सोमवार, २३ मार्च, २०२६

प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुमारवयीन टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा ठसा त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर राहतो. या काळात जर त्यास योग्य संगत न मिळण्यास त्याचे दुष्परिणाम संबधित व्यक्तीलाआयुष्यभर भोगावे लागतात. आयुष्याचे सोने किंवा मातेरे करण्याची ताकद या कुमारवयीन आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये असते.व्यक्तीला जगाची ओळख  होण्याच्या या काळातील एखादे चुकीचे पाऊल आयुष्याचा नाश करायला पुरेसे असते .असे सातत्याने म्हंटले जाते.आणि या विधानाची साक्ष आपणास पटते ती, मुनव्वर शाह लिखित आणि निराली प्रकाशनतर्फे प्रकशित  ' यस आय एम गिल्टी'   या २०० पानी पुस्तकातून. 

वाचक मित्र,मैत्रीणीनो इसवी सन २०२६ या वर्षात माझ्या वाचनाचा रोख प्रामुख्याने आत्मचरित्र,  चरित्र आणि अनुभव कथन असलेल्या पुस्तकांवर असणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याच साखळीतील एक पुस्तक म्हणून मी हे एका गुन्हेगाराचे अनुभव कथन वाचले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही पुणे शहरात एके काळी खूप चर्चेत असलेल्या जोशी - अभ्यंकर खून खटल्यातील आरोपीने त्याचे अनुभव लिहले तेच म्हणजे हे पुस्तक एक अत्यंत साधा- सरळ, पापभिरू, धार्मिक संस्कारात लहानाचा मोठा झालेला  मुलगा चुकीच्या संगतीमुळे फासावर जातो त्यामुळे आपली सांगत किती महत्त्वाची असते हे आपणास हे पुस्तक स्पष्टपणे दाखवून देते. 

२०० पानी या पुस्तकाची सुरवातीची सुमारे १६ पाने प्रकाशकाचे मनोगत, पूर्वी हे पुस्तक वाचल्याची मनोगते ,या पुस्तकांचे संपादन केलेल्या शुभदा गोगटे यांचे तसेच मुनव्वर शाह यांची  मनोगते या पुस्तकांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न कोणत्या कामासासाठी वापरले जाते.आणि त्याच कामासाठी का वापरले जाते या पुस्तकाच्या निर्मितीतयोगदान दिलेल्या व्यक्तींचे आभार या सारख्या बाबींवर खर्च करण्यात आलेली आहेत.हा मजकूर ज्या पानावर छापला आहे त्या पानांना क्रमांक क्रमांक देताना त्यांना अक्षरी एक ,दोन तीन असे क्रमांक  दिले आहेत तर  सुरुवातीचा हा भाग संपल्यावर जेथून मुनव्वर आपले अनुभव  मांडायला सुरुवात करतो त्याला १, २, ३, असे अंकी  क्रमांक दिले आहेत अंकी आणि अक्षरी दिलेल्या पानाच्या  क्रमांकाचा एकत्रित विचार करता १७ व्या पानापासून पुस्तक सुरु होते त्यातही सुरवातीची दोन पाने एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करतो ,यामध्ये  व्यक्तीचे स्वतःचे कर्म आणि दैव प्रारब्ध, देवाची इच्छा या गोष्टींचा किती प्रभाव असतो या  सारख्या बाबींवर आध्यत्मिक दृष्टीने चर्चा केली आहे  अध्यात्मिक बाबींवरील मजकुराबाबत सांगायचे झाल्यास माझा या विषयातील अभ्यास खूपच कमी असेल किंवा मुनव्वरने/ संपादिका शुभदा गोगटे यांनी  तो मुळातच किचकट  भाषेत लिहला असेल मला वैयक्तिकरित्या तो मोठ्या प्रमाणात कंटाळवाणा वाटला असो 

तर ही दोन पाने वाचल्यावर ३ ऱ्या  पानापासून मुनव्वरने  स्वतःविषयी सांगायला सुरवात केली आहे . जे  पान  क्रमांक १४३ पर्यंत आहे पान क्रमांक १४३ ते १४८ पर्यंत मुनव्वरने  सह आरोपीच्या व्यक्तिमत्तविषयी लिहले आहे . त्या नंतरची पाच पाने पुन्हा कंटाळवाणी आहेत ज्यात विविध सुविचार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुस्तक प्रकाशनादरम्यान प्रकाशक शरद गोगटे आणि मुनव्वर यांच्यातील पत्रव्यवहार आणि प्रकाशकास एका गुन्हेगाराचे अनुभव कथन प्रसिद्ध केल्यावर काय काय अनुभव आले याबाबत माहिती देते . 

मुनव्वरने स्वतःच्या आयुष्यावर लिहलेले वाचताना ७३ व्या  पानापर्यंत आपण एखाद्या गुन्हेगाराचे नव्हे तर एखाद्या  सर्वसामान्य व्यक्तीने त्याचे रोजचे लिहलेले अनुभव तर वाचत नाहीना असे वाटावे असे वाटते .

मुनव्वरला ज्यामुळे कुप्रसिद्धी मिळाली तो जोशी - अभ्यंकर खून खटल्याच्या ठळक स्पष्टपणे उल्लेल्ख ७४व्या पानावर होतो तेथून पान क्रमांक १४३ पर्यंत जोशी - अभ्यंकर खून कसा झाला ? त्याला कसे अटक केली ?अटक केल्यावर त्याला कशी वागणूक मिळाली ? अटक झाल्यावर त्याचा दिनक्रम काय होता ? तुरंगात असताना धार्मिक बाबींविषयी अभ्यास करण्याची आवड त्यात कशी निर्माण झाली ?तुरुंग प्रशासनाकडून त्याची पूर्तता कोणत्या प्रकारे झाली या विषयी सांगण्यात आले आहे . 

ज्यांना क्रिमीनल सायकॉलॉजीच्या दृष्टीने या पुस्तकाकडे बघायचे असेल त्यांनी ७४ व्या पानापासून १४८ पानपर्यंतच वाचले तरी चालण्यासारखे आहे .ज्यांना आपण कोणत्या संगतीत राहतो  हे का महत्त्वाचे आहे  या विषयी वाचायचे असेल त्यांनी पान क्रमांक १ पासून ७३ पर्यंत वाचलेले चालू शकते .ज्यांना समाजाचा विचार कोणत्या प्रकारे कार्य करतो या विषयी जाणून घेण्यात स्वारस्थ आहे  त्यांनी पान १६६ पासून शेवटच्या पानपर्यंत वाचावे  ते त्यांना माहिती देणारे असेल .ज्यांना  गुन्हेगार देखील एक माणूसच असतो त्याला देखील भावना असतात हे समजून घेयचे असेल तर त्यांनी पानं  क्रमांक १५४ ते १६५ मध्ये छापण्यात आलेला मुन्नावर शाह आणि प्रकाशक शरद गोगटे यांच्यात झालेला पत्रव्यवहार वाचावा 

 मुन्नावर याने केलेला गुन्हा निंदनीयच होता ज्याची क्षिक्षा त्यास मिळाली .मात्र लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या प्रमाणे आयुष्यात जगताना आपली एखादी छोटीशी चूक आपले आयुष्य कसे पूर्णतः नासवू शकते हे समजण्यासाठी आपण हे पुस्तक वाचलाच यावे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुमारवयीन टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा ठसा त्यांच्या पुढील संपूर्...