लेखाचे विषय

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

मानववतेच्या तिर्थस्थानाची माहिती देणारे पुस्तक "आनंदवन प्रयोगवन'


जे दुःखी, कष्टी आणि पीडित आहेत, त्यांना जो माणूस आपलं मानतो, तोच खरा साधू (संत) आहे आणि त्याच्या ठिकाणीच देव वास करतो हे सांगणारा संत तुकाराम यांचा 
'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा अभंग सुरसिद्ध आहे.अभंग सुप्रसीद असला तरी प्रत्यक्षात त्या प्रमाणे वागणारे हाताचा बोटावर मोजता येतील इतकेच लोक आचरण करत असल्याचे आपणास सहज दिसते. या मोजक्या लोकांमध्येच मोजता येतील असे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे होय. बाबा  आमटे यांनी कुष्ठरोगी, दिव्यांग, वनवासी व्यक्ती आणि यासारख्या समाजातील मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या नागरिकांना समजाजच्या मूळ प्रवाहात आणण्यसासाठी  लोक बिरादरी, हेमलकसा, आनंदवन सोमनाथ आदी प्रकल्प उभारले आहेत . या प्रकल्पाची माहिती देणारी पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध आहेत अश्याच प्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकांपैकी एक  म्हणजे बाबा आमटे यांचे सुपुत्र असलेल्या डॉ विकास आमटे यांनी लिहलेले "आनंदवन लोकवन हे पुस्तक .या पुस्तकात डॉ विकास आमटे "आनंदवन चा इतिहास उलगडला आहे .हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
              या पुस्तकात १९० पानाच्याद्वारे ७ प्रकरणातूनरंजक पद्धतीने  आनंदवनची गोष्ट उलगड जाते.पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे. जी वाचल्यावर चटकन समजते .सलग वाचल्यास कंटाळा येतो हे लक्षात
घेऊन जाणीपूवक पुस्तकात विविध चित्रे देखील देण्यात आलेली आहेत ज्यामुळे पुस्तक वाचताना आपण त्यात रंगून जातो आणि पुस्तक कधी वाचून संपले हे लक्षात सुद्धा येत नाही. 
  पहिल्या प्रकारांत डॉ विकास आमटे यांनी गोष्ट सांगण्यापूर्वी या शीर्षकाखाली हे पुस्तक का लिहले? हा हेतू सांगितला आहे ज्यात त्यानी अधिकृत माहिती व्हावी यासाठी हे पुस्तक लिहले असल्याचे सांगितले आहे. या पुस्तकाचे लेख कसे झाले ? कोणी त्यास मदत केली हे या प्रकरणातून सांगण्यात आले आहे. एका प्रकारे हि पुस्तकाची प्रस्तावनाचं ते असे पण म्हणू शकतो दुसऱ्या  प्रकरणात बाबा आमटेयांना आनंदवनाची संकल्पना कशी सुचली ?त्यांनी आनंदवन उभारण्याच्या आधी कोणते प्रकल्प उभारले ? त्यावेळी त्यांना काय अनुभवलं आले ? आनंदवन उभारण्याचं आधी बाबा आमटे उदर्निर्वाहासासाठी काय करत होते हे सांगितले आहे.आनंदवनची निर्मिती करताना बाबा आमटे यांनी आलेल्या अडचणींवर कोणत्या प्रकारे मात केली ? आनंदवनची सुरुवात कोणत्या प्रकारे झाले डॉ  विकास आमटे यांचे आनंदवनातील बालपणीचे अनुभव सांगितले आहे.झडलेली बोटे ,निर्मितीक्षम हात असे शीर्षक असलेल्या या प्रकरणातून आनंदवन काय आहे हे समजण्याची आपली पूर्वपीठिका तयार होते    तिसऱ्या प्रकरणात ?रोगमुक्तीचा वाढता परीघ या शीर्षकाखाली आपण आनंदवनचे करी कसे विस्तारित गेले कुष्ठरोग्यांच्या सेवेतून सुरु झालेले आनंदवनच्या कर्यणारे अपंग कल्याण
आणि अन्य आरोग्यविषयक सेवा देण्यास कोणत्या प्रकारे सुरुवात केली .किंबहुना असे करणे  सुरु करावे असे बाबा आमटे आणि आनंदवन व्यवस्थापनास का वाटले हे संगितले आहे 
चौथ्या प्रकरणात आनंदवनात शेती करणे कोणत्या पद्धतीने सुरु कऱण्यात आले , मुळात त्यांची गरज का भासली आजमितीस आनंदवनातील शेतीचे स्वरूप काय आहे ? आज आनंदवनास भेट दिली असता आपणास दाट जंगलात आल्यासारखे वाटते ? या जंगलाची निर्मिती कशी झाली ?याची माहिती देण्यात आली आहे २९ पानाच्या या प्रकरणाचे नाव हिरव्या निर्मितीचा ध्यास असे आहे / उद्योगातून आत्मसन्मान असे शीर्षक सलेल्या पाचव्या प्रकरणात ३० पानांद्वारे डॉ विकास आमटे यांनी आनंदवनातविविध प्रकारचे व्यवसाय करणे कसे सुरु झाले? आनन्दानात कोणते उद्योग सध्या सुरु आहेत ? आनंदवनात सुरु झालेले कोणते उद्योग काही कारंणारे बॅड झाले आहेत का ? याची माहिती मिळते या प्रकरणात आनंदवनाखेरीज बाबत आमटे त्यांच्याकडून अन्य कोणते उपक्रम राबवण्यात येतात याची तोंडओळख करून देण्यात अली आहे तर पुढच्या म्हणजेच सहाव्या प्रकरणात ज्याचे नाव कुष्ठमुक्तांचे हात वंचितांच्या मदतीला असे आहे त्यात या विषयी सविस्तर सांगण्यात आले आहे अखेरच्या सातव्या प्रकरणात आनंदवनाच्या व्यस्थापनविषयी आणि आमटे परिवाराच्या सध्याच्या शिलेदारणमाची ओळख करून देण्यात आले आहे 
आनंदवन म्हणजे फक्त कुष्ठरोगाशी संबंधित संस्था नव्हे तर त्याही पलीकडे आनंदवनाचे कार्य आहे हे कार्य समजून घेण्यासाठी किमान एकदा तरी हे पुस्तक वाचाच 


मी थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्याविषयी वाचलेले हे दुसरे पुस्तक मी वाचलेल्या पहिल्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे, 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'

पुस्तकाची दुनिया मोठी  अफलातून आहे. पुस्तक लेखनाचा प्रत्येक प्रकार आपणस काहीतरी शिववून जातो .ना सी फडके यांनी मराठीत मोठ्या प्रमाणात रुजवलेला असा निबंध हा प्रकार जो  विचारशक्तीला चालना देतो. उत्तम काव्य 'आपणास शब्दाची जादू उलगडून सांगते. कथा कादंबरी हा प्रकार आपले ऊत्तम मनोरंज करतो  तर चरित्र तसेच  आत्मचरित्र हा प्रकार आपणस  आयुष्यचं सुखदुःख सांगतो.  एखाद्या कठीण स्थितीत प्रतिभावान माणसे कोणत्या प्रकारे स्थिर चित्र राहिली. . त्यांना याचे काय फळ मिळाले ?  हे आपणास समजते. त्यामुळे आपण देखील जर आपणावर तशी स्थिती उद्भवलीच तर शांत राहायचे हे समजून घेऊ शकतो तसेच दुसऱ्याचे दुःख समजून घेण्याची आपली मानसिकता  तयारहोण्यासाठी आत्मचरीत्रे ,चरित्रे मदत करतात असे अनेक मानसशास्त्रज्ञाचे मत आहे, याचा अनुभव घेण्यासाठी या २०२६ वर्षी मी अधिकाधिक चरित्रे आणि आत्मचरीत्रे वाचण्याचे ठरवले आहे. तर या विशिष्ट हेतू ठेवून सुरु केलेल्या या २०२६ च्या वाचनातले पहिले पुस्तक मी नुकतेच वाचले. ते होते   'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'
 डायरी ऑफ ऍना फ्रॅंक', एक असे अनुभवकथन जे  एका कुमारवयीन अल्पयुषी मात्र प्रगल्भ सशक्त अश्या योग्य संधी न मिळालेल्या  लेखिकेने तिच्या आयुष्यातील २ वर्षाच्या विदारक स्थिती सांगताना केले आहे असे आपण या पुस्तकाबाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास म्हणू शकतो. .एखाद्या समाजाला विनाकारण
खलनायकाच्या भूमिकेत उभे केल्यास काय होऊ, शकते ? याचे हृद्यद्राक चित्र आपण या पुस्तकातून समजते.  या फक्त ऍना फ्रॅंक या कुमारवयीन मुलीच्या ८० वर्षांपूर्वी लिहलेल्या आठवणी नाहीत.  या आहेत कोणत्याही प्रकारची कट्टरता किती वाईट असते हे सांगणाऱ्या आठवणी. सुमारे २७० पानाच्या या पुस्तकात आपणास दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी ज्यू  धर्मियांवर कोणत्या प्रकारे अत्याचार करण्यात आला. हे समजते .                      या आठवणी वाचताना  आपणास एक कुमारवयीन मुलगी ताणतणावांना कोणत्या प्रकारे सामोरे जाते ? कुमारवयीन भावना कोणत्या प्रकारे असतात. ?  युद्ध खरोखरीच कोणत्या समस्येचे उत्तर असू शकते का ? युद्धामुळे जनजीवन कोणत्या प्रकारे विस्कळीत होते. ? या सध्याची स्थिती बघता अत्यंत आवश्ययक असणाऱ्या प्रश्नांनाबाबत विचार करायला भाग पडते. ज्यांना इस्राईल पेलेस्टाईन या सारख्या संघर्षात तेथील मुलेमुली काय अनुभवत असतील याचे वर्णन वाचायचे असेल मात्र त्यांना तेथील अनुभव वाचता येत नसतील त्यांना हे पुस्तक वाचून त्याबाबत मोठ्या प्रमाणात कल्पना सहज येऊ शकते . पुस्तक सुमारे ८० वर्षांपूर्वी लिहलेले आहे तेव्हाची
स्थिती आणि ताची स्थिती पूर्णतः बदलली आहे असे सांगून या पुस्तकाकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही.
किंबहुना  मी हा मजकूर लिहीत असताना रशिया - युक्रेन युद्धाला लवकरच ४ महिने पूर्ण होतील अद्याप त्याचे ऊत्तर सापडले नाहीये . अमेरिका आणि युरोपीय राष्ट्र यांच्यात तणाव आहे त्या पार्शवभूमीवर हे प्रश्न अधिकच महत्त्वाचे ठरतात                                                               या डायरीत ऍना  फ्रॅंक' फक्त त्यावेळी ज्यू लोकांना कोणत्या हालापेष्टाना सामोरे जावे लागले हेच सांगत नाही.  तर त्यावेळी तिला भेटायला येणाऱ्या आणि काही कारणामुळे भेटायला न येऊ शकणाऱ्या व्यक्तींविषयी  देखील अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने विचार मांडते. या विचारांमध्ये कुमारवयीन आकर्षण देखील आहे. या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत मूळ डायरीचे संपादन करताना हो भाग मोठ्या प्रमाणात वगळला असल्याचे सांगण्यात आले आहे त्यातही भडकपणा मोठ्या प्रमाणात कमी केला आहे असे  सांगण्यात आले आहे मात्र तो पूर्णतः काढून टाकला नसल्याचे या पुस्तकाच्या वाचांतून समजते .आई नई मुलगी यांचे नातेसंबंध कसे असतात? या नटे संबंधात कोणत्या गोष्टीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो.  या गोष्टी या पुस्तकाच्या वाचनाने उलगडतात .ऍनाने  या  खेरीज अन्य लेखेन सुद्धा केले त्याची तयारी तिने कशी केली( ज्यात दोन अशंतः लेखन केलेल्या दोन कादंबरी आणि काही निबंध स्वरूपातील लेखन याचा समावेश होतो ) याची माहिती मिळते .स्वतःतील लेखनाचा स्पार्क तिने कसा ओळखला होतायुद्ध संपल्यावर तिने त्याला गती देण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन कसे केले होते. याची देखील माहिती आपणास मिळते . ज्यामुळे अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र लेखिकेचे,  मात्र ' योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे,  'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'असेच म्हणावे लागते 


या आत्मपर कथनाशिवाय  ऍना फ्रॅंक' यांनी लिहलेल्या मात्र फारश्या प्रसिद्ध नसलेल्या कादंबरीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

लाईट.. ‌कॅमेरा.... ॲक्शन

विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात इथे दर बारा मैलावर  भाषा बदलते असे सांगण्यात येते. जो देश जगातील सातवा मोठा देश आहे. आणि ज्या देशाच्या अधिकृत अशा 22 भाषा आहेत. तसेच जगातील बहुतेक सर्व प्रमुख धर्माचे लोक ज्या भारतात राहतात. अश्या खंडप्राय देशाला ज्या तीन गोष्टी जोडतात त्यातील एक गोष्ट म्हणजे चित्रपट. ज्याची ओळख होते तीन शब्दातून. 'लाईट कॅमेरा ॲक्शन' हे तीन शब्द ऐकल्यावर आपल्या समजते येथे कोणत्यातरी मालिकेचे अथवा चित्रपटाचे चित्रकरण सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विचार केला असता जगात 210 देश आहेत. या प्रत्येक देशात काही प्रमाणात चित्रपट निर्मिती होते. मात्र या 210 देशांमध्ये सर्वाधिक चित्रपट निर्मिती होते ती आपल्या भारतात. त्यामुळे जगात चित्रपट निर्मितीत काय सुरू आहे? आपण काय करतो आहोत? याची माहिती असणे हे आवश्यक ठरते, आणि ही माहिती मिळते विविध ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवात. या चित्रपट महोत्सवात वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट एकाच छताखाली दाखवले जातात. त्यामुळे चित्रपट रसिकांना चित्रपट निर्मितीसाठी कोणते तंत्र वापरले जाते ? आपण कोणते तंत्रज्ञान वापरतो आहोत? कोणत्या विषयावर चित्रपट बनतात? आपण कोणत्या चित्रपट विषयावर चित्रपट तयार करतो या सारख्या विषयांची माहिती सविस्तर मिळते. त्यामुळे हे चित्रपट महोत्सव हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जगभरात आणि आपल्या भारतात सुद्ध वेळ ठिकाणी हे चित्रपट आयोजित केले जातात. त्यातीलच आपल्या महाराष्ट्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा असा चित्रपट महोत्सव म्हणजे 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' होय. 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026' सध्या सुरू आहे. या चित्रपट महोत्सवाचे निमित्त साधत दर आठवड्याला एका वेगवेगळ्या विषयावर विशेषांक प्रकाशित करणाऱ्या साप्ताहिक सकाळकडून या आठवड्याचा  विशेष अंक हा चित्रपट विषयावर काढण्यात आलेला आहे. जो मी नुकताच वाचला.
           या अंकात आपणास सिनेमाची भाषा , चित्रपट निर्मितीची प्रक्रिया चित्रपट घडताना कोणत्या गोष्टीचे काळजी घ्यावी तसेच त्यांचे प्रमोशन करताना सुद्धा कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी गेल्या पंचवीस वर्षात कोणते मोठे चित्रपट भारतात येऊन घेऊन गेले लहान चित्रपटांनी आणि निर्मात्यांनी कश पद्धतीने सुरुवात करावी ? चित्रपटातील महिलांचे चित्रीकरण आणि महिला सबलीकरण यांचा सहसंबंध याविषयी माहिती मिळते तसेच
चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात? चित्रपटाचे मानसशास्त्र म्हणजे नक्की काय चित्रपट निर्मिती करताना मानसशास्त्र असतील कोणत्या बाबींचा अभ्यास असल्या तर फायदा होतो ? कोणत्याही चित्रपटाचा काढला जातो आणि या या सिक्वेलचे व्यवसाय गणित कसे ठरते जगभरात कोणकोणत्या चित्रपट करण्यात आला आहे आणि त्यांना चित्रपट रसिकांचा कसा प्रतिसाद मिळाला? अमिताभ बच्चन हे बॉलीवूड मधील अत्यंत महत्त्वाचे अभिनेते का समजले जातात द्या पूर्वीच्या चित्रपटांचा रिलीज चे जे युग आलेले आहे त्याची कारणे काय आहेत आणि त्याच्या कितपत फायदा होतो तसेच ओटीपी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहातील चित्रपट बघणे यातील फरक काय ओटीपी ती प्राथमिक चा सकारात्मक बाजू आणि चित्रपटगृहातील चित्रपट बघणे याचे सकारात्मक बाजू डॉक्युमेंटरी तयार केल्यास त्याच्या चित्रपट निर्मितीसाठी कोणता पर्याय त्यांनी फायदा होतो. मानसशास्त्र सारख्या बाबींचा प्रचार प्रसार करण्यासाठी चित्रपट या माध्यमांचा कोणत्या पद्धतीने फायदा होतो. घ्या पुणे येथे सुरू असलेल्या चित्रपट  महोत्सवात चित्रपट बघण्यासाठी काय पुर्व तयारी करावी आणि कशी करावी. मुळात या चित्रपट महोत्सवांच्या स्वरूप काय असे असते आयोजन कोणत्या पद्धतीने होते तिकिटांचे वाटप कसे असते या विषयांची सुद्धा माहिती आपल्याला  साप्ताहिक सकाळच्या या विशेषकांतून मिळते.चित्रपटांचा विविध तांत्रिक बाजूंची मुद्देसूद मात्र जास्त चिकित्सक सखोल पद्धतीने न जाता आणि चटकन समजेल या भाषेमध्ये माहिती आपणास साप्ताहिक सकाळच्या सध्याच्या  चित्रपट विषयक या विशेषांकाचा वाचनातून आपणास होते. अंकात 12  लेख समावेश करण्यात आलेले आहेत. 
ज्यांचे चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे योगदान आहे आणि चित्रपट विषयक लेखनाच्या मोठा अनुभव आहे असा तज्ञांचे हे लेख आहेत

मी लेखाच्या सुरुवातीला सांगितले त्या पद्धतीने आपल्या भारताला ज्या तीन गोष्टी जोडतात त्यातील एक गोष्ट असणाऱ्या चित्रपटांचे विश्व किती मनोहारी आहे तसेच हा चित्रपट तयार करताना किती मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते आधी विषयांची माहिती हे आपणास या साप्ताहिक महत्त्वाचा वाचातून समजते भलेही आपण चित्रपट कमी बघत असू मात्र हे विश्व किती मनोहारी आहे हे माहिती व असणे आपल्याला एक नवीन अनुभूती देऊन जाते तरी आपण हा अंक अवश्य वाचावा.


गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

प्रसिद्ध पुस्तकांचे वाचन आणि मी (माझे वाचन भाग क्रमांक ६)

मी मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचतो, हे समजल्यावर सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीशी माझी जूजबी ओळख असते,अश्या व्यक्ती मला तुम्ही राधेय वाचले असेल. ययाती वाचले असेल. पानिपत वाचले असेल, असे प्रश्न विचारतात. माझे सर्वसाधारण असे निरीक्षण आहे की या व्यक्ती ज्या पुस्तकांची नावे घेतात ती नावे सुप्रसिद्ध पुस्तके या वर्गवारी मोडणारीच असतात. तसेच या पुस्तकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणता येऊ शकते ते म्हणजे ही सर्व पुस्तके काही मोजके अपवाद वगळता कादंबरी या प्रकारातील असतात. कादंबरी खेरीज अन्य साहित्यप्रकार जसे नाटक, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने, चरित्र, कथासंग्रह, किंवा ना. सि.फडके यांनी जो साहित्यप्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रूजवला तो साहित्यप्रकार अर्थात ललित निबंध लेखन या प्रकारातील पुस्तके नसतात. नाही म्हणायला काही चरित्र आत्मचरित्र असतात. मात्र त्यांची संख्या फारच नगण्य असते‌‌. मुख्य भर हा कादंबरीवरच असतो. या व्यक्तींशी थोडा जास्त संवाद साधला की या व्यक्तींचे वाचन काहीसे कमी असल्याचे माझे निरीक्षण असते. माझ्या अनुभव हा त्रिकाल बाधित सत्य आहे असे मुळीच म्हणता येणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. किंबहुना माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे ज्यांचे वाचन चौफर आहे. साहित्यातील विविध प्रकाराचे ज्यांचे वाचन आहे  अशा व्यक्ती मला भेटतच नसतील, असे देखील म्हणता येऊ शकते असो. मात्र ज्या व्यक्तींचे वाचन कमी आहे अशा व्यक्ती एखाद दुसरे प्रसिद्ध पुस्तक वाचतात, जे सुप्रसिद्ध असतेच.फारस्या प्रसिद्ध नसलेल्या पुस्तकाविषयी ते बोलतच नाही. हे मात्र  ठामपणे म्हणता येऊ शकते.
माझा बाबत बोलायचे झाल्यास मी 'माझे वाचन' या मालिकेच्या आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे, माझे कथासंग्रह, कादंबरी या प्रकारचे साहित्य वाचन काहीसे कमीच आहे. मी मुख्यतः विविध प्रकारची माहिती देणारी पुस्तके वाचतो. काही प्रमाणात विविध व्यक्तींनी लिहिलेली आत्मचरीत्र आणि चरीत्र मी वाचतो. आता काही जण माझे कथासंग्रह आणि कांदबरी वाचन कमी असल्याने माझे वाचनच नाही, असे म्हणू शकतात.मात्र मी आहे असा आहे, स्विकारा अथवा नका स्विकारू हा माझा दृष्टिकोन असल्याने मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही.
माझ्या आतापर्यतच्या अनुभवानुसार तयार झालेली आवड आणि माझी व्यावसायिक गरज लक्षात घेत, माझ्यात माहितीपर आणि चरित्र वाचनाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या सुप्रसिद्ध कादंबऱ्या ते लोक सांगतात, त्यातील काही मी वाचलेल्या नसतात.मात्र त्यामुळे माझे फारसे अडत नाही. मात्र मला जी लोक पुस्तकाविषयी विचारतात. त्यांचा मते वाचन म्हणजे कांदबरीवाचन असे म्हणता येवू शकते. त्यांना वाचण्याचे विविध पर्याय माहिती नसावेत,असेच त्यांच्याशी बोलल्यावर जाणवते‌.वाचनातील विविधतेचा त्यांना गंध देखील नसतो.अर्थात वाचनाचा आनंद काय असतो.हे त्यांना माहिती नसल्याने ते स्वाभाविक आहे. त्यात त्यांना बोल लावून चालणार नाही,हे ही तितकेच खरे.























बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

वाच ग घूमा ...काय मी वाचू ?( माझे वाचन भाग५)

मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्रश्न विचारला की मीच त्याला प्रतीप्रश्न विचारतो तूला कोणती पुस्तके वाचायला आवडतात,?कथासंग्रह, कादबरी, काव्यसंग्रह, नाटके, माहितीपर की ना.सी फडके यानी मराठीत मोठ्या प्रमाणात आणलेला निबंंध हा प्रकार? माझ्या या प्रश्नावर जर समोरच्या व्यक्तीने त्याचा आवडता प्रकार सांगितला आणि त्याविषयी माझ्याकडे माहीती असेल तर मी त्याला पुस्तक सुचवतो.
मात्र ज्यांचे वाचन मुळातच कमी आहे अशी व्यक्ती माझ्या प्रश्नाने गडबडते. ती म्हणते माझे असे काही ठरलेले नाहीये.मग मला त्याला सांगावे लागते,समोर येईल ते वाच.सतत वाचले की तूला समजेल तूला काय वाचायला
आवडते.एकदा प्रकार समजला की पुन्हा माझ्याकडे ये.मी तूला पुस्तके सुचवतो.

मी आतापर्यत जी पुस्तके वाचली आहेत, त्यावेळी आलेल्या अनुभवानुसार  किंवा पुस्तके वाचणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकल्या  आहेत त्यानुसार सांगतोय वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आवडीच्या विषयावरची पुस्तके सुरवातीच्या काळात मिळणे आवश्यक ठरते‌.जर त्यावेळी कंटाळा येणारी पुस्तके मिळाली तर वाचनाची नावडच निर्माण होणे शक्य आहे. आता एखाद्या विषयात आवड किंवा नावड निर्माण होण्यामागची कारणे मानसशास्त्रज्ञच जाणो,आणि मी काही मानसशास्त्र नसल्याने ते सोडून देउया.
मी माझे वाचन  या मालिकेच्या आधीच्या भागात सांंगितले आहे.त्याप्रमाणे माझे वाचन कॉमिक्सने सुरू झाले.मी अगदी सातवी आठवीपर्यत बालसाहित्य वाचत असे. राधेय,ययाती, स्वामी,या सारख्या कांदबरी मी त्यामुळे
बऱ्याच उशिरा वाचल्या, खूप मोठा काळ बालसाहित्य वाचल्याने मला ते चटकन समजत गेले.वाचलेले समजतयं हे बघून मी अजून अजून वाचायला लागलो.परिणाम तूमच्या समोर आहे.आता सर्वांनीच खुप वेळ बालसाहित्यच
वाचले पाहिजे असे नाही.तूम्हाला जर प्रौंढाच्या कांदबरी समजत असतील तर बालसाहित्य न वाचता तूम्ही थेट तेच वाचू शकतात.शेवटी वाचलेले मनाला भावणे,आणि त्यातून आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे. कारण वाचलेले भावले तर तूम्हालाच तूमचा वाचनाचा सुर गवसेल आणि मग मला जसे लोक विचारतात काय वाचू ते तसे कोणाला विचारावे लागणार नाही.उलट लोकच तूम्हाला वाचण्याविषयी प्रश्न विचालतील माझ्यासारखे.मात्र त्यासाठी आपल्याला काय आवडते हा सुर सापडणे आवश्यकच.मग शोधणार ना सुर आपला वाचण्याचा

माझे वाचन या लेखमालिकेचा चवथा भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


माझे वाचन या लेखमालिकेचा तिसरा  भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 



माझे वाचन या लेखमालिकेचा दुसरा भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


माझे वाचन याचा पाहिला भाग वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


खगोलशास्त्रातील काही बेसिक कंसेप्ट सहजसोप्या भाषेत स्पष्ट करणारे पुस्तक 'स्पेस ट्रॅव्हल'

रात्री प्रवास करताना, मानवी वस्तीपासून दुर, जिथे लाईटची अडचण नाहीये,अस्या ठिकाणी आपण प्रवासादरम्यान थांबलो आणि वर आकाशात बघीतले तर आपणास असंख्य तारे ग्रह,उपग्रह दिसतात. आपल्या मनुष्याला याचे पार अश्मयुगापासून आकर्षण. मात्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या पन्नास वर्षात मनुष्याचे याविषयीचे गुढ बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाले त्याला कारणामुळे होते या काळात झालेली प्रगती.  जगातील सर्वात श्रीमंत असणारा एलोंड मास यांच्या स्पेस एक्स या कंपनीत मार्फत काही प्रमाणात सुरू करण्यात आलेली अवकाश पर्यटन हे या प्रगतीचेच सध्याचे स्वरूप किंवा भारताचे आदित्य एलवन मिशन असो तर गणयान मिशन असो ही सुद्धा याचेच काही उदाहरणे. हा प्रवास कसा झाला याची कहाणी मोठी रंजक आहे आणि आपल्याला ही माहिती करून घ्यायची असेल तर मराठी ज्ञानभाषा हवी यासाठी मराठीमध्ये अनेक विषयांवर माहितीपूर्ण तरी रंजक भाषेत पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले ट्रॅव्हल हे पुस्तक आपणास उपयोगी ठरते मी काही दिवसापूर्वीच हे पुस्तक वाचले. 

या पुस्तकात ३२३ पानातून १२ प्रकरणाद्धारे पृथ्वीचे वातावरण नक्की कुठे संपते,आणि अंतराळ सुरु होते? ज्या रॉकेटमधून आपण अंतराळात जातो त्याची मुळातील रचना काय असते? या रॉकेटचा विकास कोणत्या प्रकारे झाला. आपल्या भारताची इस्रो असेल किंवा जगात अत्यंत प्रसिद्ध असलेल्या नासा सारख्या किंवा युरोपीय युनियनची युरोपीय स्पेस एजन्सी असो या सारख्या स्पेस एजन्सीची सुरवात कोणत्या प्रकारे झाली? अमेरिका
आणि यु.एस.एस.आर मधील जमिनीवरील युद्ध खगोलशास्रात कसे शिरले ?, याचा संपुर्ण मानवजातीला फायदा झाला की तोटा, झाला.फायदा झाला असल्यास कोणत्या प्रकारे झाला? अवकाशास्त्राचा विचार अत्यंत प्रसिद्ध

असलेल्या अपोलो मोहिमेची सुरवात कशी झाली? त्यात काय घडले? आपला भारत जे बांधायचा प्रयत्न करतोय ते अवकाश स्थानक म्हणजे काय ? अवकाश स्थानकाशीवाय अन्य कोणत्या घटकाद्वारे खगोलशास्त्राचा पृथ्वीबाहेर राहुन अभ्यास केला जातो?, या रंजक वाटणाऱ्या अवकाश संशोधन क्षेत्रात प्राणहानी करणाऱ्या घटना घडल्या आहेत का?घडल्या असल्यास त्या कोणत्या प्रकारे घडल्या, त्यात काय नुकसान झाले ? आपल्या भारताच्या अभिमानाची संस्था असलेल्या इस्रोची स्थापना कशी झाली ? अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणारे भारतीय कोण आहेत?, अवकाश संशोधन क्षेत्राची भविष्यातील वाटचाल कसी असेल,? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत.

पुस्तकाची भाषा अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखीच सहजसोपी समजणारी आहे.विषयाची गरज
नसली तरी सलग शब्द वाचण्यास कंटाळा येऊ शकतो हे लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चित्रे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही‌.

खगोलशास्त्रासारखा काहीसा किचकट वाटणारा विषय सुद्धा किती रंजकतेने मांडता येतो. तसेच खगोलशास्त्रातल्या अवघड संकल्पना जसे की क्वांटम मेकॅनिक्स, नॉन युक्लीड जॉमेट्री, वर्म होल, डार्क एनर्जी, डार्क मॅटर,  स्टिंग्युलेरिटी  या संकल्पना म्हणजेच खगोलशास्त्र नव्हे तर सर्वसामान्यांना रंजक वाटेल अश्या अनेक संकल्पना खगोलशास्त्रात आहेत. या संकल्पना वाचून सर्वसामान्यांना खगोलशास्त्रात इंटरेस्ट वाटू शकतो. यातून ते मी वरती सांगितल्या त्या संकल्पना सुद्धा माहिती करून घेऊ शकतात हे मला या पुस्तकातून पुन्हा एकदा समजले. 

   तसं बघायला गेलं तर मी तिसरी चौथी  पासून समाजात खगोलशास्त्राचा प्रचार प्रसार करणाऱ्या खगोल मंडळ या संस्थेत सक्रिय होतो. त्यामुळे या पुस्तकात असणारी बरीच माहिती मला आधीच माहिती होती. मात्र ती किती रंजकतेने मांडता येते हे मला अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकातून समजले. ज्यांना खगोलशास्त्राची काहीच माहिती नाही किंवा ज्यांना आपल्या मराठी किती सहजतेने माहिती देता येऊ शकते हे जाणून घ्यायचे आहे ते सुद्धा हे पुस्तक वाचू शकतात

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

भारतीयांना आपल्या प्राचीन वैभवशाली वारस्याची जाणीव करून देणारे पुस्तक 'सहा सोनेरी पाने'

मानसशास्त्रात व्यक्ती स्वतःच्या विषयी जो काही विचार करते, त्यानुसार तिचे व्यक्तिमत्त्व घडते, असा एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जर व्यक्तीने स्वतः विषयी नकारात्मकच विचार केला तर व्यक्तीचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि व्यक्तीमध्ये काही कारण नसताना स्वतः कमीपणा घेऊन दुसऱ्याला, त्याची त्या प्रकारची योग्यता नसताना देखील, मोठेपणा देतो. “मी कायमच हरण्यासाठीच जन्म झालेला आहे. मी पूर्वी कधीही जिंकलो नव्हतो; भविष्यात देखील जिंकू शकणार नाही” असे त्या व्यक्तीला वाटायला लागते. व्यक्तीला कायम त्याची चूकच सांगितल्या, त्याच्या चांगल्या बाबींची जाणीवच त्याला करून दिली नाही तर व्यक्तीमध्ये या प्रकारची मानसिक विकृती निर्माण होते, असे या सिद्धांताबाबत मानसशास्त्रज्ञ सांगतात. त्यावेळी त्या व्यक्तीला त्याच्या पूर्वायुष्यातील सकारात्मक बाबी सांगाव्या लागतात.

कोणताही समाज हा व्यक्तींचा समूहच असतो. जर एखाद्या व्यक्तीसमूहातील बहुसंख्य व्यक्तींना असे न्यूनगंडाने ग्रासले तर तो समाज एकत्रितपणे नकारात्मक विचार करायला लागतो. अशा वेळी या लेखाच्या सुरुवातीला व्यक्तीबाबत सांगितले तसेच या समाजाबाबत करावे लागते. या समाजाच्या सकारात्मक बाबी त्याला समजावून सांगाव्या लागतात. त्या समाजाच्या वैभवशाली घटना, प्रसंग, त्या समाजाने मिळवलेले विजयाचे स्मरण त्या समाजाला करून द्यावे लागते.

इतिहासाचे विविध टप्पे असतात. या विविध टप्प्यांपैकी एखाद्या टप्प्यावर प्रत्येक समाजाने कधीतरी यशाची चव चाखली असते; कधी अपयशाचा सामना केलेला आढळतो. आपल्या भारताचा विचार करता प्राचीन कालखंडात मोडणारा संपूर्ण भाग तसेच मध्ययुगात मोडणाऱ्या कालखंडाचा सुरुवातीचा कालखंड हा भारताचा विजयाचा, अभिमानाचा कालखंड समजला तर वावगे ठरणार नाही. या वैभवशाली कालखंडात गुप्त साम्राज्य, मौर्य साम्राज्य, आपल्या महाराष्ट्राचा विचार करता सातवाहन कालखंड याचा यात समावेश करता येईल. तर
मध्ययुगाच्या कालखंडातील एकूण भागांपैकी सुरुवातीच्या ४५ ते ५५ टक्क्यांच्या नंतरचा कालखंड भारतासाठी निराशाजनक म्हणता येईल असा आहे. आपल्या कडे ज्याबाबत सातत्याने काहीसा संताप व्यक्त केला जातो तो पश्चिमी आणि मध्य आशियातून होणाऱ्या धार्मिक आक्रमणांचा हाच तो निराशाजनक कालखंड.

ब्रिटिश राजवटीत त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने मध्ययुगीन इतिहासकालखंडातील शेवटचा ५० टक्के भागच शिकवण्यात आला, जो काहीसा निराशाजनक आहे. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यामुळे समाजावर काहीसे नैराश्य आले. याला उत्तर काय? याचा विचार जेव्हा समाजाचे हित बघणाऱ्या व्यक्ती करू लागल्या त्यावेळी भारताच्या वैभवशाली इतिहासाची—अर्थात प्राचीन कालखंडातील आणि मध्ययुगाच्या सुरुवातीचा कालखंडातील—माहिती देण्याची गरज लक्षात आली. आणि त्यानुसार समाजाचे हित इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्य करायला सुरुवात केली. या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावेच लागते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. त्यांनी *सहा सोनेरी पाने* हा ग्रंथ लिहून भारताचा गौरवशाली इतिहास समाजासमोर आणण्याचे काम केले. हा ऐतिहासिक ग्रंथ मी नुकताच वाचला.

पूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा (यूपीएससीची परीक्षा म्हणून ओळखली जाणारी परीक्षा मुळात यूपीएससीकडून ज्या विविध प्रकारच्या १७ परीक्षा घेतल्या जातात त्यापैकी एक; मात्र इतर १६ परीक्षांबाबत पुरेशी माहिती नसल्याने “यूपीएससीकडून तेवढीच परीक्षा घेतली जाते” असे समजून) अभ्यास करताना जो इतिहास अभ्यासाला होता तो किती एकांगी होता हे मला या पुस्तकातून समजले.

इतिहासाचे अत्यंत शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केले तर प्रागैतिहासिक काळ (Prehistory), आद्यऐतिहासिक काळ (Proto-History), प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ असे वर्गीकरण करण्यात येते. प्रागैतिहासिक काळात (Prehistory) माणसाला लेखनकला अवगत नव्हती; तर आद्यऐतिहासिक काळात
(Proto-History) मानवाला लेखनकला माहिती होती, मात्र त्यावेळी काय लिहिले आहे हे आपल्याला आज माहिती नाही असे समजण्यात येते. भारताचा विचार करता सिंधू–सरस्वती संस्कृतीचा कालखंड हा आद्यऐतिहासिक (Proto-History) काळात समजला जातो. *सहा सोनेरी पाने* या पुस्तकात आद्यऐतिहासिक काळाचा ओझरता उल्लेख सुरुवातीच्या प्रकरणात करत स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला थेट इ.स.पूर्व ५ व्या शतकाच्या सुरुवातीस घेऊन जातात.

या पुस्तकात भारताच्या कोणत्या वैभवशाली घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, या विषयी यापूर्वी हजार वेळा सांगण्यात आल्याने त्याची पुनरावृत्ती करत नाही. तर लेखाच्या पाचव्या परिच्छेदालाच मी पुढे घेऊन जाऊ इच्छितो. तर भारतीयांनी प्राचीन काळी त्यांच्यावर होणारे आक्रमण किती शूरपणे परतवून लावले? युरोपीय सत्तांनी स्वतःच्या पराभवाचादेखील विजयच झाला असे खोटे कसे सांगितले? प्राचीन भारतातील समाजजीवन आणि प्रशासन कोणत्या प्रकारचे होते? भारत पूर्वीपासूनच यूरोपीय सत्तांना कोणत्या प्रकारे खुणवत होता? याविषयी माहिती मला या पुस्तकातून मिळाली.

भारत आता महासत्ता होतोय असे नाही; तर भारत पूर्वी देखील महासत्ता होता. मात्र काही कारणाने आपण ते पद गमावले, इतकेच. ते का गमावले आणि भारत पुन्हा एकदा विश्वगुरू झाल्यावर इतिहासात झालेल्या चुका टाळण्यासाठी त्या माहिती असाव्यात—ज्यामुळे त्या टाळण्यासाठी काय करता येईल हे वाचकास समजले—आणि आपण वेळीच सावध होऊन कोणत्या प्रकारे त्या चुका टाळू शकतो हे समजण्यासाठी प्रत्येकाने, तो कोणत्याही विचारधारेला मानणारा असो, हे पुस्तक वाचायला हवे असे मला वाटते.


साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम

आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत  थांबलेला ...