लेखाचे विषय

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

प्रत्येक इतिहासप्रेमींनी संग्रही ठेवावे,असे पुस्तक, 'पेशवेकालीन महाराष्ट्र'

   
 आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनात इतिहास हा विषय आवडत नाही.कंटाळवाणा वाटतो.याचे महत्त्वाचे कारण तो म्हणजे राजकीय इतिहास असतो. इतिहासात वेळोवेळी राज्य केलेल्या व्यक्तींविषयी, त्यांनी केलेल्या युद्ध, लढाया आणि तह करार यांच्या विषयीची माहिती त्यात दिलेली असते. त्यांनी राज्य केले त्यांची माहिती जाणून आता काय उपयोग?या विचारातून इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही इतिहासाची एक बाजू झाली.त्या राज्यकर्त्यांनी ज्या समाजावर राज्य केले,त्या समाजाचा देखील एक इतिहास असतो. जसे एखाद्या प्रदेशातील राजकर्ते बदलतात, तसे हा इतिहास देखील बदलतो.त्यामुळे एखाद्या प्रदेशाचे संपुर्ण  आकलन होण्यासाठी त्या प्रदेशाचा राजकीय इतिहासाबरोबर सामाजिक इतिहास देखील आवश्यक ठरतो.,आणि तो जर आपलाच प्रदेश असेल तर विचारायलाच नको.आपले पुर्वज कोणत्या स्थितीत राहत होते.त्यांच्यापेक्षा आपण कोणत्या पद्धतीने वेगळे रहात आहोत?हे समजले तर सोन्याहुन पिवळे.आपल्या प्रदेशातील सामाजिक इतिहास समजला तर आपल्याला आपण कोण आहोत,हे सहजतेने समजते आपलीच आपल्याला नवी ओळख होते.आपल्या महाराष्ट्राचा बाबत बोलायचे झाल्यास, आपली ही गरज सहजतेने पुर्ण होते ती इसवी सन १९३० ते १९४० या दरम्यानचे विविध कालखंड एकत्रीतपणे विचारात घेता ८ वर्ष दैनिक केसरीचे संपादक असलेल्या वा. कृ. भावे यांनी लिहलेल्या, 'पेशवेकलीन महाराष्ट्र, महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास' या ग्रंथामुळे.जो मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था असलेल्या सावानाच्या मदतीने वाचला.
         या ४५८ पानी ग्रंथात शिक्षणपद्धती,नगररचना, इमले‌ देवालये,मुर्तीकला  व चित्रकला, दास-दासी,  वैद्य व वैद्यक्रिया ,कवी व कीर्तनकार,समाजाची मनोरचना, व्यापार व उद्योगधंदे या सारख्या 31 घटकाद्वारे पेशवेकालीन महाराष्ट्राची आपणास ओळख  करुन दिली आहे..पुस्तकाची प्रथम आवृत्ती जरी १९५६साली प्रसिद्ध झालेली असली,तरी पुस्तकाचे बहुतांस लेखन १९३५साली करण्यात आल्याने पुस्तकाची भाषा त्यावेळच्या ग्रंथप्रामान्यानुसार आहे.मात्र तरी देखील भाषा सहजतेने समजते.(निदान मला तरी)
     पेशवे कालखंड आपल्या महाराष्ट्राचा विचार करता अत्यंत महत्तवाचा आहे. आपल्या भारतासाठी मध्ययुग १८५७पर्यत मानण्यात येते.त्याचा विचार करता मध्ययुगाच्या अखेरीस समाजजीवन कसे होते? तसेच कोणत्या प्रकारच्या समाजजीवनाद्वारे आपला अर्वाचीन (मॉडर्न इतिहास) इतिहास सुरू झाला ?तसेच छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुर्देवी निधनानंतर महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था कोणत्या प्रकारची होती?‌हे समजण्यासाठी आपणास पेशवे कालखंड महत्त्वाचा ठरतो. पेशवे कालखंडाच्या अखेरच्या टप्प्यात बंगाल राज्यात ब्रिटिश राजवट सुरु झाली होती {1756 आणि 1765साली अनुक्रमे प्लासी आणि बक्सरची लढाई झाली.ज्यामुळे बंगालमध्ये ब्रिटीश सत्ता आली असे समजण्यात येते. या दरम्यान 1761 साली पानिपतचे तिसरे युद्ध झाले .तसेच इस्ट इंडीयाचे भारताचे शासन अभ्यासताना आपणास 1783चा रेग्युलेटिंग ॲक्ट दिसतो याचवेळी पुण्यात नारायण पेशव्याचा खुन झाला} त्यामुळे ब्रिटीश राजवट येण्याचा वेळची महाराष्ट्राची स्थिती समजण्यासाठी आपणास पेशवे कालखंड अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ध चा मा करणे,अटकेपार झेंडा रोवणे, पानिपत होणे यासरख्या आता सहजतेने वापरत असलेल्या म्हणींचा उगम हा पेशवे कालखंडातील घटनांपासून झाला आहे.त्यामुळे पेशवे कालखंड आपणासाठी महत्त्वाचा  ठरतो.
    पेशवे कालावधीत स्वधर्मनिष्ठा आणि परधर्म सहिष्णुता कोणत्या प्रकारची होती?त्यावेळेस पाणीपुरवठाविषयक आणि इतर लोकोपयोगी कामे कसी पार पाडली जात? व्यापार उद्योगधंदे यांची आणि लोकांची स्थिती,समाजाची मनोरचना कसी होती?त्यावेळेस ग्रंथसंग्रह आणि ग्रंथवाचन ,गायन,वादन,नर्तन, कसे केले जात?त्याकाळातील सत्पुरुषाची  समाजसेवा,ग्रामव्यवस्था,जमीन महसुल पद्धती,मुलकी खाते,शेतकी खात्याच्या पद्धती,इतर राज्यव्यवस्थांची स्थिती कोणत्या प्रकारची होती?त्या काळात काशीयात्रेची स्थिती कशी होती?त्या काळातील स्वदेशी कापड आणि कपडे कसे असत? त्याकाळी दरबार आणि सणसमारंभ कोणत्या प्रकारचे असत?याची माहिती आपणास पुस्तक वाचताना मिळते.लेखकाने अखेरच्या ३२व्या प्रकरणात उपसंहार करताना, उत्तरेत अथवा दक्षिणेत ज्या प्रकारे भव्य बांधकामे आढळतात,त्या प्रकारची बांधकामे महाराष्ट्रात का आढळत नाही,यावर भाष्य केले आहे.महाराष्ट्रात पितृतुल्य समजल्या जाणाऱ्या न.चि.केळकर यांची ग्रंथाच्या गौरव करणारी प्रास्ताविका हा ग्रंथ किती अभ्यास करुन कष्ट घेवून तयार केला आहे.न.चि केळकर सारख्या श्रेष्ठतम व्यक्तीने कौतूक केलेला हा ग्रंथ आहे.
    आपल्याकडे पेशव्यांचा राजवटीबाबत अनेकांना राग आहे.पेशवाईत काही समाज घटकांवर अन्याय झाल्याचे दाखले देण्यात येतात‌.पेशवाईत विनाकारण होणाऱ्या खर्चाबाबत विविध दावे करण्यात येतात, त्यातील सत्यता बघण्यासाठी प्रत्येकाने हा ग्रंथ किमान एकदा तरी वाचायलाच हवा.

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

नटसम्राट..‌.आयुष्याची दाहकता थेटपणे उलगडवून दाखवणारे नाटक

           
              आपल्या मराठीला अनेक अजरामर साहित्याची परंपरा लाभलेली आहे.जी जिवनाच्या प्रत्येक अंकाला आपले मराठी साहित्य स्पर्श करते.साहित्याचा सर्वच प्रांतात जसे कथासंग्रह, कांदबरी,‌निबंधवजा लेखन,काव्यसंग्रह अगदी नाटकांमध्ये सुद्धा आपल्याला हा ठसा उमटलेला दिसतो.आपल्या मराठीत अनेक धीरगंभीर विषय देखील नाटकांनी यशस्वीरीत्या समाजापुढे आणले आहेत. याच मालिकेत समाविष्ट होवू शकणारे अजरामर नाटक म्हणजे 'नटसम्राट'.माझ्याकडे हे पुस्तक २००४ पासून आहे‌.मी हे पुस्तक अनेकदा वाचलयं. १५ डिसेंबर रोजी घर आवरताना मला हे पुस्तक दिसले,असो .
              तरुणपणी अत्यंत यशस्वी असलेल्या मात्र म्हातरपणात सर्वकाही मुलांकडे सोपवल्याने कफल्लक झालेल्या एका नटाची कथा या नाटकात सांगण्यात आल्याचे आपणास माहिती असेलच. माझ्यामते या नाटकाचे थोडक्यात वर्णन करायचे असल्यास गुरुदत्त या दिग्दर्शित केलेल्या प्यासा या चित्रपटातील 'जाने वो कैसै लोग थे,जिनको प्यार को प्यार मिला, जब हमने कलीयां मांगी काटांका हार मिला' हे गाणे योग्य

ठरेल.दोन्ही ठिकाणी त्यांचा अपेक्षाभंगच दिसतो. तो देखील आपल्याच जवळच्या व्यक्तींकडून तसेच दोन्ही वेळेस आधार मिळतो तो, रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तीकडून.
    नटसम्राट या नाटकामध्ये आणि प्यासा आपणास मानवी जीवनातील सत्यस्थिती दाखवून देते.जग मानवी नात्यापेक्षा पैश्याला अधिक महत्त्व देते.पैसा असेल तर जग मानदेते.पैसा नसेल तर आपले म्हणवणारे देखील परके कसे होतात.तसेच जगात सर्वत्र वाइटच लोक आहेत असे नव्हे तर जगात कमी प्रमाणात का होईना,चांगल्या व्यक्ती देखील आहेत,हा संदेश आपणास नटसम्राट आणि प्यासामधून मिळतो‌.एका अर्थाने एकच कथा यात दोन वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.हे दोघे कलातित सत्यच मांडतात हे तितकेच खरे आहे.

पाकिस्तानमधील राजकीय.सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा मागोवा घेणारे पुस्तक, 'कुंपणापलीकडला देश पाकिस्तान'

                      

    आपल्याकडे पाकिस्तानचे नाव निघाल्याबरोबर सर्वसाधारतः वैरभावना जागृत होते आता काश्मीरमध्ये दहशदवादी कारवाया होत नसल्या तरी, या आधी काश्मीर मुद्यावरून झालेली तीन युद्धे बघता, ती बरोबरच म्हणता येईल . मात्र ही  युद्धे तेथील राजकारणी आणि लष्करशाहीने भारतावर लादलेली होती तेथील जनसामान्यांनी भारताबरोबर केलेली युद्धे नव्हती ती. राजशात्राचा विचार करता, सर्वसामान्य जनता आणि शासनकर्ते या दोन्ही एकमेकांना पूरक मात्र एकमेकांपासून पूर्णतः  वेगवेगळ्या  बाबी आहेत.  त्यामुळे त्यांची सरमिसळ करत शासनकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची मते एकच आहेत असे समजणे चुकीचे आहे,  एकेकाळी एकाच देशाचा भाग असलेल्या आणि आपल्या भारतात काही वर्षापर्यत दहशतवादी कारवाया करणाऱ्या आपल्या शेजारी  देशाची मोठ्या प्रमाणात माहिती असणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते आपणस  माध्यमात येणाऱ्या बातम्यांद्वारे तेथील शासनकर्त्यांची मते समजतात मात्र सर्वसामान्य जनतेची मते समजत नाहीत त्यामुळे आपले पाकिस्तानविषयक मते अपुऱ्या माहितीवर आधारित असतात , असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही मग पाकिस्तानविषयक अचूक मत होण्यसासाठी आपनास सर्वसामान्य जनतेचे मत विचारत घेणे क्रमप्राप्त ठरते   

                    कोणत्याही दोन व्यक्तींचा समाजाचा परस्पर संबंध आल्यास त्या समाजाची अचूक माहिती मिळते आता आपल्या भारतीयांचा आणि पाकिस्तानी समाजाचा थेट संपर्क येणे अवघड पाकिस्तानचा व्हिसा मिळणे भारतीयांसाठी अत्यंत अवघड आहे  मग काय करायचे?  तर जे भारतीय पाकिस्तानला भेट देऊन आले आहेत त्यांचे पाकिस्तानमधील अनुभवांवर आधारित लेखन वाचायचे आणि त्यांचा अनुभवविश्वाशी आपले अनुभ ताडून घेयचे आणि पाकिस्तानबाबत आपली समज अधिक विकसित करायची,  या दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रक्रियेत
आपल्यास मोठ्या प्रमाणात  मदत करते ते पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि मनीषा टिकेकर लिखित 'कुंपणापलीकडला देश पाकिस्तान'  हे पुस्तक जे मी नुकतेच नाशिकमधील सर्वात मोठी सांस्कृतिक संस्था सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने वाचले 
             १९९९ साली अमेरिकेच्या फोर्ड फाऊंडेशनतर्फे एशिया फेलोज प्रोग्रॅम जाहीर झाला या प्रोग्राममध्ये आशियाई देशातील नागरिकांना दुसऱ्या आशियाई देशात जावूं तेथील समाजजीववनाचा अभ्यास करता येणार होता याच कार्यक्रमांनातर्गत लेखिकेला सहा महिने पाकिस्तानात जाऊन तेथील समाजजीवन जवळून बघण्याची संधी मिळाली या दरम्यान लेखिकेला जे अनुभव आले ते म्हणजे सदर २४७  पानाचे हे  पुस्तक होय  पुस्तक प्रास्ताविक, पाकिस्तान सांस्कृतिक वीण, पाकिस्तान राजकारणाचा बाज, पाकिस्तान सामाजिक पैलू या चार भागात विभागले आहे सहजा प्रास्ताविकला पुस्तकाचा भाग समजत नाही याही पुस्तकात तसे केलेले नाही मात्र एकूण पुस्तकाच्या पानाचा विचार करता जवळपास १० टक्के भाग (२३ पाने ) हि प्रास्ताविकात व्यापली गेली असल्याने मी  याचा स्वतंत्र्य भाग केला आहे प्रत्येक भाग २ ते ७ प्रकरणात विभागाला आहे . 
        प्रास्ताविकात लेखिकेला पाकिस्तानचा व्हिसा मिळण्यासाठी काय अडचणी आल्या / त्या कोणत्या प्रकारे
सोडवण्यात आल्या .त्यासाठी लेखिकेला भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांची कोणत्या प्रकारे मदत झाली  तसेच व्हिसा मिळवतना वाया गेलेला वेळ फोर्डने कसा माफ केला ? याविषयी सांगितले आहे 
         पहिल्या पाकिस्तान सांस्कृतिक वीण या भागात लेखकेने तिच्या पाकिस्तानमधील वास्तव्यात तिने भेट दिलेल्या इस्लामबाबाद, लाहोर पेशावर कराची, तक्षशिला, रावळपिंडी या शहरांविषयी सांगितले आहे यात फक्त मी येथे या व्यक्तींना भेटले असे सांगितले नसून शहर कसे आहे शहराची ओळख देखील यामध्ये करून देण्यात आलेली आहे प्रत्येक शहराला इतिहासाचा वारसा असतो सांस्कृतिक ओळख असते लेखिकेने आपल्याला तिच्या लेखनात इस्लामबाबाद लाहोर पेशावर कराची तक्षशिला रावळपिंडी येथील ओळख करून देताना याचा आधार घेतल्याचे आपणस समजते प्रास्ताविक वगळून असलेल्या पुस्तकाचा विचार करता, जवळपास निम्मे पुस्तक या भागाने व्यापले आहे. 
      दुसऱ्या भागात अर्थात पाकिस्तान राजकारणाचा बाज या भागात पाकिस्तानमधील लोकशाहीविषयी आणि लष्कराच्या सहभागविवषयी दोन प्रकरणाद्वारे सांगितले आहे , हा भाग पुस्तकातील सुमारे ५० पाने व्यापतो 
तिसऱ्या भागात सुमारे ४० पानांद्वारे लेखिकेने पाकिस्तानी समाजसांस्कृतिक विश्व आणि सर्वसामान्य पाकिस्तानी व्यक्तीला भारताविषयि  काय वाटते याविषयी ३ प्रकरणाद्वारे सांगितले आहे 
   लेखात सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानविषयी तेथील समाज जीवांविषयी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे  

रविवार, १ डिसेंबर, २०२४

प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक,'सायबर अटॅक'

 सध्याचे जग सातत्याने विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे,हे कोणीही  नाकारू शकत नाही. कोव्हिड १९ च्या साथरोगानंतर तर आपल्या आयुष्यातील त्याचा वापर अजुनच वाढलेला आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजियन्स क्षेत्रातील प्रगतीमुळे तो अधिकाधीक वाढतच जाणार आहे,हे सुद्धा नाकारता येणे अशक्य.त्यामुळे तंत्रज्ञान स्नेही असणे सध्याचा काळात अत्यंत आवश्यक आहे.जर आपण काळानुरुप बदललो नाही तर  कोडॉक, नोकिया या एकेकाळच्या डॉन  म्हणता येईल, मात्र आज अस्तिवासाठी  लढणाऱ्या कंपन्यासारखे नष्ट होवू
   तंत्रज्ञानाचाच फायदा घेत त्यात पारंगत होण्याचा विचार केला असता,आपली फसगत होण्याचा धोका देखील मोठा प्रमाणात आहे. ऑफलाईन जगात ज्याप्रमाणे चांगले लोक  आहेत वाईट लोक आहेत.तोच प्रकार ऑनलाईन जगात आहे. ऑफलाईन जगात व्यक्ती समोर असल्याने त्याचा देहबोलीतून आपण सदर व्यक्ती चांगली की वाइट हे ओळखु शकतो‌.मात्र तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारी व्यक्ती समोर नसल्याने, सदर व्यक्ती चांगल्या हेतूने संवाद साधत आहे की, त्याचे हेतू वाइट आहे.हे समजत नाही. सध्या गाजत  असणारे 'डिजीटल अरेस्ट'  हे फसवणूकीचे प्रकार हे या धोक्याचे एक उदाहरण म्हणता येईल.मात्र लेखाच्या सुरवातीलाच सांगितले त्या प्रमाणे आपल्याला आपले जीवन  तंत्रज्ञान स्नेही सध्या काळाची गरज आहे. या कात्रीतून मार्ग काढायचा असल्यास आपणाला विश्वासार्ह्य मार्गदर्शकाची गरज निर्माण होते, आणि ही गरज आपली सहजतेने पुर्ण होते.ती राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ.संजय तुंगार,आणि सुधीर साबळे यांनी एकत्रीतपणे लिहलेल्या, 'सायबर अटॅक' या पुस्तकामुळे.
नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने मी सदर पुस्तक नुकतेच वाचले.
या पुस्तकात सध्या विशेष चर्चेत असलेल्या ,तूमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, ही भुलथप तसेच हनी  ट्रॅप, व्हाटसप हॅक होणे,धर्मांतराचा खेळ, ऑनलाईन गेमचे मोहजाल, डेबीट कार्ड क्लोनिंग,सेक्शटार्शन  ,झूम मिटिंगद्वारे होणारी,फिशिंगद्वारे होणारी,टिंडर सारख्या प्लॅटफॉर्म होणारी फसवणूक, ऑनलाईन कर्जाद्वरे फसवणूक, कशी होते,त्यापासून कोणत्या प्रकारे बचाव करावा, ऑनलाईन जगात अती घाई कशी अडचणीची ठरते.तसेच ऑनलाईन जगात क्लिक करताना,काय काळजी घेयला हवी, ऑनलाईन सुविधेमुळे घर सोडून गेलेल्या व्यक्ती कोणत्या पद्धतीने सापडू शकतात ,या सारख्या सुमारे 35 गोष्टी वेगवेगळ्या प्रकरणाद्वारे सांगण्यात आलेल्या आहेत.पुस्तक तांत्रीक माहिती देत असले तरी पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे.पुस्तकाच्या शेवटी तीन परिशिष्टाद्वारे सायबर गुन्हेगारीबाबतची भारतातील सद्यस्थिती, आपल्याबाबत सायबर गुन्हा घडल्यास कोणती पाउले उचलावीत,तसेच पोलीस स्टेशन आणि बँकेला कोणत्या स्वरूपात अर्ज करावा याबाबत सांगण्यात आले आहे.

   या पुस्तकाच्या दोन लेखकांपैकी एक असणारे  डॉ.संजय तूंगार हे पोलिस दलात कार्यरत आहेत.डॉ. तुंगार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आयक्तलयात कार्यरत असताना, तेथील सायबर ठाण्याचे काम बघीतले.या दरम्यान त्यांनी अनेक गुन्ह्मांची उकल केली आहे.सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिकारी
कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमात, एस.ओ.पी.तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता .तर दुसरे लेखक सुधीर साबळे  हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.त्यांना पत्रकारीतेचा २५वर्षाचा अनुभव आहे. सुधीर साबळे यांनी पत्रकारीता करताना, सायबर गुन्हांविषयी मोठ्या प्रमाणात वार्तांकन केले आहे तसेच सायबर गुन्हे याबाबत त्यांनी अनेक प्रबोधनपर लेख आणि कथा लिहल्या आहेत. दोन्ही लेखकांना सायबर गुन्हे याबाबत असे सविस्तर ज्ञान असल्यामुळे पुस्तक अत्यंत माहितीपुर्ण झाले आहे.त्यामुळे डिजीटल अरेस्टया सारख्या फसवणूकीची बातमी आपल्याबाबत प्रसिद्ध होवू नये असे वाटल्यास पुस्तक नक्कीच वाचा.




गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

'चीन, रंग आणि ढंग', कोरोना पश्च्यातील चीन उलगडणारे पुस्तक

   
गेल्या दोन तीन वर्षापासून मराठीत विविध विषयांवर  माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत.पुर्वी या विषयांवर मराठीत अभ्यासपुर्ण पुस्तक येणे शक्यच नाही असे वाटे, त्या विषयांवर देखील माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत .जे अत्यंत उत्तमतेचे लक्षण म्हणता येईल. सातत्याने वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह,भारताच्या  परराष्ट्र धोरणावर परीणाम करणाऱ्या चीन सारख्या देशांवर देखील आता मोठ्या संख्येने पुस्तके निघत आहेत.याच मराठी पुस्तकांमध्ये समावेश होवू शकेल असे एक पुस्तक, मी नूकतेच वाचले.'चीन, रंग आणि ढंग',  या ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ. अनंत पा. लाभसेटवार यांनी लिहलेल्या या पुस्तकात कोव्हिड नंतरच्या जगात चीनचे आर्थिक,राजकीय,आणि लष्करी स्थान काय असेल.याबाबत माहिती मिळते. 
       सुमारे पावणेतीनशे पानाचे हे पुस्तक, चीनचे नेतृत्व, राजकारण, अर्थकारण, करोनाचे हत्याकांड या चार भागात विभागले आहे. प्रत्येक भाग विविध प्रकरणात विभागला असून पुस्तकात एकुण ४५ प्रकरणे आहेत. मुखपृष्ठावर लाल रंगाच्या पार्श्वभुमीवर पृथ्वीला गिळू पाहणाऱ्या ड्रॅगनचे छायाचित्र पुस्तक कोणत्या विषयावर आहे, आणि पुस्तकाचा रोख कोणत्या बाजूने आहे, हे सहज दाखवून देते. पुस्तकात देखील चीन जागतिक महासत्ता होण्यासाठी किती आसुसलेला आहे, तो अमेरीका आणि आपल्या भारताच्या प्रगतीसाठी स्पर्धक नसुन शत्रू आहे.हे स्पष्ट करुन सांगितले आहे.हे.मी या आधी चीनविषयक वाचलेल्या पुस्तकाच्या तूलनेत  पुस्तकाची भाषा काहीशी कठिण आहे. अर्थात इतर पुस्तकापेक्षा यामध्ये चीनविषयक सखोल चर्चा करण्यात आलेली आहे ,हे सुद्धा खरे आहे. पुस्तक चीनविषयक जाणकार व्यक्तीने लिहले आहे,मराठी भाषा जाणकराने नाही त्यामुळे भाषेचा अवघडपणा क्षम्य आहे.
          पुस्तकाची पहिली आवृत्ती ही जानेवारी २०२३रोजी निघाली असल्याने, पुस्तकात  अगदी आताची ताजी माहिती मिळते, असे म्हटलास वावगे ठरणार नाही.मराठीतील अन्य चीनविषयक पुस्तकांमध्ये प्रामुख्याने १९७८ नंतर चीन कोणत्या प्रकारे बदलला यावर अधिक भर देत असताना (किमानपक्षी मी वाचलेल्या) हे पुस्तक त्याचा ओझरता ऊल्लेख करत मुख्य भर विद्यमान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यावरच करते.पुस्तकात चीनबाबत योग्य ती रणनिती आखण्याबाबत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन कसे कमी पडले.या चूकीच्या रणनितीचा चीनला कोणत्या प्रकारे फायदा झाला यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. नविन सिल्क रूटमुळे जागतिक स्तरावर व्यापारात होणारे बदल ,चीनचे चलन युऑन हे डॉलरला पर्याय म्हणून उभे करण्यासाठी चीन करत असलेले प्रयत्न, चीनमुळे
नव्या शीतयुद्धाचा धोका कोणत्या प्रकारे तयार होत आहे.व्यापारी प्रश्नांवरुन चीन आणि अमेरिका या दोन देशातील संबंध कसे ताणले गेले आहेत? चीनच्या कर्जाचा विळख्यात कोणत्या प्रकारे देश सापडत आहे.कोव्हिडमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेमुळे कोणते बदल झाले.या काळात चीन आणि अमेरीका राजनैतिक संबंधात कोणत्या प्रकारे बदल झाला.शि जिनपिंग यांच्या राजकीय प्रवास कोणत्या प्रकारे झाला. चीनमधील छळछावण्या, तैवानप्रश्नी  सर्वसामान्य चीन नागरिकांची,आणि चीनी सरकारची भुमिका आणि वस्तूस्थिती, शि जिनपिंग यांची चीनमधील एकाधिरशाही हुकुमशाही, चीनमधील मानवी मुल्यांच उल्लंधन आदी विविध विषयांवर पुस्तकात सविस्तर चर्चा केली आहे.
    आपल्या भारतीयांसाठी कळीचा मुद्दा असलेल्या भारत चीन संबधावर लेखकाने अन्य चीनविषयक पुस्तकाप्रमाणे स्वतंत्र्य प्रकरणाद्वारे भाष्य केलेले नाही. तर भारत चीन संबंधांवर, भारत चीन यांच व्यापारयुद्ध आणि भारताला संधी,युरोप चीन भारत या तसेच चीनची पुन्हा जीत:भारताची हार या प्रकरणाद्धारे भाष्य केले आहे सुमारे पावणेतीनशे पानांच्या या पुस्तकात सुमारे १८पाने लेखकाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यरीता भारत चीन संबंधावर भाष्य करण्यासाठी खर्ची घातली आहेत. यामध्ये चीनचे युरोपीय यूनीयसी असणारे ताणलेले आर्थिक हितसंबंध आणि त्यामुळे होणारा भारताचा फायदा, चीन भारत राजनैतिक चर्चांमध्ये भारत पुर्वीपासून घेत असलेली मवाळ काहीशी पराभुताच्या मानसिकतेची भुमिका तसेच चीन घेत असलेली आढ्यतेची अहंपणाची  भुमिका, मोदींमुळे या भुमिकेत
होणारे बदल, भारताचे लष्करी,हवाई बळ आणि चीनचे लष्करी हवाई बलाबळ, तसेच अमेरिका चीन व्यापारी युद्धाचा भारतातील कारखानदारीला कोणत्या प्रकारे फायदा होवू शकतो आदी बाबींचा समावेश आहे.
पुस्तकाची भाषा समजण्यास थोडी कठिण असली,पुस्तक वाचताना कंटाळा येण्यासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असली तरी पुस्तक खुपच माहितीपुर्ण आहे हे नाकारता येत नाही.मी आतापर्यत मराठी भाषेत चीनविषयक वाचलेल्या पुस्तकापैकी सर्वात माहितीपुर्ण पुस्तक म्हणून या पुस्तकाची निवड करेल.चीनविषयक आपल्या अनेक धारणा या पुस्तकामुळे दुर होवून आपणास वस्तूस्थिती समजते.मग वाचणार ना पुस्तक.

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'

          आपल्या महाराष्ट्राला मोठा समृध्द सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होणारे आणि बौद्धीक फराळ म्हणून सर्वांना परिचीत असलेले 'दिवाळी अंक' हे या समृध्द सांस्कृतिक परंपरेतील एक महत्तवाचा घटक, ज्याला शतकोत्तर वर्षाची समृध्द परंपरा आहे. आज विविध विषयावर दिवाळी अंक निघत आहेत.कोव्हिड साथरोगामुळे मंदावलेल्या अर्थकारणामुळे ते दोन वर्ष दिवाळी अंकाची परंपरा रोडावली असली तरी ते दोन वर्ष सोडल्यास पुन्हा एकदा ही परंपरा मोठ्या जोमाने पुन्हा एकदा सुरु झाली आहे 2024 या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे अनेक विषयावर  दिवाळी अंक निघाले आहेत.त्यापैकी एक उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेला 'भवताल' हा दिवाळी अंक मी नुकताच वाचला.
          नेहमीप्रमाणे भवतालचा हा अंक देखील संग्रही ठेवावा,असाच झाला आहे.प्रत्येकवेळी एक पर्यावरणाशी संबंधीत संकल्पना घेवून, त्यावर आधारीत सुमारे 150 पानाचा अंक काढणारे,  लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक अभिजित घोरपडे यांची यावेळची संकल्पना देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' या पर्यावरणाच्या विचार करता काहीशी वेगळ्या वाटणाऱ्या संकल्पनेवर आधारीत दिवाळी अंक ही यावेळी काढण्यात आला आहे. कोणतीही संस्कृती पूर्णपणे अलिप्त राहून विकसीत होवू शकत नाही.कोणत्याही संस्कृतीत वेळोवेळी अन्य संस्कृतीतील चांगल्या बाबींचा स्विकार करणे सुरुच असते. त्यामुळे आमच्याकडे सर्वच होते.आम्हाला सर्वकालीक महान  संस्कृतीचा वारसा आहे. हा अभिमान खोटा आहे.दांभिकपणा आहे.तसेच आमच्या संस्कृतीवर परिणाम होईल,म्हणून अन्य संस्कृतीतील उत्तम गोष्टी स्विकारण्यास तयार नसणे चूकीचे आहे.‌आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीने देखील इतर संस्कृतीच्या अनेक बाबी सहजतेने स्विकारलेल्या आहेत. इतर संस्कृतीकडे आपण स्वीकारलेल्या बाबी आता आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की आता त्यांना वेगळे म्हटले तर आपले हसु देखील होवू शकते.या देवाण घेवणीचा वारसा आम्ही मांडत आहेत,असे संपादकीयात सांगत अभिजित घोरपडे यांनी या अंकामागची पार्श्वभुमी स्पष्ट केली आहे.
       भवतालच्या 2024च्या दिवाळी अंकात आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीवर स्थापत्यशैली, मराठी भाषा, खाद्यसंस्कृती,मुंबईची जडणघडण, इराणी लोकांशी कोणत्या माध्यमातून आणि कश्या प्रकरे भारतीयांचा संबंध आला,ते भारतात कोणत्या प्रकारे समावून गेले, तसेच आता कोणत्याही देवळांचा अविभाज्य घटक म्हणता येईल असा महिरप हा घटक आपण इस्लामी संस्कृतीकडून घेतला यासारख्या अनेक विषयाबाबत वेगवेगळ्या 18 लेखातून सविस्तर माहिती मिळते.या 18 लेखांपैकी 3 लेखांचा अपवाद वगळता अन्य सर्व लेख संबंधित विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या तज्ञ व्यक्तींनी लिहलेले आहेत.त्यामुळे अंक खुप माहितीपुर्ण झाला आहे.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही‌.बटाटा, मिरची या सारखे आपल्या खाण्याचा अविभाज्य भाग झालेले खाद्यपदार्थ मुळातील भारतीय नाहीत तसेच आपल्याकडे पुर्वापार असलेले मात्र सध्या काहीसे मागे पडलेले भरडधान्य बी 12 या जीवनसत्वाचे मोठे स्त्रोत आहेत.महिरप ही वास्तूरचनेतील संकल्पना भारतात कशी रुजली.इस्लामी परंपरेत तीचे स्थान काय आहे?या सारखी अनेक विषयावरची माहिती आपणास या दिवाळी अंकाच्या वाचनातून मिळते. भवतालच्या या आधीच्या दिवाळी अंकाप्रमाणेच याही अंकात  फोटो मोठ्या प्रमाणात वापरले आहेत,त्यामुळे अंकातील माहिती चटकन समजते‌
      दिवाळी अंकावर टिका करताना सातत्याने फक्त जाहिराती छापण्यासाठी दिवाळी अंक काढले जातात,असे म्हटले जाते‌.अनेक दिवाळी अंकात मोठ्या प्रमाणात असलेल्या जाहिरातीमुळे ते काही अंशी खरे देखील वाटते मात्र भवताल च्या या अंकात आपणास फक्त मलपृष्ठावरील दोन जाहिराती वगळता अन्य जाहिराती आढळत नाहीत.त्यामुळे वाचताना सातत्य रहाते वाचताना जाहिरातीमुळे येणारा अडथळा येत नाही.सध्याचा महागाईच्या काळात कोणत्याही प्रकाशनास आपले पुस्तक मासिक वाचकांपर्यत पोहोचण्यासाठी लागणारा खर्च वसूल करत आपले साहित्य कमी किमतीत देण्यासाठी जाहिरातदार अत्यावश्यकच आहे.अस्या परिस्थितीत अन्य प्रकाशनाइतकीच किंमत (300रूपये) ठेवत जाहिरात देखील कमी घेत अंक काढण्यासाठी अभिजित घोरपडे आणि संपुर्ण भवताल टिमचे करावे तितके कौतूक कमीच आहे.त्यामुळे नविन काही जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांनी अंक वाचावाच तसेच त्यांच्या धडपडीला बळ देण्यासाठी आपण देखील हा अंक विकत घेवून वाचावा,आणि इतरांना देखील तसे सांगावे.

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारी कादंबरी 'मुंबई दिनांक'

           

 १६ नोव्हेंबर १९७९ ही  फक्त एक तारीख नहिये.  आपल्या मराठीतील ज्याला ऑल टाइम ग्रेट सिनेमा म्हणता येईल अश्या 'सिहासन' या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ती तारीख आहे .  आपल्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिगर्शक निर्माते असलेल्या जब्बार  पटेल यांची कलाकृती असलेला हा चित्रपट आज त्याला निर्माण होऊन ४५ वर्षे अर्थात २५ वर्षाची एक पिढी या हिशेबाने दोन पिढ्याच्या कालावधी होत असला असला तरी  कालसुसंगत वाटतो, कंटाळवाणा होत नाही. यातच त्याचे महत्त्व  अधोरेखित होते. चित्रपट यशस्वी होण्यामागे चित्रपटात अभिनय करणारे कलाकार जितके महत्वाचे असतात तीतकीच महत्वाची असते चित्रपटाची पटकथा.  चित्रपटाची  पटकथा सशक्त होणार का . यामध्ये पटकथा लिहणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाची असते पटकथा. ज्या  कथा कादंबरीवर आधारित आहे त्याचे सशक्त असणे  सिंहासन हा चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारित आहे त्या देखील तितक्याच सशक्त असल्याने चित्रपट जवळपास पन्नाशीत आला तरी आपल्याला खिळवून ठेवतो त्यामुळे या चित्रपटाची पटकथा ज्या दोन कादंबरीवर आधारित आहे त्या वाचण्याची मला पूर्वीपासून इच्छा होती सिंहासनच्या दोन कादंबरीपपैकी मी सिंहासन ही कादंबरी मी खूप दिवसापूर्वीच वाचली.  मात्र 'मुबई दिनांक' ही कादंबरी वाचण्याची माझी इच्छा मात्र काही करणाने अपूर्णच राहत होती मात्र  नुकतीच माझी  'मुबई दिनांक' ही कादंबरी वाचण्याची इच्छा पूर्ण झाली .  मला ही कादंबरी कशी वाटली हे आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या या लेखाचे प्रयोजन (ज्यांना माझ्या सिंहासन या कादंबरीच्या लेखाविषयी जाणून घेयचे असेल त्यांनी लेखाच्या शेवटी असलेल्या लिंकवर क्लिक करावे 

         सिंहासन या कादंबरीप्रमाणे मुबई दिनांक या कादंबरीचे लेखन सुद्धा अरुण साधू यांनी केलेले आहे मात्र सिंहासन ही कादंबरी जशी वाचताना आनंद देते, सहजतेने समजते तसे दुर्दैवाने या कादंबरी विषयी म्हणता येऊ शकत नाही.  कादंबरी अनेक ठिकाणी काहीशी कंटाळवाणी होते काही प्रसंग उगीचच काही गरज नसताना काहीसे ताणले गेले आहेत असे वाटते.  सिंहासन या कादंबरीत जशी  नाट्यमयता आहे पुढे काय घडू शकेल याचा अंदाज  बांधता येत नाही.  तसे मुबई दिनांक याबाबत होत नाही पुढे काय घडू शकेल याचा अंदाज बांधता येतो

सिंहासनपेक्षा अधिक ठळकपणे डिकास्टा याचा उल्लेख येतो  डिकास्टावर लेखकाने जवळपास ५५ ते ६० पाने खर्ची घातली आहेत मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे यांचे पात्र देखील या कादंबरीत अधिक ठळक केले आहे तसेच मूळ चित्रपटात दाखवण्यता आलेला आणि सिंहासन या कादंबरीत ओझरता देखील उल्लेख नसणारा, स्मग्लर्स चे काळे विश्व दाखवणारा प्रसंग 'मुंबई दिनाक या कादंबरीत अधिक ऊतमपणे रंगवण्यात आला आहे डिकास्टा एव्हढीच सुमारे ५० ते ५५ पाने हा प्रसंग आणि या वेळी ज्याची हत्या होते त्या पाणीटकराचे भावविश्व उभारण्यासाठी लेखकाने उभारलेली आहे 

      सिंहासन ही कादंबरी मुख्यतः  मंत्रीमंडळातील अंतर्गत राजकारणावर भाष्य करते तर मुंबई दिनांक ही कादंबरी मुख्यतः मंत्रिमंडळाबाहेरील सत्ता नाट्यावर मार्मिक भाष्य करत बोट ठेवते . मुबई दिनांक या कादंबरीतील कथानक प्रामुख्याने पाच नायकांभोवती फिरते. स्टार वेस्टर्न या इंग्रजी दैनिकाचा मुख्य वार्ताहर, जो एका वारांगनेवर प्रेम करत असतो आणि ज्याने आपल्या प्रेमापोटी तिला ते काम करायला परावृत्त केले असते असा  अय्यर, कामगार नेता डिकास्टा,,मंत्रालयात  काम करणारा ३० वर्षीय अविवाहित आणि एका  दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम करणारा लहान भावाच्या तुलनेत स्वतःला कमी समजणार किरण वझे

आणि काही कौटूंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी वाममार्गाला लागलेला आणि आणि आता त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असलेला पत्नी आणि बारा वर्षाची मुलगी असलेला पाणीटकर आणि मुखमंत्राची जिवाजीराव शिंदे हे कादंबरीचे मुख्य पाच नायक संपूर्ण कादंबरी त्यांच्या भोवती फिरते. कादंबरीची रचना प्रकरणनिहाय करण्यात आलेली असून प्रत्येक पात्राबाबत दोन प्रकरणे लेखकाने रचली आहेत जी एकामागून एक येतात सर्व पात्रांची पहिले प्रकरणे विस्तृत असून त्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश पुस्तक लेखकाने खर्च केले आहे मी लेखाच्या सुरवातीला सांगितले त्या प्रमाणे पुस्तक काहीसे कंटाळवाणे होते ते या मोठ्या असणाऱ्या ठळक रुपाने मांडलेल्या पात्र रचनेमुळेच 

सिंहासन या मराठीतील ऑल टाइम ग्रेट म्हणता येईल अश्या  चित्रपटाची मूळकथा आपल्यास चित्रपट समजण्यासाठी मदत तर करतेच मात्र राजकारण कसे चालते ? या बाबत देखील आपणास खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. आपल्या येथील इंधनाचे भाव काय असतील आपण आपल्या घामाच्या पैशातील किती रक्कम कररूपाने देणार आहोत आपला कर सरकार कोणत्या कारणास्तव खर्च करणार आहे? आपल्या प्रदेशात कोणत्या  नवीन उदयोग धंद्याच्या संधी निर्माण होणार आहेत हे सर्व राजकारणी व्यक्तीमार्फत समजते त्यामुळे राजकारण समजल्यास आपणस जवाबदार नागरिक होण्याच्या प्रक्रियेत मदत होऊ शकते  त्यामुळे आपण हे पुस्तक वाचघायलाच हवे 


सिंहासन या कादंबरीविषयी मी याच्या आधी लिहलेला लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा


https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2023/11/blog-post.html 

राष्ट्रीय प्रतीकांच्या उभारणीची प्रेरणादायी गोष्ट- कथा विवेकानंद शिला स्मारकाची

कन्याकुमारी , अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे वगळता भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक असलेले एक असे शहर आहे , जि...