावेच असे आहे. आपण जे कार्य करत आहोत त्या मागचा कार्यकारण भाव अधिक सखोल आणि सविस्तरपणे व्यक्त झाल्याने हे पुस्तक वाचल्यानंतर कार्यकर्त्याची प्रार्थना विषयीची भावना अधिक उत्तम होत तो कार्यात उत्तम रीतीने जोडला जाऊ शकतो याबाबत शंका नसावी.

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२६

कर्मयोगाच्या आधारे व्यक्तीमत्व कसे सुधारावे, ?हे सांगणारे पुस्तक

 

प्रत्येक जीव अव्यक्त आहे. ते ईश्वरत्व पूर्णपणे व्यक्त करणे हेच मानवाचे ध्येय आहे. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग अथवा राजयोग या चारपैकी कोणत्याही एका मार्गाने किंवा अनेक मार्गांनी हे ईश्वरत्व प्रकट करा, हाच खरा धर्म होय. मूर्तिपूजा, उपदेश, मंदिर, धर्मग्रंथ या सर्व केवळ तपशिलाच्या बाबी आहेत.' असा संदेश आपल्या हिंदू संस्कृतीत देण्यात आलेला आहे

योद्धा संन्यासी म्हणून सुप्रसिद्ध असणारे युवकांचे प्रेरणा स्त्रोत म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी या चारही योगांवर चार स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. विशेष म्हणजे स्वामीजींच्या जीवनामध्ये या चारही योगांचा सुंदर समन्वय पाहायला मिळतो. प्रथमदर्शनी स्वामी  ध्यानमार्गी (राजयोगी) वाटतात. पण ते उत्कट भक्तदेखील होते. रामकृष्णदेवांच्या पश्चात अवघ्या १५ वर्षांमध्ये त्यांनी सारे जग हलवून सोडले, हा त्यांचा उत्कट कर्मयोग होय. त्यांची ज्ञानमार्गातील तत्त्वचिंतनाची भूमिका त्यांच्या वेदांतपर प्रवचनातून दिसून येते.  रामकृष्णदेवांच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे विविध आध्यात्मिक भावांचे संमेलन पाहायला मिळते, त्याप्रमाणे स्वामीजींच्या जीवनामध्ये चारही योग प्रकट झालेले दिसतात.

स्वामीजींच्या चारही योगांवरील ग्रंथांचा वाचक किंवा श्रोता अमेरिकन मनुष्य होता. त्यांनी मुख्यत्वे पश्चिमेतील माणसांसाठी ही व्याख्याने दिली किंवा काही लेख लिहिले. त्यांची भाषादेखील सुमारे १२० वर्षांपूर्वीची आहे. आजच्या
भारतीय तरुणांसाठी हे चारही योग संक्षिप्त करून सुलभ भाषेत मांडणे ही काळाची गरज होती, आणि ही गरज पुर्ण
होती   सुनील चिंचोळकर यांनी लिहलेल्या मंत्र यशाचा या पुस्तकातून कर्मयोगाच्या साधकाला स्वामीजींसारख्या थोर कर्मयोग्याने जी महत्त्वाची २५ सूत्रे दिली आहेत, त्याचे अत्यंत सोप्या मराठी भाषेत मात्र सगळ्या अर्थ उघडून सांगणारे स्पष्टीकरण म्हणजे सदरचे पुस्तक होय. या पुस्तकाच्या वाचानाने आपणास  विवेकानंदा यांनी मांडलेल्या  कर्मयोगाच्या 25 सूत्रांचे अत्यंत सुलभ सोप्या सहज होणाऱ्या भाषेत ते देखील अनावश्यक तांत्रिक माहितीच्या जंजाळ्यात न अडकता आकलन होते   120 पानांमध्ये मांडलेले हे पुस्तक आपणास कर्मयोगाची ज्याला काहीच माहिती नाही त्याला मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरेल यात शंका नसावी. 

यश मिळविण्यासाठी वेळेचे नियोजन, एकाग्रता, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. केवळ मोठी स्वप्ने पाहून उपयोग नाही, तर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दररोज छोटे-छोटे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल, तर अडचणींवर मात करणे शक्य होते.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांपासून ते विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला यशाचे सूत्र जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशा वेळी यशाकडे पाहण्याची योग्य दृष्टी विकसित करण्यासाठी 'मंत्र यशाचा' हे पुस्तक निश्चितच वाचनीय ठरते.

यश म्हणजे केवळ वैयक्तिक प्रगती किंवा आर्थिक संपन्नता नव्हे, तर स्वतःचा विकास साधताना समाजासाठीही उपयुक्त ठरणे होय. यशस्वी जीवनाची दिशा शोधणाऱ्या प्रत्येकाने या पुस्तकाची आवर्जून ओळख करून घ्यावी.

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६

कहाणी विवेकानंद केंद्राची '


आपल्यापैकी अनेकांनी कन्याकुमारी येथे ज्या खडकावर बसून स्वामी विवेकानंद यांनी तीन दिवस रात्र तप केले.जिथे त्यांना या भारतभुमीस गतवैभव मिळण्यासाठी काय करावे लागेल याचा मार्ग सुसप्ट झाला.त्या ठिकाणी उभारलेल्या शिला स्मारकाला भेट दिली असेल या भेटीदरम्यान या खडकाच्या समोरच १०० एकर जमिनीवर वसलेले विवेकानंद केद्राचे मुख्यालय 'विवेकानंदपुरम देखील बघितले असू शकते‌‌

 'मनुष्यनिर्माण' व 'राष्ट्रपुनरुत्थानाचे' विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न विवेकानंद केंद्र करीत आहे. संपूर्ण भारतात विवेकानंद केंद्राचे कार्य २८ राज्यांमधील नगरस्थाने, कार्यस्थाने, शाखा, विविध प्रकल्प यांच्या माध्यमातून एकूण ११०० पेक्षा जास्त ठिकाणी सुरू आहे.

१) नैसर्गिक साधनसंपत्ती विकास
२) ग्रामीण विकास प्रकल्प
३) विवेकानंद केंद्र सांस्कृतिक संस्था
४) वैदिक दर्शन प्रतिष्ठान
५) विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन
६) अरुणाचल बंधू परिवार.

आपल्या महाराष्ट्राचाच विचार करायचा. झाल्यास केंद्राच्या 'मराठी प्रकाशन विभागा'तर्फे पुणे येथून वैचारिक व आध्यात्मिक विषयांवरील विविध पुस्तके, दैनंदिनी, कार्यदर्शिका प्रकाशित होतात. 'विवेक विचार' हे मासिकही सोलापूर येथून प्रकाशित होते.

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सर्वांना योगाच्या माध्यमातून अधिक गुणवत्तापूर्ण जीवन कसे जगता येईल, यावर संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी संस्था असावी, या उद्देशाने विवेकानंद केंद्र कन्याकुमारीने 'विवेकानंद केंद्र वेदान्तिक अॅप्लिकेशन ऑफ योग अॅण्ड मॅनेजमेंट, सोलापूर' हा प्रकल्प हाती घेतला आहे.केंद्राचा प्रशिक्षण व सेवा प्रकल्प त्र्यंबकेश्वरपासून चार किलोमीटर अंतरावरील जव्हार फाट्यावर असलेल्या पिंपळद येथे आहे. या प्रकल्पामार्फत १) आरोग्य सेवा २) स्वयंरोजगार मार्गदर्शन ३) शेती, जलव्यवस्थापन व गोसंवर्धन इत्यादी उपक्रम राबविले जातात. ४) ग्रामविकास वसतिगृह आहे. ५) कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात.

हे सर्व कामकाज कसे चालते.आपल्या सारखीच सर्वसामान्य व्यक्ती इतके मोठे कार्य कसे काय करु शकतात‌. मी या संस्थेसाठी काय करु शकतो यासारख्या असंख्य प्रश्नाची उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचेच कार्यकर्ते असलेले यांनी लिहिलेले.  हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरते‌.

विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानाडे यांची केंद्र स्थापनेमागची प्रेरणा, त्यांचे उदिष्ठ, त्यांनी आखून दिलेली कार्यपद्धती, मा.एकनाथजी यांनी केंद्राची विद्यमान कार्यप्रणालीच का निवडली,केंद्राच्या उभारणीमध्ये त्यांनी घेतलेले कष्ट या सर्व बाबींविषयी यामध्ये सविस्तरपणे सांगण्यात आले आहे‌.

सुमारे सव्वाशे पानांच्या या पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी असुन,वाचकाला विवेकानंद केंद्राविषयीम अधिकाधीक जाणुन घेण्यास प्रवृत्त करणारी आहे.वाचक पूस्तक वाचताना केंद्राच्या कार्याचा भाग होण्याची इच्छा वाचकाच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणारच नाही अशी पुस्तकाची रचना आहे.

 संघ विचारावर श्रद्धा ठेवत राष्ट्र निर्मितीचे काम करणाऱ्या विवेकानंद केंद्राची समग्र माहिती आपणास या पुस्तकाद्वारे होते. तरी व्यक्ती निर्माणातू राष्ट्र निर्मितीचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या विवेकानंद केंद्राची माहिती होण्यासाठी आपण सर्वांनी किमान एकदा हे पुस्तक वाचायला हवे



कार्यकर्त्याची जडणघडण उलगडवणारे पुस्तक 'सेवा साधना'

व्यक्ती  निर्माणातून राष्ट्र निर्माण या तत्त्वावर श्रद्धा ठेवत गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या विवेकानंद केंद्र कन्याकुमारी...