आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीमूळे शहाणपण येते असे संगितले जाते त्यामध्ये पर्यटन , फिरण्याच देखील समावेश होतो. अर्थात प्रयेकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते .तसेच जग एव्हढे मोठे आहे की,पण राहतो तो आंणि त्याला लागून असलेले ४ ते ५ जिल्हे जरी फिरायचे म्हंटले तरी एक ते दोन वर्ष सहज लागू शकतात. (आता अति परिचयात अवज्ञा किंवा आपण लांबचे एरिया आधी बघू . हा भाग काय जवळचा आहे कधीही बघता येईल,असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर भाग वेगळा ) तर दुसरे देश किमान राज्य बघयाला घेतले तर सर्व आयुष्य देखील पुरणार नाही . मग याला ऊत्तर ते काय ? तर दुसऱ्याच्या अनुभवातून फिरायचे . म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीने लिहलेल्या प्रवास वर्णनातून एखादा प्रदेश समजून घेयचाया ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
लेखाचे विषय
- पुस्तक प्रकार - नियतकालिके (15)
- पुस्तक प्रकार - वाचनीय वृत्तपत्रीय सदरे (1)
- पुस्तक प्रकार -मराठीत अनुवादित (11)
- पुस्तक प्रकार ईबुक (2)
- पुस्तक प्रकार छापील (28)
- पुस्तक प्रकार बालसाहित्य (2)
- पुस्तक प्रकार- चर्चेत असणारी (1)
- पुस्तक प्रकार- विवेकानंद केंद्रातर्फे प्रकाशित (7)
- भाषा - इंग्रजी (4)
- भाषा - मराठी (40)
- माझे स्वत:चे वाचनाच्यावेळचे अनुभव (8)
- लेखक - स्वातंत्र्यवीर सावरकर (1)
- लेखक- अच्युत गोडबोले (19)
- लेखक- गिरीश कुबेर (6)
- लेखिका मीना प्रभू (4)
- विचसारसरणी -हिंदुत्ववादी (2)
- विचारसरणी - दलित साहित्य (1)
- विचारसरणी - विद्रोही साहित्य (3)
- विचारसरणी - समाजवादी (1)
- विषयानुसार - पर्यावरण (3)
- विषयानुसार - क्रीडाविश्व (3)
- विषयानुसार - अभिनेता गुरुदत्त (4)
- विषयानुसार - अर्थशास्त्राविषयक (4)
- विषयानुसार - इतिहास (4)
- विषयानुसार - गुन्हेगारी (3)
- विषयानुसार - चीन (3)
- विषयानुसार - तंत्रज्ञान (2)
- विषयानुसार - नाशिक (4)
- विषयानुसार - महिलांचे भावविश्व (6)
- विषयानुसार - मानसशास्त्र (6)
- विषयानुसार - व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित (1)
- विषयानुसार -वैद्यकीय (3)
- विषयानुसार :संगीत (1)
- विषयानुसार- पश्चिम आशिया (3)
- विषयानुसार- राजकीय (11)
- सर्वसाधारण (9)
- साहित्य (11)
- साहित्य प्रकार - विनोदी या प्रकारात मोडणारे. (1)
- साहित्य प्रकार - कथासंग्रह (5)
- साहित्य प्रकार - कांदबरी (7)
- साहित्य प्रकार - काव्यसंग्रह (1)
- साहित्य प्रकार - नाटक (1)
- साहित्य प्रकार- निबंध (2)
- साहित्येत्तर (15)
- साहित्येत्तर प्रकार - चरित्र (24)
- साहित्येत्तर प्रकार - प्रवासवर्णन (6)
- साहित्येत्तर प्रकार - माहितीप्रधान (29)
- साहित्येत्तर प्रकार - वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह (2)
सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६
जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या शहराची सैर घडणारे पुस्तक ' न्यूयॉर्क'
आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीमूळे शहाणपण येते असे संगितले जाते त्यामध्ये पर्यटन , फिरण्याच देखील समावेश होतो. अर्थात प्रयेकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते .तसेच जग एव्हढे मोठे आहे की,पण राहतो तो आंणि त्याला लागून असलेले ४ ते ५ जिल्हे जरी फिरायचे म्हंटले तरी एक ते दोन वर्ष सहज लागू शकतात. (आता अति परिचयात अवज्ञा किंवा आपण लांबचे एरिया आधी बघू . हा भाग काय जवळचा आहे कधीही बघता येईल,असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर भाग वेगळा ) तर दुसरे देश किमान राज्य बघयाला घेतले तर सर्व आयुष्य देखील पुरणार नाही . मग याला ऊत्तर ते काय ? तर दुसऱ्याच्या अनुभवातून फिरायचे . म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीने लिहलेल्या प्रवास वर्णनातून एखादा प्रदेश समजून घेयचाशुक्रवार, ३० जानेवारी, २०२६
मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)
तर मित्रानो माझ्या पुस्तक निवडण्याचे दोन निकष आहेत .पहिला निकष आहे लेखकाचा तर दुसरा निकष आहे विषयाचा. मी माझे वाचन भाग ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे माझे आवडते लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि गिरीश कुबेर. (आता मला ते लेखक की आवडतो हे ज्यांना माहिती करायचे असेल त्यांनी या लेखालिकेचा भाग क्रमांक ४ वाचावा.त्या ठिकणी मी हा मुद्दा सविस्तर मांडल्याने तो पुन्हा इथे मांडत नाही ) या दोन्ही लेखकांनी
नवीन काही लिहले कि ते वाचण्यास माझी पहिली पसंती आहे मी आतार्यंत अच्युत गोडबोले यांची २० हुन अधिक आणि गिरीश कुबेर यांची जवळपास सर्वच मराठी पुस्तके कितीतरी वेळा वाचली आहेतमी जी पुस्तके वाचनासाठी निवडतो.त्यातील दुसरा निकषाविषयी अर्थात विषयाविषयी झाल्यास मी इयत्ता चवथीपासून खगोलशात्राचा मराठी भाषेत प्रचारप्रसार करणाऱ्या खगोल मंडळाशी निगडित असल्याने असेल मला नॅचरल सायन्स विषयी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली आहे त्यामुळे मी जी पुस्तके वाचण्यासाठी निवडतो त्यामध्ये इतिहास किंवा त्यासारख्या विषयांची माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या ऐवजी नॅचरल सायन्सविषयी माहिती देणारी पुस्तके अधिक वाचतो मी अच्युत गोडबोले आणि गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या शिवाय जी माहिती देणारी पुस्तके वाचतो त्यांची यादी तुम्ही बघितल्यास तुम्हाला हा मुदा अधिक उत्तमरीत्या समजेल
नॅचरल सायन्स सोडून मला आवडणारा दुसरा विषय म्हणजे भारताची आणि अन्य देशांची परराष्ट्र नीती. त्यामुळे त्या विषयवार लिहलेली पुस्तके सुद्धा मी वाचनासाठी निवडतो.माझ्यामध्ये ही आवड निर्माण होण्याचे कारण म्हणजे मी केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास.मी यूपीएससीच्या सिव्हिल सर्विस एक्समचा भाया करताना पहिला ऑप्शनल विषय म्हणून भूगोल हा विषय निवडला होता तर दुसराऑप्शनल विषय म्हणून मी
पोलिटिकल सायन्स हा विषय निवडला होता . या दुसऱ्या ऑप्शनल चा अभ्यास करताना माझी भारताची आणि अन्य देशांची परराष्ट्र नीती या विषयात आवड निर्माण झाली या आवडीतूनच माझी वाचनाची आवड विकसित होत गेलीअर्थात मी फक्त या दोनच विषयाची पुस्तके वाचतो असे नाही. माझ्या माहिती देणाऱ्या पुस्तकाचे वाचन करण्याच्या आवाडीस कोणताही विषय वर्ज नाही फक्त या दोन विषयाचे प्रमाण अन्य विषयापेक्षा काहीसे जास्त असते इतकेच तसेच मी फक्त माहितीपर पुस्तकेच वाचतो असे नाही.तर मी सर्व प्रकारची पुस्तके वाचतो फक्त त्यात माहिती देणाऱ्या पुस्तकाचाचे प्रमाण काहीसे जास्त असते इतकेच आता मी माहितीपर पुस्तकेच का जास्त वाचतो याविषयी सुद्धा माझे वाचनच्या दुसऱ्या भागात सविस्तर लिहले आहे त्यामुळे त्याविषयी सुद्धा इथे जास्त लिहीत नाही
मी जे वाचन करतो ते परिपूर्ण आहे असा माझा मुळीच दावा नाही. .किंबहुना माझे वाचन अत्यंत त्रोटक विस्कळीत काहीच विषयवार आधारित आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही माझ्यामध्ये ज्या प्रकारे वाचनाची सवय विकसित झाली त्याचा प्रकट अविष्कार म्हणजे माझी वाचनाची आवड आणि या आवडीतून दिसत असणारी माझी पुस्तक निवडीची पद्धत मी निवडलेली पुस्तके. (हा विकास कसा होतो याविषयी मी
तिसऱ्या भागात लिहले आहे सबब या विषयी देखील मी द्विरुक्ती टाळतो ) अन्य लोकांचा देखील प्रवास याच पद्धतीने होईल असे नाही मात्र हा प्रवास होण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. मग करणार ना वाचनमाझे वाचन या मालिकेतील सातवा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/01/blog-post_87.html
माझे वाचन या मालिकेतील सहावा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
माझे वाचन या मालिकेतील ५वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
गुरुवार, २९ जानेवारी, २०२६
वाचनाची इच्छा आहे पण ... (माझे वाचन भाग क्रमांक ७ )
माझे म्हणाल तर माझ्या बँगमध्ये नेहमी एक पुस्तक असतेच जर कोणाला भेटायला गेलो आंणि त्या ठिकाणी व्यक्ती भारतीय प्रमाणवेळेला जागून उशिरा आली तर मोबाईल बघण्यापेक्षा मी पुस्तक वाचायला सुरुवात करतो. मी घरापासून दूर राहत असल्याने मेसमध्ये जेवतो त्यावेळेस सुद्धा मेसमध्ये नंबर येण्यापर्यंत वाचू शकतो मी माझे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात दिले आहे .आपण आपल्या रुटीन प्रमाणे यात बदल करू शकतात. ऑफिसमध्ये चहा पिणे जेवण करतो या वेळेस सादर गोष्ट लवकर करुंन आपण वाचण्यास सुरवात करू शकतो. एखादा व्यक्ती प्रवाश्यात वाचू शकतो .एखादा वक्ती अलार्म लावत सकाळी लवकर उठत तो वेळ वाचनसाठी देऊ शकतो . केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हा मंत्र जपत आपण वाचनाला सुरुवात केल्यास आपले वाचन होऊ शकतो .
चटकन वाचून होणारी कमी पानाची पुस्तके वाचल्यास आपणास अरे माझे आठवड्यात एक पुस्तक वाचून संपले याचा आंनद आपण घेऊ शकतो प्रौढ असलो तरी लहान मुलांची कॉमिक्स वाचून जर पूर्वी वाचले नसेल तर वाचनाची सवय स्वतःला लावून घेऊ शकतो.कॉमिक्स सहजतेने समजत असल्याने वाचनाचा फारसा थकवा देखील येणार नाही.
कमी वेळात जास्तीत जास्त वाचन होण्यासाठी आपण वाचन वेग वाढवण्याचा सराव करु शकतो.वाचन वेग कोणत्या पद्धतीने वाढवता येतो,या विषयी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात माहिती आहे.ती समजून घेऊन त्यानुसार वाचन केल्यास आपण कमी वेळात जास्त वाचू शकतो.वाचनवेग वाढल्याने आपणास जो मोजक वेळ मिळतो त्यामध्ये एखादे पुर्ण पुस्तक देखील वाचून संपवू शकतो.कमी वेळात पुस्तक वाचून पुर्ण झाल्याने आपला आत्मविश्वास वाढून आपला वाचनवेग वाढू शकतो. ज्यामुळे पुर्वीपेक्षा कमी वेळात आपले पुस्तक वाचून पुर्ण होईल.
माझे वाचन या मालिकेतील सहावा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
माझे वाचन या मालिकेतील ५वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
मानववतेच्या तिर्थस्थानाची माहिती देणारे पुस्तक "आनंदवन प्रयोगवन'
जे दुःखी, कष्टी आणि पीडित आहेत, त्यांना जो माणूस आपलं मानतो, तोच खरा साधू (संत) आहे आणि त्याच्या ठिकाणीच देव वास करतो हे सांगणारा संत तुकाराम यांचा 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा अभंग सुरसिद्ध आहे.अभंग सुप्रसीद असला तरी प्रत्यक्षात त्या प्रमाणे वागणारे हाताचा बोटावर मोजता येतील इतकेच लोक आचरण करत असल्याचे आपणास सहज दिसते. या मोजक्या लोकांमध्येच मोजता येतील असे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे होय. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी, दिव्यांग, वनवासी व्यक्ती आणि यासारख्या समाजातील मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या नागरिकांना समजाजच्या मूळ प्रवाहात आणण्यसासाठी लोक बिरादरी, हेमलकसा, आनंदवन सोमनाथ आदी प्रकल्प उभारले आहेत . या प्रकल्पाची माहिती देणारी पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध आहेत अश्याच प्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकांपैकी एक म्हणजे बाबा आमटे यांचे सुपुत्र असलेल्या डॉ विकास आमटे यांनी लिहलेले "आनंदवन लोकवन हे पुस्तक .या पुस्तकात डॉ विकास आमटे "आनंदवन चा इतिहास उलगडला आहे .हे पुस्तक मी नुकतेच वाचले
सोमवार, २६ जानेवारी, २०२६
अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे, 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'
बुधवार, २१ जानेवारी, २०२६
लाईट.. कॅमेरा.... ॲक्शन
गुरुवार, १५ जानेवारी, २०२६
प्रसिद्ध पुस्तकांचे वाचन आणि मी (माझे वाचन भाग क्रमांक ६)
समाजाचा वेध घेणारे, विचारांना समृद्ध करणारे मासिक- अनुभव
अनेकदा वाचन म्हटलं की फक्त पुस्तके डोळ्यासमोर येतात . मात्र ते खरे चित्र नाहीये . दर आठवड्याला प्रकाशित होणारे साप्ताहिक , दर...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्र...












