या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
लेखाचे विषय
- अच्युत गोडबोले यांनी लिहलेली (15)
- अनुवादित पुस्तके (9)
- अभिनेता गुरुदत्त (5)
- अर्थशास्त्राविषयक (2)
- इंग्रजी पुस्तक (2)
- इतिहास (4)
- कथासंग्रह (4)
- कादंबरी (7)
- काव्यसंग्रह (1)
- गिरीश कुबेर यांनी लिहलेली (6)
- गुन्हेगारी (1)
- चरित्र . (20)
- चीन (4)
- तंत्रज्ञान विषयक (10)
- दलित साहित्य (3)
- नाटक (1)
- नाशिक (6)
- नियतकालिके (7)
- पश्चिमी आशिया (3)
- प्रवासवर्णने (3)
- मराठी पुस्तके (69)
- महिलांच्या भावविश्वाशी निगडित (6)
- माझे स्वत:चे वाचनाच्यावेळचे अनुभव (8)
- मानसशास्त्र (8)
- माहितीपर (52)
- राजकीय (21)
- ललित लेखन (2)
- विद्रोही साहित्य (3)
- विनोदी या प्रकारात मोडणारे साहित्य (1)
- वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह (3)
- व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित (2)
- सर्वसाधारण (8)
- स्वातंत्र्यवीर सावरकर (1)
गुरुवार, ७ मे, २०२६
उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'
सोमवार, २० एप्रिल, २०२६
जाणून घेऊया पुस्तक वाचण्याच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकांविषयी (भाग ३ )
अर्थात जगात बदल हे होतच असतात या जगात कोणतीच गोष्ट चिरकाल टिकणारी नाही यात फक्त एकाच गोष्टचा अपवाद आहे तो म्हणजे स्वतः बदलाचा तो कधीही थांबत नाही नेहमीच घडत असतोपुस्तकाच्या विश्वाला देखील हा नियम लागू होतो हेच पुस्तक व डिमांड यातून दिसून येत आहे असे म्हणता येईल
याचा दुसरा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/02/2.html
याचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/02/blog-post_22.html
सोमवार, ३० मार्च, २०२६
कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....
सोमवार, २३ मार्च, २०२६
प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'
वाचक मित्र,मैत्रीणीनो इसवी सन २०२६ या वर्षात माझ्या वाचनाचा रोख प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन असलेल्या पुस्तकांवर असणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याच साखळीतील एक पुस्तक म्हणून मी हे एका गुन्हेगाराचे अनुभव कथन वाचले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही पुणे शहरात एके काळी खूप चर्चेत असलेल्या जोशी - अभ्यंकर खून खटल्यातील आरोपीने त्याचे अनुभव लिहले तेच म्हणजे हे पुस्तक एक अत्यंत साधा- सरळ, पापभिरू, धार्मिक संस्कारात लहानाचा मोठा झालेला मुलगा चुकीच्या संगतीमुळे फासावर जातो त्यामुळे आपली सांगत किती महत्त्वाची असते हे आपणास हे पुस्तक स्पष्टपणे दाखवून देते.
२०० पानी या पुस्तकाची सुरवातीची सुमारे १६ पाने प्रकाशकाचे मनोगत, पूर्वी हे पुस्तक वाचल्याची मनोगते ,या पुस्तकांचे संपादन केलेल्या शुभदा गोगटे यांचे तसेच मुनव्वर शाह यांची मनोगते या पुस्तकांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न कोणत्या कामासासाठी वापरले जाते.आणि त्याच कामासाठी का वापरले जाते या पुस्तकाच्या निर्मितीतयोगदान दिलेल्या व्यक्तींचे आभार या सारख्या बाबींवर खर्च करण्यात आलेली आहेत.हा मजकूर ज्या पानावर छापला आहे त्या पानांना क्रमांक क्रमांक देताना त्यांना अक्षरी एक ,दोन तीन असे क्रमांक दिले आहेत तर सुरुवातीचा हा भाग संपल्यावर जेथून मुनव्वर आपले अनुभव मांडायला सुरुवात करतो त्याला १, २, ३, असे अंकी क्रमांक दिले आहेत अंकी आणि अक्षरी दिलेल्या पानाच्या क्रमांकाचा एकत्रित विचार करता १७ व्या पानापासून पुस्तक सुरु होते त्यातही सुरवातीची दोन पाने एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करतो ,यामध्ये व्यक्तीचे स्वतःचे कर्म आणि दैव प्रारब्ध, देवाची इच्छा या गोष्टींचा किती प्रभाव असतो या सारख्या बाबींवर आध्यत्मिक दृष्टीने चर्चा केली आहे अध्यात्मिक बाबींवरील मजकुराबाबत सांगायचे झाल्यास माझा या विषयातील अभ्यास खूपच कमी असेल किंवा मुनव्वरने/ संपादिका शुभदा गोगटे यांनी तो मुळातच किचकट भाषेत लिहला असेल मला वैयक्तिकरित्या तो मोठ्या प्रमाणात कंटाळवाणा वाटला असोतर ही दोन पाने वाचल्यावर ३ ऱ्या पानापासून मुनव्वरने स्वतःविषयी सांगायला सुरवात केली आहे . जे पान क्रमांक १४३ पर्यंत आहे पान क्रमांक १४३ ते १४८ पर्यंत मुनव्वरने सह आरोपीच्या व्यक्तिमत्तविषयी लिहले आहे . त्या नंतरची पाच पाने पुन्हा कंटाळवाणी आहेत ज्यात विविध सुविचार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुस्तक प्रकाशनादरम्यान प्रकाशक शरद गोगटे आणि मुनव्वर यांच्यातील पत्रव्यवहार आणि प्रकाशकास एका गुन्हेगाराचे अनुभव कथन प्रसिद्ध केल्यावर काय काय अनुभव आले याबाबत माहिती देते .
मुनव्वरने स्वतःच्या आयुष्यावर लिहलेले वाचताना ७३ व्या पानापर्यंत आपण एखाद्या गुन्हेगाराचे नव्हे तर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने त्याचे रोजचे लिहलेले अनुभव तर वाचत नाहीना असे वाटावे असे वाटते .
मुनव्वरला ज्यामुळे कुप्रसिद्धी मिळाली तो जोशी - अभ्यंकर खून खटल्याच्या ठळक स्पष्टपणे उल्लेल्ख ७४व्या पानावर होतो तेथून पान क्रमांक १४३ पर्यंत जोशी - अभ्यंकर खून कसा झाला ? त्याला कसे अटक केली ?अटक केल्यावर त्याला कशी वागणूक मिळाली ? अटक झाल्यावर त्याचा दिनक्रम काय होता ? तुरंगात असताना धार्मिक बाबींविषयी अभ्यास करण्याची आवड त्यात कशी निर्माण झाली ?तुरुंग प्रशासनाकडून त्याची पूर्तता कोणत्या प्रकारे झाली या विषयी सांगण्यात आले आहे .ज्यांना क्रिमीनल सायकॉलॉजीच्या दृष्टीने या पुस्तकाकडे बघायचे असेल त्यांनी ७४ व्या पानापासून १४८ पानपर्यंतच वाचले तरी चालण्यासारखे आहे .ज्यांना आपण कोणत्या संगतीत राहतो हे का महत्त्वाचे आहे या विषयी वाचायचे असेल त्यांनी पान क्रमांक १ पासून ७३ पर्यंत वाचलेले चालू शकते .ज्यांना समाजाचा विचार कोणत्या प्रकारे कार्य करतो या विषयी जाणून घेण्यात स्वारस्थ आहे त्यांनी पान १६६ पासून शेवटच्या पानपर्यंत वाचावे ते त्यांना माहिती देणारे असेल .ज्यांना गुन्हेगार देखील एक माणूसच असतो त्याला देखील भावना असतात हे समजून घेयचे असेल तर त्यांनी पानं क्रमांक १५४ ते १६५ मध्ये छापण्यात आलेला मुन्नावर शाह आणि प्रकाशक शरद गोगटे यांच्यात झालेला पत्रव्यवहार वाचावा
मुन्नावर याने केलेला गुन्हा निंदनीयच होता ज्याची क्षिक्षा त्यास मिळाली .मात्र लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या प्रमाणे आयुष्यात जगताना आपली एखादी छोटीशी चूक आपले आयुष्य कसे पूर्णतः नासवू शकते हे समजण्यासाठी आपण हे पुस्तक वाचलाच यावे
बुधवार, ४ मार्च, २०२६
समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'
मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दया पवार लिखित 'बलुतं' हे सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यातील महत्त्वाचे आत्मचरित्र मी नुकतेवच वाचले. समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं' असे त्याचे एका वाक्यात वर्णन करता येईल आपल्याच समाजातील एका घटकाचे आयुष्य किती त्रासदायक आणि कष्टकरी होते याचे मन सुन्न करणारे वर्णन सुमारे २०० पानी पुस्तकात आहे.समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे स्वच्छतेचे काम करून सुद्धा समाज आपल्यातील एकाला कोणत्या प्रकारे हीन वागणूक देत होता हे या पुस्तकाच्या वाचनातून मला पुन्हा एकदा समजले.
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६
समाजाच्या एका भीषण वास्तवाचे वास्तविक स्वरूप दखवणारे पुस्तक. 'उपरा'
या पुस्तकाला सहित अकादमीचा पुरस्कार मिळाला आहेत्यामुळे हे छोटेखानी आत्मचरित्र संहिताच विचार करता ऊत्तम आहे हे सांगायला नकोच भटक्या जातीत अन्य समाज घटकात शिक्षणाचा प्रचार प्रसार कसा झाला त्यांचे प्रश्न मुळात काय आहेत ?गरिबीबरोबर क्षिक्षण घेताना समाजातील समजुतीमुळे त्या समाजातील मुलं मुलींना घेताना कोणत्या अडचनांसमोर जावे लागते याचे कारण अर्थात आरक्षणाची गरज का आहे याचे
आकलन या पुस्तकातून समजते अर्थात आता पुस्तक प्रसिद्ध होऊन अर्ध्या शतकाचा यातील दाहकता झालेली असावीएकंदरीत समारोपाचे बोलायचे झाल्यास आपल्या समाजातील गुंतागुंत त्यातील विविध प्रश्न समजून घेण्याचे सहजसोपे माध्यम म्हणजे उपरा हे आत्मचरित्रपार पुस्तक
जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 2)
रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६
जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 1)
सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६
जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या शहराची सैर घडणारे पुस्तक ' न्यूयॉर्क'
आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीमूळे शहाणपण येते असे संगितले जाते त्यामध्ये पर्यटन , फिरण्याच देखील समावेश होतो. अर्थात प्रयेकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते .तसेच जग एव्हढे मोठे आहे की,पण राहतो तो आंणि त्याला लागून असलेले ४ ते ५ जिल्हे जरी फिरायचे म्हंटले तरी एक ते दोन वर्ष सहज लागू शकतात. (आता अति परिचयात अवज्ञा किंवा आपण लांबचे एरिया आधी बघू . हा भाग काय जवळचा आहे कधीही बघता येईल,असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर भाग वेगळा ) तर दुसरे देश किमान राज्य बघयाला घेतले तर सर्व आयुष्य देखील पुरणार नाही . मग याला ऊत्तर ते काय ? तर दुसऱ्याच्या अनुभवातून फिरायचे . म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीने लिहलेल्या प्रवास वर्णनातून एखादा प्रदेश समजून घेयचाशुक्रवार, ३० जानेवारी, २०२६
मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)
तर मित्रानो माझ्या पुस्तक निवडण्याचे दोन निकष आहेत .पहिला निकष आहे लेखकाचा तर दुसरा निकष आहे विषयाचा. मी माझे वाचन भाग ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे माझे आवडते लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि गिरीश कुबेर. (आता मला ते लेखक की आवडतो हे ज्यांना माहिती करायचे असेल त्यांनी या लेखालिकेचा भाग क्रमांक ४ वाचावा.त्या ठिकणी मी हा मुद्दा सविस्तर मांडल्याने तो पुन्हा इथे मांडत नाही ) या दोन्ही लेखकांनी
नवीन काही लिहले कि ते वाचण्यास माझी पहिली पसंती आहे मी आतार्यंत अच्युत गोडबोले यांची २० हुन अधिक आणि गिरीश कुबेर यांची जवळपास सर्वच मराठी पुस्तके कितीतरी वेळा वाचली आहेतमी जी पुस्तके वाचनासाठी निवडतो.त्यातील दुसरा निकषाविषयी अर्थात विषयाविषयी झाल्यास मी इयत्ता चवथीपासून मार्ताहीत खगोलशात्राचा मराठी भाषेत प्रचारप्रसार करणार्याखगल मंडळाशी निगडित असल्याने असेल मला नॅचरल सायन्स विषयी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली आहे त्यामुळे मी जी पुस्तके वाचण्यासाठी निवडतो त्यामध्ये इतिहास किंवा त्यासारख्या विषयांची माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या ऐवजी नॅचरल सायन्सविषयी माहिती देणारी पुस्तके अधिक वाचतो मी अच्युत गोडबोले आणि गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या शिवाय मी जी माहिती देणारी पुस्तके वाचतो त्यांची यादी तुम्ही बघितल्यास तुम्हाला हा मुदा अधिक उत्तमरीत्या समजेल
नॅचरल सायन्स सोडून मला आवडणारा दुसरा विषय म्हणजे भारताची आणि अन्य देशांची परराष्ट्र नीतीत्यामुळे त्या विषयवार लिहलेली पुस्तके सुद्धा मी वाचनासाठी निवडतो.माझ्यामध्ये ही आवड निर्माण होण्याचे कारण म्हणजे मी केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास.मी यूपीएससीच्या सिव्हिल सर्विस एक्समचा भाया करताना पहिला ऑप्शनल विषय म्हणून भूगोल हा विषय निवडला होता तर दुसराऑप्शनल विषय म्हणून मी
पोलिटिकल सायन्स हा विषय निवडला होता . या दुसऱ्या ऑप्शनल चा अभ्यास करताना माझी भारताची आणि अन्य देशांची परराष्ट्र नीती या विषयात आवड निर्माण झाली या आवडीतूनच माझी वाचनाची आवड विकसित होत गेलीअर्थात मी फक्त या दोनच विषयाची पुस्तके वाचतो असे नाही. माझ्या माहिती देणाऱ्या पुस्तकाचे वाचन करण्याच्या वाडीस कोणताही विषय वर्ज नाही फक्त या दोन विषयाचे प्रमाण अन्य विषयापेक्षा काहीसे जास्त असते इतकेच तसेच मी फक्त माहितीपर पुस्तकेच वाचतो असे नाही.तर मी सर्व प्रकारची पुस्तके वाचतो फक्त त्यात माहिती देणाऱ्या पुस्तकाचाचे प्रमाण काहीसे जास्त असते इतकेच आता मी माहितीपर पुस्तकेच का जास्त वाचतो याविषयी सुद्धा माझे वाचनच्या दुसऱ्या भागात सविस्तर लिहले आहे त्यामुळे त्याविषयी सुद्धा इथे जास्त लिहीत नाही
मी जे वाचन करतो ते परिपूर्ण आहे असा माझा मुळीच दावा नाही. .किंबहुना माझे वाचन अत्यंत त्रोटक विस्कळीत काहीच विषयवार आधारित आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही माझ्यामध्ये ज्या प्रकारे वाचनाची सवय विकसित झाली त्याचा प्रकट अविष्कार म्हणजे माझी ववाचनाची आवड आणि या आवडीतून दिसत असणारी माझी पुस्तक निवडीची पद्धत मी निवडलेली पुस्तके. (हा विकास कसा होतो याविषयी मी
तिसऱ्या भागात लिहले आहे सबब या विषयी देखील मी द्विरुक्ती टाळतो ) अन्य लोकांचा देखील प्रवास याच पद्धतीने होईल असे नाही मात्र हा प्रवास होण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. मग करणार ना वाचनमाझे वाचन या मालिकेतील सातवा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/01/blog-post_87.html
माझे वाचन या मालिकेतील सहावा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
माझे वाचन या मालिकेतील ५वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
गुरुवार, २९ जानेवारी, २०२६
वाचनाची इच्छा आहे पण ... (माझे वाचन भाग क्रमांक ७ )
माझे म्हणाल तर माझ्या बँगमध्ये नेहमी एक पुस्तक असतेच जर कोणाला भेटायला गेलो आंणि त्या ठिकाणी व्यक्ती भारतीय प्रमाणवेळेला जागून उशिरा आली तर मोबाईल बघण्यापेक्षा मी पुस्तक वाचायला सुरुवात करतो. मी घरापासून दूर राहत असल्याने मेसमध्ये जेवतो त्यावेळेस सुद्धा मेसमध्ये नंबर येण्यापर्यंत वाचू शकतो मी माझे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात दिले आहे .आपण आपल्या रुटीन प्रमाणे यात बदल करू शकतात. ऑफिसमध्ये चहा पिणे जेवण करतो या वेळेस सादर गोष्ट लवकर करुंन आपण वाचण्यास सुरवात करू शकतो. एखादा व्यक्ती प्रवाश्यात वाचू शकतो .एखादा वक्ती अलार्म लावत सकाळी लवकर उठत तो वेळ वाचनसाठी देऊ शकतो . केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हा मंत्र जपत आपण वाचनाला सुरुवात केल्यास आपले वाचन होऊ शकतो .
चटकन वाचून होणारी कमी पानाची पुस्तके वाचल्यास आपणास अरे माझे आठवड्यात एक पुस्तक वाचून संपले याचा आंनद आपण घेऊ शकतो प्रौढ असलो तरी लहान मुलांची कॉमिक्स वाचून जर पूर्वी वाचले नसेल तर वाचनाची सवय स्वतःला लावून घेऊ शकतो.कॉमिक्स सहजतेने समजत असल्याने वाचनाचा फारसा थकवा देखील येणार नाही.
कमी वेळात जास्तीत जास्त वाचन होण्यासाठी आपण वाचन वेग वाढवण्याचा सराव करु शकतो.वाचन वेग कोणत्या पद्धतीने वाढवता येतो,या विषयी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात माहिती आहे.ती समजून घेऊन त्यानुसार वाचन केल्यास आपण कमी वेळात जास्त वाचू शकतो.वाचनवेग वाढल्याने आपणास जो मोजक वेळ मिळतो त्यामध्ये एखादे पुर्ण पुस्तक देखील वाचून संपवू शकतो.कमी वेळात पुस्तक वाचून पुर्ण झाल्याने आपला आत्मविश्वास वाढून आपला वाचनवेग वाढू शकतो. ज्यामुळे पुर्वीपेक्षा कमी वेळात आपले पुस्तक वाचून पुर्ण होईल.
माझे वाचन या मालिकेतील सहावा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
माझे वाचन या मालिकेतील ५वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
मानववतेच्या तिर्थस्थानाची माहिती देणारे पुस्तक "आनंदवन प्रयोगवन'
जे दुःखी, कष्टी आणि पीडित आहेत, त्यांना जो माणूस आपलं मानतो, तोच खरा साधू (संत) आहे आणि त्याच्या ठिकाणीच देव वास करतो हे सांगणारा संत तुकाराम यांचा 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा अभंग सुरसिद्ध आहे.अभंग सुप्रसीद असला तरी प्रत्यक्षात त्या प्रमाणे वागणारे हाताचा बोटावर मोजता येतील इतकेच लोक आचरण करत असल्याचे आपणास सहज दिसते. या मोजक्या लोकांमध्येच मोजता येतील असे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे होय. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी, दिव्यांग, वनवासी व्यक्ती आणि यासारख्या समाजातील मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या नागरिकांना समजाजच्या मूळ प्रवाहात आणण्यसासाठी लोक बिरादरी, हेमलकसा, आनंदवन सोमनाथ आदी प्रकल्प उभारले आहेत . या प्रकल्पाची माहिती देणारी पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध आहेत अश्याच प्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकांपैकी एक म्हणजे बाबा आमटे यांचे सुपुत्र असलेल्या डॉ विकास आमटे यांनी लिहलेले "आनंदवन लोकवन हे पुस्तक .या पुस्तकात डॉ विकास आमटे "आनंदवन चा इतिहास उलगडला आहे .हे पुस्तक मी नुकतेच वाचले
सोमवार, २६ जानेवारी, २०२६
अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे, 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'
बुधवार, २१ जानेवारी, २०२६
लाईट.. कॅमेरा.... ॲक्शन
गुरुवार, १५ जानेवारी, २०२६
प्रसिद्ध पुस्तकांचे वाचन आणि मी (माझे वाचन भाग क्रमांक ६)
बुधवार, २४ डिसेंबर, २०२५
वाच ग घूमा ...काय मी वाचू ?( माझे वाचन भाग५)
खगोलशास्त्रातील काही बेसिक कंसेप्ट सहजसोप्या भाषेत स्पष्ट करणारे पुस्तक 'स्पेस ट्रॅव्हल'
आणि यु.एस.एस.आर मधील जमिनीवरील युद्ध खगोलशास्रात कसे शिरले ?, याचा संपुर्ण मानवजातीला फायदा झाला की तोटा, झाला.फायदा झाला असल्यास कोणत्या प्रकारे झाला? अवकाशास्त्राचा विचार अत्यंत प्रसिद्ध
उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'
आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
कालचीच गोष्ट आहे , मला एका मित्राने फोन करून त्याच्या मुलाची व्यथा ऐकवली . त्यांची व्यथा अशी होती की, कितीही सांगितले...






































